बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

परमार्थी गुंतवणूक

परमार्थी गुंतवणूक 
परलोक सुधारण्यासाठी चक्रवाढीत गुंतवावा परमार्थ ,
इहलोकी जगण्यासाठी फक्त जपावा मुद्दली स्वार्थ ,
मोठ्यांचा अन स्वतःचा अनुभव ,दान -धर्म सत्कर्माचे ओळखावे सामर्थ्य ,
ओंजळीत साठवणे सामान्यांचा धर्म ,पण ओसंडून घालवू नये व्यर्थ ,
अतिरिक्त द्यावे ,जो असेल रिक्त ,अमूल्य जीवन करावे खऱ्या अर्थाने सार्थ .

मार्ग अनेक गंतव्य एक

             मार्ग अनेक गंतव्य एक 
अष्टांग योग एक परमानंदी शास्त्र ,जोडे आत्मा शरीर अन मनाला ,
विपश्यना अंतर्मुख करून मनः शांती देणारी एक स्वानुभवी कला ,
अनेक धर्म -पंथ -गुरु -संत ,परमशांती च्या शोधापाई आले जन्माला ,
सुदर्शनक्रिया ,हॅपी थॉट्स ,साई ,समर्थ मंडळे वाहुनघेति मानव जातीच्या कल्याणाला ,
ताण -तणाव ,अस्थिरता ,असुरक्षितता असुरी वृत्ती ,भेडसावत आहेत भेदून ,धर्म -राष्ट्रांच्या सीमेला ,
अनुशासनयुक्त आहार -विहार -विश्रांती अन अध्यात्माचे ज्ञान असावे जोडीला ,
मार्ग अनेक ,गंतव्य एक ,आस्थेने निवडावा ,चालायचे आहे ज्याचे त्याला ,
भक्ती -कर्म -ध्यान -ज्ञान -सन्यास योगी गीता अर्थ देते जगण्याला ......

. follow the leader

.         follow the leader 
कृती विना कल्पना ,केवळ असते स्वप्न बघणे ,
कल्पनेविना केलेली कृती ,केवळ वेळ दवडणे ,
कल्पना आणि कृतीचा संगम म्हणजे परिवर्तन घडवणे ,
नवनिर्मिती चा आनंद ,अन चार सक्षम लोकांच्या गुणांना पैलू पाडणे ,
खंबीर नेतृत्वाच्या  मागे लोकांना सोपे जाते चालणे ,
कालांतराने स्वतः साठी नाही पण मागे चालणाऱ्यांसाठी गरजेचे होते शिखरे गाठणे . 

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

साक्षरता

          साक्षरता 
साक्षरता म्हणजे काय समजून लिहिता वाचता येणे ,आत्मसाद करणे ,असावा शिकण्याचा ध्यास ,
दहावी नापास ला हल्ली गरजेचे नसते ,मेहनतीने पाहिऱ्या चढत होणे आठवी नववी पास ,
शाळा शिक्षका विना चालेल पण शाळेसाठी कॉम्प्युटर मिळवण्याचा केवढा प्रयास ,
ज्ञान म्हणजे -ब्रेड नाही म्हणून उपाशी राहू नका ,खा की केकचा गोड घास ,
हसावे का रडावे !कळत नाही पण आहे कटू सत्य ,हा तर साक्षरतेचा उपहास ,
कॉपी करणे ,पेपर फुटणे ,पुढे ढकलणे ,बळाच्या  जोरावर डिग्री घेणे ,संख्यावाढ अन गुणवत्तेचा ऱ्हास ,
मनूच्यामते इंद्रीय निग्रही माणसाला ,एक गायत्रीमंत्र ही ,उद्धारास पुरेसा ,
नुसता साक्षर पण चारित्र्यहीन ,बेजवाबदार व्यक्ती कसा चालवणार आपला आदर्श वारसा . 

मत प्रदर्शनाचे प्रकार

     मत प्रदर्शनाचे प्रकार 
नेहमी माहितीये मला ,तेच म्हणायचे होते ,हा एक मतप्रदर्शनाचा प्रकार ,
संभाषण म्हणजे ,आधी नाही नाही नाही ,म्हणून टाकायचे त्रिवार ,
गुबुगुबू नंदीबैलाला ,आधीच शिकवून केलेले असते हुशार ,
काही नाईलाजाने डोलवतात मान ,कारण असतात परिस्थितीने बेजार ,
काहींच्या शब्दकोषात हो -नाही ,दोनच शब्द ,मान डोलवूनच त्याचा उच्चार ,
बोलणे सोडाच ,मनाचा थांगपत्ता लागत नाही ,काही असतात इतके निर्विकार ,
उचलली जीभ लावली टाळ्याला ,बोलणे किती सोपे !मग कशाला एवढा विचार ,
एक घाव दोन तुकडे ,कशाला हवी बडबड बेकार ,इसपार नाहीतर ऊसपार ,
काही वक्तृत्वात हुशार ,त्यांना हवे होलाहो करणारे श्रोते दोन चार ,
तोडणे -जोडणे दोन्ही साधता येते ,म्हणूनच बोलावे सदा करोनि सारासार विचार .

अर्घ्य

    अर्घ्य 
अनेक घटना घडत असतात ,आपोआप जगात ,
बघ्या पलीकडे आपली ,काहीच भूमिका नसते त्यात ,
थोड्यातरी चांगल्या घटना ,घडवायचा प्रयत्न असावा आयुष्यात ,
शेवटी वाटता कामा नये ,काय केले !गेली उभी हयात ,
अर्घ्यम्हणजे पाणी ओंजळीत घेऊन ,सोडायचे असते पुन्हा नदीच्याच पाण्यात ,
मातृ -पितृ -समाजाचे ऋण फेडायचे असते ,फाटे पर्यंत साठवू नये आपल्याच खिशात ,
जमा -खर्चाची नोंद वरचा ठेवीतच असतो ,आपल्या वही -पुस्तकात ....... 

सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६

सिद्धार्थ गौतम बुद्ध -आचार्य सत्यनारायण गोयन्काजी के प्रवचनोका सार

           सिद्धार्थ गौतम बुद्ध -आचार्य सत्यनारायण गोयन्काजी के प्रवचनोका सार -विपश्यना शिबिर २५-२-२००९से ८-३-२००९ तक 
आचार्यजीके प्रवचन मानो पुराने आयनेकी धूल झटककर ,खुदको अंदर -बाहरसे देख सकना ,
नाबोलना ना हिलना डुलना ना बाहर कुछ देखना ,मनकी एकाग्रता से ,अपने अंदर झाँकना ,
नाहो भोक्ता भाव ,हर सुख -दुःख के क्षण को ,समता -साक्षी भाव से देखना ,
तृष्णा (इच्छा ) के बालक को ,वशकी लोरी से मिठी गहरी नींद सुलाना ,
विकारोके पौधो को बंद करदो सिंचना ,अनचाहा पौधा पनपेतो सीखो उखाड फेकना ,
मोलॅसिस यादि नही चाहिये ,बंद करदो चीनी का कारखाना,
मन अपने पर हावी होतो ,सीखो मन पर राज करना ,
विपश्यना का रस अमृतसा ,सबको अपना अपनाही चखना ,
"भवतु सब्ब मंगलम "-साधु ..... साधु ..... साधु ... आशिर्वचन सबको शिरोधार ,
सम्यक शील -समाधी -प्रज्ञा से ,सबके लिये खुला निर्वाण का महाद्वार ,
गौतम हुए बुद्ध ,सिद्ध +अर्थ किया तन -मन का तृष्णा रहित व्यवहार ,
शरणागति स्वीकार हो ,नवम बुद्ध अवतार  ........ 

ईश्वर -साधना

          ईश्वर -साधना 
जप -तप -साधना मधमाशीचं पोळं ,
वरवर चावऱ्या माश्या ,अंतरी मध रसाळ ,
जणू कल्पवृक्षाची फळं ,
वरवर चोथट -कडक ,अंतरी साय दुधाळ ,
सामान्यासि आकर्षिते ,विकारांचे मृगजळ ,
साधक म्हणती ,अंतरीच्या झऱ्यात वाहे अमृत निर्मळ ,
अंतरंगाला नसावी ,बाह्यरंगाची भुरळ ,
अंधकारही दिसावा कसा उजळ -उजळ ,
टिम्ब विलीन बिंबामधे ,तेजपुंजाला पाहून यावी रे भोवळ ,
ज्ञाताकडून अज्ञाता कडे नसे प्रवास सरळ ,
असत्याकडून सत्याच्या ,अन मग अंतिम सत्याच्या असावे जवळ ,
जिव -शिवाच्या भेटीला व्याकुळ व्याकुळ ........ 


अंतःचक्षु -विपश्यना

    अंतःचक्षु -विपश्यना 
मनकी आँखें खोल शरीरा ,मनकी आँखें खोल ,
सोवत -जागत देख शरीरा ,जीवन है अनमोल ,
सुख में ना जा फूल तू ,दुःख में कटू ना बोल ,
जड -चेतन सब अनित्य है ,समता से तू तौल ..... 
ताले में क्यों रखत है तू ,सत्कर्मोका मोल .... 
चाबी तेरे पास है ,खर्चा कर दिल खोल तू ,खर्चा कर दिलखोल . 

. . विपश्यना -समापना दिन अनुभव कथन

.             . विपश्यना -समापना दिन अनुभव कथन 
विपश्यना विश्वविद्यालय के कारण ,'इगतपुरी 'का बढा मानसम्मान ,
श्री गोएंका गुरुजीका सहज सुंदर प्रेरणादायी व्याख्यान ,
विद्या -वृक्ष को सिंचता ,उत्तम व्यवस्थापन ,नियमपालन ,समर्पित सेवा और दानवीरों का दान ,
प्राकृतिक -सुंदर -स्वच्छ वातावरण ,सात्विक -संतुलित -संयमित खानपान ,
अमीर -गरीब ,युवा -वृद्ध ,देसी -परदेसी ,नर -नारी आते ,बटोरनेको ज्ञान ,
मनसे अपनाना है संवेदन अनुभूति ,आना पान यानेकी श्वास -उश्वास और ध्यान ,
विपश्यना यानी स्वतः को अंतर्मुख होकर अचूक देखना ,दिखलाती मुक्ती मार्ग महान ,
शरीर -मन -वाणी के मौनको कहते हैं आर्यमौन क्या वर्णन क्या गुणगान ,
साधना का आनंद अनुठा ,सुझाव देनातो जैसे ,सूरजको दिया दिखाने समान !!!!  

रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

जगताचा स्वामी

         जगताचा स्वामी 
मोहापाई नकोरे रे छिन्नी ने घाव घालू ,
त्यालाही जीव असतो ,म्हणून तर आपण त्याला पुजतो ,
हौसेपाई नकोरे शृंगाराने मढवू ,
त्यालाही जाणीव असते ,तो ऐकतो ,बोलतो ,बघतो ,
म्हणून तर आपण कर्माची फळे भोगतो ,
दरिद्री नर सोडून ,ज्याचे आहे त्यालाच भरून ताट नैवेद्य नकोरे दाखवू ,
तो प्रेम -भक्ती चा भुकेला ,तो खात नाही ,म्हणून त्याला आग्रह असतो ,
नवसपूर्ती पाई नकोरे त्याला लाच देऊ ,
तो माया चिकटवून घेत नसतो ,
म्हणूनतर तो गरीब भक्ताचाही पाईक होतो ...... 

शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

ओबेसिटी

   ओबेसिटी 
सात्विक -स्वच्छ ,घरी बनवलेला ,साधा,सोपा आहार असावा ताजा ताजा ,
अनैसर्गिक रंग -रसायने -प्रिझर्वेटिव्ह ,आपल्या अन्नातून करावे वजा ,
बाहेरचे ,आईसक्रीम -केक -कोक -बर्गर -फ्राईज आणि पिझ्झा ,
सगळे कसे रेडी टू ईट ,जिभेचे चोचले पुरविताना खूपच येते मजा ,
वरचेवर असे खाऊन ,अति होते वजन वाढ ,आपणच आपल्याला देतो सजा ,
दिसते तशी ताकत नसते ,हालचाल मंदावते ,मेद वाढते ,शरीर जणू रोगाची पेटी ,
लो फॅट ,नो फॅट डाएट, स्लिमिंग मेडिसिन ,जिम ,तज्ञांचा सल्ला घेऊनही वाढत जाते ओबेसिटी ,
शेवटी आपणच ठरवावी उपायांची क्वांटिटी -क्वालिटी ,विकणारा कितीही करुदे पब्लिसिटी ,
बोल्ड चकचकित जाहिरात भावते ,दिसत नाहीत छोट्या स्टार मधे दडवलेला अटी .

महापुरुषांच्या अर्धांगिनी

          महापुरुषांच्या अर्धांगिनी 
भोवल्या वरून जाणाऱ्यांमुळे ,जगतासी दासबोधाचे समर्थ ज्ञान घडे ,
कन्यारत्न कोंदणाविना ,पडले अचानक उघडे ,
पाचा पतींची पत्नी ,अंग झाकाया वस्त्रासाठी रडे ,
अग्निदिव्य ,वनवास सोसुनी सीता सुत आश्रमात वाढे ,
पत्नी -पुत्र -वैभव सोडूनि ,सोडविले सर्वांच्या दुःखाचे कोडे ,
दूध अन अश्रुंचा ओलावा जपत ,माँ यशोधरेने भोगले राजवैभव कोरडे ,
लक्ष्मणाला आदर्श भावाचा मान मिळाला ,सर्वस्व अर्पूनि रामापुढे ,
दिसले का कुणा ,उदास उपेक्षित उर्मिलेचे ,काळजातील ओरखडे ?
अहिल्या ,तारा मंदोदरी ,कस्तुरबा कित्ती कित्ती नावे येती पुढे ,
'साकेत -यशोधरा 'रचुनि कविश्रेष्ठांनी यांचे ऋण फेडिले अल्पसे थोडे ,
जगताच्या कल्याणासाठी आनंदाने तिने सोसले केवढे ....... 
'

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

अति तेथे माती

                           अति तेथे माती 
पालकांना विभक्त ,व्यस्त जीवनात हल्ली मुलांना अमूल्य वेळ देता येत नाही फार ,
खर्चिक लाड ,हो ला हो करणे ,अहं गोंजारणे ,मग त्यांना पचवता येतनाही नकार ,
दुधारी समृद्धी आणि स्वातंत्र्या बरोबर वाढले मानसिक अन सोबत करणारे शरीराचे आजार ,
आता काळ -वेळ -पैसा ओतून ,करावे लागते परीक्षण आणि उपचार ,
उपचार म्हणायचे पण तो तर असतो रोग दाबून टाकायचा प्रकार ,
शरीर तपासणे सोपे पण मन तपासणे खूपच अवघड ,मग सगळेच होतात बेजार ,
व्यक्ती स्वातंत्र्यामुळे कोणी कोणाच्या अध्याय -मध्यात कसे बरे पडणार ?
मग एकमेकांच्या अडचणी तरी कश्या बरे समजणार ?
पूर्वी स्वातंत्र्य होते कमी ,म्हणून घरचे -बाहेरचे सल्ले मिळत हजार ,
ना खर्च ,ना साईडइफेक्ट ,कळतच नसे काउंसिलिंग केंव्हा पडले पार ,
श्रद्धा ,भक्ती ,विश्वास देऊन जातो केवढा मोठा आधार !!!!

अवयव महात्म्य

      अवयव महात्म्य 
हात पाय ,डोळे कान ,देवाने दिले दोन दोन अवयव एकाला दुसऱ्याचा आधार ,
एकाच तोंडाला कामे दोन ,तोलुन मापुन चविष्ट आहार आणि शब्दांचे उच्चार ,
जीभतर दुधारी तलवार ,गोड बोलूनि जिंके जग ,अन समोरच्याला दुखवले तर करी पलटवार ,
विचारांवर आचारांची करून मात ,माणसाला वाटे ,आपण आहोत किती हुशार ,
मती पडे तोकडी ,घडवणाऱ्याची पाहुन लीला अपरंपार ,
एखादा अवयव निकामी झाला की कळते ,तोतर होता अमूल्य फार ,
त्याचा घेऊन गैरफायदा ,अवयव विक्रीचा मांडलाय बाजार ,
आपल्याला जे शरीर फुकट मिळालेय ,ते विकायचा काय अधिकार ?
मृत्यु नंतर जगण्या साठी ,अवयव दानाचा करावा विचार !!!!!

. क्षणभंगुर

.      क्षणभंगुर  
हे जीवन क्षणभंगुर  ......... 
नाही कळती क्षण किती आपुले ,याची वाटे हुरहुर ,
काळ कुणावरी अवेळीच ,  घाले घाला क्रूर ,
आयुष्याशी कंटाळुनी एखाद्यासी वाटे ,अजून तो क्षण आहेरे किती दूर ?
माणुस गुलाम ,स्वामिनी नियती ,लहरी अन मगरूर ,
आदमी कहीं तो है ही विधी के हाथों मजबूर ,
साधुजन कह गये यहाँपर ,काल करे सो आज कर ,
आज करे सो अब ,सत्कर्म की तू गठडी बांध ,जीवन है क्षणभंगुर . 


अंबा आणि लिंबोणी

 अंबा आणि लिंबोणी 
लावून कडुलिंबाचे झाड ,लिंबोणीचं येणार ,
बाठीतील अंकुरच वाढून ,आम्रवृक्ष फळणार ,
कडुलिंबाचे झाडही उपयोगीच असणार ,
पण अंबा तो अंबाच ,पिवळ्या लिंबोणीला अंब्याचा स्वाद का असणार ,
लिंबोणी छोट्या अंब्या सम दिसली ,म्हणून का मुंगी फसणार ?
माती -मशागत -माळी एकच पण ,पेराल तेच उगवणार ,
बीजापासून फळ अन फळापोटी त्याचेच बीज असणार ,
एकदा का समजला कर्माचा सिद्धांत ,तर कुकर्म करायला माणूस सहज नाही धजणार .

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

मा . शा . आरोग्य

 मा . शा . आरोग्य 
योग्य अन प्रमाणात आहार ,व्यायाम ,विश्रांती ,
निरोगी राहायला सोबत असावी मनःशांती पुरती ,
म्हणे स्पर्धा नसेल तर प्रगतीच खुंटती ,
करून स्पर्धा स्वतःशी करता येते उन्नती ,
ईर्ष्या ,द्वेष ,जीवघेणी स्पर्धा ,बघून दुसऱ्याची प्रगती ,
मनाच्या बिंबाला ग्रहण लागती ,
मनाचे रोग हळू -हळू तनालाही ग्रासती .....

आजोबांची खंत

 आजोबांची खंत 
फिरायला जाताना अचानक पाऊस आला ,
बंद दुकानाचा आडोसा ,शोधावा लागला ,
उभ्या -उभ्या काय करणार ?
लोकांची लगबग बडबड आणि सरींचा नाच न्याहाळला ,
शेजारी आजोबा लोकांचा कट्टा होता जमला ,
राजकारण ,अर्थकारण ,समाजकारण ,आपल्यावेळेस असे नव्हते ,संवाद ऐकला ,
चार बायका जमल्याकी जेवण -खाणं ,साड्या -दागिने ,घर -दार सगळ्याचा होतो काला ,
या बाबतीत बायकांना नावे ठेवण्याचा पुरुष वर्गाने ,जणू चंगच आहे बांधला ,
गम्मत म्हणजे कट्ट्यावर ,आजोबा लोकांचा कोंडमारा ,बांध तोडून बाहेर होता पडला ,
पेन्शन आहे ,फ्लॅट आहे मुले आहेत ,खंत एकच ,जोडीदाराने लवकर संग सोडला ,
तिची किंमत ती गेल्यावर कळली ,वाटू लागलंय जणू आपला उजवा हातच मोडला

सोने /दसरा

       सोने /दसरा 
खऱ्या पिवळ्या सोन्याचे भाव आकाशाला भिडले ,
झाडे होतील भुंडी ,जर दसऱ्याला एक एक पान तोडले ,
करूया निर्मळ प्रेमाच्या सोन्यात इन्व्हेस्टमेंट ,
बुडण्याची ,चोरीची नसे भिती ,वाढतच राहतो इंटरेस्ट रेट ,
बॉण्डिंग ठेवूया नको कागदी बॉण्ड ,नको ब्रेसलेट ,
शुभेच्छा आणि आशिर्वाद सगळ्यात बेस्ट ........ 

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

चारधाम

         चारधाम 
बद्री -केदार ते रामेश्वर कन्याकुमारी ,
द्वारका सोमनाथ ते काशी जगन्नाथपुरी ,
भारतीयाला वाटे ,चारधाम यात्रा जन्माचे कृतार्थ करी ,
केल्याने देशाटन ,तीर्थाटन मिळतोच लाभ नानापरी ,
नको कर्मकांड ,अर्थ प्रदर्शन ,हवी शिस्त ,स्वच्छता संस्कृती जपण्याची उर्मी उरी ,
देव भक्ति -भावाचा भुकेला ,वसे भक्ताच्या अंतरी 

मानसिक पचनशक्ती

       मानसिक  पचनशक्ती 
वाढलेले समोर सर्वच नसते रोचक ,
जास्त प्राशनाने जड होणारच ,कितीही असो पाचक ,
सुखाच्या पुराला हवा ,विवेकाचा रोधक ,
दुःखाच्या आवेगाला ,सहनशीलतेचे रेचक ,
आनंदी -निरोगी जगायला ,समाधानाचे अन्न असे पोषक .

ओळखू येणारी माणसे


ओळखू येणारी माणसे 
तुम्ही तर मराठी माणूस दिसताय ,
वर चढणाऱ्याचा पाय व्यवस्थित ओढताय ,
तुम्ही गुजराथी माणसं दिसताय ,
ट्रिप मधे फिरायचे सोडून ,सारखे खायचे डबे उघडताय ,
तुम्ही साऊथ इंडियन दिसताय ,
स्वभाषिक भेटल्यावर ,आम्हाला एकदमच विसरलेले दिसताय ,
तुम्ही सिंधी -पंजाबी -उत्तरे कडचे दिसताय ,
जी-आप -हम असे गोड गोड बोलून ,नकळत आपला माल विकताय ,
तुम्ही तर बंगाली बाबू दिसताय ,
जलबिन मछली तसे तुम्ही मच्छी बिन तडपताय ,
तुम्ही फॉरिन रिटर्न दिसताय ,
या ,या ,यू नो ,आय नो कित्ती वेळा उच्चारताय ,
अरेच्चा तुम्हीतर माणुसकी जपणारे ,माणूसच वाटताय ,
दुसऱ्याच्या सुखात सुखी ,अन परदुःखाने किती व्यथित होताय ?
तुम्हीतर मोठ्यांना मान लहानांना संरक्षण देणारे संस्कृती रक्षक भारतीय दिसताय ,
अनेकता में एकता घेऊन ,भारतीय म्हणून जगात स्वाभिमानाने जगताय .

दीपोत्सव

             दीपोत्सव 
तेल ,मेण ,वीज ,असो कोणताही दिवा ,
सण म्हंटले की आनंद -उल्हासाचा प्रकाश हवा ,
दुष्टांचा नाश ,विजयी सुष्ट ,अलीकडे -पलीकडे एकच गोष्ट ,
राम -शाम -येशू -अल्ला वा असो गौतम ,
माणुसकी हा एकच धर्म असे सर्वात उत्तम ,
प्रेमाचे लोणी वर येते ,करुन सुविचारांचे मंथन ,
सर्वांना दीपोत्सवाचे ,खूप खूप शुभ चिंतन .......

. अश्विनी पौर्णिमा

.              अश्विनी पौर्णिमा --आपल्याकडे पहिल्या अपत्याला यादिवशी औक्षण करून भेटवस्तू द्यायची पद्धत आहे . त्यादिवशीच्या मुलांच्या मनातील टिपलेल्या काही गमतीशीर भावना . 
म्हणेमोठ्यांची अवस्था असते दीनवाणी , 
मोठे आहात ना ?हेकरा तेकरू नका ,ऐकावी लागतात बोलणी ,
छोट्यांची घ्यायची जवाबदारी ,बोलायची कायम गोडवाणी ,
छोट्यांचे दुःख ----
कपडे ,खेळ ,पुस्तके वापरावी लागतात ,जुनी -पुराणी ,
काय बघा ऐट ,फक्त मोठ्यांनाच मिळते ,अश्विनीची ओवाळणी ,
मधले म्हणतात --आमची हालत तर अगदिच केविलवाणी ,
सोयिस्करपणे कधी मोठे ,तर कधी गणलेजातो लहान ,ना घाटाचे ना घरचे पाणी ,
पालकांना सगळी मुले सारखीच ,नसे भेद ,लाडकी -दोडकी ,उणी -दुणी ,
हाताची ताकत पाच ही बोटे ,पण पाचही बोटे सारखी पहिली आहेत का कोणी ?

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

प्राणायाम

        प्राणायाम -श्वसनावर नियंत्रण 
शरीर निरोगी ठेवायचे असेल तर ,मनावर नसावा अति ताण ,
शारीरिक ताण दिसून येतो ,पण मोजायचे कसे मनाचे उधाण ,
मनःशांतीच्या शोधात भटकून ,जीव होतो हैराण ,
ताण वाढला की गती वाढते श्वासाची ,हेतर जाणतोच सुजाण ,
मानसिक ताणाने कमी होतो शरीरातील त्राण ,
श्वास आहे तर जीवन आहे ,शरीर जीवंत असल्याचे एक परिमाण ,
प्राणायामाने श्वासावर ठेवू नियंत्रण ,निरोगी जीवनाचा एक उपाय रामबाण . 

जीवन संगीत

          जीवन संगीत 
ताल -सूर अनेक ,गीत एक ज्यात संगीताची एकतानता ,
थोरांशी सूर जुळवताना हवी थोडी विनम्रता ,
लहानांच्या सुरात सूर मिळवताना ,हवी कशी परिपक्वता ,
तोल सांभाळणारा सहचर ठरतो आदर्श कुटुंबकर्ता ,
झाडा -झुडपांना सुद्धा सुमधुर संगीत समजते ,प्रेमळ स्पर्श ,हळुवार भावना भावते ,
चलन -वलन भाषा येत नसतानाही ,सृष्टीकर्त्याचे दर्शन घडते ,
वृद्ध -अपंगांचे पण झाडांसारखेच असते ,गती नसली तरी भावना तेथे जीवंत असते ,
यासर्वांना समजून घेताना ,बुद्धी पेक्षा मनाच्या ओलाव्याची गरज असते .

कविता

         कविता 
कवन असावे घेऊन वास्तवतेचे तन ,भावनेचे मन ,करि रसिकासी धुंद ,
स्वान्तसुखाय परहिताय ,गेयता विचारांची ,सोबतीला थोडा छंद ,
भाषा -व्याकरण -अलंकारांची ,पेटी नसावी टाळेबंद  ,
लिहून -वाचून -ऐकून मिळावा आनंद ,उन्हाळ्यात जणू मोगऱ्याचा सुगंध ,
ती प्रसवावीच लागते ,घेऊन येते रडत रडत हसणाऱ्या बालक जन्माचा आनंद . 

पहिले अपत्य

पहिले अपत्य -कन्यारत्न 
पहिले अपत्य परमानंदाचा क्षण ,बेटा असो वा बेटी ,
पूर्वापार चालत आली चाल ,पहिली बेटी धनकी पेटी ,
आई -बाबा पदवी असते जगती महान मोठी ,
अपत्यास ही भाग्य लागते ,जन्मावे ममतेचा पोटी ,
ईशा च्या (अनिकाच्या )रूपाने आली लक्ष्मी -दुर्गा -सरस्वती ,
रत्नावलीच्या तेजाने लखलखून गेल्या अर्चना -विनय च्या नेत्रज्योती ,
वंशवेल ही प्रतिदिन वाढो ,नमन नटवरा कोटि कोटि . 
पहिले अपत्य ---पुत्ररत्न ----
पहिले अपत्य परमानंदाचा क्षण बेटा असो वा बेटी ,
पुत्ररत्न वंशाचा दिवा ,बेटी असते दीपज्योती -आनंदाची पेटी ,
आई -बाबा पदवी असते जगती महान मोठी ,
अपत्यासही भाग्य  लागते ,जन्मावे ममतेचा पोटी ,
अर्चित च्या रूपाने आला ,पुरुषोत्तम -माधव -उमापती ,
येऊनियोग अनन्य ,घरकुल आलोकित होऊनि लखलखती ,
शुभम च्या रूपाने आला ,पुरुषोत्तम -माधव -उमापती ,
रूप शुभमचे चारूत सुंदर ,अनिरुद्धासी मोहुन घेती ,
वंशवृक्ष हा सदा  बहरत राहो ,नमन करूया गणपती . 





सोमवार, २२ ऑगस्ट, २०१६

मुक्ता -१९-१-२०१४(रविवार )

    मुक्ता -१९-१-२०१४(रविवार )
मुक्ता आली ,पुरी जाहली अनिरुद्ध -चारुता अन साऱ्यांची मनिषा ,
रत्न गवसले ,स्टॅचू ऑफ लिबर्टी च्या महान अमेरिका देशा ,
बोलणार आहे मात्र राम -कृष्ण -गार्गी -मैत्रेयी -माऊलीची भाषा ,
कन्येच्या रूपाने आली ,दुर्गा -लक्ष्मी -सरस्वती -लता अन आशा ,
शोभे शुभम च्या हाती ,जणू शिंपल्यातील पाणीदार 'मोती 'जसा ,
तव तेजाने उजळुदे ,भूतलीच्या दाही दिशा ,
वंशवेल ही निशिदिन वाढो ,हीच प्रार्थना श्रीगणेशा .

कुलदीपक -चि . अर्चित -७-१-२०१०,चि . शुभम १-४-२०१०(गुरुवार )

कुलदीपक -चि . अर्चित -७-१-२०१०,चि . शुभम १-४-२०१०(गुरुवार )
छकुल्या तू जोशी कुलदीपक ......... 
लक्ष्मी केशवा होउदे बाळासी सुखी ,आयुष्यवंत ,गुणवंत ,यशवंत ,मोहक ,
मात -तातांना (आलोक -अनन्या ,अनिरुद्ध -चारुता )सोनियाचा दिन ,परमानंदाचा द्योतक ,
अति आनंदी आजी -आबा ,मामा -मामी ,काकी -काका ,
बाळ काय म्हणेल दीदी का ताई ?विचार करिती ईशा अनिका ,
शुभम झाल्यावर --अर्चित म्हणतो मीतर दादा नमन कराया पुढ्यात वाका ,
झाली पत्नी माता ,पती पिता ,बाळ घट्ट बांधति एका -मेका ,
अर्चना आत्या नाव ठेवूनि ,बाळासी देती हळुच झोका ,
घुगऱ्या आणिक पेढा घेऊनि अतिथी जनहो ,नवजाताचे नाव ऐका ,
....... सोनुल्या ,छकुल्या तू जोशी कुल दीपक ,
देवा होउदे बाळासी सुखी ,आयुष्यवंत  .....

मंगल -प्रभात (माझे आई -बाबा )

            मंगल -प्रभात (माझे आई -बाबा )
गंगा -यमुना -सरस्वती ,कृष्णा माई ,आई गोदावरी ,
सदा प्रवाही धर्म त्यांचा ,बहुजनांसी तोषित करी ,
'प्रभाकराची 'ऊर्जा घेऊनि ,मंगलाम -सुजलाम -सुफलाम झाली भूवरी ,
वंदे मातरम ,वंदे मातरम ...... 
तव चरणी घडूदे सेवा ,या युगल करी ,युगल करी !!!

दान -स्वाभिमान


दान -स्वाभिमान 
इन्सान हैसियत से ज्यादा ,जरूरतमंद की करे मदद तो वो हुई दानत ,
लेनेवाला भी हो स्वाभिमानी ,जरुरत से ज्यादा कभीभी ना ले किसीकी मदत ,
जीना मुश्कील होगा अगर घोडा घास सेही करले दोस्ती ,
दुनियादारी में कभी तो लेनाही पडता है दुसरेका सहारा ,चाहे छोटी हो या बडी हस्ती ,
आधा निवाला किसीको देकर ,चाखि है कभी जीवन की मस्ती ?
कमसेकम दूसरोको उजाडकर ,ना बसाए कोई अपनी बस्ती .

तुकाराम

            तुकाराम 
देहू गावासी केले पावनतीर्थ ,रचुनि अभंग गाथा ,
माणुस मराठी भक्ती भावे टेकवितो तव चरणी माथा ,
प्रवृत्ती -निवृत्तीतील भेद सांगे ,करुनि सोपी भाषा ,
उंचींवरी तू नेऊनि ठेविले ,जय जय महाराष्ट्र देशा ,
तुकोबा बैसूनि विमानी ,गेले वैकुंठी सदेह ,
नशिबी नव्हते अर्धांगिनीच्याही  ,करीत बसली संदेह ,
एकलाची येतो ,एकलाची जातो सोबत असते कर्मांची साथ ,
नरदेह लाभे पुण्याईने ,विठुमय होऊनि सत्कर्माने जन्म -मृत्यूवर करावी मात .

रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

कान्हा रे कान्हा

 कान्हा रे कान्हा 
यशोदेच्या ओटी ,देवकीच्या पोटी जन्मुनी ,कान्हा रे कान्हा तू कसा झालासी खोडकर ,
छेडितो गोपिकांसी ,फोडितो घागर ,चोरुनि खातोस शिंकाळ्यातील लोणी -साखर ,
सूर आळविती तक्रारीचा ,पण मानकरीत मनातुनी ,गोपी आपल्या नशिबावर ,
नंद -वसुदेवाचा पुत्र ,सुदामाचा मित्र ,पांचालीचा सखा पार्थसारथी चक्रधर ,
राधेचे अलौकिक प्रेम ,मीरेच्या मधुरा भक्तीत चिंब ,मनमोहना ,तू मुरलीधर ,तू बंसीधर ,
कृष्णा -माधवा तूच गिरीधर -नटवर नागर,कसे जगावे शिकविणारा ,कर्मयोगी योगेश्वर ,
तू युगपुरुष 'अहं ब्रह्मास्मि 'त्रिलोकवासी ,तू सकलांचा ईश्वर ,कृपा असूदे आम्हावर .....

. वर्ण -व्यवस्था


 .    वर्ण -व्यवस्था 
एका वर्गाला सोपविली समाजहितासाठी धर्म कार्य करण्याची जवाबदारी ,
तर कोणी शूर वीर देश रक्षणा साठी आनंदाने होई ,धरा -धारी ,
उदर निर्वाह अन दैनिक गरजा भागवण्या साठी कुणी व्यापारी कुणि शेतकरी ,
एक समाज वरिष्ठ सेवेत मग्न ,पोट त्याचे हातावरी ,
सर्वांच्या सोई साठी जन्माला आली वर्णव्यवस्था ,कोणाच्या पोटी जन्मावे ते नाही आपल्याकरी ,
रहावे कसे खेळीमेळीने लहान-मोठे ,राजा -रंक वा कोणत्याही वर्णातील नर -नारी ,
उच्च -नीच काही नसते ,परलोकी सगळे सारखेच असते ,सदकर्मांप्रमाणे होत असते प्रतवारी .

शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

गुजरात -सौराष्ट्र दर्शन -गिरनार (गिरिनारायण )

  गुजरात -सौराष्ट्र दर्शन -गिरनार (गिरिनारायण )
कर्ता करविता परमेश्वर ,आज्ञा व्हावी लागते वरुन ,
इच्छाशक्ती लागतेच ,पण योगही यावा लागतो जुळून ,
गिरनार दर्शनाच्या वेळी विचार केला ,दहा हजार पाहिऱ्या आपण जाऊ का चढून ?
प्रोत्साहन दिले भक्तांनी ,कळलेच नाही गुरुदत्तात्रेय कडेवर कसे पोहोचलो जाऊन ?
अलौकिक त्रिमूर्ती -पादुका स्पर्शाने सकल श्रम गेले विरुन ,गुरुरूप साठवले डोळे भरुन !!!
          गुरु -महिमा 
अध्यात्माच्या मार्गावर गुरु ,गोविंदापेक्षाही महान असतात ,
काही लोक गुरुमंत्र घेतात ,पण कर्मकांडा पुढे खरी शिकवण विसरतात ,
कबीरा सारखे थोर संत ,अनुग्रह न घेतासुध्दा गुरु मार्गावर चालतात ,
गुरु करणे ,गुरु मानणे ,त्यावर आचरण करणे सर्व आत्मा -परमात्मा मिलनाची साधने असतात . 
           भारतमाता मंदिर 
नानाविध धर्म -पंथ नांदती येथे ,भारत भूमि भूतली महान ,
तेहतीस कोटी देवी -देवता ,अगणित संत सकलांना बहु मिळतो मान ,
स्वयंभू -प्रतिष्ठापित ,सुंदर कोरीव वैभवशाली ,अनेक जागृत देवस्थान ,
भू -जल -शिखर -निर्गम स्थानी ,कळसावर फडके सदा निशान ,भारतभूमि भूतली महान ..... 

कवनकर्ती ला दाद

       कवनकर्ती ला दाद 
तुझ्या पहिल्या कवनाचे करु किती कौतुक ?
बोलके झालेत तव लेखनीतील शब्द मूक ,
कलेची देणगी असतेच स्वान्त -सुखाय ,
सोन्याला सुगंध लाभो ,होऊनि बहुजन हिताय .

व्याही -विहिणी

   व्याही -विहिणी 
जोशी परांजपे बापट अन केळकर ,
हौशी प्रेमळ सुसंस्कृत अन खेळकर ,
सगे सोयरे आप्त आणि मित्र ,
शुभाशीष देण्या जमले एकत्र ,

जयश्री विद्या विनयेन शोभते ,रवि प्रकाश सम तत्वांनी अविनाशी ही सृष्टी असते ,
श्रीदत्तात्रेय कृपा असो ,मिळो सदा सन्मती ,आधी सारे वंदू रिद्धी -सिद्धी सह गणपती .

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

अनिरुद्ध -चारुता


         अनिरुद्ध -चारुता 
अनिरुद्धला मिळाली चारुताची जोड ,
जणू दुधात घातली साखर गोड ,
पुणे तेथे काय उणे ,उभयतांच्या संसारी सुख होवो दुणे ,
शिक्षण -नोकरी ते विवाह घडला अमेरिकेत प्रवास ,
उभयतांचा बहरो सर्वांगाने संसार ,हीच सर्वांची आस ,
मित्र -परिवार -पै -पाहुणे सगळ्यांचे परदेशात ही करता स्वागत सुहास ,
देव -धर्म ,सण -वार ओसंडे उल्हास ,असो कोणताही वार ,कोणताही मास 

अलोक -अनन्या

      अलोक -अनन्या 
आलोक दिप्तीचे लग्न जुळुनी ,योग आला अनन्य ,
औक्षवंत ,यशवंत होउनी ,तात -मात मायभूमि होवो धन्य ,
अलोक पदवीदान समारंभ -शनिवार २-८-२००८-श्रावण शुद्ध प्रतिपदा . 
अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात राहून घेतलीस तू उंच उडी ,
चिकाटी -कष्ट -बुद्धिमत्ते च्या बळावर ,आलोक तू संपादिली पी एच .डी . 
खुलला आणि खुलत राहो सदा तव ,जीवनपट' थ्री डी '
गुरुजन ,आप्त ,मित्र ,कुटुंबाच्या शुभेच्छा अन अनन्या चा संग ,
आखीव -रेखीव सुबक रांगोळीत जणू शोभावेत सुंदर रंग .

विनय वाढदिवस

  विनय वाढदिवस 
ज्येष्ठ -कनिष्ठ ईशा आणि अनिका बेटी ,
विनयशील ,सुंदर ,भाग्यवान ,बहुगुणांची पेटी ,
अर्चना सम सहचारिणी लाभली उत्तम ,
लाभो तुज सदा सुख -समाधान स्वास्थ्य ,जिवेत शरदः शतम !!!

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

बालसंगोपन

      बालसंगोपन 
प्रत्येक मूल अन भोवतालची परिस्थिती वेगळी असते ,नको सारखी आपसात तुलना ,
अति संरक्षण अन अति स्वातंत्र्य दोन्हीही वाईटच ,मुलांना वाढवत असताना ,
मुलांचे उठ -सूट कौतुक किंवा अती धाक ,दोन्हीही घातकच ,माहीत असावे पालकांना ,
शिक्षण -संस्कार ,आहार -स्वास्थ्य सगळ्याची घ्यावी काळजी ,एक उत्तम नागरिक घडवताना ,
पैश्यांच्या जागी पैसा अन वेळेच्या जागी वेळच द्यावा लागतो ,बालसंगोपन करताना ,
स्पर्धेच्या जगात होकारा बरोबर ,नकार ही पचवता आला पाहिजे बालगोपालांना ,
घरात असला सुसंवाद ,तर मने वाचणे सोपे जाते ,दोन्हीही पक्षांना ,
एकदा का मुले मोठी झाली की मागितल्या शिवाय सल्ला देऊ नये त्यांना ,
मुलांना ही नसावा संकोच ,कोणत्याही वयात मोठ्यांचा सल्ला घेताना ,
शेवटी काय मुले सुखी -समाधानी -समृद्ध अन चांगला माणूस असावीत ,यातच आनंद असतो आई -वडिलांना .

बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

अमेरिकेतील मुलांचे पालक

              अमेरिकेतील मुलांचे पालक 
मध्यंतरी मी अमेरिकेत नोकरीला जाणाऱ्या मुलांची मनस्थिती वाचण्याचा प्रयत्न केला होता . आता पालकांच्या नजरेतून थोडे चित्रण -----
मुले अमेरिकेत सेटल झाली की पालकांच्या सुरु होतात परदेश वाऱ्या ,
बालपणी आम्हाला स्वप्नातही वाटले नसेल की आयुष्यात या गोष्टी घडतील साऱ्या ,
अमेरिकन व्हिसा -पॅकिंग -प्रवास -येथील आवरा -आवरी ,टेन्शन असते जाम ,
परदेश आकर्षण अन मुला -नातवंडांचा मिळणारा सहवास ,यामुळे सोपेहोते अवघड काम ,
तेथील माणसे ,समृद्धि -स्वच्छता -स्वातंत्र्य -शिस्त सर्व जोपासतात गाळून घाम ,
विकेंड चे घेऊन टॉनिक ,पाच दिवसात ऑफिस ची कामे उरकतात तमाम ,
विकेंडला कल्चरल ,नॅचरल ,मॅनमेड स्थळांचे दर्शन अन बाजारहाटाची यादी लांब ,
कॅलिफॉर्निया ,वॉशिंग्टन ,न्यूयॉर्क दर्शन अन नायगराचा प्रवाह बेलगाम ,
लॉंग विकेंड ला जोडून सुट्टी घेऊन ,मुले प्रेमाने घडवतात अमेरिकेची यात्रा चारधाम ,
उरकायचे सारे कधी हॉटेल तर कधी मित्र आप्तांकडे ठोकून मुक्काम ,
कधी विमान प्रवास कधी रेंटलकार  सोबत भरपूर चालायला असावे तैयार ,
वाटते स्वर्गीय सुख अजून काय असते ?तेसोडून मुले का करतील इकडे यायचा विचार ?
विपरीत हवामानावर मात करुन सर्व केले कंडिशन्ड ,ऑफिस -घर -मॉल अन कार ,
पालकांचा वेळ चांगला जातो अन जमेल तेवढी मुलांना मदत ,जर घरात केली कामे चार ,
काही वर्षांनी मुले म्हणतात ,एकमेकांची काळजी करत बसण्यापेक्षा ,आई -बाबा इकडेच राहायचा करा ना विचार ?
जननी जन्मभूमि ,स्वभाषा ,स्वातंत्र्य सोडून पालकांना ,स्वर्गीय सुख पचविणे जड जाते फार ,
कधी -कधी प्रत्येक जण आपापल्या जागी बरोबर असतो  ,पण जुळत नाहीत विचार ,
जग म्हंटलेकी उत्तर -दक्षिण गोलार्द्ध असणारच ,पण दोन्ही मिळूनच पूर्णगोल होणार !!
यू . एस . मधील काही खटकलेल्या गोष्टी ---
दोन मुले किंवा दोन मुलींची निखळ मैत्री नेहमीच असतो का मनोविकार ?
महासत्ता असून मुला -मुलींना निळ्या -गुलाबी रंगात बांधायचा का करावा संकुचित विचार ?
अति स्वातंत्र्या मुळे आपल्या प्रत्येक कृतीला फक्त आपणच जवाबदार ,
निर्णय चुकला ,संकट आलेतर तर ,खूपच वाटते असहाय अन निराधार . 

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

अक्षरमालेतील एक रेशमी धागा --रक्षाबंधन -नारळी पौर्णिमा

अक्षरमालेतील एक रेशमी धागा --रक्षाबंधन -नारळी पौर्णिमा 
आपले सगळे सण येतात सुंदर अर्थ घेऊन ,
नाजुक रेशमी धागा सुध्दा ठेवू शकतो नाती घट्ट बांधून ,
भाऊ -बहीण प्रतीकात्मक असतात ,नात्यातील पावित्र्य देतात दाखवून ,
यथाशक्ती एकमेकांचे करावे रक्षण ,असा भाव असावा मनातून ,
कुणाला कुणाची गरज केंव्हा भासते ,सांगावे लागत नाही शब्दातून ,
सागर किनारी वाढून सुद्धा ,निघे गोड पाणी नारळातून ,
आजच्या दिवशी श्रीफळ अर्पून ,विनंती असते सुरक्षित प्रवास व्हावा सागरातून ,
दरवर्षी उजाळा देण्यासाठी संस्कारांना ,सण -वार येत असतात धावून . 

सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

चि . अर्चनास ---

चि . अर्चनास ---
बारबार दिल ये गाये बारबार दिल ये चाहे ,तुम जिओ हजारो साल यही है तमन्ना ,
लाभो सदा स्वास्थ्य तुझिया तना मना ,आप्त -सखा जमले देण्या तुज शुभ कामना ,
happy birthday टू आईना ,हॅपी बर्थडे टू अर्चना ,
विवेक बुद्धीने वाट चाल तू ,असो कुणाही देशा ,
तिमिराला तू दे उजाळा ,तुझिया कर्तृत्व प्रकाशा ,
ईशा -अनिका ताना -बाना ,विणकर तू नागेशा ,
मायेची तू ऊब देउनी ,जपती नाजुक कोषा ,
तू एक भरजरी धागा ,खुलविसी जीवन वेशा ,
दूरदृष्टिचा चष्मा चढवूनि ,घे परमार्था चा वसा ,
आयु -आरोग्य -सुख -शांति मिळो तुज हीच प्रार्थना जगदीशा ,
happy birthday to अर्चना --------

रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

Fortyth birthday -archana

    
Fortyth birthday -archana
       अर्चनाच्या चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त आलोक अनिरुद्ध आणि विनयने तिच्या लहानपणा पासून च्या फोटोंची एक सीडी करून सरप्राईज बर्थडे च्या दिवशी सर्वांना दाखवली . त्या वेळेस मला सुचलेल्या काही ओळी . 
सुंदर सुवासिक फुलांचा गुच्छ म्हणजे 'बुके '
जणू दिवाळीतील मिक्स मिठाई चे खोके ,
कधी वर कधी खाली आयुष्याचे झोके ,
जिंदगीके कई रंग अल्बम की तस्वीरोसे झाँके ,
जीने में क्या मजा अगर जिंदगी ना हो हटके .

दुकानदारी

      दुकानदारी 
आगे दुकान पीछे मकान ,आने जाने में समय का नही कोई नुकसान ,
काम धंदाही जिसका भगवान ,सबसे बडी पूजा ग्राहक का समाधान ,
लो मार्जिन हाय टर्नओव्हर का जपते मंत्र महान ,
बूंद बूंद से घडा भर सके तो ,क्यों होगा व्यापार -धंदे में नुकसान ,
सफलता का पैमाना एक से दो और दो से तीन होती जाए दुकान .

शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६

चूक -गुन्हा

            चूक -गुन्हा 
माफ असावी चूक एक ,गुन्हा ठरतो समजून केलेल्या चुका अनेक ,
सिनेमाचे सीन होऊ शकतात रिटेक ,
जीवनाच्या नाटकात अलाऊड ओन्ली वन टेक ,
नो एडिटिंग ,नो कमर्शिअल ब्रेक ,
नियम धुडकावून माफ नसतात ओव्हरटेक .

बदल स्वतः पासून

          बदल स्वतः पासून 
देशात बदल घडवण्याची गरज आहे आज ,
सिस्टीमचा कॉमन मॅनला होत आहे जाच ,
हक्कांबरोबर सर्वांना हवी कर्तव्याची आच ,
कडक कायद्याने येऊ शकते सुराज ,
सोबत अम्मलबजावणीस तत्पर हवा समाज ,
आपल्या पासून प्रत्येकाने उठवायला हवा आवाज ,
जगाला बहाल करावाच लागेल ,आपल्या देशाला शिरताज .

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

पंढरीचीवारी



          पंढरीचीवारी 
ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबाची पालखी ,ज्ञानबा तुकाराम तुकोबाची पालखी ,
ऊन -पाऊस भूक -तहान ,अवघड दिवे घाट ,विठूमय वारकरी सहज चाले वाट ,
डोळे भरुन पाहण्यासी माऊलीचा थाट ,भरलेल्या नयनी जणू आले घनदाट ,
विठूला पाहून डोळेच मिटले ,आता पुन्हा दर्शनासी पाहे पुढच्या सालची वाट . 

आषाढी चित्रगीत

     
      

       आषाढी चित्रगीत 
माउली माउली संतांची सावली ,दारी तुळस लावली ,गळ्यात माळ घातली ,
रुपेरी रथ ,सोनेरी पालखी ,त्यात रायाचे आसन ,संगे चाले वारकरी डोक्यावरी वृन्दावन ,
टाळ -मृदूंगा संगे विठूचे भजन ,मुक्कामी करती पादुकांचे पूजन ,
येई वासुदेव टोपी मोर पंखांची घालून ,फेर फुगडी रिंगण विसरुनि देहभान ,
भक्तीची सरिता ,भेटे सागरी उन्मन ,भेटे सागरी उन्मन .
लीन झाले लाखोलॊक नामाच्या गजरात ,राव -रंक ,लहान -थोर ,नसे जातपात ,
तहान भूक विसरुनि चालती उन्हा पावसात ,शंका दाटे मनात ,जाता येईल का गाभाऱ्यात !
विठू भक्तीचा भुकेला कसा राहिल फक्त देवळात ,
उभा कळसावरी ही दिसतो ,ठेऊन कटी वरी हात ,
झाले जीवन सफल जाऊनि पंढरीत ,जाऊनि पंढरीत . 

ऋतु



               ऋतु 
उन्हाळ्याच्या तापाने धरतीच्या डोळ्यांच्या चिरा भकास दिसू लागल्या किती ,
ढगांना वाटू लागली काळजी ,पावसाचा करुनि शिडकाव ,शीतल सुगंधित केली माती ,
जिकडे तिकडे हिरवे गार ,काळ्या -हिरव्या रंगाची किती मनमोहक सुसंगती ,
कष्टाचे झाले चीज तर ,शेतकऱ्याला अजून कष्ट करायची मिळते स्फूर्ती ,
आपल्या सारख्या देशाची भिस्तच मुळी चांगल्या हवामाना वरती ,
बळीराजाच्या कृपेने खरीप -रब्बी सर्वच पिकांना जीवदान मिळती ,
उन्हाळा -पावसाळा हिवाळा ,भिन्न स्वभावी ऋतु ,पण साऱ्यांना पोषक त्यांची दोस्ती ,
निसर्ग असो वा माणुस हातात हात घालून चालण्यात असते आगळी -वेगळी मस्ती .

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

गणेशोत्सव

    
    गणेशोत्सव 
भाद्रपदात गावो गावी गणेशोत्सवाचा ,दहा दिवस असतो थाटमाट ,
नवस करणे -फेडणे ,जनसागर लोटतो ,बघाया सजावटीचा झगमगाट ,
उत्साहाचा महापूर ,आरत्यांचा कडकडाट ,
येते घरालाही घरपण ,थोरा -मोठ्यांचा चिवचिवाट ,
समाजाला एकत्र आणण्या साठी ,सार्वजनिक उत्सवाचा टिळकांनी घातला घाट ,
गणरायासी प्रिय प्रेम -पुष्प -दुर्वा -पत्री -मऊ मोदकाचे ताट ,
गणेशाला सदा समीप ठेवण्यासाठी ,छवीकारांचा क्लिक-किलाट ,
सारे जपुया भाव -भक्ती अन प्रबोधन ,नको त्यांचा बाजार -हाट . 

मन



             मन 

वाऱ्याचा वेग ,पाण्याची तरलता ,
आकाशाची पोकळी ,पाषाणाची कठोराता ,
अग्निचे उद्दीपन ,किती -किती रूपात दिसते हे मन ,
वाऱ्याचा एक वार पुरतो मोडायला ,किती अवघड पुन्हा ते जोडायला ,
वादळाचे ठीक आहे ,तेतर निसर्गाचे क्रूर रुप ,
पण मजा म्हणून तोडण्यात काय अपरूप ?

ग 'ची बाधा

ग 'ची बाधा 
सत्ता ,संपत्ती ,सौंदर्य ,शिक्षण ,त्याला भिती असते' ग 'चे बाधणे ,
सौंदर्य तर देवाजीचे देणे ,संपत्ती सदा चंचल ,होतराही उणे -दुणे ,
सत्तेत अत्यंत आवश्यक तिचा सदुपयोग होणे ,
विद्या विनयेन शोभते ,नाहीतर दहातून नऊ उणे .

सच्ची भक्ती +deul


          सच्ची भक्ती 
देवाचे दर्शन घ्यावे ठेऊन मनी भाव -भक्ती ,
नको रे अवडंबर ,नकोरे भय -भीती ,
रिवाजांचा बडगा ,नको नुसत्या रिती -भाती ,
कोरडे कर्तव्य असे व्यर्थ ,जर मनी नाही प्रिती .

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

नियोजन -भाग 1-2


             नियोजन -भाग १-२
कमावण्या बरोबर गरजेचे असते वाचवून ठेवणे ,
नवी नाती जोडणे ,जुनी निभावणे ,
अंधारात प्रकाशबिंदु शोधणे ,तळपत्या उन्हात आपल्याच सावलीत विसावणे ,
सुखावह होते हाताला हात धरुन चालणे ,
मावळतीला थोडासा दिवसाचा प्रकाश जपून ठेवणे . 

जिओ और जिनेदो हरएकको ,स्वार्थ केलिये ना छीनो दुसरेके अधिकार को ,
भुलो भयानक भूतकालको ,सुखमय रहनेदो वर्तमान को ,
हे मानव संकटो के दानव पर मातकर ,पराजय करदो चिंतासुर की ,
हरएक काम में नीति -नियोजन ,समझो यही भक्ति भगवान की . 

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

दानत


               दानत 
देण्यासाठी ठेवावे थोडे ,काहीका असो मिळकत ,
मागणारा मागतो जर समोरच्याची असेल ऐपत ,
एक घास कमी खाऊन ही सदपात्री गरजूला करावी मदत ,
आळसाला नसावे प्रोत्साहन समोरच्याला दाखवावी त्याची क्षमता अन कुवत ,
सगळेकाही जमते जर जोडीला असेल दानत ,
देणाऱ्याने देत जावे ,घेणाऱ्याने घेत जावे ,
घेता -घेता घेणाऱ्याने ,देणाऱ्याचे हातच घ्यावे ,
कवि कल्पना केवढी उदात्त ,ती असावी सदा सोबत .

निवांत दिवाळी

     
    




  निवांत दिवाळी 
फटाक्यात फटाका चमचमती फुलबाजी ,सकाळी सकाळ बातमी देई ताजी ,
चहा सोबत गप्पा रंगवतात भजी ,चवच न्यारी जेवणाची असेल जर अळवाची भाजी ,
जाता -येता फराळ ,आहेका कुणास पोटोबाची काळजी ,
जेवताना होतात कोरडे हात ,तीन पिढ्यांच्या गप्पा रंगतात आजी-माजी ,
चिमुकल्याना गोष्टींत रमवायला ,घरात हवेतच आबा -आज्जी ,
साठा -उत्तरी समाधानात ,आयुष्याची मारता आली बाजी . 


सोमवार, ८ ऑगस्ट, २०१६

माझी जीवननौका

     
  


                      माझी जीवननौका 
पहिली बेटी धनकी पेटी परमानंदाचा आविष्कार ,
ज्येष्ठ -कनिष्ठ दोन पुत्र मज जीवनाचा भक्कम आधार ,
जावई स्नूषांच्या कोंदणाने त्रिरत्न झाली रुबाबदार ,
नातवंडांचा किलबिलाट ,जणू पवित्र नाद ओमकार ,
मात -पित्याची ऋणी सदा ,माणुसकीशी झाला माझा साक्षात्कार ,
त्रिमूर्ति चा हात मज शिरी ,त्यांच्या चरणी नमस्कार ,
श्रद्धा -भक्ती -प्रेमाने जीवन -नौका होईल पार . 

मित्र

             मित्र 
मनातले आड -पडदा न ठेवता बोलता येते तो मित्र ,
कधी -कधी न बोलताही कळते ,भेटण्यासाठी लागत नाही आमंत्रणपत्र ,
एकाहाकेत पांचालीला महासंकटातून सोडविणारा सखा ,
कधीकधी मनातील हाक आधीच ऐकूजाते शब्द येण्यापूर्वी मुखा ,
ना रक्ताचे ना मानलेले पण न ठरवता एखाद्याशी जुळून जाते नाते मस्त ,
अश्या अजब रसायनाला म्हणतात ,जिवा भावाचा दोस्त ,
दोस्ती एक दौलत ,जमवणे अवघड ,गमावणे सोपे ,जपावी जिवापाड ठेवून किंमत रास्त ,
यारीचे नाते असते रेशमी तलम आर पार दिसणारे ,
जपून ठेवलेल्या ,पुस्तकातील पिंपळपाना प्रमाणे ,उघडून पहाताच ,जुन्या आठवणी जागवणारे ,
सिक्ससेन्स -टेलीपथी असे काहीतरी असणारे ,दूर राहून सुध्दा जवळ ठेवणारे ,
नुसते नसावे गोड गोड बोलणारे ,वेळ पडल्यास कठोर बनून चुका सुधारायला लावणारे ,
घट्ट बंधनात असून जखडून न ठेवणारे ,पार्थ -सारथ्या सारखे योग्यवेळी योग्य दिशा दाखवणारे ,
आजन्म साथ निभावणारे ,कृष्ण -सुदाम्याच्या पोह्यांची आठवण करुन देणारे ,
एखादे तर धन्य असते आठवण रूपाने पिढ्यानपिढ्या ,जगापुढे आदर्श ठेवणारे

शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

रहस्य निरोगी जीवनाचे


                    रहस्य निरोगी जीवनाचे 
निरोगी शरीरास हवा शुद्ध ,सात्विक ताजा ,वेळेवर ,नेमका आहार ,
सतत सक्रिय ,नियमित व्यायाम ,योग्य विश्रांती आणि विहार ,
संपूर्ण सबलीकरणासाठी दूर असावी व्यसने आणि मनोविकार ,
नको इर्ष्या द्वेष सूड ,मात्र हवा स्वाभिमान अन सकारात्मक विचार ,
मन -शरीर -आत्म्याचा असावा योग ,संगे असावा सदाचार . 

रामायण



                            रामायण 
रामाचे सुराज ,सीतेचे स्वत्व ,भरत -लक्ष्मण -शत्रुघ्नाचे बंधु प्रेम ,मारुतिची स्वामिनिष्ठा 
ऊर्मिलेचा त्याग ,दशरथाची वचनबद्धता प्रजेची राजावरील आस्था ,
मंथरेचे कान भरणे ,कैकयी ची कूटनीति अन राजमतेची प्रतिष्ठा ,
मैत्रीचा मान ,दुष्टांचा नाश ,विजय मूल्यांचा अन सुष्टाचा ,
रामायण म्हणजे नाती जपण्याची पराकाष्ठा .

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

जीवन नाट्य

    
  

जीवन नाट्य 
धारा च्या विरुद्ध वाहणारी राधा ती बावरी ,
वाऱ्याच्या विरुद्ध ही पक्षी घेई भरारी ,शमा -परवान्या ची प्रीत तर अगदीच न्यारी ,
आकाशाची पोकळी ,अनंत जड -चेतन अंतरी ,घाव सोसूनही धरणी असे बीजांकुर ,
मग माणूसच का दुःख -संकट एकलेपणाला घाबरी ?
'पिंडिते ब्रह्मांडी -ब्रह्मांडी ते पिंडी 'असे म्हणतात काहीतरी ,
लिहून ठेवलेले योग्य विराम चिन्हासह वाचणे असते आपल्याच करी ,
जीवन नाट्य वेळेआधी संपविणे तर सोपे ,त्यात ते काय धाडस अन हुशारी ,
नेटाने नेमलेले अंक पुरे करणे ,हीच खरी अदाकारी , हीच खरी अदाकारी .

चोरोका तत्वज्ञान


       

                   चोरोका तत्वज्ञान 
चोरो के हिसाब से काला धंदा चोरी में भी होती है इमानदारी ,
दुश्मनो के दुश्मनोसे होती उनकी यारी ,खून और प्यार के रिशतोकी ना होती उनपर कोई उधारी ,
इस हाथ दे ,ऊस हाथ ले ,यही होती उनकी दुनियादारी ,
काला धंदा ,काला पैसा चमचमाती दौलत पर वे जाते वारीवारी ,
क्योंकि उनकी असली दुनिया होती है अंधियारी . 

खरे -खोटे ---कोळसा काळा ,कापूस पांढरा ,पाण्याला तर नसतो रंग 
यासारखे खरे बोलून असतो काहींना ,खोटेपणा लपवायचा व्यंग ,
खरे -खोटे -अर्धसत्य बोलण्याचे कितीतरी अंग ,
'नरो वा कुंजरो वा 'सारखे पण येतात काही प्रसंग ,
सोप्या भाषेत सांगायचे तर ,खरे तेच जे असते जीवन मूल्यांच्या संग .

बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

मंगळसूत्र चोरी -विचारांचे काहूर

        

मंगळसूत्र चोरी -विचारांचे काहूर 
मंगळवार दिनांक १०-२-२०१५ला संध्याकाळी ५.३० च्या सुमारास पूर्ण काळजी घेऊन सुद्धा माझे ३पदरी ३तोळ्यांचे  मंगळसूत्र ,दोन मोटारसायकल वर स्वार चोरांनी गळ्यातून हिसकावून नेले . त्यावेळेला गळ्याला ओरखडे बसून रक्त आले . शारीरिक मानसिक धक्का बसला . पण तरी स्वतः ला सावरून त्यातून बाहेर पडणे आवश्यक होते . म्हणून कटकटीची वाटणारी पोलिस तक्रार अलंकार पोलिस चौकीत नोंदवली . आणि परिचितांना घटना सांगून सावध करण्याचा प्रयत्न केला . 
आयुष्यात नकळत येत असतात चढ़ -उतार ,पुढच्याला ठेच मागचा शाहाणा होतअसेल तर करावी तक्रार ,
वाईटात काय चांगले झाले थोडेफार ,जगणे जाते सोपे जर असा केला विचार ,
बुडत्याला असतोच ना काडीचा आधार ,हात -पाय आपणच मारावे लागतात कराया भवसागर पार ,
जीव वाचला निम्मा ऐवज राहिला ,नंतर चोरीचा मालही सापडला ,करुनि बरेच उपचार ,
काय हाती लागले त्यासाठी 'मी 'नेहमीच मानते त्याचे उपकार . 

