मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०२३

माझे आजोळ १९-११-२०२३

 


  माझे आजोळ  १९-११-२०२३
नाना -माई ना स्मरून प्रार्थना करते ,कृपा असूद्या आजोळावर देवी दुर्गे आणि व्याडेश्वर ,
पंच तारका -तीन सुपुत्रांनी धन्य जाहले कुटुंब  चिं . पु . देवधर ,
जामात -सुना,नातवंडे -पतवंडे ,वटवृक्षाच्या पारंब्या रुजल्या दूर दूर अन खोलवर ,
समाधानी सुंदर आजोळ चे घर हसू असूदे सदा त्याच्या चेहऱ्यावर ,
आत -बाहेर माणसांची वर्दळ ,भर असतो सदा सुसंवादावर ,
प्रवेश करिता स्वागत करिती दारे ,जणू जोडलेले दोन कर ,
उभे असावे सदा न डगमगणाऱ्या पायावर ,
भुई भासती मातेची मांडी ,छप्पर जणू आजीचा मऊ ऊबदार पदर ,
भिंती ,खिडक्या ,आणि झरोखे नाकी डोळी सुंदर ,
रंग -रंगोटी ,फर्निचर जणू साज चढविला जातीच्या सुंदरीवर ,
द्रौपदीची थाळी आणि अन्नपूर्णेच्या पळीने सजले इथले स्वयमपाकघर ,
येथे आला गेला ,पै पाहुणा ,मनाच्या मोठेपणात वसतो , हिशोब नसे चौरस फुटावर ,
स्वयं पाकघर ,देवघर ,माजघर ,तळघर ,अंगण ,ओसरी ,काही खोल्या माडीवर ,
पूर्वीचे झोपाळा ,कोनाडा ,खुंटी ,सोवळे ,ओवळे मोरी न्याहारी ,बंब ,शेणी ,तिन्ही सांजचे म्हणणे ,कित्येक शब्द हल्ली येतच नाहीत कानावर ,
चुलत ,मावस ,आत्ते ,मामे अशी भावंडे सुट्टीत जमत डझनावर ,
संदीप -स्वराली ,सुनिता -सुषमा आणि समस्त परिवाराने जपला विश्वनाथ -वसुधाचा वारसा अतिशय सुंदर ,
वसुधा मामी आणि संदीप तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ,सदा सुख समृद्धी आणि आयुष्य लाभो आरोग्य पर ,
मान करावा कुणीही असे नाती जपणारे आहे अजोळीचे घर ,
ही वास्तू कर्तव्य पूर्तीत आनंदी असते ,झाली वर्षे सव्वाशे च्या वर ,
जन्म स्थानी चार पिढयांना एकत्र आणले त्या साठी देवधर कुटुंबाचे आभार ,असेच योग येत राहो वरचे वर . 
Asawari joshi