त्रिस्थळी यात्रा ७-११-२४ तें १५-११-२४भाग्यश्री ट्रॅव्हल +पंचकन्या
मैत्रिणीं मुळे त्रिस्थळी यात्रेचा योग आला जुळून ,प्रयागराज ,अयोध्या ,नंदीग्राम ,सारनाथ ,काशी ,गया ,बौध्दगया ,चित्रकूट ,गुप्तगोदावरी ,आदि तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले जवळून ,
प्रयागराजला गंगा -यमुना- गुप्त सरस्वती च्या संगमावर गेलो बोटीतून,
संगम असुनही गौरवर्णी गंगा ,सावळी यमुना ,गुप्त सरस्वती आपले अस्तित्व आहेत टिकवून ,
यमुना शांत तर गंगा थोडी चंचल असल्याने संगमाचे स्थान थोडेफार बदललेले येते दिसून ,
प्रयागराज /अलाहाबाद नेहरुंचे -इंदिराचे जन्मस्थान आनंदभवन ,चंद्रशेखर आझाद पार्क ,विद्यापीठ ,कोर्ट आदि परिसर पहिला फिरून ,
चित्रकूट ला गुहेतील गुप्त गोदावरी ,स्फटिक शिळा राम -भरत भेटीचा प्रसंग आठवून डोळे आले भरून ,
अयोध्ये जवळील नंदी ग्राम हून भरताने चौदा वर्षे अयोध्येचा कारभार शत्रुघ्नाच्या मदतीने सांभाळला दुरून ,
तेथे भरत मंदिर ,भरतमारुती भेट ,कल्की मंदिर इत्यादी बघून विविध नात्यातील प्रेम आले उलगडून ,
२२-१ - २४ला राम लल्ला आला मोहक बालरुपात अयोध्येला जन्मस्थानी ,कलियुगातील वनवास संपवून ,
अयोध्याधाम ,अयोध्या ,वाल्मिकी विमानतळ , लतामंगेशकर चौक ,शरयू घाट ,देवादिकांच्या सुंदर मुर्त्या ,हनुमान गढी ,कनक भवन एकूणच शहर नमो-योगी -सहकारी आणि भक्तांच्या मुळे गेले एकदम उजळून ,
ज्योतिर्लिंग -सप्तपुरी-आणि त्रिस्थळी पैकी एक काशी विश्वेश्वराचे लिंग दोनच मिनिटात डोळ्यात घेतले साठवून ,
कालभैरव ,अन्नपूर्णा मातेची घेऊन दर्शन गंगा नदीतून थोडे जल तीर्थरूप आणले भरून ,
काशी /वाराणसी ला ८४घाटांच्या मध्ये रात्री गंगा आरतीच्या सोहळ्याने डोळे गेले दिपून ,
पितृ गयेला गयासुराला पाताळात पाठवणाऱ्या विष्णुपदाचे दर्शन आणि स्पर्शाचा योग आला जुळून ,
बौद्धगयेला सिद्धार्थ चा झाला गौतम बुद्ध ज्या पिंपळ वृक्षा खाली बसून ,
तो बौधी वृक्ष आणि सोनेरी धीर -गंभीर मूर्ती असलेले बुद्ध मंदिर पाहीले निरखून ,
अयोध्येहून येताना सरनाथाचे झाले दर्शन ,जेथेप्रथम पाच शिष्याना बुद्धाने बौद्ध धर्माची शिकवण सांगितली समजावून ,
अश्या प्रकारे ईश कृपेने सुखरूप घरी परतलो त्रिस्थळी यात्रेचे समापन करून .
आसावरी जोशी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा