शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

एकसष्ठी एक मैलाचा टप्पा

                एकसष्ठी एक मैलाचा टप्पा 
विश्वास -प्रेम -कर्तव्य -कल्पना अन कष्टाने गुलाब झाले काटे ,
मिळुनी संसाराचे पवित्र-प्रसन्न , मंदिर बनविले छोटे ,
दत्तप्रसादाचा लाभ मिळण्यास ,भाग्य लागते मोठे ,
आयुष्यातील मैलाचा टप्पा ,साठी अन एकसष्ठी ,
पूर्वार्धाच्या अनुभवांची ,शिदोरी असते गाठी ,
उत्तरार्धात देते आधार ,जशी चालत असता काठी ,
काय कमवले ,काय गमवले ,काय राहिले !चा टप्पा असतो 'साठी '
नैसर्गिक विस्मरणाला नको देऊ या नांव -"साठी बुद्धी नाठी "
चूक -भूल देऊ -घेऊ ,नाजुक नाती जपण्या साठी ,
विस्मरणाचा घेऊ लाभ ,मागू क्षमा -करु क्षमा ,अलगद उकलू गुंतागुंती ,
उगवती अन मावळती मधले क्षण हे जीवन ,साक्षीला असते ,माता आणिक माती ,
एक हात देऊया पुढील पिढीच्या हाती ,अन दुसरा मागील पिढीच्या हाती ,
चढ असो वा असो उतार ,देते आधार निस्वार्थी काठी ,
देऊ आनंद ,घेऊ आनंद ,आनंदाची चावी जपून ठेवूया आप कनवठी ,
उरले -सुरले गुंतवू परमार्थी ,संचित वाढे परलोका साठी ,
छिद्र -पोकळी विसरुनि सारे ,सूर मुक्तीचा ,वेणुस गवसे ,श्रीहरीच्या अधरी -ओठी . 
                                                                     आसावरी जोशी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा