बुधवार, २० मार्च, २०१९

उपनयन संस्कार

             उपनयन संस्कार
साजिरा -गोजिरा बटू उपनयनासी उभा ठाकला            
साजिरा -गोजिरा बटू उपनयनासी उभा ठाकला ,
गुरुगृही पाठविताना मातेच्या नयनी गंगा -यमुना आनंदे भेटल्या ,
संस्कारित होऊनि पुत्र (बटूचे नांव ) पुरुषोत्तम होईल ,म्हणूनि पित्याने आपल्या भावना चेपल्या ,
करा घेऊनी भगिनी उभी ,म्हणे सदा असेन पाठीशी भावा ,करीत रहा सदाचार ,
ब्रह्मचर्य असे पुढील तीन आश्रमांचा भक्कम पाया अन आधार ,
मामा देई आशिर्वाद शिकोनि ,सुफल संक्रमण होवो गृहस्थाश्रमी ,करा पुरुषार्थपूर्ण संसार ,
भिक्षावळ म्हणजे सत्कर्मासाठी भिक्षा देणे -घेणे एक अर्थपूर्ण उपचार ,
मौंजीबंध एक महत्वाचा संस्कार, संस्कृतीने कितीतरी हळुवार भावना आहेत जपल्या ,
तात -मात ,कुटुंब -समाज-राष्ट्राचे  ऋण उतरविण्यासी ,गुरुगृही निघाला छकुला ,
 साशीर्वाद भिक्षा घालण्यासी जमले,   आजी -आबा-आप्त -मित्र ,माता -भगिनी ,कुर्यात बटोरमंगलम च्या गजरी ,
देवा गजानना परमेश्वरा ,कायम असूदे तुझा आशीर्वादाचा हात आमच्या सर्वांच्या शिरी .