सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

Nivedan valentine

.    अक्षरमालेतील प्रेमपुष्पातील रंगछटा -व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रिय व्यक्ती बद्दल प्रेम दर्शविण्याचे निमित्तमात्र . या दिवशी कोणी कोणाबद्दल प्रेम दर्शवायचे हा वादाचा विषय असला तरी ,'प्रिय 'म्हंटले की त्यात प्रेम हा स्थायी भाव असायलाच हवा . खरेतर प्रेम दर्शविण्यासाठी ठराविक वेळ किंवा दिवसाची गरज नसावी . प्रेमात १-सतो २-रजो ३-तमो असे तीन रंगात्मक गुण असतात . प्रेम अनकंडिशनल असले तर ते सात्विक आणि अलौकिक स्थानावर जाऊन पोहोचते . सर्वसामान्यपणे ते खालील प्रमाणे व्यक्त होताना दिसते -----

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

***अटी लागू

           ***अटी लागू 
हल्ली माणसे आपली दुःखे शेअर करीत नाहीत ,आणि मदत मागत नाहीत ,अशी असते तक्रार ,
एक कारण -पैसा झाला मुबलक ,तो फेकला की दिमतीला माणसे मिळतात हजार ,
मग मदतीची भीक घेऊ कशाला ?कशाला हवेत कुणाचे उपकार ?
पण मग पाषाणातील झरे अन बाटली बंद पाणी यात फरक काय तो उरणार ?
दुसरी बाजू मदत करणाऱ्यांची ,त्याचाही दुष्काळ भासू लागलाय फार ,
अनकंडिशनल लव्ह ,हेल्प ,जाऊन बसलय ,कुठे तरी तडीपार !!!
कुणी नावासाठी तर कुणी कर वाचवण्या साठी ,कर -सेवा करणार ,
कुणी *अटी लागू असे दिसणार नाही इतक्या बारिक अक्षरात लिहून ,साध्या -भोळ्यांना लुटणार ,
बेमालूम पणे ,आवळा देऊन कोहळा उकळणाऱ्यांचाही असतो एक प्रकार ,
कमी उरलेत ,दुसऱ्यांच्या अडचणीत ,धावून जाणारे दयाळू -दानशूर -उदार ,
तरी शेवटी जग चालले आहे ,चांगल्यांच्याच बळावर ,मग ते असोत दोन -चार ,
गोड लागले म्हणून मुळापासून खाल्ले तर ,पुन्हा ऊस कसा उगवणार ?
दान देताना एका हाताचे ,दुसऱ्या हाताला कळु नये ,हा केवढा मोठा विचार !
मदत मागावी गरजे पेक्षा कमी ,मदत करावी क्षमते पेक्षा जास्त ,असे असावेत  सुंदर संस्कार !!!

प्रदर्शन दुःखाचे

                       प्रदर्शन दुःखाचे 
कमी -जास्त प्रमाणात दुःख प्रत्येकाच्याच वाटेला येत असते ,
म्हणून तर सुखी माणसाचा सदरा शोधणे अत्यन्त अवघड असते ,
दुःखाने कुणी जोरात रडते ,कुणी बैचेन दिसते ,तर कुणी निमूट पणे सहन करते ,
जोरात रडून इतरांचे लक्ष वेधून घेणारे काही असतात ,
काहींना प्रदर्शन आवडत नाही ,ते मनातल्या मनात मुसमुसतात ,
काही 'लांडगा आलारे आला 'गोष्टी सारखे उगाचच ओरडतात ,
दुसऱ्याला फसवण्याच्या छंदात ,शेवटी स्वतःच फसतात ,
असत्य असते अल्पायुष्यी ,सत्याचा प्रवास लांब -अवघड ,पण तरणारे शेवटी तेच असतात ,
दुःख वाटले तर कमी होते ,सुख वाटले तर वाढते ,असे लोक म्हणतात ,
पण -काहींना इतरांशी काही देणे -घेणे नसते तर काही इतरांच्या दुःखातच सुखावतात ,
थोडेच का असेनात दुसऱ्याच्या सुखाने सुखावतात अन दुःखात धावून येतात ,तेच खरे आपले असतात .