मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

तुच्छ -उच्च

          तुच्छ -उच्च 
आपले रिती -रिवाज प्रत्येक जिवाला मानाने वागवायची शिकवण देती 
लहान -महान असे कपाळावर लिहून का कुणी जन्मती ?
गणिका मिळवी मान असण्याचा अखंड सौभाग्यवती ,
तृतीय पंथी नवजाताचे स्वागत करण्याचा मान मिळवती ,
स्त्री -पुरुष वा असो कोणताही वर्ण ,प्रत्येकाला मान असती ,
दुर्वा फुले तुळशी सोबत ,दलदलीतील कमळ ,विषारी रुई ही देवासी प्रिय भासती ,
सुपारी -आवळा -अंबा -कवठ -नारळ पूजे मध्ये मान मिरविती ,
गाय बैल नाग कासव भारद्वाज चराचरांना नमन करती ,
कर्कश्श काळा कावळा ,पिंड शिवोनि जिवा -शिवाची भेट घडवती ,
नको भेद भाव ,ज्याला त्याला देऊ त्याचा मान ,हेच आपला धर्म शिकविती . 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा