रविवार, २३ जुलै, २०१७

परसबाग -एक जिवलग मैत्रीण

                            परसबाग -एक जिवलग मैत्रीण 
या वर्षा ऋतुतील अनोख्या ब्रह्मकमळाचा पंचम फुलोरा ,
सोबतीला तगर -कण्हेर ,अनंत -गुलाब अन सुवासिक मोगरा ,
रंगी -बेरंगी सदाफुली ,सदा परसबागेत मिरवी तोरा ,
गुणगुणायला भाग पाडी ,जाई -जुई ,सायली -अबोलीचा पाठीवर लोळणारा गजरा ,
पवित्र सुवासिक दवणा -मरवा -तुळशी ची पाने आणि मंजिऱ्या ,
आले ,पुदिना ,गवती चहा ,कढीपत्त्याचा स्वाद अन गुणधर्म न्यारा -न्यारा ,
गणेशाला प्रिय एकेरी, दुहेरी ,मुकी ,लाल चुटुक जास्वन्द अन दुर्वा एकविस /अकरा ,
विडा ,सुपारी ,नारळ मानाने मिरवी ,पूजा असो वा दिवाळी -दसरा ,
सणा -वारी रंगी बेरंगी ,सुंदर ,सुवासिक फुले ,फळे ,पत्री मुळे देवळाचे रुप येती घरा घरा ,
कधी प्रासंगिक ,मौसमी सजीव अलंकारांनी सजती वसुंधरा ,
तर कधी सार्थ दीर्घायु घेऊन  ,बीज अंकुरती धरणीच्या उदरा ,
थकलेल्या तना -मनाला ,परसबाग जिवलग मैत्रिणी सम ,कायमच देत असते आसरा ,
बागेतील फेरफटका शिकवी ,निसर्गा सम परमार्थ शिकविणारा ,मोठा गुरु नसे दुसरा .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा