गुरुवार, ७ जानेवारी, २०१६

||हिम वर्षाव -स्नो फ्लेक्स ||


                       ।। हिम वर्षाव -स्नो फ्लेक्स ।।
बाल -गोपालासी वाटे चालावे ,घसरावे ,गोळे करावेत ,मस्त खेळावे बर्फावरी ,
अन ताव मारावा ,नाना आकाराच्या शुभ्र आईस कॅन्डी वरी ,
मोठ्यांना वाटे ,आता कामासाठी बाहेर पडणे ,गाडी चालवणे जणू संकट आले दारी ,
प्रियकराला वाटे भेट द्यावा तिला ,सुंदर साज हिरकणी परी ,
बर्फ -कणांना करूया कोंदण ,रवि किरणांचे सोनेरी ,
एखाद्याला भासे चकमकत्या हिमकणांचे लोलक लावले झुंबरी ,
निलांबरी शामियाना ,जणु समारंभाची सुंदर झाली तैयारी ,
वृद्ध -व्याकुळ -विरहिंना वाटे ,ओलावा गोठला ,निसर्गाच्या ही उरी ,
काहिंना निष्पर्ण झाडावरील हिमकण कासाविस करी ,
ना मेघनेच्या उदरी ,ना धरणी च्या पदरी ,अनाथांचा कोण रे कैवारी ?
मनी असे तेच भासे ,हीचतर ,खोल मनाची किमया भारी ,किमया भारी . 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा