शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

मी मराठी -मध्यम वर्गीय

              मी मराठी -मध्यम वर्गीय 
(२६-२-२०१२ - जागतिक मराठी भाषादिना निमित्त )
असावे एखादे घर ,शाळा -मार्केट पासून जवळ टुमदार -सुबक ,
अधून -मधून नाटक -सिनेमा ,सहल घडावी अष्टविनायक ,
गरजे पुरती असावी आवक ,अडीअडचणीला थोडीशी शिल्लक ,
कधीतरी ठीक आहे हॉटेलिंग ,वडापाव पिज्जा -बर्गर ,
बरे वाटते घरचे ,वरणभात ,भाजी पोळी पोटभर ,
कोका पेक्षा कोकम चालतं ,हार्डड्रिंक सगळं मनातील बोलतं ,
सणासुदीला एखादा दागिना ,झब्बा -साडी ,
गरजे साठी स्कुटर सायकल ,स्टेटस साठी एखादी गाडी ,
कामाची जागा हवी घरा जवळ , परगावची सोसत नाही फार धावपळ ,
दुकान उघडायचे टाईम टू टाईम ,लोकेशन हवे एकदम प्राईम ,
आमची कोठेही शाखा नसते ,जातनाही आम्ही आडवळणी रस्ते ,
धंद्यात नको रिस्क हाय ,पांघरूण पाहुन पसरायचे पाय ,
क्वचितच दिसतो मोठा मराठी देणगीदार ,कर्जही नको पैश्याचे चार ,
हळूहळू कळू लागलय पैश्याचे महत्व ,पण सोडणार नाही आपली तत्व ,
चौकोनी कुटुंबात सुखानी रहावे ,उतारवयात मुलांनी विचारावे ,
भाषा -संस्कृती जपायचे ओझे यांच्यावर सोपवून निश्चितं व्हावे ,
मातृभाषा बोलणे म्हणे डाऊन मार्केट ,असे ऐकू येते काई बाई ,
पण आई ती आईच ,तिची सर देवालाही आली नाही ....... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा