कैरी चा छुन्दा
साहित्य - राजापुरी कैरी सारख्या रेषा नसलेल्या बेताच्या आंबट कैरीचा साल काढून केलेला जाङसर कीस दोन वाट्या ,दोन वाट्या साखर ,दोन टी स्पून लालरंगाचे तिखट ,एक टी स्पून मीठ ,दोन टी स्पून जिरे +दोन इंच दालचिनी +सात -आठ लवंगा ,या तिन्हींची किंचित गरम करून केलेली जाडसर पूड करावी .कृती -कैरीचा कीस ,साखर ,मीठ एकत्र करून दोन तास झाकून ठेवावे म्हणजे साखर विरघळते .हे मिश्रण एका काचेच्या पसरट बोल मध्ये घालून दोन मिनिटे मायक्रोवेव्ह करावे ,हलवून पुन्हा दोन मिनिटे ठेवावे असे मिश्रणातील पाक आटून एक तारी होई पर्यंत पाच सहा वेळा करावे .थोडे सरसरीत असताना बाहेर काढावे . गार झाल्यावर मिश्रण अजून घट्ट होते .कोमट असताना तिखट ,
आणि जिरे लवंग दालचिनीची ची केलेली पूड घालून हलवावे . छुन्दा तयार !!
काही लोक स्टील च्या परातीत मिश्रण घालून वर पातळ फडके बांधून सन ड्राय करतात ,तर काही लोक गॅस च्या मंद आचेवर एक तारी पाक होई पर्यंत शिजवतात .
टीप -घावन ,पराठे थालीपीठ ,सँडविच या बरोबर आंबट गोड तिखट चवीचा छुन्दा छान लागतो .
आसावरी जोशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा