मंगळवार, १४ मार्च, २०२३

Smaranat rahilela prawas m.ta.Pune


बिना तिकिट एका आखाती देशाचा प्रवास 
प्रवासाची आवड आणि मुले परदेशात असल्याने देश -परदेशातील भरपूर प्रवास झाला आहे . लालपरी पासून सर्व चारचाकी ,दुचाकी ,रेल्वे ,पाण्यावरून ,पाण्याखालून ,हवेत म्हणाल तर हेलिकॉप्टर -विमान अश्या वाहनातून भरपूर आंबट-गोड-कडू अनुभव युक्त प्रवास केले आहेत . 
   मार्च २००५ची गोष्ट आहे ,बहुदा मी कुवेत एअर लाईन ने शिकागो -मुंबई प्रवास करीत होते युरोप मध्ये जिनेव्हा ला टेकनिकल हॉल्ट आणि पुढे कुवेत ला विमान बदलून मुंबई पर्यंत चा प्रवास होता . जीनिव्हाला हॅन्ड लगेज घेऊन गेट च्या आसन व्यवस्थे मध्ये सर्व प्रवासी थांबलो होतो . उड्डाणाची वेळ जवळ आली तरी काही सूचना मिळेना ,शेवटी अंऊन्समेंट झाली अति हिम वृष्टी मुळे विमान निघायला उशीर होत आहे .कृपया प्रवाश्यानी ठराविक स्विस फ्रॅंक ची फ्री कूपन घेऊन येथील फूड कोर्ट मधून पदार्थ घेऊन खाऊन-पिऊन घ्यावे आणि पुढील सूचना मिळे पर्यंत थांबावे . शाकाहारी वयोवृद्ध ,लहान मुले यांची तारांबळ उडाली ,त्यांची काही रक्कम नावडत्या पदार्थांमुळे वाया गेली . मी त्यांना सल्ला दिला उरलेल्या कुपन ने चॉकलेट मिल्क ,योगर्ट ,बिस्किट ,ज्युस , केक ,चिप्स  असे पदार्थ घ्या . शाकाहारी लोकांना आणि पोटातल्या कावळ्यांना कल्पना आवडली . पोटे शांत झाल्यावर दुसरी चिंता सतावू लागली  कि आपले कुवेत मुंबई विमान तर चुकणार नाही ना ?
  आमची चिंता खरी ठरली ,कुवेत ला मध्य रात्री पोहोचे पर्यंत मुंबई  चे विमान फ्लाय झाले होते ,आत २४ तासांनी पुढचे विमान होते . २-३तासांच्या धावपळी नंतर झालेला प्रकार घरी कळवायला एक फोन कार्ड मिळाले ,तरुण मुलांच्या मदतीने एकदाचा घरी निरोप पोहोचला . एअरपोर्ट ऍथॉरिटी ने सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट ठेऊन घेतले . २४तासांचा कुवेत व्हिसा ,शहराच्या मध्यभागी पंचतारांकित हॉटेल मध्ये राहण्या -जेवणाची सोय केली . वयोवृध्द ,लहान मुले सोबत असणाऱ्यांचे हाल झाले पण आम्ही काही सुटवंग सहप्रवासी हॉटेल लगत असलेल्या मॉल आणि गोल्डसुक मार्केट मध्ये २-३तास चक्कर मारून थोडे विंडो शॉपिंग करून आलो. ध्यानी मनी नसताना  झालेला कुवेत चा हा प्रवास कायम स्मरणात राहील . म्हणतात ना परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलावी तरच आनंद सापडतो . 
          आसावरी जोशी 
१चिंतामणी अपार्टमेंट ,कार्वेनगर ,पुणें -४११०५२
सेल नंबर -९६89390802

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा