शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

Sukhi manasacha sadara shodhanyacha Prayag










        सुखी माणसा चा सदरा शोधण्याचा प्रयत्न 
प्रेम ,मैत्र ,माणुसकी ,ऋणानुबंध ,श्रद्धा -भक्ती ,रक्ताच्या नात्यांनी काय काय दिले त्याचा करीत होते विचार ,
सुखी  माणसाचा सदरा शोधण्यास केली मदत म्हणून  आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार ,
अगन -गगन—पवन -जीवन—धरण या पंच तत्त्वांमुळे पिंडाला लाभला मानव आकार ,
निस्वार्थी निसर्गातील पोषण करणाऱ्या प्रत्येक घटकाचे अनंत उपकार ,
थोडे कुटुंबा बद्दल —
पहिली बेटी धनकी पेटी परमानंदाचा आविष्कार ,
ज्येष्ठ -कनिष्ठ दोन पुत्र मज जीवनाचा भक्कम आधार ,
जावई स्नूषांच्या कोंदणाने त्रिरत्न झाली रुबाबदार ,
नातवंडांचा किलबिलाट ,जणू पवित्र नाद ओमकार ,
मात -पित्याची समस्त परिवाराची ऋणी सदा ,माणुसकीशी झाला माझा साक्षात्कार ,
योग्य आहार -व्यायाम—विश्रांती सोबत  आवश्यक क्रियाशीलता आणि सदाचार ,
सर्वांची सारखीच उत्तरे यायला आयुष्य नव्हे गणिती कोनाचा प्रकार 
परिस्थिती प्रमाणे प्रश्न सोडवावे लागतात ,आनंदाने  केला परिणामा  चा स्वीकार ,
परमेश्वरा दे दृष्टिकोन सकारात्मक ,सद्सद विवेक बुद्धी ,समाधान ,होऊ दे भव सागर पार 
त्रिमूर्ति चा हात मज शिरी ,त्यांच्या चरणी  कोटि -कोटि नमस्कार ,
     आसावरी  जोशी 

मंगळवार, १४ मार्च, २०२३

Smaranat rahilela prawas m.ta.Pune


बिना तिकिट एका आखाती देशाचा प्रवास 
प्रवासाची आवड आणि मुले परदेशात असल्याने देश -परदेशातील भरपूर प्रवास झाला आहे . लालपरी पासून सर्व चारचाकी ,दुचाकी ,रेल्वे ,पाण्यावरून ,पाण्याखालून ,हवेत म्हणाल तर हेलिकॉप्टर -विमान अश्या वाहनातून भरपूर आंबट-गोड-कडू अनुभव युक्त प्रवास केले आहेत . 
   मार्च २००५ची गोष्ट आहे ,बहुदा मी कुवेत एअर लाईन ने शिकागो -मुंबई प्रवास करीत होते युरोप मध्ये जिनेव्हा ला टेकनिकल हॉल्ट आणि पुढे कुवेत ला विमान बदलून मुंबई पर्यंत चा प्रवास होता . जीनिव्हाला हॅन्ड लगेज घेऊन गेट च्या आसन व्यवस्थे मध्ये सर्व प्रवासी थांबलो होतो . उड्डाणाची वेळ जवळ आली तरी काही सूचना मिळेना ,शेवटी अंऊन्समेंट झाली अति हिम वृष्टी मुळे विमान निघायला उशीर होत आहे .कृपया प्रवाश्यानी ठराविक स्विस फ्रॅंक ची फ्री कूपन घेऊन येथील फूड कोर्ट मधून पदार्थ घेऊन खाऊन-पिऊन घ्यावे आणि पुढील सूचना मिळे पर्यंत थांबावे . शाकाहारी वयोवृद्ध ,लहान मुले यांची तारांबळ उडाली ,त्यांची काही रक्कम नावडत्या पदार्थांमुळे वाया गेली . मी त्यांना सल्ला दिला उरलेल्या कुपन ने चॉकलेट मिल्क ,योगर्ट ,बिस्किट ,ज्युस , केक ,चिप्स  असे पदार्थ घ्या . शाकाहारी लोकांना आणि पोटातल्या कावळ्यांना कल्पना आवडली . पोटे शांत झाल्यावर दुसरी चिंता सतावू लागली  कि आपले कुवेत मुंबई विमान तर चुकणार नाही ना ?
  आमची चिंता खरी ठरली ,कुवेत ला मध्य रात्री पोहोचे पर्यंत मुंबई  चे विमान फ्लाय झाले होते ,आत २४ तासांनी पुढचे विमान होते . २-३तासांच्या धावपळी नंतर झालेला प्रकार घरी कळवायला एक फोन कार्ड मिळाले ,तरुण मुलांच्या मदतीने एकदाचा घरी निरोप पोहोचला . एअरपोर्ट ऍथॉरिटी ने सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट ठेऊन घेतले . २४तासांचा कुवेत व्हिसा ,शहराच्या मध्यभागी पंचतारांकित हॉटेल मध्ये राहण्या -जेवणाची सोय केली . वयोवृध्द ,लहान मुले सोबत असणाऱ्यांचे हाल झाले पण आम्ही काही सुटवंग सहप्रवासी हॉटेल लगत असलेल्या मॉल आणि गोल्डसुक मार्केट मध्ये २-३तास चक्कर मारून थोडे विंडो शॉपिंग करून आलो. ध्यानी मनी नसताना  झालेला कुवेत चा हा प्रवास कायम स्मरणात राहील . म्हणतात ना परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलावी तरच आनंद सापडतो . 
          आसावरी जोशी 
१चिंतामणी अपार्टमेंट ,कार्वेनगर ,पुणें -४११०५२
सेल नंबर -९६89390802

रविवार, ५ मार्च, २०२३

अर्चना चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस

अर्चना चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस 
अर्चना खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद आज तुझा वाढदिवस सोनेरी ,
वर्षे उलटली पन्नास ,मातृत्वाचे अमूल्य दान देवाजीने दिले माझ्या पदरी ,
विनय ची साथ म्हणजे शीतल वट  वृक्षाची छाया ,प्राणवायु ची झुळुक देणारी ,
ईशा -अनिका ,श्वास -उश्वास ,सूर -ताल ,गती -विश्रांती ,अर्थ लाभला तव संसारी ,
कष्ट ,नियोजन,व्यवस्थापन ,जनसंपर्क आणि देवा कडून मिळालेली हुशारी ,
संसार ,समाजसेवा ,व्यवसाय ,अर्थ ,परमार्थ साधत घेत रहा तू उंच भरारी ,
आप्त -मित्र-परिवाराच्या सोबतीने सफल होवो सुवर्ण ,हीरक ,अमृत अन शतकी वारी ,
लाभो तुजसी आयु -आरोग्य-सुख-समृद्धी-समाधान हीच प्रार्थना करते माते जोगेश्वरी . 
                                                                                आई 

जयंत बापट -अण्णा-पंचाहत्तरी-अमृतमहोत्सव समारंभ

 


जयंत बापट -अण्णा-पंचाहत्तरी-अमृतमहोत्सव समारंभ 
उगविला सोनियाचा दिन ,अण्णा तुला पंचाहत्तरी निमित्त खूप खूप शुभेच्छा श्री चरणी जोडोनिया हात ,
भेसोदामंडी ,उज्जैन ,पुणे ,मुंबई ,बहारिन मधील सुंदर क्षणांची तरळली ”यादोंकी बारात ”
जयाची लाभली सुंदर साथ ,तुम्ही उभयता जणू ,चांद आणि रात -दिवा आणि वात ,
समीर -सुदीप च्या रूपाने उगवले सूर्य -चंद्र ,जया -जयंत च्या नभांगणात ,
सुना -नातींचे प्रेम आणि पाठबळ जणू अंबे अष्टभुजेचे आश्वासक हात ,
आप्त -मित्र-परिवार शिंपडती सडा अमृताचा ,वानप्रस्थ ते शतायुषी प्रवासात ,
विनयशीलता ,प्रसिद्धी परामुख चिकाटी आणि कष्टाने कमावलेस अर्थ -परमार्थ ,देश -परदेशात ,
व्याडेश्वर कृपेने उभयतांसी लाभो चिरायुष्य -आरोग्य अन होत राहो सुख-समाधानाची बरसात . 
          आसावरी जोशी (शकू ) आणि कुटुंबीय