सोमवार, १७ जुलै, २०२३

चि . राजीव यांस -शुभेच्छा पत्र


चि . राजीव यांस -शुभेच्छा  पत्र 
राजीव तव जन्माने धन्य जाहले मात -पिता अन कुटुंब भिमन वार 
साठाव्या वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद आम्हा कडून भेट वस्तू म्हणून स्वीकार ,
अमृत -सहस्रचंद्र दर्शन-शतका सारखे शुभदिन येत राहो तव जीवनी वारंवार ,
आदर्श पुत्र -पती-पिता -मित्र तू सर्वच नात्यांना दिलासा सुंदर आकार अन आधार ,
अर्धांगिनी लाभली “दीपा ”सम शिवातील शक्ती चा साक्षात्कार ,
गीतिका -कृत्तिका च्या रूपाने निराकाराचे रूप जाहले साकार ,
शीघ्र लाभू दे सदगुणी जावई ,फुलुदे उभयतांचा संसार ,
एका हाकेला कुणास ही मदतीला धावून जाण्याचे तुम्हा वरी सुसंस्कार ,
अजातशत्रू तू ,जपत आलास रक्ताचा अन जोडलेला परिवार ,
लाभो तुजसी आयु -आरोग्य-सुख-समृद्धी-समाधान ,हीच प्रार्थना करुनि परमेश्वर चरणी शतशः नमस्कार . 
          आसावरी जोशी आणि परिवार 

शुक्रवार, ७ जुलै, २०२३

सीझन चार

                  सीझन  चार 

अनुभवले अमेरिकेतील सीझन चार ,
स्प्रिंग -समर-फॉल आणि आणि विंटर तर फारच गार ,
स्प्रिंग म्हणजे बर्फाळ थंडी ने गारठलेल्या सृष्टीत डोकावणारी  बहुरंगी बहार ,
उन्हाळ्यात दिवस मोठा ,लक्ख प्रकाश झाडे झाली हिरवीगार ,
रात्री च्या समयी स्वच्छ तारांकित आकाश ,क्षितिजावरी धरणी आकाशाच्या मिलनाचा साक्षात्कार ,
हिंडणे फिरणे ,सुट्ट्या शाळांना आनंदासी नसे पारावार ,
विविध रंगी आणि सुवासिक सुंदर फुलांचे आकार -प्रकार ,
पशु -पक्षी ,कीटक -भ्रमर ,काजव्यांचा मुक्त संचार ,
गुरु पौर्णिमेचा चंद्र मनोहारी ,उगविला घेऊन सूर्याचे शीतल  तेज अन सुंदर गोलाकार ,
फॉल मध्ये होई अचंभा ,पाहुनि निसर्गाची सुंदर चित्रकारी ,
दुतर्फा दिसती पिकली पाने पिवळी -तपकिरी-विटकरी अन लाल सिंदुरी ,
सरता सरता निष्पर्ण वृक्ष -वेली भासे जणु बर्फ  झाडण्या खराटे घेऊन करती तैयारी ,
हिमवृष्टी  चे  सौंदर्य  निरुपम ,शुभ्र वस्त्रे अन हिरकण्यांचे आभूषण लेवून सजली सुंदर नवी नवरी ,
थोडे त्रास ती  वावरताना कामकरी अन शाळकरी ,
जोवर आनंदाचे पारडे असती जड ,तोवर चिंता नसे उरी ,
निसर्ग देवते सदा  कृपा असू दे ,प्राणिमात्रा वरी ,
आपण ही जपुया निसर्गासी ,पळुन आपापली जवाबदारी ,
निराकार पुरुष परमात्म्यासी ,प्रकृती करी साकार ,
नास्तिक ही होईल आस्तिक ,तव सृजनाचा पाहुनी चमत्कार ,
अनुभूतींतील ओमकारा तू या भक्ताचा साष्टांग स्वीकार . 



गुरुवार, ६ जुलै, २०२३

गुरु पौर्णिमा ३-७ -23

 



गुरु  पौर्णिमा ३-७ -२३
इच्छा तेथे सापडे मार्ग ,मना तू शोध ना !!
आवश्यकताच आविष्काराची जननी असते ना !
परब्रम्हाच्या शोधाची जेंव्हा उपजते कामना ,
निसर्गात पदोपदी भेटतात गुरु ,जर मनी असेल सदभावना ,
साकार -निराकार असूदे कोणतीही आराधना ,
गंतव्या पर्यंत प्रवास करायचा आहे आपल्याच पायांना ,
देवाजीने दिले मानव जन्माचे दान ,उंची  कडून मुळा कडे धाव ना ,
सदगुरू म्हणजे मित्र-मार्गदर्शक -तत्ववेत्ता , कृपा असू दे चालताना ,
तव आशिर्वादाने शक्य होते  साधनां न शिवाय ही साधना ,
म्हणूनच गोविंद -गोपाळा पेक्षा सदगुरु भासे गुरु ,साऱ्याच संतांना ,
शतशः नमन सदगुरु चरणी ,आणि शुभेच्छा बंधू -भगिनींना . 


Asawari joshi