देऊळ

    
  


                    देऊळ 
समई स्नेहाचा साठा ,ज्योतीचा जीव जरी एका फुंकरी पेक्षाही छोटा ,
अंधार भेदून दाखवी प्रकाशाच्या वाटा ,
शुद्ध -सुगंध घेऊन येई ,उदबत्तीचा धूर ,
शंख -घंटा नाद स्वागत संदेश पोहोचवि दूर दूर , 
हळद -कुंकू अक्षदा मांगल्याचे प्रतीक ,
वाहण्यासी तुळस -बेल -दुर्वा -फुले ,त्यात गुणही कित्तीक ,
खोड झिजल्या विना मिळत नाही चंदन शीतल -सुवासिक ,
पादुकांचे तीर्थ आपण घेतो मस्तकी मुखी ,
पुष्पांजली वाहून ,रिते हात ही होती सुखी ,
खाण्यासाठी योग्य ते असे खाद्य ,पण प्रेमाने अर्पण करतो तोअसे नैवेद्य ,
आराध्याचे गुणगान म्हणजे असे आरती ,भक्तीचा भुकेला देव करी भक्ताची कामनापूर्ति ,
देवाच्या आधी कासवाला करावा नमस्कार ,प्रार्थना एकच ताब्यात असावेत पंचेंद्रिय -विकार ,
छिन्नीचे सोसून घाव गाभाऱ्याला लाभते मूर्ति ,घरी रोज जमवणे अवघड षोडषोपचार इती ,
म्हणून देवासाठी नाही ,सामान्य जिवासाठी झाली देवळाची निर्मिती . 

अक्षरमाला ब्लॉग वर्षपूर्ती



         अक्षरमाला ब्लॉग वर्षपूर्ती 
२०१६-च्या दिवाळीत अक्षरमाला ब्लॉग ला एक वर्ष झाले . वर्ष पूर्ती निमित्त माझी नातवंडे आणि मी यावर काही ओळी . 
अर्पण -अर्चित अर्पित काव्य पुष्प हे तव चरणी जगदीशा ,
           निराकार ओमकार मुक्ताच्या ज्ञानेशा ,
            कायम असुदे शुभम भवतु चा हात मज शिरी ईशा ,
             मज दोषांना उदरी घे ,गौरी पुत्र गणेशा . 
आठवसी का रुतलेल्या पाऊल खुणा ,
सावरिरे सावरी माझिया मना ,
वरदानाने मिळती मानवी हळव्या संवेदना ,
रिते हात आले रितेच जाणार ,तरी अर्थ लाभुदे या जीवना ,
संकटातून आम्हा सावरी जो तोच तू ,ईश्वर -राम -कान्हा . 

मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

टाळी आणि टिचकी

        
  


                     टाळी आणि टिचकी 
मित्र -आप्त -कैवारी ,नातलग शुभचिंतक शेजारी ,
ओळख नसताना प्रवासात ही भेटतात मदतीचा हात देणारी ,
अडी -अडचणीत पाठीशी उभी राहणारी ,
नाती असावीत टिकणारी ,नसावीत बारिक -सारिक कारणाने तुटणारी ,
लग्न -कार्य -समारंभ हवीहविशी वाटणारी ,बारसे असोवा बारावा दिवसाची दखल घेणारी ,
इंटरनेट च्या जमान्यात सोशल साईट्स वर वरचे वर भेटणारी ,
अधून-मधून जाणीव पूर्वक प्रत्यक्ष किंवा फोनवर सहज संवाद साधणारी ,
तोडणे असते सोपे ,जोडणे अवघड ,ही म्हण अगदी खरी ,
पण शेवटी 'टाळी 'असते दोन्ही हाताने वाजणारी ,
एका हाताची वाजते टिचकी ,चुटकी सरशी विरणारी .

मती तशी मूर्ति

      
    

                           मती तशी मूर्ति 
असते ज्या अवस्थेची पकड मनावरती ,रसग्रहणा नंतर तशीच दिसे आकृती ,
चित्र ,साहित्य ,पाककृति ,असो कोणतिही कलाकृती ,
मनी असे ते स्वप्नी दिसे ,रुढ झाली उक्ती ,
भावने प्रमाणे प्रत्येकाला भासते मंदिरातील मूर्ती ,
सत्यम -शिवम -सुंदरम उमगायला ही लागते सन्मती . 

शतायुषी भव



         शतायुषी भव 
आसमान मे समाजांना ,तूफान मे खोजाना ,आग मे जल जाना ,
प्रलय में डूबजाना ,खिलनेसे पहिलेही मुरझाजाना ,
असमय का रोना ,स्वाभाविक है दुःख का आना ,
असंभव सा है ,भौतिकी से भाग पाना ,अनुभव ही सिखाता है आशावादी रहना ,
मिट्टी मे मिलकर अंकुर का उपजना ,जलकर सोनेका निखरना ,
आब का मोतीपर चमकना ,डूबकर सूरजका फिरसे उगना ,
अर्थपूर्ण है जिके मरना ,मरके भी यादों मे जीना ,
असल में यही है शतायुषी होना ,शतायुषी होना .

आयुष्य



                        आयुष्य 
आयुष्य दाराचीये कडी ,जिवा नीट पाहून दार उघडी ,
आयुष्य पायाचिये बेडी ,भक्ती भावाची मार रे हतोडी ,
आयुष्य अंगरखा कापडी ,कारे कुकर्माचे डाग पाडी ,
आयुष्य जरतारी तलम साडी ,नाही नेसली तरी उभी जाते घडी ,
येथे क्रोध आगितली उडी ,राख होऊनि विवेकाची ,चोहू बाजूने उडी ,
वासना अथांग सागरातील बुडी ,बुडणारा अन हात देणारा दोघांना घेऊन बुडी ,
आयुष्य दुर्वांची जुडी ,ताज्या फुलांची पुडी ,वेळ राहता वाहण्यासी तू ती उघडी ,
आयुष्य पंच पक्वानांची गोडी (पंचेंद्रियं )ताटात नैवेद्याच्या ठेवूनि तुळशीपत्र शोभते केवढी ?



सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

होममेकर ते वर्किंग वूमन



       होममेकर ते वर्किंग वूमन 
बाईचे जीवन ,आयुष्यभर रांधा वाढा उष्टी काढा ,
पै पाहुणा ,मुलांचे आजार -अभ्यास ,शाळा -क्लासलाही आणा सोडा ,
घरात बसून काम काय असते ?अधून -मधून ऐका पाढा ,
काळ बदलला तो -ती समानता आली ,अवघड झाले एकट्याने ओढणे खर्चाचा गाडा ,
तिच्या साठी फुले कर्वेंच्या डोळ्यांच्या ,पाणावल्या होत्या कडा ,
मग मुली -बाळी शिकू लागल्या ,आर्थिक स्वावलंबनाचा घेतला धडा ,
दुहेरी जवाबदारी जणू तारेवरची कसरत ,पण पुरेसा असतो जोडीदाराचा आधार थोडा . 

जिद्द जगण्याची



      जिद्द जगण्याची 
जगण्याची जिद्द संकटांचे करीत नाही अवडंबर ,
इवल्याश्या फटीत ,इवल्याश्या मातीत पाण्याच्या काही थेंबांवर ,
रूजत -जगतं उपयोगी पडतं ,वड -पिंपळ -अवदुंबर ,
कदाचित लोक म्हणूनच पूजतात ,नमन करतात जणू उभा दत्त -दिगंबर .

. मनाचे पान -स्वाभिमानाचे दान



.      मनाचे पान -स्वाभिमानाचे  दान 
भुकेल्याला चालतो खायला कोंडा ,अन झोप आलेल्याला झोपायला धोंडा ,
पण अपमान युक्त अन्न समजावे विषा समान ,त्याचा मिरवू नये झेंडा ,
भले चांदीच्या ताटा भोवती महिरप मोत्यांची मांडा ,
आपले काड्याकुड्यांचे घरटे बरे ,नको दुसऱ्यांचा सोन्याचा पिंजरा अन भोवती नोकरांचा तांडा . 
या उलट -काही लोकांना स्वाभिमानाचे करताना दान वाटते हुशारी ,
आयुष्यात उचलायचीच नाही शेवट पर्यंत कोणतीही जवाबदारी ,
फक्त आपल्या सुखाचीच घेत राहतात खबरदारी ,
उंच -उंच चढण्या साठी कुणालाही करायचे शिडी अन दोरी ,
एकाची टोपी दुसऱ्याच्या डोक्यावर ,दुसऱ्याची तिसऱ्यावर ,जमा -खर्चाच्या वहीत नुसती उधारी ,
स्वाभिमानाचे संपूर्ण दान देऊन ,होईनात का दिवाळखोरी .