शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

।।जीवन -संगीत ।।

                       ।।जीवन -संगीत ।।
तालसूर अनेक,गीत एक त्यात हवी संगीताची एकतानता,
थोरांशी सूर जुळवताना थोडीशी नम्रता,थोडी आत्मियता,
लहानांच्या सुरात सूर मिळवताना,हवी परिपक्वता,
तोल सांभाळणारा माणूस ठरतो,आदर्श कुटुम्बकर्ता . 
             अचल -दिन (डिसएबल डे )
झाडा झुडपांना सुद्धा सुमधुर संगीत समजते,
पोषक -प्रेमळ -स्पर्श ,हळुवार भावना भावते,
चलन -वलन नसताना ही सृष्टिकर्त्याचे दर्शन घडते,
मन -शरीर -आत्मा असलेल्या वृद्ध -अपंगांनाही जाणीव अन भावना असते,
या सर्वांना समजून घेताना,बुद्धी पेक्षा ओलाव्याची गरज असते -----


||पुरुष -प्रकृती ---जीवन -चक्र ||.

       


                            ।।पुरुष -प्रकृती ।।
तू पुरुष परमात्मा मी मायेत गुरफटलेली प्रकृती,
तुजवर केलीमी जिवापाड प्रिती,
कधी पूर ,कधी विरुद्ध प्रवाह ,कधी भोवऱ्यात भिरभिरती,
कोरड्या पात्रात सुद्धा खड्डे ,खडक असावेत किती ?
संकटात टाकायचे अन हाक मारले की सोडवायचे,अशी रे कशी तुझी निती?
पेराल  तसे उगवेल खरे,पण सगळी कडे नसते ना सुपीक माती,
प्रयत्न करून सुद्धा वाटते,काहीच लागत कां नाही हाती,
गतजन्मी चे देणे म्हणायचे,पण अजून बाकी आहेत जन्म किती ?
                            जीवन -चक्र 
गत जन्माच्या पुण्याई ने मानव जीवाची उत्पत्ती,विवेक बुद्धिने कर्म करुनि सार्थ व्हावी स्थिती,
फल हे ध्येय नसावे,ना उरती संहारा ची भिती,परम पित्याची भक्ती देते कोटि कोटि चक्रातुन मुक्ती . 



बुधवार, १३ जानेवारी, २०१६

. ।। कोण तो ।। ।। कान्हा रे कान्हा ।।


                        ।।कोण तो ।।
ना जवळ छत्री,ना दूरवर कोठे सावली देणारे झाड,
रखरखत्या उन्हात जीव नुसता हैराण,सगळीकडे ओसाड -उजाड,
भिरभिरती नजर शोधत असते एखादे ओळखीचे कवाड,
तळपत्या सूर्याला,अचानक कोण पाठवते ढगाच्या आड ?
             ।। कान्हा रे कान्हा ।।
कान्हा रे कान्हा तू असाकसा रे खोडकर ?
छेडितो गोपिकासी,फोडीतो त्यांची घागर,
चोरुन खातोस शिंकाळयातील लोणी -साखर,
पण गोपिकातर मनातून मान करीत आपल्या नशिबावर,
'अहं ब्रम्हास्मि 'त्रिलोकवासी तू सकलांचा ईश्वर,
तू मुरलीधर तूच गिरिधर,नटवर -नागर -योगेश्वर . 


. ।। वेळू -बासुरी ।।

         

                    ।।वेळू ।।
थकल्या पायांना मिळतो काठीचा आधार,
लाटांमधुनी वाट काढुनी होते नादियापार,
'जिसकी लाठी उसकी भैस 'हातर जगताचा व्यवहार,
चिरनिद्रेचे स्वागत करण्या होते शैय्या तैयार,
माया धावली परब्रम्ह भेटीला ऐकुनि बन्सी पुकार,
पोकळीतल्या संचिताने भव -चक्रातून माधवा कररे माझा उद्धार . 





                            ।।बासुरी ।।
वेळू परिपक्व परिपूर्ण होतो फुलांनी फुलून,काढलानाही तर जातो जळून,
उपयोगी पडतो कित्येक पावसाळे उन्हाळे सोसून सोसून,
मोडलेल्यांचा आधार,गुढी,काठी,लाठी,दांडी,शेवटचा प्रवास ही त्यावरून,
वेणू -नाद निघतो वेळूला आतून कोरून कोरून अन छेदून,
ब-न-सी सम बन विकार विसरुन,सांगे बंसीधर बासरीच्या गोड गळ्यातुन,
रास रंगला पुरूष -प्रकृती चा,गोपी गेल्या देह भान विसरुन,
रास झाला कृष्णमय जिकडे -तिकडे कान्हाच -कान्हा डोळे गेले दिपून,
श्वास अन इन्द्रीय नियंत्रण आले जमून,तर छिद्रातील हवा जाते सप्त -सूरात वीरुन,
गंधर्व गळ्यातील सूर घेउनी बासरी जन्मली बासा पोटी,
भाग्य तिचे किती महान,लग्न लागले ब्रजेश ओठी,
अनहद नादाच्या नदीत न्हाऊन,सार्थक जन्म कोटि -कोटि,
गोपी -गोपाळाचे मिलन तर,जिवा -शिवा ची घट्ट मिठी . 



।।व्यवसाय ।।



         


                        ।।व्यवसाय ।।
कोणत्याही यशा साठी इच्छा,निश्चित ध्येय,ज्ञान,कृती यांची बांधावी लागते जुडी,
म्हणे धंदा रक्तातच असला तर माणसे कोणत्याही व्यवसायात होतात बडी,
कोणीतरी सुरूवात केली तरच व्यवसाय कुशल होईल ना पुढची पिढी,
थोडे नशीब थोडा मर्यादा अन क्षमतेचा मेळ हवा, 'रिस्क तेवढा नफा 'म्हणून काही घेतात मोठी उडी,
चादर पाहून पसरावे पाय,नहीतर पावले पडतात उघडी,काही मोठ्या चादरीची करतात चौघडी,
बिझनेस इथिक्स पाळून प्रॉफिट मधे चालणारी,खरी म्हणावी लागेल मोठी पेढी,
सर्वात उत्तम जर व्यवसाय वाढत राहिला पिढी -दर -पिढी,
एक्सपान्शन ,डायवर्जन ,मार्जिंग,कोलाब्रेशन,ग्लोबलायझेशन,गरजेनुसार केले तर समजावे -
व्यवसायाची अचूक सापडली नाडी . 


।। देव कुठे असतो ।।




                    ।। देव कुठे असतो ।।
देव कोठे असतो ?देव कोठे असतो ?
देव्हाऱ्यात देवळात मूर्तिमंत असतो,कधीतरी तो फ्रेम मधे बसतो,
दवाखान्यात तो डॉक्टर मधे दिसतो,सर्जन तर जणु सृजनकर्ताच असतो,
माणसाच्या माणुसकीत तर तो अतीच सुखावतो,
देवाजीची करणी अन नारळात पाणी,असे आपण आस्थेने म्हणतो,
पान डुलते,फूल फुलते ,वारा वाहतो,झरा खळखळतो,
 नेमाने चंद्र उगवतो,सूर्य मावळतो,डोळा लवतो ,श्वास चालतो,
तरी म्हणे देव कुठे असतो ?आपल्याला कुठे दिसतो ?
श्रद्धा नसली तर दगड -धोंडा भासतो,आस्तिकाला जड -चेतन कशातही दिसतो . 

         

मंगळवार, १२ जानेवारी, २०१६

।।दगडाची कहाणी ।।

        

   


             ।।दगडाची कहाणी ।।
दगडा पेक्षा वीट मऊ ,दगड डोके ,पाषाण हृदय काय काय तो शब्दांचा मारा ,
याच पाषाणाच्या हृदयातून फुटतो ,पाण्याचा शीतल झरा ,
माती म्हणजे काय?तप -नी -तप झिजून दगडाचा होणारा चुरा ,
माती -पाणी -पाषाणा पासूनच उभे राहते ,देऊळ -गढ -निवारा ,
माणूस राहतो शांत सुरक्षित ,असो शत्रू किंवा उन्ह -पाऊस -वारा ,
छिन्नीचे घाव सोसूनच देवपण येते ,आधी असतो दगडाचा एक चिरा ,
पाषाणाच्या मूर्तीला नसे भेद -भाव ,राजा -रंक -काळा -गोरा ,
खाणीत सापडणाऱ्या सोन्याने कळस शोभतो सोनेरी चमचमणारा ,
काळ्या दगडाच्या पोटातच सापडतो ,मुकुटात लखलखणारा हिरा ,
दगड असोनि भक्तिचा भुकेला ,जेऊ घालती शिंपी -माळी -कुंभार -राधा आणि मीरा . 

॥ चलने का नाम ज़िन्दगी ॥

     


             ॥     चलने का नाम ज़िन्दगी  ॥ 
खाई थी हमने कसमे ,वादे कई किये थे ,अनजान रास्तेपर सपने बड़े बड़े थे ,
ना धूप की थी फ़िक्र ,ना अंधेर से डरे थे ,बस हाथोंमें हाथ लेकर हमतो निकलपड़े थे ,
वो साथथे हमारे ,पर दिलसे जुड़े नहीं थे ,जजबातों के ख़जाने तहखाने में पड़े थे ,
इत्तेफ़ाक़ था अबतक रास्ते  मुड़े नहीं थे ,फिर इत्तेफ़ाक़ ने साथ छोड़ा रास्ते अलग हुए थे ,
ख्वाबोंके टूटने पर झटके कई लगे थे ,अब रास्तेमें हम अकेलेही खड़े थे ,
रास्ता उन्होंने छोड़ा ,होश हमारे क्यूँ उड़ेथे,सबकुछ तो लुटादिया था,फिर सवाल क्यों पड़ेथे ?
आती है जान अकेली ,जातीभी अकेली ,पर बीचके सफ़र में रिश्ते कई बने थे ,
सोचा चलना ही जिंदगी है ,और हम फिरसे चल पड़े ,
चलना शुरू किया तो ,तिनके के सहारे भी जहाज़ से लगे थे ,
पीछेना मुड़कर देखा ,हालाँकि बीच -बीच में ,पहाड़ोंसे पड़ाव भी पड़े थे ,
चलना तो था हमीको ,पर देने सफर में सहारा ,सैंकड़ों हाथ बढे थे ,
ख़ुदा को किसने देखा ?पर खुदाई के आगे ,हम जिस्मोजानसे झुके थे ,खुदाई के आगे ---




सोमवार, ११ जानेवारी, २०१६

. ।। काही समीकरणे ।।





                    ।।  काही समीकरणे ।।
कोलकत्ता म्हंटले कि ,दिसतो ब्रिज हावडा ,सात आश्चर्या वरुन देशाचे नाव निवडा ,
वनस्पती तुपालाच पुढे नाव पडले डालडा ,e सर्च म्हंटले की गुगल पेज उघडा ,
कर्जत म्हंटले की आठवतो दिवाडकरांचा बटाटेवडा ,फोटो fकॉपीवर झिरॉक्स चा  जबरदस्त पगडा .

।। म्हणी -सुविचार ।।

      



                       ।।बोलक्या म्हणी ।।
बोलाची कढी अन बोलाचाच भात ,गाव जेवण घातले तरि हात होत नाही ओला ,
स्वतः बद्दल अति बडबड ,समजावे है दाल में कुछ काला ,
जगाची रीतच आहे ,आनेवालेका  बोलबाला ,जानेवालेका मुंह काला ,
जग इकडचे तिकडे झाले तरि ,काही असतात हरफन मौला . 
           ।।  सुविचार ।।
शिक्षणाच्या जोडीला संस्कार ,व्यापाराच्या जोडीला व्यवहार ,
व्यवहार असावा स्वच्छ -आरपार ,देव तारी त्याला कोण मारू शकणार?
कमवण्याला काटकसरीचा आधार ,धर्माला तारतो मानवतावादी अवतार ,
सुखाचा शेला दुःखाच्या किनारी शिवाय कसा उठून दिसणार ?
यशामध्ये थोडे नशीब अन प्रयत्न मात्र करावे लागतात अपार ,
संकटाला समजावे संधी ,संधीचे करावे सोने बावन्नकशी चमकदार . 





         




















             






                        




                  


. ।। ईशा -अनिका ।।

      


      .    ।।   ईशा -अनिका ।।
आईना आई -मॉमी -आई ग आई -कधितरी मदर '
नॉर्मली बाबा ,लाडात आल्यावर ड्या ---डी ,कधी -कधी फादर ,
तुझे माझे पटत नाही ,तुझ्या वाचुन करमत नाही ,अश्या दोन्ही सिस्टर ,
अनिकाला नॉर्मल हाक मारायची नाही ,ईशाला ताई म्हणायचे नाही असुदे ती एल्डर ,
लाथा-बुक्के ,शाब्दिक चकमक ,आड येतनाही ,भाषा अन ग्रामर ,
उठल्या -उठल्या बिगहग झोपताना आय लव यू ,शिवाय ,छोटी जात नाही बेडवर ,
छोटीला मोठीच्या आवडी -निवडी माहित ,जीव टाकते ती बहिणीवर ,
चालताना छोटीचे दुखले पाय तर ,ताई तिला घेते पाठुंगळीवर ,
मोठी साधी-मिशकिल-मितभाषी तर,छोटी म्हणजे fashionआयकॉन ,नमनाला तेल घडा भर ,
दोघी बहिणी चौफेर हुशार ,अभ्यास-संगीत --डान्स -क्राफ्ट -कुकिंग सगळ्यातच ,पण पाय आहेत जमिनीवर ,
आई -बाबाच्या लाडक्या लेकी ,आजीचीतर कॉलर ताठ अन मान वर . 



              
    

रविवार, १० जानेवारी, २०१६

।। विवाह एक व्रत ।।




          

                ।।   विवाह एक व्रत ।।
आपल्या संस्कृतीत विवाह नसतो एक करार ,
तीतर एक शपथ ,व्रत पूर्णत्वाला न्यायचा महान विचार ,
करारात दुसऱ्याचे उणेच जणू ,आपला विजय अन अधिकार ,
इथे बेरीज -गुणाकारा बरोबर सोडवायचे असतात वजाबाकी -भागाकार ,
वजाबाकीत दुण्याने द्यावा ,उण्याने घ्यावा लागतो हातचा उधार ,
आयुष्याचे गणित सोडवण्याची कलाच ,असते सहजीवनाचा आधार . 

नसावेत सतत आपसात वाद -विवाद -फिर्याद ,एकमेकांच्या गुणांना द्यावी दाद ,
पडताना मिळावा प्रेमळ आधाराचा भक्कम हात ,आपसात असावा सुसंवाद ,
आयुष्यात मिळावी शेवट पर्यंत साथ ,अजून काय हवे असते नागमोडी सह -प्रवासात ?
        

शनिवार, ९ जानेवारी, २०१६

।।पंचतत्व =पाचबोटे ।।


                           ।।पाचबोटे =पंचतत्व ।।
पाच बोटे म्हणजे पंचतत्वांचे प्रतीक ,मान मिळाला किती मोठा ,
अग्नि -वायु -आकाश -भू -जल ,यांचा अंगठा -तर्जनी -मध्यमा -अनामिका-कनिष्ठात एकवटला साठा ,
कशाला काट्या चमच्याचा आटापिटा ,अंगठा -तर्जनीचा देवाने दिला चिमटा ,
मध्यमाने मस्त लोणच्याचा खार चाटा ,पापड -पापडी -सांडगीचा तोडावा तुकडा छोटा ,
मस्त मऊ भात खाताना ,चिमुकल्या अनामिका -कनिष्ठाचा मोठा वाटा ,
जाणिजे यज्ञ कर्मात अहुतिचा अमर्याद साठा ,
स्वच्छतेच्या खुळचट कल्पना ,करतात आपलाच तोटा ,
बोटे चाटून ,भुरकून खाल्यानेच ,साफ राहतो कोठा ,
रगडा -मिसळ ,नूडल -पास्ता खाण्यासाठी क्षम्य असावा ,चमचा -सुरी -काटा ,
पंचतत्व पोहोचवतात षटरसांची ,खरी चव आपल्या ओठा ,
'पिंडी ते ब्रम्हांडी ',ब्रम्हांडी ते पिंडी ',जाणावा मंत्र मोठा. 









शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

।।नाती-गोती ।।




भयंकर परिस्थितीत बळ देतात ,बाबांचे चार शब्द ,
घाबरू नकोस कायम मी आहे तुझ्या पाठीशी ,
दुखः वेदना सहन करायची शक्ती मिळते ,
कारण माहित असते ,आई जागत बसली असणार उशाशी ,
एक मायेचा तर दुसरा भक्कम आधाराचा हात सहप्रवासात ,
सहज दोन हात करू शकतात कोणत्याही वादळाशी ,
तुझे माझे पटेना अन तुझ्या वाचून करमेना असले तरी ,
भावंडे हवीतच मनातले ओळखायला ,वाटून खायला ,खेळायला एकमेकांशी ,
सुख वाटले तर वाढते ,दुःख वाटलेतर विरते ,
रक्ताची अन नात्याची चार माणसे हवीतच गाठीशी ,
एका हाकेला मध्यरात्री धावून येणारा शेजारी अन मित्र ,
त्याची तुलना तर फक्त देवदूताशी ,
कायम जपावा धागा ,जोडणारा मनाला मनाशी ,
माणसाची मैत्री जमते अमूल्य अश्या आयुष्याशी .

To,dear isha---from puna ajji , on her sweet sixteen birthday.17-01-2016



               चि . ईशास ------
२०१६मधे सोळावं सरणं हाही एक योगायोगच . आयुष्यात सदा चांगले योगायोग येत राहो . तुला सुखी -समृद्ध -समाधानी -आरोग्यपूर्ण चीरायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि आशिर्वाद . 
        म्हणे सोळावं वरिस धोक्याचं गं ,सोळावं वरिसं धोक्याचं ,
धोक्याला आपण का घाबरायचं गं ,धोक्याला आपण का घाबरायचं ?
वयालाही कोंदण संस्कारांच गं ,कोंदण असतच संस्कारांच --
अभेद्य कडं शिक्षणाचं गं ,कडं टिकाऊ शिक्षणाचं ---
पुढे गद्धे पंचविशी ,साठी बुद्धि नाठी ,असे अडथळे पार करत चालायचय गं ,तोल सांभाळत चालायचय ,
लहानपणी आकर्षण चंदामामाचं गं ,आता अंधारात दिशा दाखवणाऱ्या निशीकांताच गं ,शीतल सुंदर पूर्णचंद्राचं ,
बालपणी आकर्षण इंद्रधनुच गं ,आता लाल -गुलाबी रंगाचं गं लाल गुलाबी ----
परिकथांची जागा घेतली दिवा -स्वप्नांनी गं ,निरागसतेला बळ विवेकाचं ,
उश्रंखलतेला बंधन आवडे मुलायम रेशमाच गं ,आप्तेष्टांच्या शुभेच्छा अन आशिर्वादाच ,
निर्णयाच्या अधिकारा बरोबर ,बळ लाभूदे परिणाम पेलायचं गं ,हक्कांबरोबर कर्तव्याच . 
सोळावं वरीस आयुष्याची जोमाने सुरुवात करायचं गं ,पुढे -पुढे जात राहायचं गं ,प्रगती पथावर चालायचं . 








गुरुवार, ७ जानेवारी, २०१६

।।लग्न गाठ ।।

                                   ।।लग्न गाठ ।।
आयुष्यातील आनंदोत्सव ,असावी लग्न गाठ ,
करार म्हंटले तर मनात अढी ,अन आलीच त्यात गाठ ,
स्वार्थाने -सूडाने पेटून स्वीकारलेले बंधन ,म्हणजे आता माझ्याशी आहे गाठ ,
गाठ जुळवुनी सतत स्मरावे ,जीवन म्हणजे षटरसांचे ताट ,
तिखटाला मिठाची ,तुरटाला आम्बटाची जोड ,कडूला गोड मानून घेणे आपल्याच हातात ,
जीवन नाट्यात एकमेकासी पूरक नवरस ,जरी आगळा शृंगारिक थाट ,
मधु -मिलनाचा स्वाद समजतो ,आधी बघुनि नीरस  वाट ,
गाठी सम असावे नाते घट्ट ,प्रेम -पात्रे भरुनि वहावी काठोकाठ . 







||हिम वर्षाव -स्नो फ्लेक्स ||


                       ।। हिम वर्षाव -स्नो फ्लेक्स ।।
बाल -गोपालासी वाटे चालावे ,घसरावे ,गोळे करावेत ,मस्त खेळावे बर्फावरी ,
अन ताव मारावा ,नाना आकाराच्या शुभ्र आईस कॅन्डी वरी ,
मोठ्यांना वाटे ,आता कामासाठी बाहेर पडणे ,गाडी चालवणे जणू संकट आले दारी ,
प्रियकराला वाटे भेट द्यावा तिला ,सुंदर साज हिरकणी परी ,
बर्फ -कणांना करूया कोंदण ,रवि किरणांचे सोनेरी ,
एखाद्याला भासे चकमकत्या हिमकणांचे लोलक लावले झुंबरी ,
निलांबरी शामियाना ,जणु समारंभाची सुंदर झाली तैयारी ,
वृद्ध -व्याकुळ -विरहिंना वाटे ,ओलावा गोठला ,निसर्गाच्या ही उरी ,
काहिंना निष्पर्ण झाडावरील हिमकण कासाविस करी ,
ना मेघनेच्या उदरी ,ना धरणी च्या पदरी ,अनाथांचा कोण रे कैवारी ?
मनी असे तेच भासे ,हीचतर ,खोल मनाची किमया भारी ,किमया भारी . 


बुधवार, ६ जानेवारी, २०१६

।।प्रेम म्हणजे-----।।



       

             ।।प्रेम म्हणजे -----।।
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ----
त्यात तन -मन -धन सारे काही ,अर्पण असतं ,
घेण्या पेक्षा देण्याला वरचं स्थान मिळत असतं ,
कमी -जास्त ,व्यक्त -अव्यक्त ,पारडे वरखाली होत असतं ,
पुस्तकापेक्षा बोली भाषेच व्याकरण थोडं वेगळाच असतं ,
मिकार- तूकार पेक्षा भावना पोहोचणे महत्वाचं असतं ,
तेवता -तेवता पोळल्यावर ,फुंकरी पुरतेतरी शीतल वारं हवच असतं . 
प्रेम म्हणजे -------
असो रक्ताच्या नात्यांचे ,मानलेल्या मनांचे ,
मित्र -मैत्रीचे ,जिवा -शिवाचे ,
डोळे मिटून पडलेल्या ,गुलाबी स्वप्नांचे ,
जर असेल सुवासिक सदा फुलणारे ,एकमेकांचा मान ठेवणारे ,आदर असणारे ,
'तर 'रंग न विटणारे ,अनंत काळ टिकणारेच असते . 
प्रेम म्हणजे -------

. ।। माझी दिनचर्या ।।



            .      ।।  माझी दिनचर्या ।।
मॉर्निग वॉक,योग -प्राणायाम ,शान्तिदेते चिंतन -मनन,
सकाळी पेपर ,दुपारी लेखन -वाचन ,मधे -मधे पब्लिक रिलेशन ,
घरकाम बागकाम ,बाहेरची कामे ,थोडे शिवण ,थोडे दूरदर्शन ,
निरोगी रहायला पुरेशी झोप ,सात्विक जेवण ,थोडे सांस्कृतिक कार्यक्रम अन मनोरंजन ,
झेपेल तेवढी एखाद्याला मदत ,आणि वाटते ,निदान दुखवू नये कुणाचे मन . 

मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

॥ गुड़िया रानी ॥


         || गुड़िया रानी ||
मेरी प्यारी गुड़िया,जादूकी पुड़िया,
कपड़े उसके बढ़िया बढ़िया,
दुल्हन बनेगी ,पहनेगी गेहने -धानी चूड़ियाँ ,
खुश रहेगी ,महल हो या कुटिया,
और बनेगी दादी -नानी -बुढ़िया,
घर में होंगे ,पोता -पोती ,बेटे -बहू,दामाद और बिटिया !!! 



।।गोड गोडुली ।। ।। सोनू -मोनू ।।



                ।।गोड -गोडुली ।।
गोड -गोडुली मनीराणी ,आहे मोठी शहाणी,
जेवण करून पिते पाणी ,झोपताना लागतात गोष्टी अन गाणी,
डोक्यावर तिच्या चिंगीची वेणी,गळ्यात माळ ,त्यात रंगित मणी,
कार्टून लागले कि ,टकलावून बघते कशी ,दूरचित्रवाणी,
वेळच्या वेळी लागते सगळे,रडणे तिला माहितनाही,आहे कित्ती गुणी . 




                 ।।सोनू -मनू ।।
काऊ चिऊ मनिमाऊ,सोनू देतो त्यांना खाऊ,
आपण सगळे कार्टून पाहू,मम्मम करून फिरायला जाऊ,
मित्र माझे रंगीत -मऊ,त्यांच्या शिवाय कसा राहू ?

मनू राजा ,वाजवुन दाखवी बाजा,
फारवेळ घरात वाटे सजा ,भटकायला त्याला येते मजा,
चांदोबाला म्हणतो येरे राजा,मगच भात खाईन मऊमऊ ताजा .

।।बाळाची चाहूल ।।



               ।।बाळाची चाहूल ।।
बाळाची चाहूल असते ,पति -पत्नीच्या प्रेमाचा मेळ,
त्यांना वाटे बाळासाठी ,आणू ,किती वस्तू अन किती खेळ,
निरागसाला हवा असतो ,सहवास आणि थोडासा वेळ,
चिंता नसावी ,ऐकून -वाचून ,अंगावर पडलेकी सारे काही आप जमेल,
परिवाराचे प्रेम ,मात -पित्याच्या मायेची ऊब ,जीवन -प्रवासात पुरून उरेल,
आईच्या दुधाची सर ,आणि कशाला कशी मिळेल,
तिच्या कुशीत मना-मनाची तार आपसूकच जोडलेली असेल ,
बाबाच्या हाताच्या झोळीत ,बाळ सुखाने हसत झोपेल ------

।। विद्यार्थी मनोगत -अरे बापरे सुट्या सुरु ।।



          ।।विद्यार्थी मनोगत ।।
हा क्लास ,तोक्लास ,अतिरेक क्लासचा वाटू लागला tax ,
गरजे पुरते मार्गदर्शन,घरचे संरक्षण ,खरी गरज सेल्फ -स्टडी ची max,
परीक्षेपूर्वी पूर्ण क्षमतेने करावी तयारी ,वाटते छान  relax,
अभ्यास ,आत्मविश्वास थोडी नशिबाची साथ ,होणारच उत्तम पास . 



          ||अरे बापरे शाळेच्या सुट्ट्या सुरु ||
नाटक,सिनेमा,शिबिर,छंदवर्ग,एखादी तरि सहल हवी,
चर्चासत्र,विशेषवर्ग,आणि म्हणायचे मटेरिअलीस्टीक झाली पिढी नवी,
थोडे स्वातंत्र्य ,स्वच्छन्द लाभल्यास,कलेकलेने घेतल्यास ,बालक होईल चित्रकार -शास्त्रज्ञ-कवी,
स्वजनांचे प्रेम मार्गदर्शन घेऊन ,घडतच होते लोक पूर्वी . 

सोमवार, ४ जानेवारी, २०१६

Homemakers tips



    १-तळणीचे प्रमाण बघूनच कढईत तेल घालावे . शेवटी थोडे तेल उरतेच ,त्यात  फोडणीचे साहित्य घालून gas बंद करावा . गार झाल्यावर फोडणी एखाद्या भांड्यात काढून ठेवावी . भरीत ,कोशिंबीर ,शिजवलेल्या  भाज्याना वरून घालायला  ही फोडणी वापरता येते . 
२-बरेच वेळा साबूदाण्याची खिचडी कधी कडक तर कधी मऊ गच्च तर कधी खाली लागते . अश्या वेळेस साबुदाणा थोडे पाणी ठेवून रात्रभर भिजत ठेवावा . सकाळी त्यात आवडी प्रमाणे मीठ ,साखर,दाण्याचे कूट,मिरचीचा ठेचा घालावा . जिऱ्याची फोडणी करून त्यात बटाटे परतावे आणि ही फोडणी साबुदाण्यात ओतून चांगले मिसळावे . लागेल तसे मिश्रण काचेच्या पसरट भांड्यात घालून साबुदाणा पारदर्शक होई पर्यंत मायक्रोवेव मध्ये ठेवावे . मधून -मधून मिश्रण हलवावे . खिचडी मऊ -मोकळी चांगली होते .
३-झटपट हळीवाचे लाडू करायचे असल्यास दुप्पट पाणी घालून ,हळीव १०मि . भिजत ठेवावे . त्यात योग्य प्रमाणात खोवलेला नारळ ,गूळ जायफळ -वेलची पूड घालून सारण एकसारखे करावे . गूळ वितळून सारण घट्ट होई पर्यंत मायक्रोवेव मध्ये ठेवावे . बाहेर काढून थोडे साजुक तूप घालावे . सारण गार झाल्यावर लाडू वळावेत .

Homemakers tips



    १-शिळाभात ,भाजी ,उसळ ,वरण खायचा कंटाळा आल्यास ,त्यात भाजणी किंवा दोन-तीन प्रकारची पिठे घालून कांदा घालून थालिपिठे करावीत . तसेच लोण्याखालच्या बेरीमध्ये थालीपिठाचे पीठ भिजवल्यास थालीपीठ खुसखुशीत होते . 
२-तांदुळाच्या रव्याची खांडवी करतो ,त्याप्रमाणे वरईची खांडवी पण करता येते . उपासाला चालते आणि पटकन होते . 
३-देवासमोर किंवा पंगती समोर रांगोळीची कचकच नको असल्यास ताज्या फुलापानांची किंवा मणी -मोती -कुंदन यांची तयार रांगोळी वापरू शकतो . 
४-दारासमोर टिकाऊ रांगोळी हवी असल्यास तांदूळ भिजवून त्याची पेस्ट करून वापरता येते ,लाल रंगासाठी गेरु पाण्यात भिजवून वापरावा . जास्त टिकाऊ रांगोळी oil पेंट ने काढता येते . 
५-घरातील चांदीची भांडी काळी पडूनयेत त्यासाठी भांडी पुठ्याच्या डब्यात ठेऊ नये . प्लास्टिक पिशवीत बांधून मग कापडात गुंडाळावी .
६-काळी पडलेली चांदीची भांडी टूथ पेस्ट /पांढऱ्या टूथ पावडर ने घासावीत . 
७-काळी पडलेली चांदीची भांडी लक्ख करण्या साठी एका मोठ्या पातेल्याला अलुम्युनियम foil लावून त्यात पाणी भरावे आणि पाणी उकळत ठेवावे ,पाणी उकळू लागल्यावर त्यात भांडी टाकावीत आणि १/२चमचे खायचा सोडा टाकावा . भांडी स्वच्छ झाल्यावर चिमट्याने एक एक वस्तू बाहेर काढून कापडावर वाळत ठेवावी . 
८-सोन्याचे दागिने रिठ्याने /लिक्विड सोपने टूथ ब्रश ने घासून स्वच्छ करावेत . 



    १-अष्टांग सुपारी -जेवणा नंतर मुखशुद्धी म्हणून अबाल -वृध्द सर्वांना चालणारी ही सुपारी पाचक -पौष्टिक आणि स्वादिष्ट ही आहे . ओवा,शोपा,वावडिंग,जवस,बडीशोप,ज्येष्टीमध,बदाम,किसलेले सुके खोबरे सर्व समप्रमाणात ,स्वादा पुरते लवंग ,वेलची ,सुंठ ,काळेमीठ ,साखर . सर्व पदार्थ गरम करून पूड करून काचेच्या बाटलीत भरून ठेवावी . 
२-तोंडल्याच्या काचऱ्या करताना खमंग परतण्या साठी बऱ्यापैकी तेल घालावे लागते ,पण भाजी झाल्यावर तेल शोषले जात नाही आणि डब्याला भाजी देताना त्यातून तेल बाहेर येऊ शकते . त्यासाठी भाजी होत आल्यावर उकडलेला बटाटा कुस्करून /१-२चमचे तांदूळ पिठी /बेसन घालून भाजी परतावी . भाजी जास्तीचे तेल शोषून घेते . 
३-कैरी प्रमाणे आंबट सफरचंद ,अर्धवट पिकलेले टोमेटो यांचा मेथंबा पण चांगला होतो . आंबटपणा कमी वाटल्यास गारझाल्यावर थोडे लिंबू पिळावे . 
४-गोड खूप आवडत असल्यास मुलांना अंजीर जरदाळू खजूर मनुका असा सुकामेवा खायला द्यावा . सीडलेस खाजुरात अकरोड बदाम पावडर करून त्यात थोडे तूप घालून स्टफ करावे . खाण्यास पौष्टिक आणि डब्यात द्यायला पण सुटसुटीत आहे . 
५-कारल्याचे काप करून मीठ लावून थोडे पिळावेत . नंतर कुरकुरीत होई पर्यंत मायक्रोवेव मध्ये ठेवावेत ,मधून -मधून हलवावेत . रोज जेवणा बरोबर ४-६काप खाल्यास कडूरस आहारात मिळतो . 



Homemakers tips



-पराठ्याचे पीठ दह्यात भिजवावे ,थोडे सैल असावे ,सैल पीठ लाटण्यास सोपे जावे यासाठी एक तासभर फ्रिज मध्ये ठेवावे . लाटणे सोपे जाते आणि पराठे पण मऊ राहतात . 
२-पुऱ्यांची कणीक चवीपुरते मीठ ,एखाद चमचा साखर व मोहन घालून घट्ट भिजवावी . पुऱ्या खुटखुटीत आणि फुगीर राहतात . 
३-खाऱ्या शंकरपाळ्याच्या पिठात चमचाभर साखर आणि गोड्यामध्ये चिमुटभर मीठ घालावे . 
४-कोथिम्बिरीची जुडी निवडताना ,कोवळ्या काड्या टाकू नये ,त्यात मिरची ,आले ,लसूण ,मीठ घालून पेस्ट करून फ्रिजर मधे ठेवावी . थोडे लिंबू पिळल्यास पेस्ट हिरवीगार राहते . घाईच्या वेळेत हिरवा मसाला म्हणून उपयोगी पडते . जसे-रस्सा ,धिरडी ,थालीपीठ ,पराठे ,कोथिंबीरवडीत घालण्यासाठी ,दाण्याचा कूट घालून इन्स्टनट चटणी करता येते ,marination साठीही वापरू शकता . 
५-सीझन मधे कैरीचा कीस /लिंबाचा रस थोडे मीठ घालून ,फ्रिजर मधे ठेवावा ,हवा तेंव्हा थोडा काढून वापरता येतो . 
६-फावल्या वेळेत एखादा नारळ खरवडून ,फ्रीजर मधे ठेवावा ,हवा तेंव्हा थोडासा काढून स्वयंपाकासाठी वापरता येतो . 
७-कोथिंबीर हिरव्या मिरच्या ,पालेभाज्या निवडून एखाद्या पेपर मधे गुंडाळून मग प्लास्टिक पिशवीत घालून फ्रीज मधे ठेवल्यास जास्त दिवस टिकतात . 
८-दहीबुत्ती (फोडणी दिलेला दहीभात )मध्ये कांदा -काकडी बारिक चिरून घातल्यास गच्च होत नाही .



   १-लिंबाचे लोणचे मुरायला वेळ लागतो . लगेच हवे असल्यास लिंबाच्या फोडी करून बिया काढून टाकाव्यात . कुकर च्या डब्यात वर झाकण ठेऊन कुकरच्या वरण  भाता प्रमाणे तीन शिट्या काढाव्यात . रात्रभर फोडी बंद कुकर मधेच ठेवाव्यात . फोडी मऊ झालेल्या असतात ,झाल्या नसल्यास फोडी वरखाली करून पुन्हा एखादी शिट्टी काढावी . आता गार फोडींचा उपयोग ,उपासाचे गोड लोणचे ,तिखट लोणचे ,लिम्बूमिरची ,लेमन सॉस अश्या कोणत्याही लोणच्या साठी ,त्यात्या प्रकारचा मसाला वापरून करता येतो . 
२-कैरीचा छुंदा पण उन्हाच्या ऐवजी मायक्रोवेव मधे आटवला तरी पटकन होतो .
३-बेकिंग -कुकिंगला एसेन्स वापरताना कोणत्याही फ्लेवर बरोबर काही थेंब वनिलाचे घातल्यास चांगला उपयोग होतो . 
४-पुलाव साठी आपण खडा गरम मसाला वापरतो (आक्खा )त्याबरोबर यासर्व मसाल्याची थोडी पूड साईच्या दह्यात घालून किंचित मीठ -साखर घालून फेटावी आणि शेवटी पुलाव मधे मिक्स करून एक वाफ आणावी . स्वाद व रंग चांगला येतो . 
५-शिळा भात उरल्यास नेहमी फोडणीचा भात केला जातो ,त्या ऐवजी आवडीप्रमाणे ,पुलाव ,चायनीज फ्राईड राईस ,साबुदाणा खिचडी प्रमाणे खिचडी ,किंवा साखरभात नारळीभात पण करता येतो . फक्त गोडभात करताना शिजलेल्या भाताच्या निम्मी साखर /गूळ घालावे . एरवी आपण तांदूळाच्या बरोबरीने साखर घेतो . 

Homemakers tips


t . -१-सत्यनारायण च्या प्रसादाचा शिरा करताना रवा गुलाबीसर भाजून झाला की ,केळ्याचे तुकडे घालून पुन्हा थोडा भाजावा . रवा फुलून येतो ,केळे काळे पडत नाही ,स्वाद ही चांगला येतो . 

२-नारळ घालून रव्याचे लाडू करताना ,रवा भाजत आल्यावर त्यात खोवलेला नारळ घालून पुन्हा थोडा परतावा . रवा फुलून येतो ,खवट वास येण्याची भिती नसते . 

३पनीर ची भाजी करतानलादी च्या लादी शालों फ्राय करून मग तुकडे करून भाजी करावी ,खमंग लागते . 

४-चकल्या करताना मदतीला कोणी नसल्यास ,कढई भरुन एकचकली करावी ,उलटायला निथळायला सोपे जाते . तुकडे करून ठेवल्यास मुलांना डब्यात द्यायला पण बरे पडते . 

५-तळणी करताना ओहोटी च्या वेळेस तेल जास्त लागते ,धूर पण जास्त होतो . भरतीला तेल कमी जळते . तळणीच्या तिथीचा पाऊण भाग म्हणजे द्वादशीचा (१२)पाऊण ९होतो ,सकाळी /संध्याकाळी ८ते ९तळणी केल्यास तेल कमी लागते .

    १-गूळ घालून करतो त्या पक्वान्नात,चिमुट भर हळद व मिठाची कणी घालावी . रंग आणि स्वाद चांगला येतो . उदा-खांडवी,नारळीभात . 
२-साखरभाता साठी भात शिजवताना ,चिमुटभर हळद आणि मिठाची कणी घालावी . 
३-गूळपोळीत बेसन घालतो ते भाजण्यासाठी तेल वापरावे ,म्हणजे गूळ मऊ रहातो आणि चांगला पसरतो . 
४-बटाटेवडे /भजी करताना डाळीच्या पिठात थोडे वरण आणि अर्धा चमचा साखर घालावी ,कमी तेल पितात आणि कुरकुरीत होतात . 
५-उकडीच्या मोदकाचे सारण करताना त्यात १-२चमचे तांदूळपिठी घातल्यास चांगले आळून येते . 
६-तळणी करताना तेल फसफसायला लागले तर त्यात एखादे चिंचेचे बुटुक घालावे . 
७-धिरडी -डोसे तव्याला चिकटत असल्यास ,त्यात थोडा रवा घालावा,उलटणे सोपे जाते . 
८-डोश्याच्या पिठात अर्धा चमचा साखर ,अर्धा चमचा मेथीपूड ,चमचाभर बेसन घातल्यास डोसे जाळीदार ,सोनेरी ,कुरकुरीत होतात . 
९-मिसळणाच्या डब्यात मेथीदाणा पूड ठेवावी ,आंबट -गोड -तिखट -अश्या आमटी -भाजीला चांगला स्वाद येतो अन आरोग्यास ही चांगले . 
१०-

||टॉमी आणि जेमी ||



                   ।।टॉमी आणि जेमी ।।
टॉमी आणि जेमी ,पक्के दोस्त तुम्ही आणि आम्ही ,
उशिरा येता नेहमी नेहमी ,परत जायचीही घाई करता तुम्ही ,
माझी खोली आहे रिकामी ,खेळ खेळुया झकास नामी ,
बाबा चालला त्याच्या कामी ,मस्त खाऊ देईल माझी मम्मी .

।। बोबडी बडबड -बाळोबा ।।



                ।बोबडी बडबड -बाळोबा ।
बोलावे लागते बाळोबांशी ,झोप येते मग कशीबशी ,
डोक्याखाली छोटी उशी ,सारखे झोपतात डाव्याकुशी ,
वाघोबाची मावशी ,जिभेने चाटते हळूच मिशी ,
डोळे मिटून दूध पिशी ,नक्कल करतात तिची खाशी ,
डायपर मध्ये करतात शिशी ,गप्पा मारतात कोणाशी ?
फटाफटा शिंका देशी ,चपट्या नाकात जणू शिरली माशी ,
आसने तुम्हाला जमतात कशी ?सायकल चालवी एक मैल ताशी ,
आंघोळ तुमची कावळ्या सरशी ,झोप तुमची लहरी कशी ?
चिंता नसे सुखी जिवाशी ,आहेतरी तुमची कोणती राशी ?
घरदार सारे तुमच्या सेवेशी ,घरदार सारे ---------

||बोबडी बडबड -बदकुल्या ||



               ||बोबडी बडबड -बदकुल्या ||
बदकुल्यारे बदकुल्या , पाय तुझे फदकुल्या ,
अंग तुझे तेलकट ,पाणी  जाते ओघळत ,
पोहण्यात तुझ्या किती नजाकत,
नजरेतून तुझ्या ,मासा काही नाही चुकत ,
चमच्या सारखी चोच खास ,
सांडत नाही खाली घास .

||बोबडी बडबड -मधले खाणे ||



         बोबडी बडबड -मधले खाणे ।।
वाटाणा फुटाणा शेंगदाणा ,उडत येतो टना टणा ,
काजू बदाम बेदाणा ,तोंडात भरला बोकाणा ,
उपमा पोहे गरम शिरा ,वड्यात वडा साबुदाणा ,
लाडू -चिवडा कायम तयार ,भूक लागली पटकन आणा ,
द्राक्ष संत्री अंबा केळी ,फळे म्हणजे जीवनसत्वांचा खजाना ,
करंजी चकली चा तळला घाणा,ताई बाईच्या दिवाळसणा ,
चव बघायची कुणाकुणा ,एकेकाने हात पुढे आणा .

।। लग्न एक जुगार ।।



       संभ्रम लग्न जमवताना 
आपल्या मुलांचे लग्न जुळवताना ,पालकांना प्रश्न पडतो बक्कळ ,
पत्रिका ,गुण बघावेत कि नाही ,चालत नाही अक्कल ,,
कधि वाटते अज्ञानात असते सुख ,दिसत नाही मोठे मुसळ ,
जाणकारांना टोचत राहते ,दूर वरचे छोटे कुसळ ,
निम हकीम जान खतरे मैं ;नुसते कॅन्फ्यूजन त्याची होते बिन चवीची मिसळ ,
जोड्या जुळून येतात वरून ,पण चुकत नाही जुळवा जुळव अन धावपळ ,
लग्न एक जुगार ,तरी जिंकण्या साठी अड्जेस्टमेंट ची हुकमी पत्ती हवीच जवळ .

||वारी आणि marethon ||



                             वारी आणि marethon 
श्रद्धा भक्ती नेम आणि धार्मिक सहल ,म्हणून चालत राही वारकरी ,
बेभान होउनि ज्ञानबा ,तुकाराम ,हरिनामाच्या गजरी ,
टोपी -धोतर -सदरा बुक्का असे कपाळावरी ,टाळ -मृदुंग -भगवा असे त्यांच्या करी ,
तुळशी वृंदावन घेउनि शिरी ,पालकी पुढे झिम्मा -फुगडी -फेर धरी ,
मन -तन आत्म्याच्या योगे ,सोनेरी क्षण साठवती नरनारी ,
वारीच्या मार्गी वाटती ,चहापाणी फळे आणि शिरापुरी ,
असुदे उन्ह -पाऊस ,चढ -उतार ,भक्ती ची सरिता सतत वहति भेटाया सागरी ,
असे एकच ध्येय ,कधी टेकतो माथा विठू चरणी पंढरपुरी . 
MARETHONE मधे ----वारीचाच उत्साह पहिला ,अमेरिकेच्या नगरी -नगरी ,
FASHION ,फिटनेस ,challenge सोबत ditermination ,dedication lहवे उरि ,
. ५,५k ,हाफ ,फुल ,कलरफुल प्रकार असतात कितीतरी ,
नंबर वाला tishirt short ,शूज ,enrollment ही असे जरुरी ,
आनंदी आनंद रनर जेव्हा फिनिश लाईन टच करी ,
TRAFFICCONTROLL ,पोलिस बंदोबस्त ,medical help आणि अनेक कामांची volentiers घेती आनंदाने जवाबदारी ,
शिवाय family &friend सपोर्ट positive energy boost करी ,
MARETHONE नंतर फन -फूड -म्यूझिक -मस्ती ,medal -lotery च्या सुखावाणाऱ्या सरीवर सरी ,
बरेच धागे समान असतात ,रनर असो वा वारकरी . 
             

||दसरा ||


सर्वाना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा ----दसरा ----
दसरा सोनियाचा सण ------
विकारांचे ज्वलन ,कोत्या मनाचे उल्लंघन ,
वागताना ठेवू भान ,दुष्ट वृत्तींचा विनाश ,सुष्टाना देऊ मान ,
हात  मैतरी चे दोन ,कसा टिकेल दशानन ,
सुख -शांति ची उधळण -----दसरा ----
घेऊ खारीचाच वाटा ,पूल बांधायलाआपण ,घेऊ खरिचाच वाटा पूल सांधायासी आपण 
येइल आनंदी उधाण ---दसरा ---दसरा सोनियाचा सण . 
                                                             

--------||उत्तरायण -मकरसंक्रात ||-------


                         --------उत्तरायण -मकरसंक्रात ---------
आपले परके काही नसते ,लहान -मोठे काही नसतं '
सहानुभूति दुक्खात ,सहभाग आनंदात ,तेच नांत खंर असतं ,
कधी -कधी गाठी सोडवणे अवघड असतं ,तेंव्हा सण हे एक सोल्यूशन असतं ,
                          म्हणूनच सणांचे सेलिब्रेशन असतं ------------
गुळात गोडवा नखशिखांत ,ओत -प्रोत स्नेह (तेल )चिमुकल्या तिळात ,
होवो प्रेमाचे संक्रमण मनामनात -घराघरात -----------. 
                            

-||स्त्री ||-


                  -स्त्री -
शक्ती -समृद्धि -विद्येची देवी ,दुर्गा -लक्ष्मि -सरस्वती ,
वंशाची पणती ,सर्वस्व समर्पित प्रिती 
प्रजननाची शक्ती ,वात्सल्याची मूर्ती ,
नाही बलाचे प्रदर्शन ,म्हणून का अबला ती ?
सहनशीलतेची अपरिमिती ,
पुरुषाला पूर्णत्वास नेणारी प्रकृती ,
यज्ञाची पूर्णाहुति ,मंत्राची फलश्रुती ,
दिव्यालाही जीवन देणारी ती ज्योती ,
तिच्या प्रगतीत सकल विश्वाची उन्नती ,
नको पूजेचे अवडंबर ,नको देव्हाऱ्यातील मान ,
नकोच नको त्याच्या पायाखालची वहाण ,
परस्पर आदर -न्याय प्रेमाने पारडी असावीत समान ,
एकमेकांना पूरक नाकोणी मोठे नाकोणी लहान ,
एक नयन तर ,दुसरा कान ,एक जिव्हा तर दुसरा स्पर्श -ज्ञान ,
एक श्वास तर दुसरा उश्वासाचे भान ,तो-ती मिळूनच असतात जीवन देणारे पंचप्राण . 
                       

--||आ +ई =आई ||--


----आ +ई =आई -------
आई म्हणजे आत्मा +धरणी वारील सगुण ईश्वर ,
आर -पार गोड जणू ,पंढरी शुभ्र खडिसाखर ,
चंदनाचे खोड झिजून ,सुवास पसरे घरभर ,
भरती -ओहोटी ,नदी-नाले ,तिच्या ठायी अथांग सागर ,
उन्हालाही देई सावली ,मऊ ऊबदार तिचा पदर ,
पुरणार नाहित कवनातील नुसते भाव ओंजळभर ,
अधून -मधून प्रत्येकाने आई व्हावे ,माया पाखडावी सूपभर ,
नाते -गोते नसतानाही ,ऐकू येते ज्यांना क्रन्दन ,
मदर टेरेसा ,सिंधूताई ,फुले -कर्वे -आमटेंच्या मातृत्वाला साष्टांग -वन्दन 
देवकी पोटी जन्म घेउनि ,कृष्ण झाला यशोदेचा नंद -नंदन . 
                                                                     

||दिवाळी-दसरा ||.


