बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

देऊळ

    
  


                    देऊळ 
समई स्नेहाचा साठा ,ज्योतीचा जीव जरी एका फुंकरी पेक्षाही छोटा ,
अंधार भेदून दाखवी प्रकाशाच्या वाटा ,
शुद्ध -सुगंध घेऊन येई ,उदबत्तीचा धूर ,
शंख -घंटा नाद स्वागत संदेश पोहोचवि दूर दूर , 
हळद -कुंकू अक्षदा मांगल्याचे प्रतीक ,
वाहण्यासी तुळस -बेल -दुर्वा -फुले ,त्यात गुणही कित्तीक ,
खोड झिजल्या विना मिळत नाही चंदन शीतल -सुवासिक ,
पादुकांचे तीर्थ आपण घेतो मस्तकी मुखी ,
पुष्पांजली वाहून ,रिते हात ही होती सुखी ,
खाण्यासाठी योग्य ते असे खाद्य ,पण प्रेमाने अर्पण करतो तोअसे नैवेद्य ,
आराध्याचे गुणगान म्हणजे असे आरती ,भक्तीचा भुकेला देव करी भक्ताची कामनापूर्ति ,
देवाच्या आधी कासवाला करावा नमस्कार ,प्रार्थना एकच ताब्यात असावेत पंचेंद्रिय -विकार ,
छिन्नीचे सोसून घाव गाभाऱ्याला लाभते मूर्ति ,घरी रोज जमवणे अवघड षोडषोपचार इती ,
म्हणून देवासाठी नाही ,सामान्य जिवासाठी झाली देवळाची निर्मिती . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा