शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

||पुरुष -प्रकृती ---जीवन -चक्र ||.

       


                            ।।पुरुष -प्रकृती ।।
तू पुरुष परमात्मा मी मायेत गुरफटलेली प्रकृती,
तुजवर केलीमी जिवापाड प्रिती,
कधी पूर ,कधी विरुद्ध प्रवाह ,कधी भोवऱ्यात भिरभिरती,
कोरड्या पात्रात सुद्धा खड्डे ,खडक असावेत किती ?
संकटात टाकायचे अन हाक मारले की सोडवायचे,अशी रे कशी तुझी निती?
पेराल  तसे उगवेल खरे,पण सगळी कडे नसते ना सुपीक माती,
प्रयत्न करून सुद्धा वाटते,काहीच लागत कां नाही हाती,
गतजन्मी चे देणे म्हणायचे,पण अजून बाकी आहेत जन्म किती ?
                            जीवन -चक्र 
गत जन्माच्या पुण्याई ने मानव जीवाची उत्पत्ती,विवेक बुद्धिने कर्म करुनि सार्थ व्हावी स्थिती,
फल हे ध्येय नसावे,ना उरती संहारा ची भिती,परम पित्याची भक्ती देते कोटि कोटि चक्रातुन मुक्ती . 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा