गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

                वयाचे  टप्पे 

बालपण देगा देवा ,ठेवा जपून आनंदाचा ”ठेवा ”
सोळावे वरीस  ,गद्धे पंचविशी  चे अडथळे पार करीत ,सोनेरी स्वनांचा तारुण्याचा काळ सर्वाना वाटे हवा हवा ,
पुढे जोडीदाराच्या मदतीने संसाराचा गाडा ओढण्याची असते मोठी जवाबदारी ,
मुलांचे शिक्षण -आरोग्य -लग्न-स्वावलंबन यात आव्हाने येतात कितीतरी ,
सोबत आई -वडील परिजनांची काळजी ,अन नाती जपण्याची कसरत ,जणू चालणे तारेवरी ,
बांधावा लागतो लवचिक पूल ,पुढच्या -मागच्या पिढीची सांधायला दरी ,
हेसगळे करताना उभयतांच्या उतरणीच्या नियोजनाची ही घ्यायची असते खबरदारी . 
साठी -सत्तरीच्या मधे सुरु होते आयुष्याची उतरणी ,
तुलनेने थकते शरीर ,साठी बुद्धि नाठी सारख्या चिकटतात म्हणी ,
हा काळ होतो सुसह्य ,जर जपले असेल तन -मन-धनाचे आरोग्य तरुणपणी ,
म्हातारपण -बालपणात साम्य असते ,ही भावना सकारात्मकता दर्शविणारी ,
बालके बोट धरून चालणारी ,एकच प्रश्न अनेक वेळा विचारणारी ,
उतरणीतही तेच असते ,फरक एवढाच एक कृती आनंद देणारी तर दुसरी वैताग देणारी ,
म्हातारपण -बालपण जणू चंद्राची कोर ,कृष्ण -शुक्ल दोन्ही पक्षात दिसणारी ,
एक कोर वाढत वाढत पूर्ण चंद्राच्या रूपाने शीतल प्रकाश देणारी ,
तर दुसऱ्या पक्षातील कमी कमी होत ,कोर रूपाने अंधारात विलीन होणारी ,
पण अमावस्येच्या अस्तित्वा मुळेच पौर्णिमा येते लखलखणारी ,प्रकाशाच्या वाटा दाखवणारी ,
देवा जेष्ठांच्या अनुभवाची शिदोरी ठरू दे समाज -संस्कृतीला  पोषक अन समृद्ध करणारी .
          आसावरी जोशी 
     मो. ९६८९३९०८०२






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा