सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

अनंत चतुर्दशी

          अनंत चतुर्दशी 
ओमकार स्वरूप तू ,तू प्रथमेश तू अनंत ,घेऊनि पूजा -अर्चा आणि शिदोरी ,
बुद्धी - रिद्धी -सिद्धी विधाता ,गौरी नंदन आज निघाला निज घरी ,
प्रवास लांबचा आहे तरी ,लंबोदरा -एकदंता-विनायक करणारच तू मूषका वरी ,
पाऊस -उन्ह खेळ करि ,ब्रह्मकमळाने धरले छत्र ,गणपती -गज वदना च्या शिरी ,
भालचंद्र तू अथर्व -अमोघ तू ,सुख कर्ता -दुःख हर्ता ,स्मरण तुझे मंगलकारी ,

निरोप देऊ या बाप्पा मोरयासी ,”पुढच्या वर्षी लवकर ये ”च्या गजरी .

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

प्रतिभा हेमंत -सहस्त्र चन्द्रदर्शन

        प्रतिभा हेमंत -सहस्त्र चन्द्रदर्शन 

उजाडला दिन सोनियाचा नसे आनंदासी पारावार ,

सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्या निमित्त एकच शुभेच्छा ,उभयतांना लाभो सुख -शांती-आयु-आरोग्याचे ऐश्वर्य अपार ,

मुले -सुना-जामात -नातवंडे जणू प्रतिभामय स्थापत्याचे स्तंभ ,वेलबुट्टी ,आत्मालंकार ,

जन्मदाते पाया अन “हेमंती ”कळसाने लाभला मंदिरासी पूर्णाकार ,

कर्तृत्व ,दातृत्व ,व्यवहार ,आदर ,सत्कार ,शिकण्या सारखे गुण बहु ,मोजता ते कसे येणार ,

पुण्यनगरी जाहली उभयतांची कर्मभूमि ,एकमेकांसी पूरक आदर्श जोडीदार ,

होऊन दीपस्तंभ दाखविली दिशा ,दूर केलात अनेकांच्या द्विधा मनस्थितीची अंधकार ,

सूर्याचे तेज ,चंद्राची शीतलता ,लक्ष्मी -सरस्वती एकत्र नांदे असा हा आदर्श परिवार ,

कुटुंब ,आप्त ,मित्र सकलांची सुंदर गुंफण करणारा ”हेमंत -प्रतिभा नामक आदरणीय सुवर्णकार ,

होवो शताब्दी कडे वाटचाल ,हीच  करुनि प्रार्थना ,ईश्वर चरणी शतशः नमस्कार . 

                                                           आसावरी जोशी 

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

अग्निपरीक्षा

अग्निपरीक्षा 

आज अचानक , एक विषाणू ,बन खडा भस्मासुर ,

सारी दुनिया अलग अलग वजहोसे चिंतातुर ,

हरपल मर मरकर ना जी ,उभर डर से उपर ,

असुर तो आते जाते ही रहेंगे ,रूप बदल बदल कर ,

कोरोना से डरोना ,लडना होगा मानवता को यम -नियमोका पालन कर ,

मुश्कील घडी ही सिखलाती  हमको पितल -सोने में अंतर ,

स्वीकृती -संस्कृती—स्वाभिमान -अस्तित्व की करनी होगी रक्षा ,अग्नि परिक्षा देकर ,

बहुतेरे कह गये संकट को समझो एक सुनहरा अवसर ,

होनाही होगा हम सबको , परिश्रम पूर्वक आत्म निर्भर ,

ए जिंदगी,कुछ अच्छा कर गुजर , जीवन हो जाए सदा के लिये अमर ,

“वसुधैव कुटुम्बकम “का मंत्र हो  हम सबकी जिव्हा पर . 

                आसावरी जोशी

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

अयोध्येतील श्री राम मंदिर भूमिपूजन हस्ते -पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी—बुधवार दिनांक पाच ऑगस्ट २०२०

                   अयोध्येतील श्री राम मंदिर भूमिपूजन 
                 हस्ते -पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी—बुधवार दिनांक पाच ऑगस्ट २०२०
अयोध्या नगरीत अभिजीत मुहुर्ती ,श्री राम मंदिराचे ,होते का ते केवळ भूमि पूजन !!
ते तर आपुल्या धर्म -पुराण—इतिहास -कला—साहित्य -संस्कृती अन वचन—पूर्तीचे जतन ,
आदर्श ठरले संत -महंत विभिन्न प्रतिनिधी अन राष्ट्र प्रमुखांचे सेवाभावी वर्तन ,
लघु असो वा महत्तम ,अफाट काटेकोर होते ,या सोहळ्याचे पूर्व -पश्चात नियोजन ,
रामनामाच्या सागरी ,भक्ती -सरितेचे झाले दीर्घ विरहा नंतर मिलन ,
बत्तीस वर्षांची होती तपस्या ,पंचतत्वांच्या साक्षीने नव-शिळांचे झाले पूजन—अर्चन ,
खूप काही शिकवुनि गेले ,राष्ट्रप्रमुखांनी केलेले साष्टांगसह वंदन ,
“जय सियाराम “च्या घोषाने अधोरेखित झाली ,स्त्री शक्तीची आन -बान -शान ,
समयोचित संदर्भ देऊन ,आबाल -वृद्ध—वैद्यांचा वृद्धिंगत केला मान ,
आत्मनिर्भरते सोबत देऊ केले ,भारतीय असल्याचे अमूल्य आत्मभान ,
सर्वोत्तम मानवी मूल्यांचे -गुणांचे स्वरुप म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम ,
त्याग -तपस्या-प्रेम -करुणा-कर्तव्य-बलिदान -न्याय आदिंची मूर्ति म्हणजे राम ,
कौसल्येचा पोटी ,दशरथ ओटी ,शरयूकाठी ,अवधवासीयांच्या ओठी “लल्ला राम ”एकच नाम ,
विराम म्हणजे थांबणे ,गती -प्रगती हवी तर आयुष्यात हवाच कालातीत-देशातील -दिशादर्शक राम ,
नरेंद्राने रोवले रोप ,का !पारिजातकाचेच ,पवित्र मंदिर परिसरी ,
आणले होते या स्वर्ग फुलासी श्री कृष्णानें ,स्वर्गतुनी भूवरी ,
धर्म -पुराण-आयुर्वेद -साहित्यात असे मान ,सकल देवी -देवतांसी प्रिय ,शोभे त्यांच्या शिरी ,
रंग -सुगंध-नाद नाजुक -मखमली स्पर्श ,सोबतीला औषधी गुण नानापरी ,
तन-मन-धन अर्पित करणाऱ्या सुबुद्धांची ,वाढत राहो वंश वेल ,द्या वरदान ब्रम्हा -विष्णु-कैलाशपती ,
कार्य सिद्धीस जावो हीच प्रार्थना ,प्रथम पूजनिय गौरी नंदन गणपती ,
रक्षण करण्यासी समर्थ आहे ,चिरन्जीवी -रामदास-हनुमान-अंजनी पवन सुत-राया मारुती . 
                                        आसावरी जोशी . 

