शनिवार, ३० जुलै, २०१६

प्रेम -भाग २

      
  


                प्रेम -भाग २
फक्त गरज म्हणून गाठ बांधतात ,सोय म्हणून सहज सोडतात ते प्रेम नसते ,
वादळाच्या हिंदोळ्यात सुद्धा घट्ट पकड असणारे प्रेम असते ,
तनाच्या बँकेत ,मनाच्या लॉकर मधे सेफ ठेवतात ते प्रेम असते ,
एकदा का मोडले तर त्याला रिप्लेसमेंट नसते ,म्हणून ऍडजेस्टमेंट ची गरज असते ,
आंधळे असून सिक्सथ सेन्स ला दिसते ,ते प्रेम असते ,
वेड्यांच्या खोल मनात दडलेले शहाणपण प्रेम असते ,
शेवटल्या श्वासापर्यंत साथ देणारे खरे प्रेम असते ,
सहवासाच्या पलीकडील सह अनुभूति म्हणजे प्रेम असते ,
क्षमा ,तडजोड ,विश्वास ,ओलावा ,आधार युक्त प्रेम परिपूर्ण असते ,
क्षमा म्हणजे चुकीची पुनरावृत्ति करू देणे नव्हे ,तर सूड बुद्धीला तेथे जागा नसते ,
प्रेमाची निश्चित अशी परिभाषा नसते ,प्रत्येकाची अनुभूति वेगवेगळी असू शकते ,
पण तरी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे ,फक्त प्रेमच असते .

शुक्रवार, २९ जुलै, २०१६

शब्दांचा मार



             शब्दांचा मार 
मारणाऱ्याचा धरता येतो हात ,कोण थांबवणार बोलणाऱ्यांची बात ,
हाताची जखम असते शरीराच्या वर ,शब्दांची खोलवर रुजते मनात ,
वरची जखम बरी होऊ शकते टाकुन कात ,मनावरची करते कायम नको असलेली साथ ,
शब्दांचा सुटलेला बाण कधीच येत नाही कमानीच्या आत ,
आधी विचार मगच उच्चार ,गैरसमज टाळता येऊ शकतात माणसा -माणसात . 

पुस्तक भिशी

       
   


                         पुस्तक भिशी 
भिशीत भिशी पुस्तक भिशी ,विविध विषयांचे वाचन ,
गिफ्ट देताना चर्चा नुसती ,होतनाही पटकन डिसिजन ,
लहान -मोठे -तो -ती ,असो कोणतेही ऑकेजन ,
एखादे पुस्तक भेट द्यावे ,करावे दिवसाचे सेलिब्रेशन ,
एकमेकांशी शेअर करावीत ,असावे पुस्तकांचे रोटेशन ,
सायंस -फिक्शन -फूड इत्यादि ,अनुभव आणि तरल इमोशन ,
ज्ञान वाढते आनंद मिळतो ,रिलीज होते टेन्शन ,
कायम आपली सोबत करतं ,असो परिक्षा -एकाकीपण -किंवा असूदे व्हेकेशन .  




सापशिडी -पेरावे तसे उगवते



                            सापशिडी 
साप शिडीचा पट उघडला ,फासातर तुझा तूच खेळ ,
दान पाडणे हातात असून नसते ,तोतर नशिबाचा खेळ ,
पुढे -मागे गोटी सरकवत ,बसवावा लागतो ताळमेळ ,
नियम खेळाचे माहित हवेत संपू शकतो केव्हाही खेळ ,
छोट्या -मोठ्या शिड्या मिळाल्यातर ,आनंदाची रेलचेल ,
सापाने जर गिळले तर ,फुकट जातो किमती वेळ ,
शेवट पर्यंत खेळायचाच असतो ,तिखट-आंबट -खारट -गोड ,मिश्र चवीची ती तर भेळ ,
चढ -उतार -धक्के अन वळणेघेत ,डेस्टिनेशन गाठते ,आपली रेल . 
                       पेरावे तसे उगवते 
कर्मावर -कर्तृत्वावर असावा विश्वास ,नसावा कामात नुसता आभास ,
यशाची आसच माणसाचा करते विकास ,पेरून उगवले नाहीतर माणूस होतो निराश ,
प्रयत्न करत रहावे ,जोपर्यंत आहे श्वास ,कमी प्रयत्नात मिळते यश ,तेंव्हा संचिताचा वाटा असावा खास ,
श्रद्धा -भक्ती -आस्था असावी डोळस ,शुद्धी अन सहवासा साठी असावेत उपवास ,
पार्थाचा मार्गदर्शक झाला सारथी ,आपण त्याच्या तत्वज्ञाना वर चालूया ठेवूनि विश्वास .                              



सुविचार

                             सुविचार 
शिक्षणाच्या जोडीला हवेत संस्कार ,व्यापाराच्या जोडीला व्यवहार ,
कमवत्या कर्तुत्वाला काटकसरीच्या संसाराचा भक्कम आधार ,
सुखाच्या शेल्याला दुःखाची थोडी टोचणारी भरजरी किनार ,
जागतिकीकरणाची नौका ,माणुसकीच्या सागरातूनच तरणार ,
यशामधे थोडा नशिबाचा वाटा अन प्रयत्न मात्र लागतात अपार ,
कोणताही व्यवहार असावा स्वच्छ आणि आरपार ,देव तारतो त्याला कोण मारू शकणार ?
संकटाना समजावे संधी ,संधीचे करावे सोने ,बावन्नकशी चमकदार . 

काळ एक अतिथी


                                        काळ एक अतिथी 
दारी आलेला अतिथी जाणावा देवा समान ,दारी कोण ते पाहूनच द्यायचा असतो मान-सन्मान ,
चोर- भामटा -कामचुकार पारखूनच ,द्यावे सदपात्री दान ,राखावा लक्ष्मण -रेषेचा मान ,
चालावे -वागावे काळाबरोबर ,नाहीतर नाहक गमवावे लागतात प्राण ,
अनेक दुःखे विसरायला काळ हे एकच औषध अन प्रमाण ,
काल पासून घ्यावा धडा ,आज मधे जगण्या साठी ,उद्याची अती चिंता चिता समान ,
काळ एक अतिथी चार दिवस येतो -जातो ,त्याचा महिमा असे महान . 

सकारात्मकता एक रामबाण उपाय



    
     
    

सकारात्मकता एक रामबाण उपाय 
नुसती चिंता चिता समान ,संकट समयी सकारात्मकता एक रामबाण ऊपाय ,
एकाकीपणात एकांताचे सुख अनुभवावे ,संकटालाही संधी समजावे ,
दुःखा मुळे असते सुखाचे अस्तित्व ,अंधारामुळेच समजते प्रकाशाचे तत्व ,
सकारात्मकता करते परिसाचे काम ,मग लोखंडालाही लाभे खणखणीत दाम ,
अर्थ --प्राण्यात प्राणी मनुष्य प्राणी ,चांगल्या -वाईटातला फरक जाणी ,
घर बनते प्रेमाच्या माणसांनी ,नाही नुसत्या दगड मातीच्या भिंतींनी ,
दिवस बनतो प्रकाशाने ,नाही नुसती रात्र संपल्याने ,
जीवन बनते कर्तृत्वाने ,नाही नुसत्या शरीराच्या जन्माने ,
मरण खुलते जळून उरलेल्या चांगल्या आठवणींच्या भस्माने . 

भांडवल



                                    भांडवल  
प्रत्येकाला आपले -आपलेच सोसावे लागते ,लोकांची सिम्पथी असते वर्बल ,
दुसऱ्याच्या दुःखात सुख अन सुखात दुःख मानणारे असतातच काही ,पण तेतर ऍबनॉर्मल ,
दुःख दर्शवायला पांढरे कपडे अन सण -समारंभाला गिफ्ट -गुच्छ ,हेतर खूपच फॉर्मल ,
घर -दार ,पैसा -अडका सगळे नुसते मायाजाल ,आभासाचा भास व्हर्चुअल ,
ऐकताना सर्व सोपं जातं ,पचवायला मात्र अवघड ,फारच जड आणि अनडायजेस्टेबल ,
नाटकात ही परकाया प्रवेश केलातर च ,अभिनय वाटतो ऍक्चुअल ,
मग माणूस म्हणून जगताना दुसऱ्यांच्या सुखात सहभाग अन दुःखात सह अनुभूति तरी असावी रिअल ,
माणूस म्हणून मरताना ,आपल्या सोबत तेवढे तरी असावे किमान भांडवल . 


गुरुवार, २८ जुलै, २०१६

नदी -किनारा -सागर -दरिया



                                      नदी -किनारा 
एका नदी मुळे जन्माला येतो किनारा ,तो ही असावा तिचे उपकार मानणारा ,
तिच्या उशृंखलतेला आवर घालणारा ,गतीला आकृतिबंध देणारा ,
शीतल -नितळ -परोपकारी प्रवाहाचे दुतर्फी रक्षण करणारा प्रत्येक वाळणावरचा सहारा ,
भोवती जन्मते संस्कृती ,झाडे -झुडपे त्यावर पक्ष्यांचा निवारा ,ग्रीष्मात ही पाझर फोडणारा ,
दोघांच्या साथीने वाळू -खडक -जडालाही चैतन्य देणारा ,सर्वांना प्रवाहात सामिल करणारा ,
नदी किनाऱ्याला अन किनारा नदीला अस्तित्व देणारा ,महासागरात विलीन होईपर्यंत साथ निभावणारा . 

                  सागर -दरिया 
मुश्किल है दारिया के दिलको देख पाना पूरा ,
लहारोको बाहो में लेता किनारा ,धरतीको गलेसे लगाता आसमा प्यारा ,
चांदनी को चांद की शीतलता का सहारा ,शामढले पंछी भी चाहे डालीका सहारा ,
कभी ज्वार -भाटा ,कभी सुनामीने सागर को आघेरा ,दिन भी हुआ दीन आतेही सांझका अंधियारा ,
विरह के बिना मिलन भी अधूरा ,अभाव और प्रभाव एकदुजेको करते पूरा ,यहिहै जिंदगीका सच सुनहरा . 


माझ्या नातवंडांचे जेवण


                       माझ्या नातवंडांचे जेवण 
मुक्ताला आवडे पिझ्झा -पास्ता -स्टीम्ड गाजर -झुकिनी -ब्रॉकोली ,जोडीला तूप -गूळ -पोळी ,
शुभम तर भटो गरमागरम वरण -भात ,लाडू -जिलबी -थालीपीठ अन तोंडी लावायला चिंचगोळी ,
अर्चित खातो चिवडा -चिप्स -भेळ ,आंबट फळे ,रोज लागे दही ,एनीटाईम चिकन विथ पोळी ,
अनिकाला प्रिय शिरा -पॅनकेक ,सगळे सौम्य जेवण ,तिची कुकिंग ची हौस आगळी वेगळी ,
ईशा चाटे छुन्दा -लोणचे ,गोड -तिखट सगळे आवडे ,फक्त ताटा भोवती काढते कोथिंबिरीची रांगोळी . 

बुधवार, २७ जुलै, २०१६

डोहाळे जेवण (सोळा संस्कार )



                                             डोहाळे जेवण (सोळा संस्कार )
कन्या -पत्नी होतीस तू होणार ग आता माता ,
डोहाळे पुरविती सासुराची सारी ,आणिक भाऊ -बहिण -माता -पिता 
मैत्रिणी शेजारिणी तुजसि देती आणून आंबट -चिंबट येताजाता ,
मळमळणे -अवघडणे -दुखणे ,सकलांचे अर्थच बदलले आता ,
गोड मानुनी पोटात घेतेस ,बाळोबांच्या लाथा ,
आभाळ ठेंगणे भासूलागले ,तुम्हां पति -पत्नीस आता ,
उचित समयी कूस उजळुदे ,संसार सागरी येत राहुदे आनंदाच्या लाटा ,
मुलगा -मुलगी असुदे काही ,बाळ असावे आयुष्य -आरोग्य सम्पन्न हीच मागणी प्रजापिता . 

                  बाळाच्या लाथा -थोडी गम्मत 
ममता -प्रेम -कर्तव्याची मूर्ति आई ,पोटातील बाळाच्या आनंदाने लाथा खाई ,
नाळ कापताच बाळ कोहम कोहम ची आरोळी देई ,आता मात्र लाथेच्या बदली चापट खाई ,
चतुर्भुज झाल्यावर मारलीतर ,आईच्या उरी नभरणारी जखम होई ,एकच कृती कसे भिन्न- भिन्न परिणाम देई .

रेषा


                       रेषा 
देवाने जन्मापासूनच रेषा दिलेली असते आयुष्याची ,
प्रत्येकाच्या हातातच असते रेषा भूत -भविष्य -वर्तमानाची ,
काही ठळक -पुसट ,काही लांब -तुटक ,आधी परिक्षा मग तयारी माहीत नसलेल्या अभ्यासक्रमाची ,
नागमोडी मार्गाची पूर्वसूचना मिळालीच तर ,थोडे संथ थोडे सावध होऊन बदलावा मार्ग ,पण यात्रा चालूनच असते संपवायची ,
जाणीव असावी मनगटाच्या मर्यादा अन ताकतीची ,नको सवय दैवाला दोष देऊन जवाबदारी झटकायची ,
कष्ट -विवेकबुद्धी -सचोटीने संधीचे करावे सोने ,शर्थ असावी प्रयत्नांची ,
संकटांनाही समजावे संधी ,कला असावी अवगत रेषा काबूत ठेवण्याची ,
परिस्थिती बदलणे शक्य नसेल तर थोडे स्वतः बदलून किल्ली जपावी आनंदाची ,
प्रत्येकाच्या रेषा वेगवेगळ्या ,नको तुलना कुणाशीच कुणाची ,
जगी सर्व सुखी असा कोण आहे ?ओळख असावी या तत्वज्ञानाची ,
स्वतः शी राहून प्रामाणिक ,काहीवेळा ठेवावी लागते झाकली मूठ सव्वा लाखांची ,
मग इतारांपेक्षा आपणच सुखी ,प्रचिती येईल या चिरंतन आनंदाची

. वाचणे -वाचणे



.                              वाचणे -वाचणे 
विविध भाषा शिकता येतात अन ,पुस्तके वाचता येतात ,
अक्षर ,शब्द ,वाक्य व्याकरण आणि बरेच काही भाषा शास्त्राचे टप्पे असतात ,
कधी शब्दशः अर्थ तर कधी मतितार्थ दडलेले असतात ,अभ्यासाने ते उमगतात ,
थोड्या फार फरकाने शब्दांची सगळे सारखीच उकल करतात ,
'वाचेल तो वाचेल 'खरच आहे ,पुस्तके जीवनभर साथ निभावतात ,
      म्हणे पुस्तकांप्रमाणे चेहरे पण वाचता येतात ,वाचायचे असतात ,
पण त्याचे निश्चित असे काही शास्त्र नसते ,थोडे सहवासाने ,थोडे अनुभवाने जमू शकते ,
कधी -कधी मनातले चेहऱ्यावर उघड -उघड दिसते ,
एकाच्या मनातले दुसऱ्याच्या कानात बिनतारी पोहोचते ,
कधी 'मुंह में राम बगल में छुरी 'सारखे असते ,
जसे दिसते तसे प्रत्येक वेळी नसते ,म्हणून तर जग फसते ,
मुखवटा ओळखणे अन त्यामागचे वाचणे तसे अवघडच असते ,
कळे -कळे पर्यंत नाट्य संपलेले असते ,
मात्र आपण खुली 'किताब असणे सर्वस्वी आपल्याच हातात असते ,
कधीतरी लेकी बोले सुने लगे ,तर कधी शालजोडीतूनही मारावे लागते ,
आजार होऊ नये अगर चिघळू नये म्हणून काळजी ही घ्यावीच लागते ,
गोड -गुळगुळीत वेष्टनात कडू औषध लपवावे लागते ,
फक्त निरोगी -सशक्त राहण्यासाठी ,जोडलेले टिकवण्या साठी ,थोडेफार कोटिंग माफ असते ,
नाहीतर बोलावे तैसेचि चालावे हेच सर्व नात्यांसाठी पोषक असते ,उत्तम असते .

हवामानाचे वर्तमान



                                                                     हवामानाचे वर्तमान 
घामाच्या धारांनी पुणेकर हैराण झाले ,अमुक तमुक शहराला अवकाळी पावसाने झोडपले ,
जोरदार पावसाने रस्ते तुंबून ,जनजीवन विस्कळित झाले ,दरड कोसळून घाटात कोंडी ,लोक वैतागले ,
गारपिटीने लाखोंचे नुकसान ,हिम -वर्षावाने उत्तर भारत गोठले ,लोक गारठून गेले ,
ग्लोबल वॉर्मिंग तर परवलीचा शब्द झाला ,लहान -थोर सर्रास वापरू लागले ,
उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या लोकांची पसंती बसायला घरात ,
घरात ही पडेना चैन ,ए . सी . पंखा ,कूलर च्या कृत्रिम वाऱ्यात ,माणसाला हवे सगळे माफक प्रमाणात ,
उन्हाळ्यात म्हणायचे केव्हां एकदा पाऊस पडतो ,पावसाळ्यात म्हणायचे ,केव्हा एकदा सूर्य दिसतो ,
आपली थंडीच कशी बरी स्वेटर शालीने मस्त ऊब येते ,पण नकोबाई ,कामे संपण्या पूर्वीच दिवस संपतो ,
दुष्काळा मुळे शहरात झाली पाणी कपात ,हंडाभर पाण्यासाठी मैलो चालावे लागते खेड्यात ,
घामाच्या धारांवर पावसाच्या धारांनी केली मात ,रेनकोट -छत्र्या खरेदी साठी गर्दी उसळली बाजारात ,
एकच फोटो गाळलेली जागा भरतो पेपरात ,म्हणे उभा छापला तर आयफेल आडवा छापला तर हावडाब्रिज कलकत्त्यात ,
गांव -राज्य -देशपातळीवर हवामानाचे वेगवेगळे अंदाज ,निसर्गाचे अजूनच वेगळे रूप पाहून ,लोक अजूनच गोंधळतात ,
निसर्गाचा सिंहाचा वाटा आहे आपल्या आयुष्यात ,त्याचे रक्षण करण्या साठी सर्वांनी खारीचा वाटा तरी उचलुयात . 

मंगळवार, २६ जुलै, २०१६

जी g जी


                              जी g जी 
मी मागे म्हंटले तसे पूर्वी दोन्ही हाताने लिहिणारे एकमेव होते गांधीजी ,
आता टेक्सटिंग च्या जमान्यात अनेक झाले गांधीजी ३g ४g जी जी जी ,
वायफाय ३g ४जी सगळे सांभाळू लागले ,नेट साहेबांची मरजी ,
सर्वांशी सहज संपर्कात राहणे झाले सोपे ,हातर टेक्नॉलॉजी चा वरदानच आहेजी ,
तरुणांचा लागतो पहिला नंबर ,पण मागे नाहीत बालक अन आबा -आजी ,
उपजलीकी काही मिनिटात हाती लागते ,काना -कोपऱ्यातली बातमी ताजी ताजी ,
एकमेकांच्या टच मधे राहणे ,झालेय किती ईझी ?
नाण्याला असतात दोन बाजू ,एक चांगली तर वाईट असु शकते दुजी ,
पोस्ट करणाऱ्यांमध्ये नकळत होते स्पर्धा ,लाईक आणि कमेंट मधे कोण मारताय बाजी ,
ऍडिक्शन तर वाईटच ,सारखी साईट पहिली जाते ,नसेना का मनाची मर्जी ,
मनासारखी मिळाली नाही दाद ,तर घेरते डिप्रेशन अन नाराजी ,
ह्या जी जी मधे वेळ अन पैसा खर्ची पडलेला चालतो ,पण महाग होऊन चालत नाही किराणा अन भाजी ,
वर्चुअल नाही ऍक्चुअल मदतीचे हात हवे असतात ,वाहताना आयुष्याची ओझी ,
मनावर ताबा आणि काही पथ्य पाळून ,आपणच घ्यायला हवी आपली काळजी ,
साधन साध्यावर होऊ नये हावी ,हीच प्रार्थना मनापासून माझी . 

Amerikeche akarshan



                                         अमेरिकेचे आकर्षण 
जुलै -ऑगस्ट मधे अमेरिकेत शिकायला जाणारे असतात हजारोवर ,
त्या भूमीत पाय रोवणे सोपे जाते ,कष्ट अन उच्च शिक्षणाच्या जोरावर 




. बोलावे तैसे चालावे



               .     बोलावे तैसे चालावे 
बोलावे तैसेची चालावे ,मिळे शिकवण संत साहित्यात ,
नको बोलाचीच कढी अन बोलाचाच भात ,
प्रत्यक्षात भिजत नाहीत हात ,काहीच जात नाही पोटात ,
वाणी आणि वर्तनात विवेकाने साधावा समन्वय ,कायम असावे ध्यानात ,
काही लोक इतरा सांगे ब्रह्मज्ञान ,आपण मात्र कोरडे पाषाण रूपात ,
नको नाव सोनुबाई ,जर कथलाचा वाळा घालायचाय हातात . 






सोमवार, २५ जुलै, २०१६

. मला वाटते



     .                       मला वाटते 
मागितल्या शिवाय सल्ला देऊ नये ,बोलावल्या शिवाय जाऊ नये ,
भूक नसताना खाऊ नये ,झोप आल्या शिवाय झोपू नये ,
कुपात्रास देऊ नये दान ,वेळ आल्या शिवाय त्यागू नये प्राण ,
शत्रूला कधी कमी लेखु नये ,लाचारीने कधी जगायला लागू नये ,
चोरी कधी करू नये ,कमावण्यासाठी कोणतेही कष्ट कमी लेखू नये ,
अंदाज घेतल्या शिवाय पाण्यात कधी उतरू नये ,
मुलांवर अनाथआश्रमाची अन माता -पित्यांवर वृद्धाश्रमाची वेळ येऊ देऊ नये 
प्रेमात कुणाला फसवू नये ,वात्सल्यात परतीची अपेक्षा ठेवू नये ,
अडचणीत सापडलेल्याची अजून अडवणूक करू नये ,घेतलेले उपकार कधी विसरू नये . 

वयाचे टप्पे -उतरणी



वयाचे टप्पे -उतरणी 
साठी -सत्तरीच्या मधे सुरु होते आयुष्याची उतरणी ,
तुलनेने थकते शरीर ,साठी बुद्धि नाठी सारख्या चिकटतात म्हणी ,
हा काळ होतो सुसह्य ,जर जपले असेल तन -मन-धनाचे आरोग्य तरुणपणी ,
म्हातारपण -बालपणात साम्य असते ,ही भावना सकारात्मकता दर्शविणारी ,
बालके बोट धरून चालणारी ,एकच प्रश्न अनेक वेळा विचारणारी ,
उतरणीतही तेच असते ,फरक एवढाच एक कृती आनंद देणारी तर दुसरी वैताग देणारी ,
म्हातारपण -बालपण जणू चंद्राची कोर ,कृष्ण -शुक्ल दोन्ही पक्षात दिसणारी ,
एक कोर वाढत वाढत पूर्ण चंद्राच्या रूपाने शीतल प्रकाश देणारी ,
तर दुसऱ्या पक्षातील कमी कमी होत ,कोर रूपाने अंधारात विलीन होणारी ,
पण अमावस्येच्या अस्तित्वा मुळेच पौर्णिमा येते लखलखणारी ,प्रकाशाच्या वाटा दाखवणारी . 

वयाचे टप्पे -प्रौढ



                                      वयाचे टप्पे -प्रौढ 
जोडीदाराच्या मदतीने संसाराचा गाडा ओढण्याची असते मोठी जवाबदारी ,
मुलांचे शिक्षण -आरोग्य -लग्न-स्वावलंबन यात आव्हाने येतात कितीतरी ,
सोबत आई -वडील परिजनांची काळजी ,अन नाती जपण्याची कसरत ,जणू चालणे तारेवरी ,
बांधावा लागतो लवचिक पूल ,पुढच्या -मागच्या पिढीची सांधायला दरी ,
हेसगळे करताना उभयतांच्या उतरणीच्या नियोजनाची ही घ्यायची असते खबरदारी . 

शनिवार, २३ जुलै, २०१६

वयाचे टप्पे -तरुणपण


                        वयाचे टप्पे -तरुणपण 
स्वमग्नतेतून बाहेर येऊन ,माणूस होतो एक नागरिक जवाबदार ,
गद्धे -पंचविशीचा काळ म्हणून ,थोडा लागतो मोठ्यांचा आधार ,
शिक्षण -अर्थार्जन विवाहास उपयोगी ,थोड्या भावना थोडा व्यवहार ,
वाटे ऐकावे जनाचे करावे मनाचे ,राहावे आकर्षक अन रुबाबदार ,
सुंदर स्वप्ने प्रत्यक्षात पाहताना ,नसे आनंदाला पारावार ,
आयुष्यातील सुवर्णकाळ होईल सुगंधित ,जर जोडीला असतील सारासार विचार ,
जोडीदाराची लाभली उत्तम साथ ,तर बनतो एक आदर्श परिवार . 

स्वीट सिक्सटीन


                          स्वीट सिक्सटीन 
झालीस तू स्वतंत्र सुकुमारी ,काल -काल बोट धरून चालणारी बालिका होती ,
नटणे -मुरडणे आवडू लागले ,जडली आरशावरती प्रिती ,
वाटे काळजी कांतीची ,लपवू पाहते मुरुमा मधला मोती ,
नख-शिखांत निरखण्याची सवय तिला आता भावती  ,
ती जन मना पुढे करू लागली ,तन मनाची सुंदर प्रस्तुती ,
नैसर्गिक बदलांना ती कधी लपवती कधी न्याहाळती तर कधी कुरवाळती ,
थोडी हुरहुर थोडी भिती ,थोडा आनन्द -आकर्षण झुलू पाहती स्वप्नांच्या झुल्या वरती ,
एक पारडे परिवाराचे तर दुसरे मित्र -मंडळीचे ,होत असते खालती -वरती ,
ती असो वा तो थोडे अनुभवाचे बोल ही ऐकावेत धोक्याच्या वळणा वरती . 






वयाचे टप्पे --बालक



         वयाचे टप्पे --बालक 
उठल्या पासून झोपेपर्यंत ,सुसंस्कार अन शिकवण्यावर आई -बाबांचा भर ,
ब्रशची पेस्ट थोडी पोटात ,थोडी ब्रशच्या तळात ,तर थोडी फरशीवर ,
दूध -नाश्ता -जेवण अंगी लागते ,सांड -लवंड केल्यावर ,
जेवणात आवडी -निवडीच फार ,भर असतो नकोते खाण्यावर ,
स्वच्छता -आरोग्य -सुसंस्कार ,शिक्षणाचे धडे मिळती दिवसभर 
ओल्या मातीवर करुनि संस्कार ,सुबक टिकाऊ उपयोगी पात्र ---
बनविण्याची जवाबदारी असते सर्वस्वी कुंभारावर . 


शुक्रवार, १५ जुलै, २०१६

वयाचे टप्पे -बाळ




iPadजन्मल्यापासून मानवाला रोज काहीतरी शिकायला मिळत असते . वय आणि अनुभव या एकत्र प्रवासाचे  काही ठळक टप्पे म्हणजे १बाळ २बालक ३स्वीट सिक्स टीन ४तरुणपण ५प्रौढत्व ६उतरणी . त्या टप्प्यांची माझ्या निरीक्षणात आलेली सर्वसामान्य  वैशिष्ठ्ये ----
भूक लागली की प्यावे ,झोप आलीकी झोपावे ,
घरादाराने हाताच्या फोडा प्रमाणे जपावे '
बाळाच्या तंत्रा प्रमाणे आई -बाबाने आळीपाळीने झोपावे उठावे ,
ना कालचा विचार ,ना उद्याची चिंता प्रत्येक क्षण आनंदाने जगावे ,
बाळाला भूक लागली की आईला पान्हा फुटाणे जणू सर्व दैवी चमत्कारच वाटावे ,
हसणे रडणे कपडे ओले करणे ,सगळ्याचेच कौतुक व्हावे ,
तिसरे शहाणपण विसरे म्हणून त्याचेही कौतुकच असावे ,
निरागसता कमी होऊन व्यवहार कळू लागले की ,दैवी रुपाला माणसात गणावे ,
स्थिती बदलणे हाही प्रगतीचा नैसर्गिकनियम,त्याचे  स्वागतच करावे ,
म्हणूनच म्हणतात -लहानपण देगा देवा ,आयुष्यातील अमूल्य ठेवा . 

गुरुवार, १४ जुलै, २०१६

Devshayani


     उद्या देवशयनी आषाढी एकादशी . देवाचे झोपणे -उठणे त्याचे अस्तित्व स्वीकारणे नाकारणे ,सर्व माणसाच्या श्रद्धा -भक्तीवर अवलंबून असते . श्रद्धा ठेवली तर दगडातही देव दिसतो . नाहीतर म्हणे देव कुठे असतो ?

सोमवार, ४ जुलै, २०१६

प्राणी सम्मेलन



                    प्राणी सम्मेलन 
रांगेतून चाले मुंगीबाय कष्ट अन चिकाटीला पर्याय नाय ,
सापालातर पायच नाय सरपटत सरपटत वेगात जाय ,
चिव -चिव चिमणी इवलेसे मिळूनही समाधानी ,
काव -काव चतुर कावळा आहे कसा सावळा ,
बदकु आणि बगळा पाय कसा पसरट पिवळा ,
विठू -विठू पोपट आहे भारी चावट ,
मोरा तुझा कित्ती रे तोरा ?नाचुन दाखव ना फुलवून पिसारा ,
म्हणे आमची मनीमाऊ दूध पिऊ का लोणी खाऊ ,
मोती आमचा कुत्रा मुळीच नाही तो भित्रा ,
काळी -पांढरी गरीब गाय तीतर साऱ्या जगाची माय ,
उंचच उंच उंट आवाडे त्याला वाळवंट ,
टॉक टॉक घोडा छोटू आहे पाठीवर हळू धाव थोडा ,
कोकिळेची गोड तान हरवून जाते आपले भान ,
जिराफाची उंच मान सहज खाई फांदीवरील पान ,
झेब्रा दिसे सुंदर फार काळा पांढरा पट्टेदार ,
हत्तीची सोंड जणू फव्वारा कानाच्या पंख्यानी घाली तो वारा ,
सिंहाच्या मानेवर मऊ आयाळ त्याच्या रुबाबाने सगळे घायाळ ,
ससुल्या टुणुक टुणुक उडया मारी असतो पक्का शाकाहारी ,
बघुन बघुन माकडचाळे रडूबाईला हसूच आले ,
रानी वनी भटकावे प्राण्यांचे गुण पारखावे ,
मनी असावे भाव उदार तेतर आपले जोडीदार .

रविवार, ३ जुलै, २०१६

. पिकले पान (वृद्धाश्रम )



.                  पिकले पान (वृद्धाश्रम )
पिकल्या पानाला पुस्तकात ठेवताना कित्ती कित्ती विचार मनात येतात ,
काही जपली जातात ,काही पाचोळा म्हणून तुडवली जातात ,
काही चक्रीवादळात बेनाम होतात ,तर काही खत होऊन एखाद्या रोपट्याला पोसतात ,
पूर्वी बहरताना कित्येकांना तळपत्या उन्हात विसावा देताना दिसतात ,
कुशीतून उमललेल्या फुलांनी सुवासाची -रंगांची उधळण करतात ,
रसाळ -चविष्ट फळांनी विविध जिवांना तोषिवतात ,
जीवन-चक्र अबाधित ठेवायला कायकाय सोसतात !
ज्याचे -त्याचे नशीब उपभोग अन भोग हातात हात घालून चालतात ,
पण पालवीलाही कधीतरी पिकावेच लागते ,म्हणून काहींना तरी ठेवावे अलगद पुस्तकात .           

हुताशनि -होळी



.        हुताशनि -होळी 
होळी विविध रंगात न्हाऊन निघायचा उत्सव ,
करुनि विकारांचे ज्वलन ,शुद्धता जपणारा ,
तरल प्रवाही राहून  सर्व रंग सामावून घेणारा ,पंचतत्वांचे महत्व सांगणारा ,
धरे वरील धूलीचे वंदन करायला शिकवणारा ,
ऋतुराजाच्या अन सुगीच्या आगमनाची चाहुल देणारा ,
कृष्ण -गोपींचे अलौकिक नाते विणणारा उत्सव ,
मना -मनांना ,अनेक रंगांना एका इंद्रधनुष्यात सामावून घेणारा उत्सव . 

. गुढीपाडवा



.                             गुढीपाडवा 
संवत्सराचे स्वागत करूया गुढी उभारून ,नात्यांचे तोरण ठेवू प्रेमाने बांधुन ,
साखर -गाठीचा गोडवा सदा असावा जिभेवर टिकून ,
आरोग्य जपायला थोडा कडूलिंब ही घ्यायचा असतो गोड मानून ,
नव -वर्षाच्या खूप  खूप  शुभेच्छा  सर्वांना हात जोडून ,
सुख -समृद्धी -समाधान लाभो हीच कामना मनापासून .      

जयनाम महाभारत



                                                जयनाम महाभारत 
"जय"नाम महाभारत म्हणजे प्रत्यक्ष वेदव्यासांची वाणी ,
सोन्याला लाभावा सुगंध तसेच या महाकाव्याला ,श्रीगणेशाची लाभली लेखणी ,
नवरस ,षट्विकार ,त्रिगुणी नात्यांची ,अन विविध विषयांची ,एक काल अबाधित शिकवणी ,
जितुके करावे मंथन ,तितुके हाती लागे लोणी ,
अर्जुनाला दिलेला गीतोपदेश तर हे चक्रपाणी ,
मानव जातीला जगायला शिकविणारा ग्रन्थ शिरोमणी .

जोडीदार



             जोडीदार 
घ्यायची असेल भरारी तुला उत्तुंग उंच ,
तुला देईन साथ मी बनून मजबूत पंख ,
कधि वेग असला उशृंखल ,चंचल ,मनस्वी खळखळणारा ,
तरी शेवट पर्यंत बनून राहीन तुझा किनारा ,
संथ संयत वाहण्यात वाटत असेल आनंद अगर ,
तरी तुला सामावून घेईन बनून अथांग सागर ,
चालताना आले चढ -उतार जर ,काठी बनून देईन आधार जीवनभर ,
गूढ रम्य खोलवर जाऊन वेचायचे असतील मोती ,
तरी मी असेन बनून संरक्षक अन सोबती ,
व्हायचे असेल तुला अंकुरित जेंव्हा ,होईन मी तुझा पोषक ओलावा -उबारा तेव्हा ,
आजीवन देईन साथ श्वास आहे जोवर ,
संस्कारांची धरुन कास ,भर असेल कधी पुढे तर कधी मागे चालण्यावर . 



.              

शनिवार, २ जुलै, २०१६

सुंदर माझं घर



                                                 सुंदर माझं घर 
सुंदर माझे घर ,सदा असावे हासू त्याच्या चेहऱ्यावर ,
आत बाहेर माणसांची वर्दळ ,भर असावा सुसंवादावर ,
हक्कांसोबत कर्तव्याची असावी जवाबदारी लहाना पासुन थोरांवर ,
प्रवेश करताच स्वागत करिती दारे दोन ,जणू जोडलेले दोन कर ,
उभे असावे सदा न डगमगणाऱ्या पायावर ,
भुई असावी मातेची मांडी ,छ्प्पर जणु आजीचा मऊ-उबदार पदर 
भिंती -खिडक्या आणि झरोखे नाकी डोळी सुंदर ,
रंग -रंगोटी फर्निचर जणु साज चढविला ,जातीच्या सुंदरावर ,
द्रौपदीची थाळी अन अन्नपूर्णेच्या पळीने सजवावे आपले स्वयंपाकघर ,
आला -गेला ,पै -पाहुणा मनाच्या मोठेपणात वसावा ,नको हिशोब चौरस फुटांवर ,
मान करावा जगभराने ,घर-परिवार अन कुटुंब प्रमुखावर ,
सदा असावी ओढ घराची ,कितीही जावे लागो दूरवर .     

.              

. पर्यावरण संरक्षण -संवर्धन



.                पर्यावरण संरक्षण -संवर्धन 
असंख्य वाढत्या वाहनांचा अन कसला कसला हवेत मिसळतोय धूरच धूर ,
सर्वच नियम धाब्यावर बसवून ,प्रदूषणाचा आलाय पूर ,
कचरा फेकणे ,थुंकणे ,मलविसर्जन जागोजागी ,माणसाला वाटत नाही का हुरहुर ?
नको पाण्याची नासाडी ,थेंब न थेंब जिरवू -पुरवू ,सदुपयोग करूया पुरेपूर ,
निरिच्छपणे शुद्ध हवा पुरवणाऱ्या झाडांचे कित्ती मोठे असेल बरे ऊर ,
अशुद्ध घेऊन शुद्ध हवा देणाऱ्या झाडांबद्दल आपण कृतज्ञ असावे जरूर ,
हरिताची रीत रुजवून ,दुष्काळ -प्रदूषण -तापमानाची तिव्रता ठेवूया दूर,
शक्यतो अनैसर्गिक वस्तुंना ठेवून दूर ,नैसर्गिक चा वापर करूया भरपूर ,
निदान आपल्या स्वार्थासाठी नको वृक्षछेदन ,करू हिरवेआच्छादन ,बदलून टाकू धरतीचा नूर ,
नको नुसता दिवस साजरा ,हवा वसा -व्रत ,निदान नातवंडांना तरी मिळो फळे रसाळ -मधुर ,
हाताबाहेर जाण्यापूर्वी ,प्रत्येकाला पर्यावरण संरक्षण अन संवर्धनाचा सापडावा सूर . 

अष्टांग योग


                        अष्टांग योग 
अष्टांगयोग म्हणजे मन-शरीर -आत्म्याची एकरूपता ,एक उत्तम जीवनशैली ,
यम -नियम म्हणजे समाजाने अन स्वतःने घातलेले नियम पाळावेत वेळोवेळी ,
समाज-राष्ट्र -विश्वाची शांति -प्रीति जपूया ,आपण सगळे पावलो-पावली ,
आसन -प्राणायामाने राहि नियंत्रित ,शरीर श्वासाच्या हालचाली ,
सूर्यनमस्कार सर्वांग सुंदर व्यायाम ,आसन -प्राणायाम -साधनेची सुंदर सांगड जमली ,
आहाराला समजावे पूर्णब्रह्म ,नसावे नुसते उदरभरणासाठी ,वदन कवली '
प्रत्याहारी अंगाने जिवा -शिवाच्या भेटीची ,वाट गवसली ,
धारणा -ध्यान मनःशांतीला पोषक ,साधना असुही शकते वेगवेगळी ,
समाधी हे अंतिम ध्येय गाठूनि ,खऱ्या योग्याला लागे ब्रम्हानंदी -टाळी ,
करुनि योगसाधना ,जपून ठेवूया निरामय जीवनाची गुरुकिल्ली ,
नमन असावे तव चरणी ,'योगसूत्रकार 'आदिमुनि पतंजली .

पालखी

                                       पालखी      
ज्ञानबा   तुकारामाच्या गजरात ,पालख्या विसावल्या ,पावन झाली पुण्यनगरी ,
नर -नारी ,गरीब -श्रीमंत ,सर्व भेद विसरुनी ,अद्वैत झाला वारकरी ,
भाबड्या भक्तासाठी झाला सगुण ',तो ' असुनि निर्गुण निराकारी ,
विठु -माऊलीच्या ओढीने ,जनसागर निघाला पंढरपुरी ,
'तो 'ही भक्तीचा भुकेला ,वाट पाहत उभा ठेवूनि हात कटीवरी . 

Bramhakamal



                  ब्रम्हकमळ 
परसबागेतील कळी ते निर्माल्य असा ब्रह्मकमळाचा जीवनक्रम बघितला अन खालील ओळी सुचल्या 
बिजातून ,कंदातून ,काडीतून ,तर काही रोपे अंकुरतात पानाच्या पोटी ,
अचूक अचंभित करणारी ,ब्रह्मदेवाची सृष्टी 
नैसर्गिक पावसाने चिंबून नखशिखान्त ,फुलती डुलती पानफुटी ,
काळोखात काही घटिकांचे घेऊन आयुष्य ,शुभ्र सुरभित ब्रम्हकमळ उमलती ,
किती पेक्षा कसे जगावे ?याचा सुंदर पाठ शिकविती ,
अचल असुनही गुणांमुळे ,चालुन येती लोकच ,फुलोऱ्याच्या अवती -भवती ,
जागृत राहुन तव फुलण्याची वाट पहाती ,मन नयन नासिका ते तोषविती ,
उत्पत्ती -स्थिती -लय या जीवनक्रमाचेच जणू दर्शन घडती ,
ब्रम्हा -विष्णु -शिवांश घेउनी जणु प्रकटले त्रिमूर्ती ,
देव म्हणा वा शक्ति ,श्रद्धा -भक्ती वा चमत्कार ,पंगू भासे मानव मती ,
मतीवरी करुनि मात ,मनापासूनि नमन करोति -नमन करोति