शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

आयुष्य जगणे

             आयुष्य जगणे 
जन्म -मरणाला जोडणाऱ्या साखळी चे नाव आयुष्य ,
पूर्वजन्म -पुनर्जन्म यावर मोठ्या -मोठ्यांनी केले भाष्य ,
दिसत नाही ,आठवत नाही ते का वाटू नये असत्य ,
जगणे करावे सार्थक हेच खरे सत्य ,
मिळालेले जीवन काही काढतात ,तर जगतात काहीजण ,
कोणी सदा दुर्मुखलेले ,दिशाहीन भटकतात रानोवन ,
तर कोणी करतात रानाचेही नंदनवन ,
माणूस एकटा येतो ,एकटाची जातो हे जरी खरे ,
सुख -दुःखात आले कुणी धावून तर वाटतेच ना बरे ,
काहींना वाटते पैसा हवा बास्स ,नसूदे कुणाची साथ ,
पण नाळ कापायला अन उचलायला ,लागतातच माणसाचे हात . 

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०१६

पुण्यातील रिक्षा

          पुण्यातील रिक्षा 
पुण्यातील रिक्षा ,म्हणे प्रवाश्यांना शिक्षा ,
येणार नाही जवळ ,जाणार नाही लांब ,
घाई च्या वेळेत पेट्रोल घ्यायला थांब ,
लो टर्नओव्हर हाय मार्जिनवर हवा असतो धंदा ,
ओला ,उबर ,शेअर रिक्षाला विरोध ,कारण स्पर्धा आली की होतो वांधा ,
मीटर असून पैसे मागणार जे येईल मनाला ,
कधीच सुटे पैसे नसतात गिऱ्हाइकाला परत द्यायला ,
हे जणू पुरेसे नाही प्रवाश्याला वैतागायला ,
ट्रॅफिक ,स्पीड ब्रेकर पोल्युशन ने लागते डचमळायला ,
एकदाचे हश्श होते ,सुखरूप पोहोचल्यावर मुक्कामाला ,
एखादा देव माणूस भेटतो ,मग वाईट होते विसरायला 

नार सुगरण

               नार सुगरण 
सुगरण नार ओळखा कोण ,जिला येते शिवण टिपण ,
बनवता येते सुग्रास जेवण ,
स्वभावातच काटकसर ,सेवाभाव ,प्रेम अन आपलेपण ,
बदलत गेली परिस्थिती ,परिभाषा अन वातावरण ,
महिलादिन झाला एक महत्वाचा सण ,
नाजुक नार झाली दे दणादण ,
कंट्रोल केले सेलफोन ,स्कुटर ,अवकाश यान ,कॉम्प्युटर चे बटन ,
तीही सुगरण ,ही पण सुगरण ,
परिस्थिती प्रमाणे बदलण्यातच असते खरे शहाणपण .

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा

सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा 
उगवला दिन सोनियाचा ,नसे आनंदासी पारावार ,
फुलले आनंदाने श्री मोरेश्वर गोसावींचे कुटुम्ब -आप्त -मित्र परिवार ,
सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्या निमित्त देऊ सदिच्छा ,आपणास लाभो सुख -शांती -आयु -आरोग्याचे ऐश्वर्य अपार ,
शैक्षणिक ,सामाजिक ,धार्मिक सर्वच चांगल्या कामात ,आपला असतो हातभार ,
सूर्याचे तेज ,चंद्राची शीतलता ,लक्ष्मी -सरस्वती आनंदाने एकत्र नांदे ,असा हा आदर्श परिवार ,
मुले -सुना ,कन्या -जामात ,नातवंडे ,सहचारिणी चा लाभला भक्कम आधार ,
एका हाताने दिलेले दुसऱ्या हाताला कळू नये ,असे उच्च आपले विचार ,
नशिबाने नाशिक नगरी कर्मभूमि लाभली ,करणारी भक्तांचा उद्धार ,
कर्तुत्वाला दातृत्वाची जोड ,जणू सुगंधित आभूषण घडविणारा सुवर्णकार ,
एकच प्रार्थना ,होवो शताब्दीकडे वाटचाल ,करुनि ईश्वर चरणी नमस्कार .

मार्केट

मार्केट 
डिमांड पेक्षा सप्लाय जास्त झाला तर किंमत घसरते ,
पुरवठा कमी अन मागणी जास्त झाली तर मार्केट वर जाते ,
खऱ्या प्रेमाच्या गणितात मात्र उलट परिस्थिती असते ,
जेवढे जास्त द्याल ,तेवढे जास्त परत मिळते ,
बाजार मांडला तर मार्जिनल यूटिलिटी ला मोल ठरते ,
सफल प्रेमात टू वे ट्रॅफिक लागते ,सुवर्ण मध्य ठरवून भेटता येते ,
मार्केट असो वा कोणतीही वाट ,नेहमी गती एकसारखी नसते ,
स्पीड ब्रेकर ,चढ -उतार ,वळणे आली की गती मंदावणे सहाजिक असते ,
शेवटी हॅप्पी आणि सेफ जर्नी डेस्टिनेशन चा आनंद द्विगुणित करते .

रविवार, ६ नोव्हेंबर, २०१६

. कांदा कहाणी

.            कांदा कहाणी 
ऐंशीने झाले कांदे ,खायचे झाले वांधे ,
राजकारणी एकमेकास निंदे ,त्यात ही उलट -सुलट धंदे ,
पूर्वी कांदा -भाकर समजले जाई गरीबांचे खाणे ,
आता म्हणे पार्टी श्रीमंत आहे ,पार्टीत कांदाभजी खाऊन तृप्त झाले पाहुणे ,
आधी कांदा चिरताना डोळ्यात यायचे पाणी ,
आता येते पाणी, ऐकून कांद्याच्या किंमतीची कहाणी .

लव्ह &वॉर

                लव्ह &वॉर  
आझादीकी आगसे टूट सकती है ,गुलामीकी जंजीर ,
दूध में उबल उबल करही ,चावल की बनती है खीर ,
आमने -सामने लडनेवाले को कहा जाता है वीर ,
व्यक्ती हो या देश ,प्रेममें लड मरने वालेको सताती नहीं कोई फिकिर ,
लव्ह और वॉर में हुए छल को लोग कहते हैं तकदीर ,
जीतने के लिये अच्छे अच्छे को पीछेसे भोंकना पडता है खंजीर ,
बाणोसे तीखा होता है ,कलम से निकला शब्दोंका तीर ,
साम -दाम -दंड -भेद कई हतखंडे अपनाके करना पडता है ,दूध का दूध नीर का नीर . 

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

कालचक्र

      कालचक्र 
वर उन्ह ,खाली खडक ,छाटणे कापणे सोसत झाडाने जगायचे असते ,
बहरलेल्या वृक्षा खाली अनेकांना विसावायचे भाग्य लाभते ,
कुणीच पानझडीने वैतागून जायचे नसते ,
पिकले पान पडायचेच ,मगच नव्या पालवीला डुलायला मिळते ,
ऋतु असो वा जीवन ,चक्रा संगे गतीशील राहायचे असते .

अंधाराकडून प्रकाशाकडे

                    अंधाराकडून प्रकाशाकडे 
सुंदर स्वप्न जन्माला आले ,
मध्यरात्री लागली होती झोप गाढ ,
वादळ -विजा ,आवाज आला कडाड कडाड ,
अचानक उन्मळून पडले एक झाड ,
गांगरले ,बावरले जाग येऊन स्वप्न होते असे कळले ,
काहीच कळेना ,स्वप्नाने इतके का पछाडले ,
उजाडल्याने डोळे उघडले ,अन सावरुन पुनः कामाला लागले . 

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

सॉरी थँक्यू

        सॉरी थँक्यू 
चुकतो म्हणूनच आपण माणूस असतो ,
नाहीतर देवच झालो नसतो !!
सॉरी म्हणून बिनधास्त चुका करण्याची नसावी तयारी ,
कळत -नकळत घडलेल्या चुकांसाठी म्हणायचे असते सॉरी . 
जगताना सर्वांनाच एकमेकांची गरज भासते ,
थँक्यू म्हणणे कृतज्ञता दर्शविण्याचे नुसते एक साधन असते ,
सॉरी -थँक्यू भावना दर्शविण्या साठी इंग्रजीने दिलेली शब्दांची एक देणगी ,त्याचा जाणावा मर्म ,
कृतज्ञता कृतीतून दाखवायची ,ही आपली संस्कृती अन धर्म ,
लक्षात असावे ,नेहमी सोबत असते आपल्या सोबत आपले कर्म .