गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०२५

शुभेच्छा पत्र -शामा च्या सत्तराव्या वाढदिवसा निमित्त

शुभेच्छा पत्र -शामा च्या सत्तराव्या वाढदिवसा निमित्त 
अडथळ्याची शर्यत खेळत पार केलीस दशके सात ,
नोकरी ,संसार ,पुढच्या मागच्या पिढी ची जवाबदारी ,पुन्हा सात च्या आत घरात ,
बुद्धी सोबत तुझ्या नियोजनपूर्ण कष्टाला द्यावीच लागेल दाद ,
ईश कृपेने मुले निघाली संस्कारी -गुणी ,सून -जावई नातवंडं करिती प्रेमाची बरसात ,
स्वतः सोबत इतरांनाही दिलासा कायम मदतीचा हात ,
ईश्वर चरणी एकच प्रार्थना लाभो तुजसी आयु -आरोग्य-सुख-समाधान सदैव जीवनात . 
  आसावरी जोशी 

बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५

नीता ढवळे एकसष्ठी शुभेच्छा

 


                नीता ढवळे एकसष्ठी शुभेच्छा 
कट्ट्या वरील भेटीं मुळे आपली मैत्री झाली छान ,
समाजकारण ,राजकारण ,रेसिपिज ,घरगुती औषधे यांची होत असते देवाण घेवाण ,
निखळ मैत्री ,आड येत नाही वय ,रुसवे फुगवे ,हेवेदावे ,मान अपमान ,
कारण प्रत्येकाच्या पदरी देव देतोच ना काही गुणांचे दान ,
नीता आमची उत्साही ,सुगरण ,उकडीचे मोदक ,मूंग हलव्याचे किती करू गुणगान ,
नीता -विनय एक नाण्याच्या दोन बाजू जणू देवा नेच दिलेले वरदान ,
मुलगी -जावई-नातू कर्तृत्ववान स्वाभिमानाने उभयतांची उंचावली आहे मान ,
वाढदिवासा निमित्त खूप खूप शुभेच्छा ,केलीस पूर्ण सहा दशकीं वारी ,
लाभो  तुजसी आयु आरोग्य ,सुख समाधान ,हीच प्रार्थना व्याडेश्वरा  अन देवी दुर्गेश्वरी . 

        आसावरी जोशी 

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

त्रिस्थली

 त्रिस्थळी यात्रा  ७-११-२४ तें १५-११-२४भाग्यश्री  ट्रॅव्हल +पंचकन्या 

मैत्रिणीं मुळे त्रिस्थळी यात्रेचा योग आला जुळून ,
प्रयागराज ,अयोध्या ,नंदीग्राम ,सारनाथ ,काशी ,गया ,बौध्दगया ,चित्रकूट  ,गुप्तगोदावरी ,आदि तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले जवळून ,
प्रयागराजला गंगा -यमुना- गुप्त सरस्वती च्या संगमावर गेलो बोटीतून,
संगम असुनही गौरवर्णी गंगा ,सावळी यमुना ,गुप्त सरस्वती आपले अस्तित्व आहेत टिकवून ,
यमुना शांत तर गंगा थोडी चंचल असल्याने संगमाचे स्थान थोडेफार बदललेले येते दिसून ,
प्रयागराज /अलाहाबाद नेहरुंचे -इंदिराचे जन्मस्थान आनंदभवन ,चंद्रशेखर आझाद पार्क ,विद्यापीठ ,कोर्ट आदि परिसर पहिला फिरून ,
चित्रकूट ला गुहेतील गुप्त गोदावरी ,स्फटिक शिळा राम -भरत भेटीचा प्रसंग आठवून डोळे आले भरून ,
अयोध्ये जवळील नंदी ग्राम हून भरताने चौदा वर्षे अयोध्येचा कारभार शत्रुघ्नाच्या मदतीने सांभाळला दुरून ,
तेथे भरत मंदिर  ,भरतमारुती भेट ,कल्की मंदिर इत्यादी बघून विविध नात्यातील प्रेम आले उलगडून ,
२२-१ - २४ला राम लल्ला आला  मोहक बालरुपात अयोध्येला जन्मस्थानी ,कलियुगातील वनवास संपवून ,
अयोध्याधाम ,अयोध्या ,वाल्मिकी विमानतळ , लतामंगेशकर चौक ,शरयू घाट ,देवादिकांच्या सुंदर मुर्त्या ,हनुमान गढी ,कनक भवन एकूणच शहर नमो-योगी  -सहकारी आणि भक्तांच्या मुळे गेले एकदम उजळून ,
ज्योतिर्लिंग -सप्तपुरी-आणि त्रिस्थळी पैकी एक काशी विश्वेश्वराचे लिंग दोनच मिनिटात डोळ्यात घेतले साठवून ,
कालभैरव ,अन्नपूर्णा मातेची घेऊन दर्शन गंगा नदीतून थोडे जल तीर्थरूप आणले भरून ,
काशी /वाराणसी ला ८४घाटांच्या मध्ये रात्री गंगा आरतीच्या सोहळ्याने डोळे गेले दिपून ,
पितृ गयेला गयासुराला पाताळात पाठवणाऱ्या विष्णुपदाचे दर्शन आणि स्पर्शाचा योग आला जुळून ,
बौद्धगयेला सिद्धार्थ चा झाला गौतम बुद्ध ज्या पिंपळ वृक्षा खाली बसून ,
तो बौधी वृक्ष आणि सोनेरी धीर -गंभीर मूर्ती असलेले बुद्ध मंदिर पाहीले निरखून ,
अयोध्येहून येताना सरनाथाचे झाले दर्शन ,जेथेप्रथम पाच शिष्याना बुद्धाने बौद्ध धर्माची शिकवण सांगितली समजावून ,
अश्या प्रकारे ईश कृपेने सुखरूप घरी परतलो त्रिस्थळी यात्रेचे समापन करून . 
                   आसावरी जोशी.