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

Alok 40th birthday



आलोक -चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त काही खास आठवणी आणि शुभेच्छा . 
                    गुरुवार दिनांक २३फेब्रुवारी १९७८हा दिवस ,माझ्या आयुष्यातील कॅलेंडर मधील ,एक सोनियाचा दिन . म्हणून कदाचित आम्ही आलोकल  लहानपणी सोनू म्हणायचो . आलोक लहानपणापासूनच शांत ,स्वावलंबी ,मोठ्यांचा मान राखणारा ,लहानांना प्रेमाने मदत करणारा ,निश्चयी ,मितभाषी पण मिष्किल ,मोजके पण जिवलग मित्र असलेला . व्यवस्थित जेऊन सुद्धा शरीरयष्टी मात्र फारच किरकोळ . अर्चना -आलोक -अनिरुद्ध ही भावंडे फारशी भांडलेली मला आठवत नाही . एक गम्मत सांगाविशी वाटते ,लहानपणी तो अंक आणि अक्षरे उलटी लिहायचा ,मिरर इमेज सारखी . तीन ला सहा आणि सहाला तीन तर हमखास . तोच प्रकार कुलुप -किल्ली च्या बाबतीत . पण प्राथमिक शाळेत पहिला -दुसरा क्रमांक सोडला नाही . कधी चारू पहिला तर कधी आलोक पहिला . 
          चिकाटी आणि हार्डवर्क च्या जोरावर बारावी बोर्डात नंबर आला आणि इंजिनिअरिंग ,एम . एस . ,पीएच . डी . असे टप्पे पूर्ण केले . पर्ड्यूला कोराफासच्या अवॉर्ड साठी नॉमिनेशन झाले तेव्हा आणि पीएच . डी . ग्रॅज्युएशन सेरेमनी चा वॉक पाहताना अभिमानाने ऊर भरून आले . पुढे नोकरी ,लग्न ,बाबा म्हणून ही प्रमोशन मिळाले . 
          आता आलोक -अनन्या -अर्चित पुण्यात आल्याने माझा आनंद गगनात मावेनासा झालाय .
                                                                                                                         आई

                   चाळीसावा  वाढदिवस 
     आलोक आम्हां सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा ,आज तुझा वाढदिवस चाळीसावा ,
पहाटे उठल्यावर  अर्चित  चा हसरा चेहरा  तुला सदा दिसावा ,
अनन्या  चा प्रेमळ सहवास शतकपूर्ती पर्यंत लाभावा ,
जन्मदात्यांना तुझा सदैव स्वाभिमानच वाटावा ,
चाळीशीच्या चष्म्यातून ,सकारात्मक बहुआयामी दृष्टिकोन तू जपावा ,
यश -कीर्ती -संपत्तीचा लौकिक -अलौकिक खजिना ,सत्कार्यासाठी खर्चुन वाढवावा ,
मैलाच्या दगडाने भूत -भविष्य सांधून ,गुरुकृपेने जीवन प्रवास सुकर -सफल व्हावा
चाळीशी म्हणजे काय ,जणू अठरा वर्षाच्या सज्ञान -सतेज रत्नाला बावीस वर्षाच्या स्वानुभवाचे कोंदण लाभावे ,
एकच प्रार्थना सुखी -समाधानी चिरायुष्या साठी ,सर्वांच्या शुभेच्छा आणि परमेश्वराचे आशिर्वाद सदा तुझ्या पाठीशी असावे .
                                                                                                                                                           आई 

. अनिरुद्धच्या चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त -काही आठवणी आणि शुभाशिर्वादाची एक कविता --



     .  अनिरुद्धच्या चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त -काही आठवणी आणि शुभाशिर्वादाची एक कविता -------
            २०जानेवारी १९८०या दिवशी कोणत्याही अडथळ्यांची चिंता न करता जन्माला आलेले आमच्या वंश -वृक्षाचे हे शेंडेफळ . दोन वर्षापेक्षाही कमी अंतर असलेला -आलोकचा जणू पाठिराखाच . आलोक -अनिरुद्धला जुळ्यांप्रमाणेच वाढवलेले आठवतंय मला . 
            तीक्ष्ण बुद्धी आणि इतरांवर छाप पडेल असे व्यक्तिमत्व असलेला . आमच्या कडे पूर्वी पाहुण्यांची बरीच वर्दळ असायची . पुण्याला कोणी शिक्षणासाठी ,कोणी नोकरीसाठी ,कुणी उपचारासाठी तर कुणी सहज पुणे बघण्यासाठी आमच्या घरी येत असत . सहा ते साठ वयाच्या सर्वांशी लाघवी पणाने बोलून आपलेसे करून त्यांना कम्फर्टेबल झोन मधे आणणारा हा माझा मनकवडा मुलगा ,म्हणून कदाचित याला लहानपणी लाडाने आम्ही' मोनू 'म्हणत असू . ताई -दादा चे मित्र -मैत्रिणीनशी याची खास मैत्री . त्यांच्या सर्व वस्तू कुठे असतात ?आई मीठ मोहरी ,डाळ -तांदूळ कुठे ठेवते याची त्याला बारिक माहिती असत . चौकस बुद्धी आणि तीक्ष्ण पंचेंद्रिय असल्याने आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी त्याला माहीत असत . अभ्यास मात्र उडत -उडत करायचा ,त्यामुळे त्याला बरेच वेळेला ,ओरडा बसायचा . पण परिक्षेत मार्क मात्र उत्तम असायचे . शाळेत आदर्श विद्यार्थी ,आणि पालकांनाही आदर्श पालकांचा मान मिळवून देणारा हा आमचा मुलगा !!!!
       अर्चनाताईने लहान भावाचे नाव अनिरुद्ध ठेवायचे असे सांगितले . आणि आम्ही तेच नांव ठेवले . नावाप्रमाणे कोणत्याही रोधकाची पर्वा न करता ,बारावी टेक्निकल ,सी . ओ . ई . पी . मधे प्रॉडक्शन इंजिनियरिंग ,आणि अमेरिकेतील सिनसिनाटीहून एम . एस . होऊन नोकरीत स्थिर -स्थावर झालेले गुणी बाळ ते !!!चारुताचायोग्य जोडीदार  शुभम -मुक्ताचा प्रेमळ बाबा ,मुलगा ,जावई ,भाऊ ,मामा -काका अशी सर्व नाती जवाबदारीने अन प्रेमाने सांभाळणारा . अमेरिकेतून आईला रोज फोन करून हाल -हवाल विचारणाऱ्या या माझ्या मुलाचे माझ्या बऱ्याच नातेवाईकांना आणि मैत्रिणींना कौतुक वाटते .
दूरदेशी गेल्यावरही, रोज येणारा  तुझा फोन, जणू माझ्या प्राण वायूला संरक्षक कवच देणारा ओझोन...      
                                                                                                                               आई         

      अनिरुद्ध आम्हां सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा ,आज तुझा वाढदिवस चाळीसावा ,
पहाटे उठल्यावर शुभम -मुक्ताचा हसरा चेहरा  तुला सदा दिसावा ,
चारुताचा प्रेमळ सहवास शतकपूर्ती पर्यंत लाभावा ,
जन्मदात्यांना तुझा सदैव स्वाभिमानच वाटावा ,
चाळीशीच्या चष्म्यातून ,सकारात्मक बहुआयामी दृष्टिकोन तू जपावा ,
यश -कीर्ती -संपत्तीचा लौकिक -अलौकिक खजिना ,सत्कार्यासाठी खर्चुन वाढवावा ,
मैलाच्या दगडाने भूत -भविष्य सांधून ,गुरुकृपेने जीवन प्रवास सुकर -सफल व्हावा
चाळीशी म्हणजे काय ,जणू अठरा वर्षाच्या सज्ञान -सतेज रत्नाला बावीस वर्षाच्या स्वानुभवाचे कोंदण लाभावे ,
एकच प्रार्थना सुखी -समाधानी चिरायुष्या साठी ,सर्वांच्या शुभेच्छा आणि परमेश्वराचे आशिर्वाद सदा तुझ्या पाठीशी असावे .
                                                                                                          आई  






. नव वर्षाभिनंदन

 .        नव वर्षाभिनंदन 
 सर्वांना नव वर्षाचे खूप खूप अभिनंदन ,
 अमूल्य आयुष्याला देऊया नाजुक नात्यांचे कोंदण ,
आजी =गोड गोड लाडू -वडी ,मऊ साडीची गोधडी ,जादुई मिश्रणाची हवीहवीशी पुडी ,
आ +बा =आई -बाबांच्या संचिताची प्रवाही माया ,विशाल वटवृक्षाची घनदाट छाया ,
आ +ई =आत्मा +ईश्वर ,कर्तव्य अन प्रेमाचा झरा अनश्वर ,
बा +बा =मुलांच्या बारश्या पासुन बाशिंग बांधे पर्यंत त्याला माहित नाही आळस ,
            कुटुंबाच्या इमारतीचा ,तोच पाया ,तोच कळस ,
भा >ऊ =लहान असो वा मोठा ,बहिणीच्या पाठीशी कायम ऊ <भा ,
दुहिता =सासर -माहेर 'दुहि 'कडचे 'हित 'जपणारी ,ती कन्या -भगिनी -पत्नी -माता ,
मुले =थोरा मोठ्यांने  ,ईश्वराने दिलेला परमानंदी ,अमूल्य असा 'दुवा '
स >खा =सख्यांपेक्षा 'खा <स 'मृगनाभीतील दरवळणारा कस्तुरीचा वास ,
परमेश्वर =दिसत नसला तरी ,वाऱ्या सम येतो अनुभवता ,तो तर आहे अनादि -अनंत -अक्षर ,
             माणुस नसेना पण माणुसकी असते अमर ,ती जपूयात साक्षीला ठेवून ईश्वर . 

स्वराज्या कडून सुराज्या कडे

           स्वराज्या कडून सुराज्या कडे 
जेंव्हा  ढासळतात नैतिक मूल्ये ,वाढू लागतात समाजातील शल्ये ,
लहानपणा पासूनच माणुस घडवणाऱ्या मूल्यांचा मनावर व्हावा संस्कार ,
हाच निरोगी समाजाचा भक्कम पाया अन आधार ,
समाज विघातकाना व्हावी शिक्षा कठोर ,
गौरव -सन्मानाने विभूषित व्हावेत ,चारित्र्य सम्पन्न ,समाज सुधारक थोर ,
अनुसरण हा नैसर्गिक नियम ,त्यावर चालेल नवी पिढी ,
व्यक्ती ते समष्टी समाज प्रगतीची उत्तम शिडी ,
स्वराज्याचे होवो सुराज्य -रामराज्य ,प्रजा लाभो साजेशी ध्येय वेडी .

सीनियर सिटीझन -मदर्स डे

             सीनियर सिटीझन -मदर्स डे 
एका फोटोत कुटुंबा समवेत दिसते 'ती 'ओतप्रोत आनंदात ,
तर कधी ऐसपैस घरात ,एकटीच आनंदी मुखवट्याच्या आत दडलेल्या गदारोळात ,
आईच ती ,जसे आनंदाने साजरा  करते वर्षाकाठी येणारा 'मदर्स डे '
तसेच स्वतःला सांभाळून ,निष्काम व्यस्ततेत गोजिरे करते 'अदर्स डे '
ती म्हणजे 'व्यक्ती नव्हे प्रकृती 'प्रकाशाचा किरण 'आनंदाचे प्रवाही झरे '
ऊर्जा साठवण्या साठी सदा उघडी ठेवते शरीर व मनाची दारे ,
सकारात्मकतेने स्वीकारावे आयुष्यातील प्रत्येक संक्रमण ,
परिस्थितीचे होऊ देऊ नये ,मनस्थिती वर आक्रमण ,
देवा दे दान निदान सदा जगता यावे माणसाला जपून माणूसपण .

उपदेशामृत

       उपदेशामृत 
चेहरे -मोहरे -शब्द जे समोर आले ते वाचले ,
प्रवचन ,सत्संग ,थोरांसोबत लहानांचे ही बोल ऐकले ,
काही रुचले पचले ,तर काही चोथा होऊन गेले टाकले ,
रुचले -पचले त्यातीलही आधी फक्त समजले शब्दार्थ ,
स्वानुभवाने रवंथ करता करता उशीरा उमगले भावार्थ ,
उशीर झाला ,संध्या समयी ,आयुष्याच्या हेतूचे आले थोडे भान ,
देवा जन्मजन्मांतर असेलच तर संचित कोषातील अर्थांचे बालपणीच देरे थोडे दान .

माझा बगीचा -निष्काम कर्माची शिकवण देणारी पाठशाळा .

     माझा बगीचा -निष्काम कर्माची शिकवण देणारी पाठशाळा . 
       आमचा कर्वेनगर ,पुणें येथे गार्डन फ्लॅट आहे . वडिलांचा शेती बागायतीचा व्यवसाय असल्याने ,लहानपणा पासूनच झाडे -झुडपे -रोपे -वनस्पती सारख्या हरित सुवर्णाची आवड जडली . बाग कायम बहरलेली रहावी म्हणून वेगवेगळ्या ऋतुंमध्ये फुलणारी ,कुंदा ,कण्हेर ,गुलाब ,जासवंद ,सिंगल -डबल तगर ,मोगरा ,मदनबाण ,ब्रह्मकमळ ,अनंत ,अबोली ,चाफा इत्यादि फुलझाडे लावली आहेत . मधे -मधे रंग सुगंधाची उधळण करण्या साठी मे फ्लॉवर ,हेगझोरा ,बर्ड ऑफ पॅरेडाइज ,सदाफुली ,लिली ,मरवा ,दवणा पण आहेत . मोठे झाड म्हणाल तर फक्त एक कल्पवृक्ष आहे . सर्वात आवडता म्हणजे "हर्बल पॅच "या पॅच मध्ये छोटे वाफे करून व मधे -मधे कुंड्या ठेवून ,तुळस ,गवती चहा ,बेझिल ,ओली हळद ,आले ,आळू ,कोरफड ,कढीपत्ता ,पुदीना ,विड्याचा वेल इत्यादि लावले आहे . बाहेरील एक भिंतच काबीज केलेला मघई चा वेल तर ,जाणाऱ्या -येणाऱ्यांच्या कौतुकास पात्र ठरला आहे . पूर्वी पॅशन फ्रुट ,तोंडली अश्या वेली साठी एक छोटा मांडव पण होता ,पण आता पुरेसे उन्ह मिळत नसल्याने त्यांचा अभाव खटकतो . बागेला पाला पाचोळा व ओला कचरा मिश्रित खतच घालते . 
             बागकामाला माळी न ठेवता ,मी स्वतःच जमेल तेवढी कामे रोज सकाळी थोडा वेळ करते त्यामुळे दिवसाची सुरुवात आनंददायी होते . आपल्या परस बागेतील नारळ ,फुले ,पाने ,हर्ब्ज वापरणे आणि इतरांना देणे यात मिळणारा आनंद अनमोल आहे . झाडा झुडपांच्या जीवनक्रमातून इतरांना निरिच्छ पणे आनंद देण्याची शिकवण आणि मिळणारी सकारात्मक ऊर्जा तर जणू "सोन्याला सुगंध मायमातीचा "
                                                                                                   आसावरी जोशी 
                                                                                                सेल नंबर -९६८९३९०८०२
                                                                                                       कर्वेनगर ,पुणे , 

. अभिनंदन -आलोक




.                            अभिनंदन -आलोक 
आलोक खूप खूप अभिनंदन ,नोकरीत बारा वर्षे केलेली तपश्चर्या फळाला आली ,
कमिन्स ने तुझ्यावर "इंजिनियरिंग डिरेक्टर ,इलेकट्रॉनिक बिझनेस युनिट "ची जवाबदारी विश्वासाने आहे टाकली ,
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद ,ज्यांची -ज्यांची तुझ्या प्रगतीत मदत झाली ,
स्व सोबत सहकारी ,कुटुंबीय -कंपनीला ,लाभो दिर्घायुष्य -आरोग्य -भरभराट ,
नवदुर्गे चरणी एकच प्रार्थना ,सापडो सदा तुला ,सचोटी -सहकार्य -समाधान -श्रेय देणारी योग्य वाट . 
                                                                                                   आई 







आयुष्यातील अध्याय

                  आयुष्यातील अध्याय 
आयुष्याच्या ग्रंथातील सरत असतात अध्याय ,चांगले -वाईट ,क्लेशकारक ,तरी अपरिहार्य ,
परिक्षा पास करायची तर ,काही आवडते ,काही नावडते ,असतात विषय अनिवार्य ,
जसे इच्छा नसताना पडतच असतात ,चांगल्या सोबत स्वप्ने ,वाईट घाबरवणारी ,
जाग आल्यावर वाईट ते विसरून जायचे ,कारण वाट पहात असते ,रोज एक पहाट सोनेरी ,
वनवास -वटिकेतील निवास -राजमहाल ते आश्रम प्रवास ,कित्ती त्या अग्निपरिक्षा ,
सुवर्ण असो  वा सीता यांना कधीच वाटली नाही ती शिक्षा !!!!!!
सिद्ध -शुद्ध -आदर्श राहायला ,द्याव्याच लागतात अश्या अनेक परिक्षा ,
अनुभवाने रुंदावत असतात ,आयुष्यातील आयाम आणि कक्षा ,
पहिले पान जन्म ,शेवटचे मृत्यु ,मधली पाने' त्या 'ला माहीत ,प्रत्येकाच्या हाती पुस्तके न्यारी -न्यारी ,
परिस्थितीचा हसत स्वीकार ,सकारात्मकता ,कर्तव्य -निष्ठा ,जीवनाला देत असते उभारी ,
इंट्यूशन ,टेलिपथी ,सिक्सथसेन्स च्या स्वागता साठी ,उघडे असावे लागते ,अंतःकरणाचे  द्वार ,
स्थूल अंतराला नसते महत्व ,अनुभूति साठी जुळावी लागते ,मनाची तार ,
अनुभूति म्हणजे ओमकार नाद ,घंटेची किंकिण ,वाद्यांची मोहक झंकार ,
मनाला समजुत घालण्या साठी ,कर्माचा सिद्धांत पडतो ,खूप उपयोगी ,
भोग चुकलेत का कुणाला ?मर्यादा पुरुषोत्तम राम असो वा कृष्णा सम महायोगी . 

कोनाचे प्रकार

              कोनाचे प्रकार 
भूमिती चे पुस्तक चाळले तर ,सापडला त्रिकोन ,चौकोन ,षटकोन ,
जंग जंग पछाडून ही ,सापडेना दृष्टिकोन ,
भूमिती एक गणिती प्रकार ,पद्धत वेगवेगळी असू शकते ,पण सर्वांचे असते एकच उत्तर ,
जीवन म्हणजे मिळालेल्या भूमिकेत शिरणे ,असुदे वय पंचवीस ,पन्नास ,पंचाहत्तर ,
प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असू शकते ,कारण व्यक्ती तितक्या प्रकृती ,
अनेकदा एकाच व्यक्तीलाही भूमिके प्रमाणे भिन्न- भिन्न निर्णयाची करावी लागते कृती ,
एकाच गोष्टीच्या ,समजण्या -समजावण्या साठी काढाव्या लागतात ,विभिन्न आकृती . 

श्री गुरुदेव दत्त अवतार आणि परिसर यात्रा :



श्री गुरुदेव दत्त अवतार आणि परिसर यात्रा
: श्री दत्त अवतार यात्रेचा योग आला जुळून, कारण, भिऊ नकोस, पाठीशी आहे हे सोबतीला होते गुरू - आश्वासन,
अक्कल कोट ला स्वामी समर्थ मंदिर अन वटवृक्षा चे घेतले तृप्त दर्शन,
कडगंजी  ला महान ग्रंथ गुरु चरित्राचे झाले लेखन,
पवित्र नदी - संगम आणि श्री दत्तात्रय - निर्गुण पादुका मुळे, गाणगापूर  झाले पावन,
देवा मज भक्ताची पूजा अर्चना स्विकार कर, सोबतीला वाहते  भाव युक्त शब्द - सुमन.
आसावरी जोशी.
: श्री दत्त गुरूंचे पहिले अवतार  श्रीपाद श्री वल्लभ यांची जन्म भूमि पिठापूर,
मंथनगड ला भक्तास दिले दर्शन, कर्म भूमि कुरव पूर, 
शिव - शक्ति चे दर्शन कुक्कुटेश्वारि, तरपण  विधी चे स्थान पादगया, मुक्ती पावला गयासूर, 
श्री टेबे स्वामी चे वास्तव्य  लाभले, धन्य झाले कृष्णा माई बेट, 
मंत्रालय येथे, श्री राघवेंद्र स्वामींची आनंददायक दर्शन भेट, 
श्रीपाद श्री वल्लभ यांचा पालखी सोहळा, एकमेव अद्वितीय दुजा,  
अन्नावरम ला झाली भूतला वरील पहिली, श्री सत्य नारायण  महा पूजा,
परमेश्वरा तव चरणी कोटी कोटी नमस्कार, शिरी असूदे हात तुझा. 
आसावरी जोशी.

Vastushanti-navanirmal

महाराष्ट्रातील शक्तीपीठे


                                  महाराष्ट्रातील शक्तीपीठे
आज वार शुक्रवार ,देवीला नमस्कार , 
भारत भूवर एक्कावन्न शक्तीपीठे, देवी सतीच्या अंशाचे अवतार ,
भाग्यशाली महाराष्ट्रात भरला ,साडेतीन पीठांचा पावन   दरबार ,
कोल्हापुर वासिनी अंबाबाई ,महालक्ष्मी चा अवतार ,
तुळजापुरची मात भवानी ,जणु झाली सरस्वती साकार ,
माहुरगढची महाकाली
रेणुकादेवी  करि ,असुरांचा संहार ,
वणीवासिनी देवी सप्तशृंगी ,अर्धमंत्र ओमकार ,
'माँ का बुलावा 'आल्यावर ,खरंच घडतात कित्येक चमत्कार ,
रोपवेने सुलभ झाले ,देवी सप्तशृंगी दर्शन ,शासनाचे शतशः आभार ,
देवस्थानी दर्शन पूजन ,व्यवस्थापन ही झाले प्रगत ,आबाल -वृद्धांचा केलाजातो विचार ,
तव दर्शनाने तृप्त जाहले ,तन -मन-नयन ,सहकुटुंब -सहपरिवार ,
आई  देवी  दे शक्ती -भक्ती ,शांती -समृद्धी -सुबुद्धी चा वर ,तव चरणी कोटी -कोटी नमस्कार . 

Father'sday nimitt aksharmaletil ek prastuty.----' बाबा -बा +बा

 Father'sday nimitt aksharmaletil ek prastuty.----'                  बाबा -बा +बा
बारश्या पासून बाशिंगा पर्यंत ,ज्याचा वाटतो भक्कम आधार ,
घोडा -घोडा होणारा ,सायकल शिकवणारा ,मोडलेले दुरुस्त करणारा शक्तिवान अन हुशार ,
अधून -मधून त्याच्या मुळे आई चा नकार सुद्धा होतो होकार ,
आजारपणात आईची माया अन बाबांची धावपळ करून केलेले उपचार ,
स्वतः हून सल्ला देत नाही ,एकदा का झाले हातचार ,
मागितलातर देतो सल्ला ,भावने पेक्षा त्यात असतो व्यवहार ,
लवकर जाऊन उशिरा येतो ,पण मुलांना पुरतो सुट्टीचाही एक वार ,
आधुनिक बाबा तर खूपच झालाय जवाबदार ,
अपत्य जन्माच्या वेळेस ,मॅटर्निटी लीव्ह चा हक्क आणि जवाबदारी चा पायंडा पाडणारा ,
आईच्या खांद्याला खांदा लावून ,कुटुंबाची जवाबदारी घेणारा ,
अडीअडचणीत 'वर्क फ्रॉम होम 'करणारा ,
म्हणजे साईड बाय साईड 'वर्क फॉर होम 'करता येते म्हणणारा ,
हाऊस वाईफ प्रमाणे ,हाऊस हसबँड या शब्दाची देणगी ,शब्दकोषाला देणारा ,
काळाच्या गरजे प्रमाणे बदलायला घेत आहे पुढाकार 
स्वतः च्या गरजा कमी करतो ,मुलांसाठी राबराब राबणार ,
अश्या आदर्श बाबाला मुले कशी बरे विसरणार ?मुले नाही च विसरू शकणार .
Happy fathers day.
                                      Asawari joshi

एकसष्ठी एक मैलाचा टप्पा

                एकसष्ठी एक मैलाचा टप्पा 
विश्वास -प्रेम -कर्तव्य -कल्पना अन कष्टाने गुलाब झाले काटे ,
मिळुनी संसाराचे पवित्र-प्रसन्न , मंदिर बनविले छोटे ,
दत्तप्रसादाचा लाभ मिळण्यास ,भाग्य लागते मोठे ,
आयुष्यातील मैलाचा टप्पा ,साठी अन एकसष्ठी ,
पूर्वार्धाच्या अनुभवांची ,शिदोरी असते गाठी ,
उत्तरार्धात देते आधार ,जशी चालत असता काठी ,
काय कमवले ,काय गमवले ,काय राहिले !चा टप्पा असतो 'साठी '
नैसर्गिक विस्मरणाला नको देऊ या नांव -"साठी बुद्धी नाठी "
चूक -भूल देऊ -घेऊ ,नाजुक नाती जपण्या साठी ,
विस्मरणाचा घेऊ लाभ ,मागू क्षमा -करु क्षमा ,अलगद उकलू गुंतागुंती ,
उगवती अन मावळती मधले क्षण हे जीवन ,साक्षीला असते ,माता आणिक माती ,
एक हात देऊया पुढील पिढीच्या हाती ,अन दुसरा मागील पिढीच्या हाती ,
चढ असो वा असो उतार ,देते आधार निस्वार्थी काठी ,
देऊ आनंद ,घेऊ आनंद ,आनंदाची चावी जपून ठेवूया आप कनवठी ,
उरले -सुरले गुंतवू परमार्थी ,संचित वाढे परलोका साठी ,
छिद्र -पोकळी विसरुनि सारे ,सूर मुक्तीचा ,वेणुस गवसे ,श्रीहरीच्या अधरी -ओठी . 
                                                                     आसावरी जोशी



ओम नमो भारतमाता

                                ओम नमो भारतमाता 
ओम नमो बद्री -केदार , ईश्वर चरणी भक्तजनांचा कोटी कोटी नमस्कार ,
भारत देशी वाढू दे ,शांति -समृद्धी -सामंजस्य -ऐक्य -देशभक्तीचे संस्कार  ,
ओम नमो मर्यादा पुरुषोत्तम ,गोवर्धनधारी ,योगेश्वर ,साकार म्हणा वा निराकार ,
आधी कर्तव्याशी राखू ईमान ,मगच मागू अधिकार ,
ओम नमो कन्याकुमारी -लक्ष्मी -सरस्वती -चंडी -गौरी ,तव  चरणी नमन त्रिवार ,
नको कोरडी माया -ममता ,सोबत असुदे ओलावा अन ,अन्यायाचा तिटकार ,
भारतमातेचा जयजयकार ,भारतमातेचा जयजयकार ,
द्वारकाधीशा -जगन्नाथा -बालाजी -रामेश्वर -काशी विश्वेश्वर ,
स्वाभिमान -स्वधर्म -स्वातंत्र्य रक्षणा साठी ,कृपा असुदे आम्हावर ,
भारत देश तेहतीस कोटी देवांचा शूर -वीर -साधु -संत अन ऋषी -मुनींचा ,
भान राखुया मान राखुया सुजलाम -सुफलाम -वैभवशाली इतिहास -संस्कृतीचा ,
कोटी -कोटी देशबंधूंसह ,वसा घेऊया ,विश्व कल्याण अन विश्व शांतीचा .

गुढीपाडवा

         गुढीपाडवा 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ,आज नव -वर्षाचे झाले आगमन ,
स्वागताला उभी ,थोडी नमलेली  गुढी, पात्र -वस्त्र  ,रंग -सुगंध ,कडू -गोडाचे सुंदर मिश्रण ,
तसेच नानाविध गोष्टींचे मिश्रण असते आपले जीवन ,
आंबा -कडुलिंबाची  हिरवी फुललेली डहाळी सांगे ,सुख म्हणजे समृद्धी अन स्वास्थ्याचे अजोड मिलन ,
शुभ्र गोड गाठी बनती ,साखरेचे कण -कण विरघळून तापवून ,
नात्यातील अखंड गोडवा टिकवण्या साठी ,छोटीशी गाठ घ्यावी लागते खपवून ,
तोरणातील विविध रंग शिकविती ,आयुष्यातील प्रत्येक प्रवेश बहरु द्यावा त्या त्या रंगात रंगून ,
ठिपके जोडून काढलेली रेखीव रांगोळी सांगती  ,समाजाने  प्रगत व्हावे ,एकमेकासी धरुन ,
आपणासी सुख -समृद्धी -स्वास्थ्य -समाधान घेऊन येऊ दे ,नव -वर्षातील प्रतिदिन . 
                                                                आसावरी जोशी
                 २--गुडीपाडवा  
संवत्सराचे स्वागत करूया गुडी उभारून ,
नात्याचे तोरण ठेवू प्रेमाने बांधून ,
गाठीतील गोडवा सदा असावा जिभेवर टिकून ,
आरोग्य जपायला ,कधीतरी कडूलिंबही घ्यायचा असतो गोड मानून ,
नववर्षाच्या शुभेच्छा देऊ ,सर्वांना हात जोडून ,
सर्वांना सुख -समृद्धी -समाधान लाभो हीच प्रार्थना मनापासून . 
                                     आसावरी जोशी . 

दिन विशेष (जागतिक मातृभाषा दिन )


   दिन विशेष (जागतिक मातृभाषा दिन )
एकवीस फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन . एखादा दिन विशेष आला की त्या विषयावर अनेक माध्यमातून लोक आपले विचार मांडत असतात ,मी एका त्रयस्थ या दृष्टिकोनातून मातृभाषे विषयी माझे विचार मांडत आहे ,अर्थात माझी मातृभाषा मराठी असल्याने मी तिला प्रतिनिधी केले आहे . 
 माझा जन्म महाराष्ट्रात झाला (आजोळी ),आई -वडील मराठी म्हणून माझी मातृभाषा मराठी .  वडिलांच्या शेती -बागायती व्यवसायामुळे बालपण ते लग्न होई पर्यंत चा काळ भवानीमंडी -भैंसोदामंडी अश्या राजस्थान -मध्यप्रदेश च्या सीमारेषेवर असणाऱ्या हिंदी भाषिक जोडगावात गेला . त्यामुळे व्यवहार भाषा कोसा कोसावर बदलणारी हिंदी भाषा ,तर शिक्षणाचे माध्यम प्रमाण हिंदीभाषा होते . गावात दोन -चार घरे मराठी होती ,त्यापैकी कुणी इंदुरी मराठी ,कुणी देशावरील तर कुणी कोकणी मराठी बोलत . आमच्या घरात आजी -आजोबा ,आई -वडील ,आत्या हे सर्व मात्र पुणे मुंबईचे प्रमाण मराठी बोलत . आम्ही पाच भावंडे ,शाळा व इतर कारणाने दहा बारा तास घराबाहेर असल्याने बरेचवेळा घरात ही आपापसात हिंदी बोलायला लागायचो . पण आई -वडील त्या बाबतीत कडक शिस्तीचे होते . घरात सर्वांनी एकमेकांशी मराठीतच बोलायचे अशी सक्तीच होतीम्हणा  ना !याचा आम्हाला कधी कधी रागही यायचा . पण आज आम्ही मान्य करतो कि आई वडिलांच्या या आग्रही धोरणाचा पुढील आयुष्यात खूप फायदाच झाला . पुढे मुले मोठी झाल्यावर शेती व्यवसायात रमणार नसून ,नोकरी -व्यवसाय किंवा विवाहोत्तर आयुष्य महाराष्ट्रात घालवणार असल्याचे ,त्यांच्या दूरदृष्टीने हेरले होते . बोलीभाषे व्यतिरिक्त मातृभाषेचे ज्ञान वाढावे म्हणून वडिलांनी पुणे मुंबई निघणारे मराठी वर्तमानपत्र ही लावले होते . पोस्टाने ते दोन तीन दिवस उशीरा येत असे . पण इथे ताज्या बातम्यांपेक्षा दैनिकातील भाषा डोळ्याखालून जाणे त्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते . मराठी—हिंदी लिपी सारखीच असल्याने फावल्या वेळेत थोडे  मराठी चाळले जायचे . किंवा मोठी माणसे त्यातील कथा आणि मनोरंजनात्मक सदरे वाचून दाखवत . त्यामुळे आम्ही भावंडे कोणत्याही क्लास किंवा परिक्षे शिवाय ,आज ओघवती मराठी बोलू ,वाचू ,लिहू शकतो महाराष्ट्रा पासून दूर राहून सुद्धा ,मराठी साहित्य ,सिनेमा ,नाटक ,लेखक ,कवि यांची निदान तोंडओळख तरी झाली . त्यामुळे पुण्यात बी . एड . करताना ,मराठी माध्यम असून चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले . 
सांगायचा मुद्दा असा की जेंव्हा मातृभाषा आणि शिक्षणाची माध्यम भाषा किंवा व्यवहार भाषा वेगळी असते तेंव्हा पालकांनी तसेच कुटुंबातील मोठ्यांनी ,थोडे सक्तीने, थोडे गोडीगुलाबीने आणि थोडे वातावरण निर्मितीने मुलांना मातृभाषेची गोडी लावायला       
हवी .

   भारतात हल्ली बहुतेकांना तीन -चार भाषा अवगत असतात . मातृभाषा ,राज्यभाषा (१-२),राष्ट्रभाषा आणि अंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी . इंग्लिश आल्याशिवाय बाल्याची प्रगती होणार नाही अशी ठाम समजुत असल्याने किंवा मातृभाषेच्या चांगल्या शाळा उपलब्ध नसल्याने ,इंग्रजी माध्यम शाळेत घालण्याचे प्रमाण हल्ली  खूपच वाढले आहे . दुसऱ्या बाजुला पुरेशी विध्यार्थी संख्या नसल्याने मातृभाषेतील काही शाळा बंद कराव्या लागल्या असे समजते . 
    बहुभाषिक असणे चांगलेच ,त्यातील एक मातृभाषा असावी . किमान एका भाषेवर प्रभुत्व असावे ,बाकी भाषा किमान लिहिता -वाचता—बोलता आल्या तरी चालते . मनातील भावनांचे ,विचारांचे आदान -प्रदान महत्वाचे. समोरच्याच्या भाषेत आपण संवाद साधला तर आत्मीयता वाढीस लागण्यास मदतच होते . 
    पहिली वीस -बावीस वर्षे सोडली तर ,पुढील चाळीस -पंचेचाळीस वर्षे पुण्यातच गेली . त्यामुळे तीनही मुलांना आवर्जून मराठी शाळेतच घातले . कारण मराठी मातृ-राज्य—व्यवहार भाषा होती आणि त्या वेळेस चांगल्या मराठी शाळाही उपलब्ध होत्या . पुढे मुले हिंदी ,इंग्रजी ,संस्कृत ही शिकली . मराठी माध्यमामुळे मुलांना इंजिनियरिंग च्या शिक्षणात किंवा अमेरिकेतील उच्चशिक्षण ,नोकरी ,व्यवसायात कोणतीही अडचण अली नाही . 
   आता नातवंडांच्या वेळेस त्यांना मराठी शाळेतच घालावे असा अट्टहास करणे योग्य नव्हे . स्थळ -काळ—वेळ -परिस्थिती प्रमाणे प्रत्येक प्रश्नांची उकल वेगवेगळ्या प्रकारे करावी लागते . दूरसंचार व वाहतुकीच्या साधनांमध्ये क्रांतिकारक बदला सारख्या कारणांमुळे जगातील अंतरे कमी झाली आहेत . एका राज्यातून दुसऱ्या राज्यातच काय पण एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतरित होणेही सोपे झाले आहे ,त्यामुळे आंतराष्ट्रीय प्रमाण भाषेला खूप महत्व आले आहे . घरात आई -बाबा दोघांची मातृभाषा वेगवेगळी असली तर बरेच वेळा घरात इंग्लिश बोलले जाते ,तर काही वेळा फॅशन म्हणून इंग्लिश बोलले जाते . आई -बाबा दोघे नोकरी करणारे असल्याने काही मुले घरापेक्षा जास्तवेळ शाळा—पाळणाघर येथे असतात ,मग मुले जी भाषा ऐकतात तीच बोलणार नां !एक गमतीशीर किस्सा सांगावासा वाटतो -एका नोकरी करणाऱ्या मराठी कुटुंबात मुलीला सांभाळायला एक पंजाबी आया होती ,तर ती मुलगी आयांच्या सहवासामुळे आधी पंजाबी ,शाळेत जाऊ लागल्यावर इंग्रजी आणि काही वर्षानंतर थोडे मराठी बोलायला शिकली . मुलीच्या दृष्टीने विचारांची देवाण -घेवाण महत्वाची आणि नैसर्गिक ही होती .
 एकदा शिकलेली भाषा माणूस कधी पूर्ण विसरत नाही असे म्हणतात . तरी बोली भाषेत सरावाला खूप महत्व आहे . लहानपणी मी हिंदी भाषिक राज्यात राहायल्याने आधी हिंदीत विचार करून मग मराठी बोलले जायचे ,आता चार -पाच दशके महाराष्ट्रात ,तेही पुण्यनगरीत राहिल्याने ,हिंदी लिटरेचर मध्ये एम . ए . असूनही थोडे आठवून आठवून हिंदी बोलले जाते . 
   आपली संस्कृती जाणून घ्यायला मातृभाषेची खूप मदत होते . घरातील लोकांशी सुसंवाद साधणे सोपे जाते ,सुसंवादाने अनेक छोटे -मोठे प्रश्न सुटतात . त्याचा मानसिक आरोग्य चांगले ठेवायला उपयोग होतो . एखाद्या भाषे बद्दल प्रेम अवश्य असावे पण अहं किंवा न्यूनगंड नसावा . त्याचप्रमाणे इतरांच्या भाषेला कमी न लेखता तिचा आदर करणे ही आपले कर्तव्य आहे . आदर्श पिढी घडवायची असेल तर मोठ्यांनी आदर्श वर्तन करणे अपरिहार्य आहे . 
  परदेशात राहणाऱ्या माझ्या मुलांची मुले म्हणजे माझी नातवंडे मातृभाषा मराठीत संवाद साधु लागली की माझे ऊर अभिमानाने-आनंदाने भरुन येते . हे मी प्रामाणिक पणे मान्य करून ,एक पाल्य -पालक आणि आजी म्हणून आलेले अनुभव सर्व वाचकांना समर्पित करते . 
                                     आसावरी जोशी 
                               १चिंतामणी अपार्टमेंट ,मधुबन कॉलनी कर्वेनगर ,पुणे -४११०५२
                              सेल -९६८९३९०८०२
                             ई-मेल -asawari51 @gmail . com 

माननीय श्री घैसास आणि सौ. स्मिता वाहिनी यांस - एक विचार भेट -२६जानेवारी २०२०


माननीय श्री घैसास आणि सौ. स्मिता वाहिनी यांस - एक विचार भेट -२६जानेवारी २०२०  

वाढदिवस आणि पुस्तक प्रकाशनाचा जुळून आला योग मणि -कांचन ,
उभयतांच्या कर्तृत्व अन दातृत्वाला मानाचा मुजरा म्हणून प्रस्तुत करते एक कवन ,
यशवंत -कीर्तिवंत प्रवासात लाभली निगर्वी स्मित हास्याची शिदोरी ,
जणू माय मातीला ओलावा अन सुगंधाला मिळावे रुप सोनेरी ,
द्वैता कडून अद्वैता कडे जाणारा आपला प्रवास ,ईशकृपेने सदा लखलखत राहो भूवरी ,
व्यावसायिक ,सामाजिक ,धार्मिक ,शैक्षणिक सर्वच कामात दिसते ,सकारात्मक चिंतन -मनन ,
यशप्रभा उद्योग मंदिराच्या शिल्पकारांचे ,मनःपूर्वक अभिनंदन ,
शुभ दिवसांचे होवोत ,रौप्य -सुवर्ण -हीरक महोत्सव ,आणि सहस्त्र चंद्र दर्शन ,
शतक महोत्सवी वाटेवर लाभो ,गुरु -आप्त -मित्र -कुटुंबियांची साथ ,पाठीशी राहो गजानन ,
सूर्याची तेजोमय शलाका ,चंद्राचा अमित शीतल प्रकाश ,दिनचक्राला देतात मिळून पूर्ण आकार ,
लक्ष्मी -सरस्वती -दुर्गा आनंदे नांदती ,असा हा संयुक्त परिवार ,
उजव्या हाताने दिलेले ,काळूनये डाव्याला ,असे थोर आपले विचार ,
ईश्वर चरणी एकच प्रार्थना ,आपणास लाभो ,सदा सुयश -सुख -शांती -आयु -आरोग्याचे ऐश्वर्य अपार . 
                                                                               आसावरी जोशी 

जीवन आणि जगणे

                                जीवन आणि जगणे 
जन्म -मरणातील अंतर म्हणजे जीवन ,यालाच म्हणायचेका जगणे ?
भूक -भय -निद्रा -मैथुन ची गरज पशूंप्रमाणे माणसाला ही निसर्गचे  देणे ,
मग पशु आणि माणुस यांच्यात फरक काय बरे असतो ,तुका म्हणे ,
मोठमोठ्या तत्वज्ञानीं चे बघुया विचार -सार ,अन बांधूया गाठी ,
जीवन जगावे लागते स्वतः साठी आणि अवलंबून असणाऱ्यांसाठी ,
प्रत्येक भूक भागवण्यासाठी  भाकरी भाजण्यासारखे केलेले  कर्म म्हणजे उपजीविका ,
जगण्याचा खरा हेतू तोही इतरांसाठी ,म्हणजे जीविका ,
ते सुंदर रित्या शिकवतात पंचतत्त्व अन , निसर्गातील फूल अन कालिका ,
माणसा ला पशु पासून भिन्न करणारी भावना -तर्क -विचार -बुद्धी ची देणगी स्वरूप मालिका ,
भाकरी शिळी झाली की त्यातून पसरू लागते दुर्गंधी ,
फुले शिलीच काय ,मृत झाली तरी ती देतात सुगंधी अन फक्त सुगंधी ,
योग्य वेळी सुपंथ धरूया ,माणुस बनुया ,उतरवून अहंकाराची धुंदी अहंगंडाची धुंदी . 






शब्दांची जादू +शब्दांची मजेदार व्युत्पत्ती

शब्दांची जादू

          शब्दांची जादू 
काही शब्द उलट -सुलट लिहिले वाचले तर कधी पोषक होतात तर कधी घातक ,
फक्त -वजा चिन्हाचाच केला विचार तर सगळेच भासे नकारात्मक ,
उभा -आडवा केला विचार तर +अधिक पदरी पडे सकारात्मक ,
वन -वास सर्वांनाच वाटे अप्रिय ,
नव -नव्याची आस जिवासी वाटे प्रिय ,
मन काबूत नसेल तर सैरा वैरा पळे ,
नम -वता आले तर योगेश्वर कळे ,
कुकर्मांची परिणिती असणारच नरक ,
सत्कर्म कर न -कर न सतत बिंबवून आचरणात पडतो चांगला  फरक ,
अंतिम सत्य असे मरा ,असुदे योनी कोटी चौऱ्यांऐंशी ,
त्यातील राम ,कळला ज्याला ,त्याचाच होई वाल्मिकी ऋषी ,
प्रवाहा बरोबर वाहत जाते ती धारा ,
विरुद्ध वाहून उगमा कडे जाते ती कृष्ण बावरी राधा -मीरा .
           शब्दांची मजेदार व्युत्पत्ती 
मिठाची ( सॉल्ट )गरज भागवण्या साठी केलेले अर्थार्जन म्हणजे salary ,
सूर्या सारखी गोल गरम जीवदान देणारी अन भूक भागविणारी भास्करी ,
चांदवी म्हणजे शेवटी केलेली मुलांना आवडणारी छोटीशी भाकरी ,
प्रातः समयी झोपून रहावे अशी वाटणारी झोप गोड साखरी ,
सुलभते साठी झाले अपभ्रंश अन बदल ,पण समृद्धच  झाली , भाव जपूनि अंतरी ,
स्थल -काल -परिस्थितीनुरूप बदल स्वीकारण्याची लवचिकता शिकविते भाषासुंदरी .

. मराठी राज्यभाषा दिन

   .            मराठी राज्यभाषा दिन 

उत्तमच असते माय -राज्य -राष्ट्रभाषे सोबत ,अंतराष्ट्रीय भाषेचे असणे ज्ञान ,
सशक्त संयुक्त कुटुंबात जरी एकच असतो प्रमुख ,पण इतरांनाही द्यायचा असतो योग्यतो मान -सन्मान ,
कुसुमाग्रजांना मानाचा मुजरा देऊन ,वाढली मराठीची आन -बान -शान ,
उदरात कानी पडलेल्या मायभाषेला ,सहाजिकच असते वरचे स्थान ,
भाग्यवान आपण महाराष्ट्रवासी , येथे मराठीला लाभला दुहेरी मुकुटाचा मान ,
मनीचे पोहोचविते कानी ,दोन बाजूंना जोडणारी एक लवचिक कमान ,
भाषा आपुली शास्त्रीय ,सुसंस्कृत ,समृद्ध ,पदरी आपुल्या थोर साहित्यिक -कवि -संतांचे दान ,
भाषेवरुन नको भांडण -तंटा ,ती तर एक साधन ,मोजते मनीचे उधाण ,
अभिजात ,पुरोगामी म्हणून पेलू शकते ,कालमानाने ,काही कोसाने आलेल्या योग्यत्या बदलांचे आव्हान ,
तिच्या चिर आयुष्य -आरोग्या साठी करूया ,परमेश्वराचे निःशब्द ध्यान . 

मैत्र

              मैत्र 
मैत्र असावे बर्फासम उबेने वितळणारे ,नितळ आणि पारदर्शी ,
वायुसम शीतल ,प्रवाही ,ना कुम्पण ना वेशी ,
एका हाकेला प्रतिध्वनी सारखे धावत येशी ,
धरणीसम क्षमाशील ,आश्वासक ,जणू विसावा देणारी हाताची उशी ,
चंद्र -सूर्य -ग्रह -तारे ,विभिन्न प्रकार -प्रकृती राहती ,जसे अनंत -आकाशी ,
सागरासम अथांग ,ओहटी असो वा भरती ,आधार देई किनाऱ्याची कुशी ,
मैत्र भावनेची दिली जोड ,तर प्रत्येक नाते होई सुगंधित -सोनेरी -बावनकशी !!!!! 

दीपावली

                                    दीपावल
       दीपावली 

                 
घेउन मा घेउन मातीचे कण ,तुडवुन -तावून घेऊन तयार होते एक चिमुकली पणती ,
स्वतः  जळुनी  दाही दिशा  उजळुनि टाकी ,मऊ कापुस वाती ,
स्नेह (तेल ) तर प्राण ,शिवाय त्याच्या व्यर्थच ,समस्त नाती गोती ,
एकमेकांचा हात धरूनि ,स्वागतास उभ्या दिव्या -दिव्यांच्या पंक्ती ,
कंदिल -तोरण दारी झुलती ,सुंदर रांगोळ्या अवती -भोवती ,
         वृद्धिंगत होऊ दे ,गो -धन-उदीम-सुख -समृद्धी अन बंधू -भगिनी ,पती -पत्नीतील प्रिती ,
आप्त जनांच्या गाठी -भेटी आणि शुभेच्छा वाढविती ऊर्जा—शक्ती ,
तेल -उटणे ,पूजा -अर्चा ,फराळ सुगंधी , चोहुकडे दरवळती ,
दीनदयाला दे वरदान अखंड तेवूदे ,अंतरी -अंतरीतून स्नेहमयी ज्योती ,
“असतो मा सत गमय ,तमसो मा ज्योतिर्गमय ”साररूप फलश्रुति . 
       
  आसावरी जोशी

कंदिल -तोरण दारी झुलती ,सुंदर रांगोळ्या अवती -भोवती ,
वृद्धिंगत होऊ दे ,गो -धन-उदीम-सुख -समृद्धी अन बंधू -भगिनी ,पती -पत्नीतील प्रिती ,
आप्त जनांच्या गाठी -भेटी आणि शुभेच्छा वाढविती ऊर्जा—शक्ती ,
तेल -उटणे ,पूजा -अर्चा ,फराळ सुगंधी , चोहुकडे दरवळती ,
दीनदयाला दे वरदान अखंड तेवूदे ,अंतरी -अंतरीतून घेउन मातीचे                                   दीपावली 
घेउन मातीचे कण ,तुडवुन -तावून घेऊन तयार होते एक चिमुकली पणती ,
स्वतः  जळुनी  दाही दिशा  उजळुनि टाकी ,मऊ कापुस वाती ,
स्नेह (तेल ) तर प्राण ,शिवाय त्याच्या व्यर्थच ,समस्त नाती गोती ,
एकमेकांचा हात धरूनि ,स्वागतास उभ्या दिव्या -दिव्यांच्या पंक्ती ,
कंदिल -तोरण दारी झुलती ,सुंदर रांगोळ्या अवती -भोवती ,
वृद्धिंगत होऊ दे ,गो -धन-उदीम-सुख -समृद्धी अन बंधू -भगिनी ,पती -पत्नीतील प्रिती ,
आप्त जनांच्या गाठी -भेटी आणि शुभेच्छा वाढविती ऊर्जा—शक्ती ,
तेल -उटणे ,पूजा -अर्चा ,फराळ सुगंधी , चोहुकडे दरवळती ,
दीनदयाला दे वरदान अखंड तेवूदे ,अंतरी -अंतरीतून स्नेहमयी ज्योती ,
“असतो मा सत गमय ,तमसो मा ज्योतिर्गमय ”साररूप फलश्रुति . 
         आसावरी जोशी -तावून घेऊन तयार होते एक चिमुकली पणती ,
स्वतः  जळुनी  दाही दिशा  उजळुनि टाकी ,मऊ कापुस वाती ,
स्नेह (तेल ) तर प्राण ,शिवाय त्याच्या व्यर्थच ,समस्त नाती गोती ,
एकमेकांचा हात धरूनि ,स्वागतास उभ्या दिव्या -दिव्यांच्या पंक्ती ,
कंदिल -तोरण दारी झुलती ,सुंदर रांगोळ्या अवती -भोवती ,
वृद्धिंगत होऊ दे ,गो -धन-उदीम-सुख -समृद्धी अन बंधू -भगिनी ,पती -पत्नीतील प्रिती ,
आप्त जनांच्या गाठी -भेटी आणि शुभेच्छा वाढविती ऊर्जा—शक्ती ,
तेल -उटणे ,पूजा -अर्चा ,फराळ सुगंधी , चोहुकडे दरवळती ,
दीनदयाला दे वरदान अखंड तेवूदे ,अंतरी -अंतरीतून स्नेहमयी ज्योती ,
“असतो मा सत गमय ,तमसो मा ज्योतिर्गमय ”साररूप फलश्रुति . 
         आसावरी जोशी                             दीपावली 
घेउन मातीचे कण ,तुडवुन -तावून घेऊन तयार होते एक चिमुकली पणती ,
स्वतः  जळुनी  दाही दिशा  उजळुनि टाकी ,मऊ कापुस वाती ,
स्नेह (तेल ) तर प्राण ,शिवाय त्याच्या व्यर्थच ,समस्त नाती गोती ,
एकमेकांचा हात धरूनि ,स्वागतास उभ्या दिव्या -दिव्यांच्या पंक्ती ,
कंदिल -तोरण दारी झुलती ,सुंदर रांगोळ्या अवती -भोवती ,
वृद्धिंगत होऊ दे ,गो -धन-उदीम-सुख -समृद्धी अन बंधू -भगिनी ,पती -पत्नीतील प्रिती ,
आप्त जनांच्या गाठी -भेटी आणि शुभेच्छा वाढविती ऊर्जा—शक्ती ,
तेल -उटणे ,पूजा -अर्चा ,फराळ सुगंधी , चोहुकडे दरवळती ,
दीनदयाला दे वरदान अखंड तेवूदे ,अंतरी -अंतरीतून स्नेहमयी ज्योती ,
“असतो मा सत गमय ,तमसो मा ज्योतिर्गमय ”साररूप फलश्रुति . 
         आसावरी जोशी
                                  दीपावली 
घेउन मातीचे कण ,तुडवुन -तावून घेऊन तयार होते एक चिमुकली पणती ,
स्वतः  जळुनी  दाही दिशा  उजळुनि टाकी ,मऊ कापुस वाती ,
स्नेह (तेल ) तर प्राण ,शिवाय त्याच्या व्यर्थच ,समस्त नाती गोती ,
एकमेकांचा हात धरूनि ,स्वागतास उभ्या दिव्या -दिव्यांच्या पंक्ती ,
कंदिल -तोरण दारी झुलती ,सुंदर रांगोळ्या अवती -भोवती ,
वृद्धिंगत होऊ दे ,गो -धन-उदीम-सुख -समृद्धी अन बंधू -भगिनी ,पती -पत्नीतील प्रिती ,
आप्त जनांच्या गाठी -भेटी आणि शुभेच्छा वाढविती ऊर्जा—शक्ती ,
तेल -उटणे ,पूजा -अर्चा ,फराळ सुगंधी , चोहुकडे दरवळती ,
दीनदयाला दे वरदान अखंड तेवूदे ,अंतरी -अंतरीतून स्नेहमयी ज्योती ,
“असतो मा सत गमय ,तमसो मा ज्योतिर्गमय ”साररूप फलश्रुति . 
         आसावरी जोशी