                 ----दिवाळी-दसरा ------
प्रिय जन येति घरा ,तोचि दिवाळी -दसरा 
उणे -दुणे सगळे विसरा ,चहूकडे प्रकाश पसरा ,
आनंदाने सण करु साजरा ,प्रेमा सारखा भाव नाही दुसरा . 

||प्रेम ----lovemarriage ||


              प्रेम ----lovemarriage . 
lovemarriage चे म्हणाल तर असे ठरवून ठेवता येत नसते रिलेशन '
कधी बालवयातील निरागस इमोशन '
कधी सुख -दुःखाचे सारखेच अनुभवलेले संघर्षण ,
कधी तारुण्यातील रूप -गुणांचे आकर्षण '
लव एट फर्स्ट साईट 'क्लिक होणे 'तर कधी सोशल प्रमोशन '
त्यात सुध्दा कालांतराने मतभेद ,गैर समज ,घरच्यांचा विरोध ,असे अनेक असतात क्वेश्चन ,
गुण -दोषांसकट स्वीकार हेच प्रत्येक गुंत्याचे असते सोल्यूशन ,
कधी आधी लग्न मग प्रेम ,कधी आधी प्रेम मग लग्नाचे सेलिब्रेशन ,
'लव इन 'चा अपवाद सोडला तर लग्नकरणे आणि ते प्रेमाने टिकवणे हेच असावे डेस्टी नेशन ,

।।हौस खरेदीची ।।




स्वस्त मिळते म्हणून होलसेल आणायचे ,
सेल असलाकी गरज नसताना शॉपिंग करायचे ,
जास्त झाले म्हणून ,फुक्कट वाटायचे ,
शेवटी वस्तू महागातच पडते ,
पण हौसेला का कधी मोल असते ?
हौसेला कधीच मोल नसते . 

||मी पुणेरी ||


||मी पुणेरी ||
मी झाले पक्की पुणेरी ,येथे मला ओळख लाभली दुहेरी ,
शकुंतला बापट ची झाली जोशी आसावरी ,
अमुक ची मुलगी ,तमुक ची बायको ,शिवाय आई म्हणून ओळख मिळाली संसारी ,
पुणे तेथे काय उणे ची म्हण झाली खरी ,दुःखा पेक्षा सुखाची मोठी मिळाली  शिदोरी ,
देश -परदेश हिंडले पण निश्चिंत वाटते चिंतामणी च्या घरी ,
जाऊ तेथे रमायचे ,स्वभाव असला जरी ,पुण्या बद्दल विशेष प्रेम माझिया उरी ,
जय भारत -जय महाराष्ट्र जय जय हो पुण्य -नगरी . 

।। अमेरिकेचेआकर्षण ।।



Sent from my iPadअमेरिकेचे आकर्षण 
डॉक्टर ,आय . टी . ,कॉम्प्युटर ,इंजिनिअर ,
अमेरिकेत सर्वांना खूप डिमांड ,पगार हि लट्ठ भाराभर ,
जर झाला दूर ,विसाचा मोठा अडसर ,
आधी जीव टांगणीवर ,मग मिळतो पगार ,
इच्छा असते ,रग्गड रुपये जमवूया कमवुनि डॉलर ,
स्वप्न सकलांचे एक ,करू सुखाने संसार ,
पैसा मिळतो भरपूर ,नाही मिळत कामाला नोकर ,
एक अमेरिकेत ,एक मायभूमित असावे आपुले घर ,
ग्रीनकार्ड -सिटीझन शिप कुटुंबासोबत फिरावे जगभर ,
खूप झाली कसरत ,मायदेशी परतण्याचा आता करूया विचार
 त्यांची मुले ,फॉर गुड यायला तयार नसतात देशावर ,
शेवटी तडजोडी शिवाय पर्याय नसतो आयुष्यभर ,तडजोडी ----

||संभ्रम लग्न जमवताना ||



||  संभ्रम लग्न जमवताना ||
एकदा पत्रिका बघायचे ठरवले कि सुरु होते घालमेल ,
मंगळ ,सगोत्र ,षडाष्टक ,एकनाड टाळून करायचा गुणांचा मेळ ,
बघूया पंच तत्व ,अंकज्योतिष ,ब्लड ग्रुप ,अजून कोणत्या सोई शास्त्राने जुळेल ,
एकच इच्छा ,सुशिक्षित ,सुंदर ,सुसंस्कृत ,सधन ,अनुरूप असा जोडीदार कसा मिळेल ,
प्रत्येकाला पक्षाला वाटते ,दुसरयामुळेच आपले नशीब फळेल ,
पत्रिका तर नकार कळवायचे एक साधन ,वाटते नाही म्हंटले तर समोरच्याला वाईट वाटेल ,
भावनांना हवी डोळस पणाची जोड ,जरी असला मना -मनाचा खेळ . 

।।थ्री रिंग्स ।।




कुठेतरी वाचले होते ,लग्न म्हणजे सेरेमनी ऑफ थ्री रिंग ,
पहिली साखरपुड्याची रिंग ,दुसरी लग्नाची रिंग ,
आणि तिसरी सफरिंग सफरिंग सफरिंग ---,
मला सुचला उपाय ,त्याचे करते शेयारिंग ,
सोल्यूशन आहे ,टाळायचे असेल सफरिंग ,
एकाची सुरु झाली बडबड आणि फाय रिंग ,
दुसऱ्याने करायचे फक्त हियरिंग  आणि हियरिंग ,
डोस झाला जास्त तर ,दुसऱ्या कानाने करायचे पासिंग ,
ऐकावे जनाचे करावे मनाचे ,अधून -मधून करावे थोडे डेरिंग ,
नेहमीच प्रिवेन्शन इज बेटर देन क्योरिंग . 

my iPadआमंत्रण पत्रिका ||


Sent from my iPadआमंत्रण पत्रिका
सदा सर्वदा आपुले , आशिर्वाद अन शुभेच्छा मिळाव्या ,
नको पुष्पगुच्छ ,नको भेटवस्तू उगा साठवाया ,
पत्रिकेचे प्रयोजन दिन -स्थळ -वेळ -कार्यक्रम स्मरणी असाया ,
करोनि नियोजन दैनंदिनीचे ,असावे उपस्थित कार्य -शोभा वाढवाया .

. ।।लीव्ह इन रिलेशनशिप ।।



     ।।लीव्ह इन रिलेशनशिप ।।

लव असो वा अरेंज ,दोन्हीत लग्न असते कॉमन,
नव्या मार्गाचे काय विचारता,त्याचे नाव लीव्ह इन रिलेशन,
शादीका लड्डू खायला नको अन पस्तवायला नको ,म्हणून ही प्रिकॉशन,
देवाण -घेवाण व्यवहार चोख ,कशाला हवीत इमोशन ,
दोघांनी मिळून घरटे बांधा,नाही पटलेतर घेऊन आपापाल्या काड्या ,उडून जाऊ भुर्रकन,
कर्तव्य अन हक्क ,अश्या असणारच नाण्याला बाजू दोन ,
खोट्या चकचकीत नाण्यापेक्षा ,जीर्ण -मळकट नोटेचे ,वरचढ असते मूल्यांकन .