मंगळवार, २७ डिसेंबर, २०१६

देऊळ

                             देऊळ 
देव असतो सगळी कडे ,जळी -स्थळी -आकाशी -काष्ठी अन पाषाणी ,
भक्तांच्या आर्त हाकेला ,धावून येतो कोणताही रूपात ,कोणत्याही ठिकाणी ,
तरी नवीन वर्ष ,सणवार किंवा एखाद्या विशेष दिनी ,
आपण जातोच ना देवळात ,टेकायला मस्तक परमेश्वर चरणी . 
कारण देवळातील -----------


शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

मी मराठी -मध्यम वर्गीय

              मी मराठी -मध्यम वर्गीय 
(२६-२-२०१२ - जागतिक मराठी भाषादिना निमित्त )
असावे एखादे घर ,शाळा -मार्केट पासून जवळ टुमदार -सुबक ,
अधून -मधून नाटक -सिनेमा ,सहल घडावी अष्टविनायक ,
गरजे पुरती असावी आवक ,अडीअडचणीला थोडीशी शिल्लक ,
कधीतरी ठीक आहे हॉटेलिंग ,वडापाव पिज्जा -बर्गर ,
बरे वाटते घरचे ,वरणभात ,भाजी पोळी पोटभर ,
कोका पेक्षा कोकम चालतं ,हार्डड्रिंक सगळं मनातील बोलतं ,
सणासुदीला एखादा दागिना ,झब्बा -साडी ,
गरजे साठी स्कुटर सायकल ,स्टेटस साठी एखादी गाडी ,
कामाची जागा हवी घरा जवळ , परगावची सोसत नाही फार धावपळ ,
दुकान उघडायचे टाईम टू टाईम ,लोकेशन हवे एकदम प्राईम ,
आमची कोठेही शाखा नसते ,जातनाही आम्ही आडवळणी रस्ते ,
धंद्यात नको रिस्क हाय ,पांघरूण पाहुन पसरायचे पाय ,
क्वचितच दिसतो मोठा मराठी देणगीदार ,कर्जही नको पैश्याचे चार ,
हळूहळू कळू लागलय पैश्याचे महत्व ,पण सोडणार नाही आपली तत्व ,
चौकोनी कुटुंबात सुखानी रहावे ,उतारवयात मुलांनी विचारावे ,
भाषा -संस्कृती जपायचे ओझे यांच्यावर सोपवून निश्चितं व्हावे ,
मातृभाषा बोलणे म्हणे डाऊन मार्केट ,असे ऐकू येते काई बाई ,
पण आई ती आईच ,तिची सर देवालाही आली नाही ....... 

गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

धुराडे

                   धुराडे 
व्यसनी -अपराधी स्वतःला कधीच देत नसतो दोष ,
पळवाट काढून दुसऱ्यांवर काढत राहायचा रोष ,
स्मोकर म्हणतो ,तुम्ही करता ते पवित्र होम -हवन ,
आमच्या धुराला मात्र म्हणायचे पोल्यूशन ,
तुम्ही बुरसट ,काय कळणार तुम्हाला फॅशन !
आम्ही प्रॅक्टिकल ,तुम्हीच जपा फालतू इमोशन ,
व्यसनी माणसांनो लक्षात ठेवा ,बरे नव्हे कोणतेच ऍडिक्शन ,
कोणतेही व्यसन असूच शकत नाही एखाद्या समस्येचे सोल्युशन . 

ब्रह्मांड

                     ब्रह्मांड 
ब्रह्मांडी ते पिंडी ,पिंडी ते ब्रह्मांडी ,
धूलीकण -ओलावा -प्रकाश वायु संगे आकाशी अवतरले इंद्रधनुष्य ,
भूमातेच्या कुशीतून रंगछटांचा आनंद घेई ,पंचतत्वांचा कुंभ मनुष्य ,
निसर्गाच्या कुंचल्यातून चितारलेल्या रंगानांही लाभला मातीचा सुगंध ,
अगन -गगन -पवन -जीवन -धरण सर्वांचे मिश्रण म्हणजे निखळ आनंद ,निखळ आनंद . 

प्रश्न

                         प्रश्न 
सर्वांना दूरदेशी पाठवताना मन का जड होत नाही ?
त्यांच्याच सुखात आपले सुख ,म्हणून सोडायचे काही ,
पिल्लांचे पंख बळकट व्हावे म्हणून आधी झटायचे ,
उंच भरारी मारायला लागली की आपणच का पंख छाटायचे ?

प्रार्थना

                      प्रार्थना 
भूतकाळ उगाळायचा असेलच छंद ,
तर त्याचा असावा ,चंदनासम शीतल सुगंध ,
आला दिवस आनंदात जावो ही प्रार्थना असावी ,
भविष्याचे नियोजन असावे पण चिंता नसावी .

गणित एक अवघड विषय

                    गणित एक अवघड विषय 
घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच व्हावे 
उजव्या हाताने देताना ,डाव्याला माहित नसावे ,
दोन्ही हाताने घेताना व्याजाचे गणित पक्के असावे ,
दातृत्वाच्या कडीने वाढत -वाढत साखळी व्हावे ,
समाजात देणारे जास्त ,घेणारे नाममात्र उरावे .

इच्छा

                          इच्छा
आपलीच भाकरी भाजणे हातर स्वार्थ ,
कुटुंबाच्या भाकरी भाजण्याला आहे अर्थ ,
लष्कराच्या ..... भाजणे म्हणजे परमार्थ ,
इच्छा मागणे एकच -सार्थ जीवन न जावो व्यर्थ .

घडलं -बिघडलं

                      घडलं -बिघडलं 
आयुष्यात घडायचे ते घडतच असते ,
चांगले घडले म्हणून उतू नये ,
वाईट घडले म्हणून खचू नये ,
आपण चांगल्या साठी निमित्त झालोतर 'लकी '
मात्र कुणाच्या वाईटाला कारण होऊ नये नक्की ,

चाहुल

                  चाहुल 
दुधापेक्षा साय गोड असते ,
मुद्दलीला व्याजाची जोड हवीहवीशी असते ,
मुलांपेक्षा नातवंडांची ओढ असते ,
आई च्या भूमिकेत कडक -शिस्तप्रिय असते ,
आज्जी झाली की कधीतरी चुकीचीही कड घेत असते ,
कळते पण वळत नाही  कारण ती भूमिका जगत असते ,
दुधापेक्षा साय पचायला जरा जडच असते . 

माणुसकी

             माणुसकी 
दुसऱ्याच्या दुःखात होणे दुःखी ,
सुखात होणे सुखी ,
हीचतर खरी माणुसकी ,
सोपी आहे डेफिनेशन ,
किती अवघड ऍप्लिकेशन ,
बरेच असतात आपल्या दुःखात सुखावणारे ,
आणि दुसऱ्याचा सुखात हळहळणारे ,
तिसरा प्रकार "घातकरी "
'मुंह में राम बगल में छुरी '

भवसागर

                   भवसागर 
कुणाला आवडेल का दुःखाला मिठी मारणे !
भावतेच ना आरपार पोहत जाणे ,
गोते खाण्यापेक्षा बरे एखाद्या आधाराने थांबणे ,
डुबताना काडीचाही आधार भक्कम वृक्षासम वाटणे !
संधी मिळताच अनिवार्य पुन्हा हात -पाय मारणे ,
भाग्यात लागते आधार अन संधी लाभणे ,
पुढे आपल्याच हातात असते संधीचे सोने करणे ,
शेवटी आनंद टिकवायचा असेल तर उत्तम  असते प्राप्त परिस्तिथी स्वीकारणे ,
यालाच म्हणतात भवसागर तरून जाणे  ...... .... .... 
पुढची अवघड पाहिरी म्हणजे जिवा -शिवा ची गळाभेट होणे . 

सूर्य

               सूर्य 
छोटू -छोटू सूर्याने लावला गॉगल बघ ,दाटुन आले काळे ढग ,
मित्राच्या कपाळावर घामाच्या धारा ,वाहू लागला वादळ वारा ,
रवीने घेतला हातात ब्रश ,नभी चितारला इंद्रधनुष ,
भानुने बदलली अलगद कूस ,पडायला लागला उघडा पाऊस ,
खग बसला ढगा मागे जाऊन ,पाऊस आला धरणीवर धावून ,
भास्कर बुआंनी चढविला सोनेरी वर्ख ,तुम्हीतर राव ग्रह -ताऱ्यांचे अर्क ,
सोन्याच्या गोळ्याला नावे अनेक ,हिरण्यगर्भ -मरीच -आदित्य -सवित्र आणि पूषण ,
सकल सृष्टीचे सौंदर्य वाढविणारे तुम्हीचतर सुवर्ण आभूषण . 
सूर्याला वंदन करावे सदा ,म्हणजे लाभेल आरोग्य -संपदा

गुण -दोष

                 गुण -दोष 
नकळत केलेली वाईट कृती चूक असू शकते ,
पण समजून उमजून केलेली वाईट गोष्ट कट कारस्थान असते ,
पहिल्या चुकीला माफी असू शकते ,
पण कट म्हणजे गुन्हा ,आणि त्याला शिक्षा व्हावीच लागते ,
तसे सर्वगुणसम्पन्न कोणीच नसते ,
पण एखाद्यावर प्रेम करताना वाटते ,
गुणांचे पारडे जड असावे ,
दुर्गुण दुर्लक्ष करण्याजोगे असावेत

रविवार, ४ डिसेंबर, २०१६

. जगी सर्व सुखी असा कोण आहे ?

.      जगी  सर्व सुखी असा कोण आहे ?
मग दुःखाचा कशाला करून घ्यायचा त्रास ,
चिखलातच कमल पुष्पांचा निवास ,
दगड मातीतच नवरत्नांची आस ,
काट्यातच गुलाबांचा' सु 'वास ,
आपणच ठरवायचे रिता का भरलेला अर्धा ग्लास ,
ना जनाची ना मनाची लाज ,म्हणे निर्लज्जम सदा सुखी ,
लोक स्तुती करतात तोंडदेखी ,पण त्याची किंमत नसते कुणाच्या लेखी ,
वागताना आपल्या जागी दुसऱ्याला ठेवून बघावे ,
अन साऱ्यांनी सुख -सागरात न्हाऊन निघावे . 

जमा -खर्च सत्य -असत्य

             जमा -खर्च सत्य -असत्य 
जमा खर्चाच्या वहीत ,हिशोब तसा चोख नसतो ,
ज्याच्या -त्याच्या सोई प्रमाणे ,नफा किंवा तोटा असतो ,
सत्याला लागते पुराव्याची गरज ,
खोट्यावर विश्वास ठेवला जातो सहज ,
पण सत्याचाच विजय होतो शेवटी ,
असत्याची वाट एकाकी एकटी .

फोटो

            फोटो 
जुने झाले फोटो श्वेत -धवल ,
रोल धुणे ,निगेटिव्ह जपणे आणि साठवणे फोटो फिजिकल ,
नव्याने आले फोटो डिजिटल ,काढा ,साठवा ,लगेचच पाठवू शकता ग्लोबल ,
रंगीत -सुंदर खऱ्या खोट्याची होत नाही पटकन उकल ,
टिपता येते देवादिक -आप्त -मित्र अन निसर्गाची हलचल ,
जुने ते सोने ,काहीवेळेला सौंदर्य वाढवतात ,फोटो श्वेत -धवल 
कष्ट वाचवणारी फोटोकॉपी म्हणजे सेकंदात हुबेहूब केलेली नक्कल ,
एक्सरे ,सोनोग्राफी तर वैद्यकशास्त्रातील जादू मॅजिकल ,
जीवदान देण्यास करतात मदत ,फोटो क्लीनीकल .