मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

Ananya 40th birthday

                 अनन्या  चाळीसावा वाढदिवस 
चाळीशीचा चष्मा म्हणजे बहुआयामी दृष्टी ,
परमेश्वर कृपेने अन आप्त मित्र परिवाराच्या शुभेच्छानी बहरत  राहो तव आयुष्याची सृष्टी ,
सज्ञान वयाला अनुभवाची जोड लाभते पूर्वार्धात ,
परिश्रम  जवाबदारी अन सत्कर्माच्या पूंजीवर मिळणार असते  प्रेम सुख समाधानाचे हवे हवेसे व्याज उत्तरार्धात ,
अर्चित च्या आगमनाने जणू साखर च पडली संसार रुपी दुधात ,
आज वर आलोक ची तुला लाभलीच आहे अन  आयुष्यभर लाभत राहो सुंदर साथ ,
जणू लक्ष्मी च्या हातात केशवाचा हात ,
श्रीकृपेने आयु आरोग्य सुख समाधानाची सतत होवो तुजवरी बरसात . 
          आई

Charuta 40th birthday

               चारुता  चाळीसावा वाढदिवस 
चारुता चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त खूप खूप आशिर्वाद आणि शुभेच्छा ,
ईश कृपेने लाभो तुजसी आयु -आरोग्य-सुख-समाधन ,पूर्ण होवो साऱ्या इच्छा ,
शुभम -मुक्ता फुले दोन ,तुमच्या संसार रूपी नंदनवनाची शान ,
अनिरुद्ध च्या सुंदर साथीने होवो चतुः आश्रमाची वाटचाल सुकर -सफल आणि छान ,
घरी दारी ,सरकार दरबारी ,मिळत राहो आदर मान -सन्मान ,
आप्त मित्र परिवाराला तुझा कायम वाटो स्वाभिमान ,
चाळीशी म्हणजे अठरा वर्षाचा सज्ञान पाया ,त्यावर उभी बावीस वर्षांच्या अनुभवांची सुंदर नक्षीदार कमान . 
                                  आई     

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

Fulanche sakhali

काटक अन औषधी पांढरी ,पर्पल ,लाल ,गुलाबी सदाफुली ,
बागेचे शोभा वाढवी ,बारमासी फुले इवली -इवली . 
अबोली असूनही कृतीतून ,बरेच काही बोलून जाते ,
हिरव्या गार शेल्या वर मोहक नाजुक नक्षी काढून देते, 
पांढरी शुभ्र तगर ,दुहेरी अन एकेरी ,
आलटून पालटून वर्ष भर , बागेत असतेच हजेरी ,
एकेरीचा सडा जणू स्वस्तिकची रांगोळी काढलिये दारी ,
नारळ, दुर्वा, बेल, तुळस विडा अणि सुपारी 
या  सर्वानी पुरी होई ,देव पूजेची तयारी ,

हार असुदे देवासाठी वा वेणीवर लोळणारा गजरा ,
उन्हाच्या कडाक्यात गारवा देई ,सुरभित मन मोहक मोगरा ,

अनंताचा सुगंध दीर्घकाळ सुखावणारा ,
दरवळून जातो देवळातील संपूर्ण गाभारा ,
ऋतुराजाचा उत्सव या सर्वांच्या उपस्थितीने होई साजिरा -गोजिरा तिसरा दिवस 
  Ixora आणि मे फ्लॉवर, नसेना पूजेत मान,
पण आकार रंग टिकाऊपणा चे देवाजी ने दिलेय दान, 

अनेक छोट्या फुलांचा गुच्छ ,टिके बरेच दिवस ,दिसेही छान ,
 शिकवण देई आपणासी ,संगठित राहून वाढवता येते शक्ती अन मान ,
मला वाटते एक तरी रोप हवेच ,आपल्या बागेची वाढवायला शान 

बोली भाषेत म्हणतात द्रौपदीची वेणी ,
विंचरायला ,ना लागे कंगवा ना लागे फणी ,
बर्ड ऑफ पॅरेडाइज म्हणतात  याला कुणी 

उन्हाळ्यात फुलली लाल पिवळी गुलबक्षी 
निसर्ग आणि जनुकीय कमाल 
एकाच झाडावर विविध रंगी नक्षी
बागे मध्ये होती जागा थोडी,
मनी  वाटले रंग सुगंधाने उजळू दे वाडी,
म्हणुन खोचली एक एक काडी,
वर्षे झाली दोन तेव्हडी,
वाटू लागले उगा लावली आशा वेडिं,
आज अचंबित करून गेली रान चाफ्याची
पिवळी अणि अरुणिम जोडी.
    Asawari joshi

रविवार, २८ मार्च, २०२१

70th birthday

   ईश्वर चरणी मनःपूर्वक नमस्कार 
आणि सर्व शुभचिंतकांचे खूप खूप आभार 
 ३१मार्च म्हणजे असते एका आर्थिक वर्षाची समाप्ती ,
प्रत्येक एन्ट्रीत हवा ताळमेळ अन निती -निगुती ,
ईशकृपेने मज जीवनात झाली सात दशकांची पूर्ती ,
अर्थकारणात चालत नसते चूक उन्नीस -बीस ,
जीवनात स्वार्थ -परमार्थ ,पाप -पुण्य मोजायला वर बसला आहे निर्गुण-निराकार हिशेबनीस ,
अर्थपूर्ण आयुष्या साठी हवे सत्कर्म ,निर्णय क्षमता ,आप्त -मित्र-परिवाराची साथ अन नशिबाचे बळ ,
परमेश्वराचे स्थान तर निश्चीतच असते सार्वोच्च अढळ ,
देवादिकांना तरी भोग आहेत का चुकले ?
आपण तर शूद्र जीव ,प्रवासात येणारच चढ -उतार ,खाच खळगे अन अडथळे ,
पूर्व संचितानेच आपणास मनुष्य जन्माचे भाग्य लाभले ,
शिव -शक्ती च्या मिलनाचा हा तर एक दुवा ,
जीवन सार्थकी लागू दे ,नमन तव चरणी श्री गणेशा -दिगंबरा-लक्ष्मी केशवा . 
                                              आसावरी जोशी