रेडिओ ९०.४ सादरीकरण
मी योगासन प्राणायाम बरेच वर्ष करत होते त्या बरोबर पार्किन्सन उपयुक्त व्यायाम प्रकार यू ट्यूब वर बघून करायला सुरुवात केली .उलटे चालणे , हाताचा आधार न घेता खुर्ची वरून उठ बस करणे ,आवाजाचा पोत चांगला राहावा आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरावी या साठी स्तोत्रे मोठ्या आवाजात म्हणणे उलटे अंक मोजणे ,रोज हाताने थोडे तरी लेखन करणे चालू ठेवले .स्वयं पाकात म्हणाल तर पोळी भाजी ऐवजी भाज्या घालून थालीपीठ व्हेज पुलाव असे प्रकार वरचे वर व्हायला लागले .बाई किंवा डबा हा पर्याय शेवटाला .शिवण सफाईदार आले नाही तरी चालू ठेवले आहे .व्यस्त असल्यावर ट्रेमर्स चे प्रमाण थोडे कमी असते असे अनुभवास आले .आठवड्यात दोन दिवस मुलाकडे जाते तेव्हा नातवा बरोबर भेंड्या पत्ते खेळणं ,त्याला त्याला हिंदी,मराठी संस्कृत स्तोत्रे शिकवणे चालू,भटकायला नेणे असा टाईम पास चालू असतो .
क्षमा ताई चे पार्किन्सन वर बोलू काही पुस्तक वाचण्यात आले त्यात पीडी सपोर्ट ग्रुप ची माहिती कळली त्यांच्या कडून मृदुला ताई आणि शोभना ताई चा नंबर मिळाला त्यांना संपर्क साधला आणि दोनच दिवसात मी या ग्रुप शी जोडले गेले .
सपोर्ट ग्रुप शी जोडली गेल्या मुळे मला एक प्रेमळ आणि अनेक पातळ्या वर आधार देणारे एक मोठे कुटुंबच मिळाले .मनात सकारात्मक ऊर्जेचा झरा वाहू लागला .म्हणतात ना “मन चंगा तो कठो ती मैं गंगा “
मी मंडळावर केलेली एक छोटीशी कविता म्हणू शकतें का
म्हणतात ना उजव्या हाताने केलेले कार्य कळू नये डाव्या हाताला ,
ना अर्थाजन ना प्रसिद्धीची हाव ,खरे समाज कार्य म्हणतात याला ,
शुभार्थी -शुभंकर साठी किती तरी सभा संमेलने अन धावा धाव ,
तरी वागण्यात असतो सदा विनम्र भाव ,
येथे मिळते तज्ञा कडून पीडी विषयीचे शास्त्रीय आणि अनुभवलेले ज्ञान ,
धोक्यांपासून सावध होता येते ,आणि आजाराच्या स्वीकृतीचे लौकर येते भान ,
शुभार्थीना मासिक सभेतून गवसे आनंदी सकारात्मक ऊर्जा आणि संस्थे च्या मार्गदर्शनाचा वाटे मोठाआधार ,
त्या साठी संस्था आणि सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार .
आसावरी जोशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा