गुरुवार, २६ मार्च, २०२०

शार्वरी संवत्सर स्वागत

  शार्वरी संवत्सर स्वागत 
साऱ्या जगात माझेच राज्य ,म्हणून कोरोना राक्षस झाला उन्मत्त ,
देवा  आज एकच प्रार्थना ,असुरांच्या नाशा साठी ,सदा तू रहा माणुसकी सोबत ,
वेगवेगळ्या तज्ज्ञांनी महामारीशी लढण्या साठी केले सल्ला -मसलत ,
अलगीकरण -विलगीकरण ,स्वच्छता सर्व सूचना पाळूया शत प्रतिशत , 
“प्रिकॉशन इज बेटर देन क्योर “नियम पालनाचे घेऊया व्रत ,
प्रयत्नांची शर्थ आणि सकारात्मक ऊर्जेने कोरोना व्हायरस नक्कीच होईल संपूर्ण हताहत ,
गुडी उभारून मदतीस धावणाऱ्या देवदूतांचे मानूया आभार ,करूया नववर्षाचे स्वागत . 
                         
 आसावरी जोशी