शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

Vijay Anjali shubhecha patr


विजय -अंज 
विजय  सष्ठब्दी पूर्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा आमच्या परिवारा कडून ,
ईश कृपेने लाभो तुजसि चिरायु -आरोग्य-सुख-समाधान भरभरून ,
क्षण आनंदाचा असो वा अडचणींचा तेथे असतोस तू हजर आवर्जून ,
पडेल ती जवाबदारी समर्थ पणे पेलतोस पडद्या मागे उभा राहून ,
आई -बाबांचा वारसा पुढे नेत आहेस सर्वांशी स्नेह संबंध जोडून ,
सहचारिणी ची साथ लाभली ‘अंजली ‘ भरून ,
उभयतांच्या आनंदाला द्विगुणित करोत भार्गवी पिनाक मिळून ,
अमृता ची गोडी सहस्त्र चंद्रा ची शीतलता अनुभवत चाल तू शतकी पंथा वरुन . 
       आसावरी  जोशी  आणि परीवार 

अतुल -सुवर्णा——शुभेच्छा पत्र

 अतुल -सुवर्णा——शुभेच्छा पत्र 

स्नेह बंधाचे रूपांतर झाले नाते संबंधात ,विश्वास दृढ झाला काही म्हणीवर ,
लग्नगाठी स्वर्गातच बांधल्या जातात ,फलश्रुति असते स्वयंवर ,
प्रत्यक्षाला प्रमाण कशाला !जोड्या जुळल्या खाडिलकर -घाणेकर अन खाडिलकर - मे णोलीकर ,
अतुल -सुवर्णा जोडी जणू लक्ष्मी-नारायण च निवास करिती भुईवर ,
रोहन -कुणाल जणू सूर्य चंद्र तव उभयतांच्या नभांगणावर ,
ऋचा ,प्रणिता सुविद्य सुसंस्कृत सुना ,स्वागत करिती परिजनांचे जोडोनिया दोन्ही कर ,
लग्न गाठ अन वर्ष गाठ योग आला मणी -कांचन  ,सकलां  च्या तोंडात पडो तूप साखर ,
हेमंत प्रतिभा चा  वारसा  पुढे नेलातच ,घातली त्यात सवाईने भर ,
अतुल आप्त -मित्र-परिवारासाठी तू आधारवड अन गाईड -फ्रेंड-फिलॉसॉफर ,
सहा दशका प्रमाणे अमृत -सहस्त्र चंद्र दर्शन अन सुवर्ण झळाळीची वर्षे लाभो शंभर ,
लाभो तुजसी चिरायुष्य -आरोग्य-सुख समाधान हीच सदिच्छा अन प्रार्थना ठेऊनी माथा श्री चरणावर . 
     आसावरी  जोशी  आणि परिवार 

मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०२३

माझे आजोळ १९-११-२०२३

 


  माझे आजोळ  १९-११-२०२३
नाना -माई ना स्मरून प्रार्थना करते ,कृपा असूद्या आजोळावर देवी दुर्गे आणि व्याडेश्वर ,
पंच तारका -तीन सुपुत्रांनी धन्य जाहले कुटुंब  चिं . पु . देवधर ,
जामात -सुना,नातवंडे -पतवंडे ,वटवृक्षाच्या पारंब्या रुजल्या दूर दूर अन खोलवर ,
समाधानी सुंदर आजोळ चे घर हसू असूदे सदा त्याच्या चेहऱ्यावर ,
आत -बाहेर माणसांची वर्दळ ,भर असतो सदा सुसंवादावर ,
प्रवेश करिता स्वागत करिती दारे ,जणू जोडलेले दोन कर ,
उभे असावे सदा न डगमगणाऱ्या पायावर ,
भुई भासती मातेची मांडी ,छप्पर जणू आजीचा मऊ ऊबदार पदर ,
भिंती ,खिडक्या ,आणि झरोखे नाकी डोळी सुंदर ,
रंग -रंगोटी ,फर्निचर जणू साज चढविला जातीच्या सुंदरीवर ,
द्रौपदीची थाळी आणि अन्नपूर्णेच्या पळीने सजले इथले स्वयमपाकघर ,
येथे आला गेला ,पै पाहुणा ,मनाच्या मोठेपणात वसतो , हिशोब नसे चौरस फुटावर ,
स्वयं पाकघर ,देवघर ,माजघर ,तळघर ,अंगण ,ओसरी ,काही खोल्या माडीवर ,
पूर्वीचे झोपाळा ,कोनाडा ,खुंटी ,सोवळे ,ओवळे मोरी न्याहारी ,बंब ,शेणी ,तिन्ही सांजचे म्हणणे ,कित्येक शब्द हल्ली येतच नाहीत कानावर ,
चुलत ,मावस ,आत्ते ,मामे अशी भावंडे सुट्टीत जमत डझनावर ,
संदीप -स्वराली ,सुनिता -सुषमा आणि समस्त परिवाराने जपला विश्वनाथ -वसुधाचा वारसा अतिशय सुंदर ,
वसुधा मामी आणि संदीप तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ,सदा सुख समृद्धी आणि आयुष्य लाभो आरोग्य पर ,
मान करावा कुणीही असे नाती जपणारे आहे अजोळीचे घर ,
ही वास्तू कर्तव्य पूर्तीत आनंदी असते ,झाली वर्षे सव्वाशे च्या वर ,
जन्म स्थानी चार पिढयांना एकत्र आणले त्या साठी देवधर कुटुंबाचे आभार ,असेच योग येत राहो वरचे वर . 
Asawari joshi

रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

मैत्र

फुलांसाठी रंग सुगंधाची उधळण करते धात्री,
रांगोळीतील ठिपके आणि  गाजाऱ्यातील धागाआपले अस्तित्व संपवातात,म्हणून 
मोहक सौंदर्य साठवता येते नेत्री,
दोष झाकून गुणांना उजळणारी असते खरी मैत्री .🤝🙏🤝🙏🌹 मैत्र दिनाच्या खूप शुभेच्छा 
                                              आसावरी जोशी

सोमवार, १७ जुलै, २०२३

चि . राजीव यांस -शुभेच्छा पत्र


चि . राजीव यांस -शुभेच्छा  पत्र 
राजीव तव जन्माने धन्य जाहले मात -पिता अन कुटुंब भिमन वार 
साठाव्या वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद आम्हा कडून भेट वस्तू म्हणून स्वीकार ,
अमृत -सहस्रचंद्र दर्शन-शतका सारखे शुभदिन येत राहो तव जीवनी वारंवार ,
आदर्श पुत्र -पती-पिता -मित्र तू सर्वच नात्यांना दिलासा सुंदर आकार अन आधार ,
अर्धांगिनी लाभली “दीपा ”सम शिवातील शक्ती चा साक्षात्कार ,
गीतिका -कृत्तिका च्या रूपाने निराकाराचे रूप जाहले साकार ,
शीघ्र लाभू दे सदगुणी जावई ,फुलुदे उभयतांचा संसार ,
एका हाकेला कुणास ही मदतीला धावून जाण्याचे तुम्हा वरी सुसंस्कार ,
अजातशत्रू तू ,जपत आलास रक्ताचा अन जोडलेला परिवार ,
लाभो तुजसी आयु -आरोग्य-सुख-समृद्धी-समाधान ,हीच प्रार्थना करुनि परमेश्वर चरणी शतशः नमस्कार . 
          आसावरी जोशी आणि परिवार 

शुक्रवार, ७ जुलै, २०२३

सीझन चार

                  सीझन  चार 

अनुभवले अमेरिकेतील सीझन चार ,
स्प्रिंग -समर-फॉल आणि आणि विंटर तर फारच गार ,
स्प्रिंग म्हणजे बर्फाळ थंडी ने गारठलेल्या सृष्टीत डोकावणारी  बहुरंगी बहार ,
उन्हाळ्यात दिवस मोठा ,लक्ख प्रकाश झाडे झाली हिरवीगार ,
रात्री च्या समयी स्वच्छ तारांकित आकाश ,क्षितिजावरी धरणी आकाशाच्या मिलनाचा साक्षात्कार ,
हिंडणे फिरणे ,सुट्ट्या शाळांना आनंदासी नसे पारावार ,
विविध रंगी आणि सुवासिक सुंदर फुलांचे आकार -प्रकार ,
पशु -पक्षी ,कीटक -भ्रमर ,काजव्यांचा मुक्त संचार ,
गुरु पौर्णिमेचा चंद्र मनोहारी ,उगविला घेऊन सूर्याचे शीतल  तेज अन सुंदर गोलाकार ,
फॉल मध्ये होई अचंभा ,पाहुनि निसर्गाची सुंदर चित्रकारी ,
दुतर्फा दिसती पिकली पाने पिवळी -तपकिरी-विटकरी अन लाल सिंदुरी ,
सरता सरता निष्पर्ण वृक्ष -वेली भासे जणु बर्फ  झाडण्या खराटे घेऊन करती तैयारी ,
हिमवृष्टी  चे  सौंदर्य  निरुपम ,शुभ्र वस्त्रे अन हिरकण्यांचे आभूषण लेवून सजली सुंदर नवी नवरी ,
थोडे त्रास ती  वावरताना कामकरी अन शाळकरी ,
जोवर आनंदाचे पारडे असती जड ,तोवर चिंता नसे उरी ,
निसर्ग देवते सदा  कृपा असू दे ,प्राणिमात्रा वरी ,
आपण ही जपुया निसर्गासी ,पळुन आपापली जवाबदारी ,
निराकार पुरुष परमात्म्यासी ,प्रकृती करी साकार ,
नास्तिक ही होईल आस्तिक ,तव सृजनाचा पाहुनी चमत्कार ,
अनुभूतींतील ओमकारा तू या भक्ताचा साष्टांग स्वीकार . 



गुरुवार, ६ जुलै, २०२३

गुरु पौर्णिमा ३-७ -23

 



गुरु  पौर्णिमा ३-७ -२३
इच्छा तेथे सापडे मार्ग ,मना तू शोध ना !!
आवश्यकताच आविष्काराची जननी असते ना !
परब्रम्हाच्या शोधाची जेंव्हा उपजते कामना ,
निसर्गात पदोपदी भेटतात गुरु ,जर मनी असेल सदभावना ,
साकार -निराकार असूदे कोणतीही आराधना ,
गंतव्या पर्यंत प्रवास करायचा आहे आपल्याच पायांना ,
देवाजीने दिले मानव जन्माचे दान ,उंची  कडून मुळा कडे धाव ना ,
सदगुरू म्हणजे मित्र-मार्गदर्शक -तत्ववेत्ता , कृपा असू दे चालताना ,
तव आशिर्वादाने शक्य होते  साधनां न शिवाय ही साधना ,
म्हणूनच गोविंद -गोपाळा पेक्षा सदगुरु भासे गुरु ,साऱ्याच संतांना ,
शतशः नमन सदगुरु चरणी ,आणि शुभेच्छा बंधू -भगिनींना . 


Asawari joshi

शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

Sukhi manasacha sadara shodhanyacha Prayag










        सुखी माणसा चा सदरा शोधण्याचा प्रयत्न 
प्रेम ,मैत्र ,माणुसकी ,ऋणानुबंध ,श्रद्धा -भक्ती ,रक्ताच्या नात्यांनी काय काय दिले त्याचा करीत होते विचार ,
सुखी  माणसाचा सदरा शोधण्यास केली मदत म्हणून  आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार ,
अगन -गगन—पवन -जीवन—धरण या पंच तत्त्वांमुळे पिंडाला लाभला मानव आकार ,
निस्वार्थी निसर्गातील पोषण करणाऱ्या प्रत्येक घटकाचे अनंत उपकार ,
थोडे कुटुंबा बद्दल —
पहिली बेटी धनकी पेटी परमानंदाचा आविष्कार ,
ज्येष्ठ -कनिष्ठ दोन पुत्र मज जीवनाचा भक्कम आधार ,
जावई स्नूषांच्या कोंदणाने त्रिरत्न झाली रुबाबदार ,
नातवंडांचा किलबिलाट ,जणू पवित्र नाद ओमकार ,
मात -पित्याची समस्त परिवाराची ऋणी सदा ,माणुसकीशी झाला माझा साक्षात्कार ,
योग्य आहार -व्यायाम—विश्रांती सोबत  आवश्यक क्रियाशीलता आणि सदाचार ,
सर्वांची सारखीच उत्तरे यायला आयुष्य नव्हे गणिती कोनाचा प्रकार 
परिस्थिती प्रमाणे प्रश्न सोडवावे लागतात ,आनंदाने  केला परिणामा  चा स्वीकार ,
परमेश्वरा दे दृष्टिकोन सकारात्मक ,सद्सद विवेक बुद्धी ,समाधान ,होऊ दे भव सागर पार 
त्रिमूर्ति चा हात मज शिरी ,त्यांच्या चरणी  कोटि -कोटि नमस्कार ,
     आसावरी  जोशी 

मंगळवार, १४ मार्च, २०२३

Smaranat rahilela prawas m.ta.Pune


बिना तिकिट एका आखाती देशाचा प्रवास 
प्रवासाची आवड आणि मुले परदेशात असल्याने देश -परदेशातील भरपूर प्रवास झाला आहे . लालपरी पासून सर्व चारचाकी ,दुचाकी ,रेल्वे ,पाण्यावरून ,पाण्याखालून ,हवेत म्हणाल तर हेलिकॉप्टर -विमान अश्या वाहनातून भरपूर आंबट-गोड-कडू अनुभव युक्त प्रवास केले आहेत . 
   मार्च २००५ची गोष्ट आहे ,बहुदा मी कुवेत एअर लाईन ने शिकागो -मुंबई प्रवास करीत होते युरोप मध्ये जिनेव्हा ला टेकनिकल हॉल्ट आणि पुढे कुवेत ला विमान बदलून मुंबई पर्यंत चा प्रवास होता . जीनिव्हाला हॅन्ड लगेज घेऊन गेट च्या आसन व्यवस्थे मध्ये सर्व प्रवासी थांबलो होतो . उड्डाणाची वेळ जवळ आली तरी काही सूचना मिळेना ,शेवटी अंऊन्समेंट झाली अति हिम वृष्टी मुळे विमान निघायला उशीर होत आहे .कृपया प्रवाश्यानी ठराविक स्विस फ्रॅंक ची फ्री कूपन घेऊन येथील फूड कोर्ट मधून पदार्थ घेऊन खाऊन-पिऊन घ्यावे आणि पुढील सूचना मिळे पर्यंत थांबावे . शाकाहारी वयोवृद्ध ,लहान मुले यांची तारांबळ उडाली ,त्यांची काही रक्कम नावडत्या पदार्थांमुळे वाया गेली . मी त्यांना सल्ला दिला उरलेल्या कुपन ने चॉकलेट मिल्क ,योगर्ट ,बिस्किट ,ज्युस , केक ,चिप्स  असे पदार्थ घ्या . शाकाहारी लोकांना आणि पोटातल्या कावळ्यांना कल्पना आवडली . पोटे शांत झाल्यावर दुसरी चिंता सतावू लागली  कि आपले कुवेत मुंबई विमान तर चुकणार नाही ना ?
  आमची चिंता खरी ठरली ,कुवेत ला मध्य रात्री पोहोचे पर्यंत मुंबई  चे विमान फ्लाय झाले होते ,आत २४ तासांनी पुढचे विमान होते . २-३तासांच्या धावपळी नंतर झालेला प्रकार घरी कळवायला एक फोन कार्ड मिळाले ,तरुण मुलांच्या मदतीने एकदाचा घरी निरोप पोहोचला . एअरपोर्ट ऍथॉरिटी ने सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट ठेऊन घेतले . २४तासांचा कुवेत व्हिसा ,शहराच्या मध्यभागी पंचतारांकित हॉटेल मध्ये राहण्या -जेवणाची सोय केली . वयोवृध्द ,लहान मुले सोबत असणाऱ्यांचे हाल झाले पण आम्ही काही सुटवंग सहप्रवासी हॉटेल लगत असलेल्या मॉल आणि गोल्डसुक मार्केट मध्ये २-३तास चक्कर मारून थोडे विंडो शॉपिंग करून आलो. ध्यानी मनी नसताना  झालेला कुवेत चा हा प्रवास कायम स्मरणात राहील . म्हणतात ना परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलावी तरच आनंद सापडतो . 
          आसावरी जोशी 
१चिंतामणी अपार्टमेंट ,कार्वेनगर ,पुणें -४११०५२
सेल नंबर -९६89390802

रविवार, ५ मार्च, २०२३

अर्चना चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस

अर्चना चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस 
अर्चना खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद आज तुझा वाढदिवस सोनेरी ,
वर्षे उलटली पन्नास ,मातृत्वाचे अमूल्य दान देवाजीने दिले माझ्या पदरी ,
विनय ची साथ म्हणजे शीतल वट  वृक्षाची छाया ,प्राणवायु ची झुळुक देणारी ,
ईशा -अनिका ,श्वास -उश्वास ,सूर -ताल ,गती -विश्रांती ,अर्थ लाभला तव संसारी ,
कष्ट ,नियोजन,व्यवस्थापन ,जनसंपर्क आणि देवा कडून मिळालेली हुशारी ,
संसार ,समाजसेवा ,व्यवसाय ,अर्थ ,परमार्थ साधत घेत रहा तू उंच भरारी ,
आप्त -मित्र-परिवाराच्या सोबतीने सफल होवो सुवर्ण ,हीरक ,अमृत अन शतकी वारी ,
लाभो तुजसी आयु -आरोग्य-सुख-समृद्धी-समाधान हीच प्रार्थना करते माते जोगेश्वरी . 
                                                                                आई 

जयंत बापट -अण्णा-पंचाहत्तरी-अमृतमहोत्सव समारंभ

 


जयंत बापट -अण्णा-पंचाहत्तरी-अमृतमहोत्सव समारंभ 
उगविला सोनियाचा दिन ,अण्णा तुला पंचाहत्तरी निमित्त खूप खूप शुभेच्छा श्री चरणी जोडोनिया हात ,
भेसोदामंडी ,उज्जैन ,पुणे ,मुंबई ,बहारिन मधील सुंदर क्षणांची तरळली ”यादोंकी बारात ”
जयाची लाभली सुंदर साथ ,तुम्ही उभयता जणू ,चांद आणि रात -दिवा आणि वात ,
समीर -सुदीप च्या रूपाने उगवले सूर्य -चंद्र ,जया -जयंत च्या नभांगणात ,
सुना -नातींचे प्रेम आणि पाठबळ जणू अंबे अष्टभुजेचे आश्वासक हात ,
आप्त -मित्र-परिवार शिंपडती सडा अमृताचा ,वानप्रस्थ ते शतायुषी प्रवासात ,
विनयशीलता ,प्रसिद्धी परामुख चिकाटी आणि कष्टाने कमावलेस अर्थ -परमार्थ ,देश -परदेशात ,
व्याडेश्वर कृपेने उभयतांसी लाभो चिरायुष्य -आरोग्य अन होत राहो सुख-समाधानाची बरसात . 
          आसावरी जोशी (शकू ) आणि कुटुंबीय