सोमवार, २४ ऑक्टोबर, २०१६

बो .ब . -डोन्ट शाय

             बो .ब . -डोन्ट शाय 
डोन्ट शाय ,डोन्ट शाय ,यू आर अ बोल्ड बॉय ,
डोन्ट क्राय ,डोन्ट क्राय ,यू आर अ ब्रेव्ह बॉय ,
बी हॅपी ,डोन्ट बी सॅड ,यू आर अ गुड बॉय ,
एन्जॉय अँड गिव मी हाय फाय ..... बाय बाय ,
नाऊ यू आर मॉम अँड डॅडीज बॉय ,एन्जॉय -एन्जॉय . 

जो जो रे जो जो (पारंपरिक )

            जो जो रे जो जो (पारंपरिक )
जोजो रे जोजो तान्हुल्या बाळा ,तुझी आई गेली शिंपी आळीला 
शिंपी हो दादा ,शिंपी हो ताई ,बाळाचे झबले झाले का नाही ?
आत्ता हो देतो मग हो देतो ,शिंपी दादाने उशीर केला ,
इकडे बाळाने धिंगाणा केला . 
(असे सर्व बलुतेदारांची नावे घेई पर्यंत बाळ झोपी जाते ,या गीता मध्ये सुंदर आवाज 
अन संगीत ज्ञानाची गरज नाही कारण गद्यात्मक पद्य आहे .)
सुतार दादा -पाळणा झाला कि नाही ,
सोनार दादा -साखळी झाली कि नाही ,
शाळेत -दादाला आणायला ,
ऑफिस वाले दादा -आई चे ऑफिस सुटले का नाही 
अमेरिकेत -वॉलमार्ट आळीला -ग्रोसरी करायला ,
बेबीसरस -कपडे ,डायपर ,खेळणी इ . आणायला ,
इंडियन स्टोर ला -खाऊ ,डाळ ,तांदूळ आणायला असे आपण ऍड करू शकतो .

देवा दे परमोच्च प्रेम

                     परमोच्च प्रेम 
भरभरून दिलेस भौतिक सुख इहलोकी ,
थोडे मिळाले कि अधिकाची आशा न चुकी ,
तूच घातलेस जन्माला ,म्हणे कर्माची फळे भोगायला ,जी राहिली बाकी ,
निरिच्छ -निष्काम प्रेम कळते पण वळत नाही ,ते असूदे पुस्तकी ,
पवित्र असले तरी अपूर्णच असते ,प्रेम एकाकी ,
आता मिळूदे प्रतिसादी परमोच्च प्रेम परलोकी ,
खरच देते वचन ,मग मागायचे राहणार नाही काही बाकी . 

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

बाळाचे आगमन -बोबडी बडबड

        बाळाचे आगमन -बोबडी बडबड 
कधी भासे सावळा -शामल ,जणू उमलले नीलकमल ,
भासे कधी गोरे गोरे तुझे तन ,केतकीचे सुंदर बन ,
कुरळे काळे केस गुंफले ,जणू नभी ढग दाटले ,
निळे डोळे जणू सागर ,भुवया जणू कमान चढविली क्षितिजावर 
गोल गुबऱ्या गालावर ,खळी जणू चंद्र -विवर ,
इवले इवले तुझे कर ,स्पर्श होता फुटे पाझर ,
सोनियाच्या पावलांनी झाले तुझे आगमन ,
घर -दार फुलून गेले ,जणू काही नंदनवन ,
गालातील गोड हसू आणि तुझी जांभई ,
सुख आता ठेवू कुठे ,विचार करिती नंद आणि यशोदा माई .

. कहाणी सुफळ संपूर्ण

.             कहाणी सुफळ संपूर्ण 
कहाणी सुख दुःखाची ,कहाणी मैत्री शत्रुत्वाची ,
कहाणी गरिबी श्रीमंतीची ,कहाणी लाडकी दोडकीची ,
कहाणी सुष्ट दुष्टाची ,कहाणी आस्तिक नास्तिकाची ,
कहाणी जय पराजयाची ,कहाणी जीवन मरणाची ,
कहाणी सूडद्वेषाची अन प्रेमाची ,कहाणी अभाव प्रभावाची ,
जितके प्रश्न ,अपेक्षा तिततक्याच उत्तरांची ,
असावी श्रद्धा- भक्ती कामावर अन देवावर ,सोबत उभारी मनाची ,
साठा उत्तरांची होवो पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी आयुष्याची . 

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

. सिंगल पेरेंटिंग

.           सिंगल पेरेंटिंग 
शादीका लड्डू एखाद्याला पचतो ,एखाद्याला बाधतो ,पण भिस्त असावी साकारात्मकतेवर ,
एका चाकावर गाडी चालवण्याची वेळ आली तरी ,प्रयत्नांती भेटतोच परमेश्वर ,
स्वयंपाक पाणी आले गेले ,मुले वाढवणे ,एकल्याने सांभाळायचे घर ,
पैसे काही झाडाला लागत नाहीत ,त्यासाठी जावे लागतेच कामावर ,
कसरत असते तारे वरची ,ताण असतो तनामनावर ,
मुखवटे चढवून जगावे लागते ,दानव आहेतच जगभर ,
कुणीतरी मिसमॅच भेटले तरी ,शेवटी जग चालते आहे विश्वासावर -
माणसा -माणसाच्या चांगुलपणावर . 

. नको अतिरेक

.             नको अतिरेक 
ओला असो वा कोरडा ,दुष्काळ म्हणजे पाण्यासाठी वणवण फिरणे ,
नसे चांगला भावनांचा महापूर ,वा डोळ्यांचे पाणी आटणे ,
कधी पोटाची खळगी भरायला ,नसतात मूठभर फुटाणे ,
अति साठवे पर्यंत दातच नसतात खायला चणे ,
उत्तम असते चांगल्या साठी प्रयत्न करणे अन असेल त्यात समाधान मानणे . 

पणजी म्हणाली

                   पणजी म्हणाली 
आधुनिक युगात मुलांऐवजी आला लॅपटॉप मांडीवर ,
अंगाई गीते वाजू लागली ,कॅसेट अन सिडी वर ,
आईचे दूध अन मऊ भाताची जागा घेऊ लागले बेबीफूड चे डबे सुंदर ,
बाबांनी इम्पोर्टेड खेळणी आणली खोलीभर ,
उबेसाठी ,बाळाजवळ झोपती सॉफ्ट टॉय कुशीवर ,
ज्येष्ठांच्या अनुभवापेक्षा ,भर आला पुस्तकी ज्ञानावर ,
रहाणीमान उंचावले तरी शरीर अन मन प्रतिकार करीत नाही रोगांवर ,
श्रीमंत देशात होऊ घातली संशोधने ,वाढले काळजीचे वातावरण ,
एक खेडूत पणजी म्हणाली ,बाळाला वाढवायला हवे घराला घरपण ,
घरपण असेल तर जोमाने वाढेल बालपण ,असेनात चढ -उतार -वळण . 

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

तुच्छ -उच्च

          तुच्छ -उच्च 
आपले रिती -रिवाज प्रत्येक जिवाला मानाने वागवायची शिकवण देती 
लहान -महान असे कपाळावर लिहून का कुणी जन्मती ?
गणिका मिळवी मान असण्याचा अखंड सौभाग्यवती ,
तृतीय पंथी नवजाताचे स्वागत करण्याचा मान मिळवती ,
स्त्री -पुरुष वा असो कोणताही वर्ण ,प्रत्येकाला मान असती ,
दुर्वा फुले तुळशी सोबत ,दलदलीतील कमळ ,विषारी रुई ही देवासी प्रिय भासती ,
सुपारी -आवळा -अंबा -कवठ -नारळ पूजे मध्ये मान मिरविती ,
गाय बैल नाग कासव भारद्वाज चराचरांना नमन करती ,
कर्कश्श काळा कावळा ,पिंड शिवोनि जिवा -शिवाची भेट घडवती ,
नको भेद भाव ,ज्याला त्याला देऊ त्याचा मान ,हेच आपला धर्म शिकविती . 


सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

देवा दे दान

            देवा दे दान  
देवा दे दान विवेक बुद्धीचे ,
सहनशक्तीचे ,भूत दयेचे, 
माणुसकीचे ,ममतेचे ,प्रेमाचे 
क्रियाशीलतेचे ,नवनिर्मितीचे ,
दान शूरतेचे ,ईश्वर भक्तीचे ,
देवा दे दान मुक्तीचे ,परमशांतीचे . 

. पळवाट

.             पळवाट 
फुलांच्या पायघड्या असतात स्वप्नांसाठी सुंदर ,
प्रत्यक्षात चढ -उतार ,वळणे  ,सिग्नल अन स्पीडब्रेकर ,
वाट सरत नाही ,आपण चालत नाही जोवर ,
पळवाटेने कसे पोहोचता येईल योग्य मुक्कामावर .

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

लँड लाईन फोन

            लँड लाईन फोन 
नव वर्षाच्या शुभेच्छा देण्या साठी उघडली फोन नंबर ची डायरी ,
पहिला फोन आईला लावला ,क्रॉस कनेक्शन मुळे भलतेच संवाद ऐकून संकोच वाटला अंतरी ,
समजले -सिंहगढावर जाणाऱ्या प्रेमी -युगलांचा मीटिंग पॉईंट ठरला होता धायरी ,
कालच फोनवर भेटलेल्या मैत्रिणीला फोन फिरवला जोशात ,
ऐकावे लागले आपण फिरवलेला नंबर नाही अस्तित्वात ,
अश्या वेळी रिडायल केले की म्हणे नंबर लगेच लागतात ,
तेवढ्यात आला बहिणीचा फोन ,म्हणाली वैतागून ,
अगं केंव्हाचा करतीये फोन ,सारखे म्हणतात नंबर पहा तपासून ,
मार्केटिंग वाल्यांचा मात्र येतो ,ना काळ ना वेळ ,छळतात नुसते फोन वरुन ,
या फोन पाई ,दूध जाते उतू ,पोळीचा होतो पापड ,भाजी जाते जळून ,
वाटते घरांची वाढली अंतरे ,निदान मनांची अंतरे तरी कमी ठेवावीत फोनवर बोलून .

. चिंतामणी भीशी (१९९०-२००७) निरोप

.                     चिंतामणी भीशी (१९९०-२००७) निरोप 
भीशी अठरा वर्षाची झाली ,वयात आल्याची चाहुल लागली ,
नाईलाजाने निरोप देताना ,समस्त सखींची मने ओलावली ,
खारी -मारी ,कॉफी पीत भरपूर गप्पा अन कौशल्यांची देवाण -घेवाण अशी नियमावली ठरली ,
हळू हळू एक गोड ,एक तिखट पदार्थ करण्याची नकळत रीत पडली ,
नाटक -सिनेमा ,गप्पा -गोष्टी ,खाणे -पिणे ,काढल्या अनेक सहली ,
ना कधी हेवे दावे ,रुसवे -फुगवे ,दर महा दुसऱ्या बुधवारची डोळे लाऊन वाट पाहिली ,
सुख दुःखात साथ दिली ,देत राहू ,खासियत म्हणजे कधीच वादळे नाही घोंघावली . 

सासुरा ची वाट

            सासुरा ची वाट 
ती शिकली सवरली ,पायावर उभी राहिली ,मोठी झाल्याची जाणीव झाली ,
नवे घर ,नवी माणसे ,माहेर सोडून सासरी पाठवायची वेळ जवळ आली ,
नच माहेरासी जड ,परी लवचिक त्या वंशवेलीस लाभला फुला -फळांसोबत उंची गाठण्याचा मंत्र ,
माहेराची मिळाली सावली ,आता ती माहेर बनून अनेकांना देईल आश्वासक शीतल छत्र ,
हल्ली तोही जातो प्रकाशवाटे वरुन विद्येच्या घरी अन कराया व्यवसाय -नोकरी ,
मैलांचे अंतर कापणे सोपे जाते जर प्रेम अन आपुलकी असेल कुटुंबाच्या अंतरी .

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०१६

व्रत -वैकल्य -साधना

            व्रत -वैकल्य -साधना 
सणावारी नको नुसत्या झेंडूच्या माळा अन आपट्याची पाने ,
करूया प्रार्थना ,सूर्याने शिंपडावे भरभरून लखलखते सोने ,
नको नुसते सडा -रांगोळी ,दिवे आरत्या तोरणं ,
शुद्ध पाण्याने काठोकाठ भरावीत ,नदी -नाले -धरणं ,
पुरेसे नाही सवाष्ण -ब्राह्मण ,पक्वान्न -पुरण ,
गुरांनां लाभो मोकळ्या आकाशा खालील हिरवेगार कुरण ,
पाणी -टंचाई ,तपमान वाढ ,प्रदूषण ,अत्याचार ,भ्रष्टाचार रुपी असुरांचा होवो संहार ,
एकाचा श्वास तो दुसऱ्याचा उश्वास ,एकमेकांच्या जगण्याचा आधार ,
निसर्गाच्या सुंदर संतुलनासाठी मानावेत किती आभार !!!
जठराग्नी च्या होमकुंडात असावी समाधानाची आहुती,
सात्विक ओंब्या -लोम्ब्या -शेंगा ,फळा -फुलांनी राहो धरणी अंकुरती ,
खरी पूजा म्हणजे सर्वांनी जपावे पंचतत्वांचे शुद्ध स्वरुप ,
त्यांच्याच ठाई असे कोटि -कोटि देवतांचे सगुण रुप ,
प्रत्येक सण -उत्सव म्हणजे खेळीमेळीने एकत्र येऊन केलेली परमेश्वराची आराधना ,
निसर्गाला सोबत घेऊनच पुरी होऊ शकते ,मानवाची ही साधना .

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

अमूल्य अवयव

         अमूल्य अवयव 
देहाला लाभली अमूल्य अवयवांची देणगी ,त्यांची किंमत काढणे एक अविचार ,
म्हणे एक रुपयाला अश्रु चार ,मग डोळ्यांच्या किंमतीचा काय पारावार ,
जयपुर लेग ला लागतात किती तरी हजार ,
गुढग्याची वाटी बदलणे लाखांचा व्यववहार ,
किडनी रिप्लेसला डोनर हवा तयार ,मग पैसे जुळवायचा विचार ,
एक -एक अवयवाचा केला विचार तर देवाचे आपल्यावर केवढे उपकार !!
क्षण भंगुर आयुष्यात अवयवांची घ्यावी काळजी ,ठेवूनि सदाचार ,
जीवन उपभोगल्या नंतर तरी अवयव दाना साठी मनाला करूया तैयार .

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

संस्कारांचे महत्व

        संस्कारांचे महत्व 
दगड आणि मूर्ती ,देह आणि माणुस यात काय फरक ?
देवत्व आणि मनुष्यत्व आणण्या साठी संस्कार लागतात सरस ,
घडण्यासाठी अन घडवण्यासाठी ,दुतर्फी करावी लागते आराधना ,
घाव घालणे ,मुलामा देणे ,प्राण ओतणे एकीकडे ,दुसरीकडे बदल स्वीकारण्याची साधना .

चूक -सवय -व्यसन

                   चूक -सवय -व्यसन 
माणुस म्हंटले की चुकायचाच ही उक्ती सर्वांना माहित असते ,
एखाददा केली तर चूक म्हणून कधी तरी माफी मिळू शकते ,
माफी मिळाली म्हणून पुन्हा पुन्हा केली तर ती वाईट सवय जडते ,
समजून उमजून केल्या चुका ,तर त्याला व्यसन म्हणावे लागते ,
आपल्या बरोबर इतरांनाही व्यसनात ओढणे ,व्यसनाची परिसीमा असते ,
एकच प्याला करत मनाला फसवायचे ,दुसऱ्यालाही दरीत ओढायचे ,मग बाहेर पडणे अवघड असते ,
म्हणून वाईटाचा वाटेला न जाण्यातच खरे शहाणपण असते . 

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

शब्दांची जादू

          शब्दांची जादू 
काही शब्द उलट -सुलट लिहिले वाचले तर कधी पोषक होतात तर कधी घातक ,
फक्त -वजा चिन्हाचाच केला विचार तर सगळेच भासे नकारात्मक ,
उभा -आडवा केला विचार तर +अधिक पदरी पडे सकारात्मक ,
वन -वास सर्वांनाच वाटे अप्रिय ,
नव -नव्याची आस जिवासी वाटे प्रिय ,
मन काबूत नसेल तर सैरा वैरा पळे ,
नम -वता आले तर योगेश्वर कळे ,
कुकर्मांची परिणिती असणारच नरक ,
सत्कर्म कर न -कर न सतत बिंबवून आचरणात पडतो चांगला फरक ,
अंतिम सत्य असे मरा ,असुदे योनी कोटी चौऱ्यांऐंशी ,
त्यातील राम ,कळला ज्याला ,त्याचाच होई वाल्मिकी ऋषी ,
प्रवाहा बरोबर वाहत जाते ती धारा ,
विरुद्ध वाहून उगमा कडे जाते ती कृष्ण बावरी राधा -मीरा .

शब्दांची मजेदार व्युत्पत्ती

           शब्दांची मजेदार व्युत्पत्ती 
मिठाची ( सॉल्ट )गरज भागवण्या साठी केलेले अर्थार्जन म्हणजे salary ,
सूर्या सारखी गोल गरम जीवदान देणारी अन भूक भागविणारी भास्करी ,
चांदवी म्हणजे शेवटी केलेली मुलांना आवडणारी छोटीशी भाकरी ,
प्रातः समयी झोपून रहावे अशी वाटणारी झोप गोड साखरी ,
सुलभते साठी झाले अपभ्रंश अन बदल ,पण समृद्धच  झाली , भाव जपूनि अंतरी ,
स्थल -काल -परिस्थितीनुरूप बदल स्वीकारण्याची लवचिकता शिकविते भाषासुंदरी .

डाकिया (पोस्टमन )

            डाकिया (पोस्टमन )
डाकिया डाक लाया ,डाकिया डाक लाया ,
मामा का मनीऑर्डर आया ,अम्माने राखी का तोहफा पाया ,
दूर गांव से काका का अंतर्देशीय आया ,दादी को कितनी बार पढ सुनाया ,
तार देख टेन्शन आया ,पर जिजी -जीजू के आनेका संदेसा था पाया ,
लिफाफा देख भैय्या दौडा आया ,उसमें भाभीका दिल था समाया ,
रजिस्टर लेने बाबा को बुलाया ,हेड ऑफिस से प्रमोशन का संदेश था आया ,
पोस्टकार्ड साथी सुख -दुःख का ,ना कुछ अंदर ,ना कुछ बाहर ,कितना खुला दिल पाया !!
देखते ही देखते पोस्टमन की जगह ई -डाकियेका राज आया ,सुविधा की वजह से इसेभी अपनाया ,
बढते रहने का नाम जिंदगी है ,पर दिल अब भी घर आनेवाले डाकियेको ना भूल पाया .

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

बॉलीवूड

               बॉलीवूड 
सात्विक सुंदर मीना ,शर्मिला ,नूतन ,किती मोहक मधुबालाचे हसणे ,
वैजयंती ,हेमा श्री -प्रदा ,मीनाक्षी माधुरी चे थुई थुई थिरकणे ,
पूर्व -पश्चिम -उत्तर -दक्षिण अनेक तारा -तारकांचे चित्रपट नभी चमचमणे ,
खन्ना ,खान ,कपूर ,कुमारांवर तरुण -तरुणींचे फिदा होणे ,
देवाने दिला चिरतरुण आनंद ,देहबोली संजीव -जया सम ,शक्य नाही काही जोड्या विसरणे ,
भल्या भल्याना वाट दाखवी बच्चनजींचे तारांगणात सूर्य बनून उगवणे ,
लता -गीता -आशा ,रफी -मुकेश क्या कहने किशोर !समृद्ध झाले बहुरंगी शब्द -ताल-सुराने जीवनगाणे ,
बॉलीवूड ने देश -परदेशात राष्ट्रभाषेची गोडी लाविली ,भारत देशा सोपे झाले महा सत्तेचे स्वप्न पहाणे ,
दादा साहेब फाळकेंच्या रोपट्याचा वटवृक्ष जाहला ,जगताला दिले आशय -विषय -मनरंजन जडित सुंदर लेणे .

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

. कासव देवळातील

.          कासव देवळातील 
तोंड म्हणे अरे राम ,हात -पाय म्हणे किती काम ,
नाक म्हणे काय हा वास ,डोळयांसी आवडे वाम वाम ,
कानाला वाटे निंदा छान ,इंद्रिय सुखाचा माणुस गुलाम ,
वाटे दुःखाचा वाटा मोठा ,सुखाचा लहान नाही मनासी समाधान ,
कासव शिकवी जो ठेवी नियंत्रण इंद्रियांवरी ,तोचि जीव महान ,
म्हणून तर देवळातील कासवाला मिळाला देवा आधी नमस्काराचा मान .

बाल सुलभ प्रश्न

           बाल सुलभ प्रश्न 
परदेश म्हंटले की व्हिसा संपायच्या आत परतीचा प्रवास ,हे ओघानेच आले ,
आज्जी येणार म्हंटल्यावर नातवंडांचे तासा तासाचे काउन्ट डाउन सुरु झाले ,
व्हिसा संपला ,कळलेच नाही गोतावळ्यात हसत -खेळत सहा महिने कसे गेले ,
निघायची वेळ आली ,नातवंडे हिरमुसली ,आजी -आबांचे डोळे पाणावले ,
नात म्हणाली एक दिवस उशीरा आली असतीस तर ,आजच्या दिवस नसते का राहता आले ?
बालसुलभ प्रश्नाचे आज्जीला काहीच उत्तर नाही सापडले ,नातीने आजीला निरुत्तरच केले . 

छोटूचा चष्मा

          छोटूचा चष्मा 
ताईला आला चष्मा नावाचा दागिना नवा ,
छोटू म्हणे मलापण नंबरचा चष्मा हवा ,
आई -बाबांनी गॉगल आणुन पुरविला हट्ट ,
खाता -पीता ,जागता -झोपता ,छोटूने धरून ठेवला घट्ट .

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६

होरी

               होरी 
मनमोहन ब्रिन्दावन में राधारानी संग खेले होरी ,
गोप गोपी संग ,अनहद नाद पे झूमे सगरी नगरी ,
को मोहन को राधा ,को गोपी को गोप सुदही सारी बिसरी ,
जनसागर संग नाचे गाये नद -नाले ,कदम्ब ,कोकिल ,कजरी ,
भक्ती रंग में डूब गये ,ब्रज भूमि के सगरे नर -नारी ,
धो ना पायो लोकलाज का जल ,ताने -बाने में थी प्रेमरंग की बुनकारी .

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

सणाची खंत

                सणाची खंत 
गणपती -नवरात्र सारख्या सणात शिरला दिखाऊपणा चैन ,भक्ती -पावित्र्य उरले नगण्य ,
वाढदिवसाच्या दिवशी दिवा ओवाळण्या पेक्षा ,विझवण्यात वाटू लागले धन्य ,
नाती जपणे ,प्रेम वाढविणे यात असावा आनंद ,ते विसरुन सामाजिक प्राणी बनू लागला वन्य ,
दीपावलीतील शुभ -लाभ मधील लाभाला मिळू लागले अति महत्व ,
विसरत चाललो आपण सण वारातील ,उच्च निर्व्याज प्रेमाचे तत्व .

. मसाल्याचे पदार्थ

.           मसाल्याचे पदार्थ 
रंग रचना सुगंध -स्वादा सोबत मसाले असतात गुणकर ,जर वापर केला माफक 
मूळ स्वाद जपून भोजन बनते त्रिदोष संतुलित ,सुपाच्य ,आरोग्यदायी ,आकर्षक ,
मिसळणाचा डबा जणू प्रथमोपचार -पेटी ,वापरात असावे हिंग जवस -मोहरी -मेथी ,
वाता अतिरेका पासून बचाव अन  आरोग्य-संपदा वाढवते ,सहज मिळणारे ओमेगा थ्री ,
आले -लसूण शीत युद्धात उपयोगी ,दंतपीडा जंतु संसर्गात लवंग कढी पत्ता असे हितकर ,
धने -जिरे -काळीमिरी बडिशेप ,दालचिनी -वेलची -सुंठ ,काढा असे उत्तम सर्दी -खोकला -तापावर ,
देवघर असो वा स्वयंपाकघर मानच भारी ,रक्तशुद्ध करोनि उजळवी कांती हळद आणि केशर 
मिरची मनमोहिनी ,पाचक रोचक पित्तशामक ,आमसुलाचा विविध प्रकारे केलेला वापर ,
जठराग्नी प्रज्वलना पासून क्षुधाशांती ,मुख -शुद्धी ,उपचार अन प्रतिकार ,मसाले असे आघाडीवर .