शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

|| बोबडी बडबड - काऊ चिऊ ||

एक होती चिऊ, एक होता काऊ
चिऊ चे घर होते मेणाचे, काऊ चे होते शेणाचे

एकदा काय झाले, खूप मोठे वादळ आले
चिऊ चे घर राहिले टिकून, काऊ चे गेले वाहून

चिऊ होती बिच्चारी, तरी सुद्धा विचारी
कावळा होता हुशार, पण चिकाटी नव्हती फार

काऊ ला घडली अद्दल,पाण्यात गेली त्याची मुद्दल
वारा सुटला गारेगार, काऊ ने ठोठावले चिऊताई चे दार

चिऊताई चिऊताई येऊ का घरात, आत ये दादा, उभा का दारात?
चिऊ ने दिला संकटात आसरा, म्हणून काय कायमचे हात -पाय पसरा?

काऊ ने घेतला संकटातून धडा, अन बांधला मोठा भक्कम वाडा
काऊला कळू लागली  इतरांची पिडा, मदतीचा त्याने उचलला विडा

आता काऊला म्हणीतून सुद्धा, मिळू लागला मान केवढा !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा