गुरुवार, १६ जुलै, २०२६

दिन विशेष (जागतिक मातृभाषा दिन )

 दिन विशेष (जागतिक मातृभाषा दिन )


   दिन विशेष (जागतिक मातृभाषा दिन )
एकवीस फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन . एखादा दिन विशेष आला की त्या विषयावर अनेक माध्यमातून लोक आपले विचार मांडत असतात ,मी एका त्रयस्थ या दृष्टिकोनातून मातृभाषे विषयी माझे विचार मांडत आहे ,अर्थात माझी मातृभाषा मराठी असल्याने मी तिला प्रतिनिधी केले आहे . 
 माझा जन्म महाराष्ट्रात झाला (आजोळी ),आई -वडील मराठी म्हणून माझी मातृभाषा मराठी . वडिलांच्या शेती -बागायती व्यवसायामुळे बालपण ते लग्न होई पर्यंत चा काळ भवानीमंडी -भैंसोदामंडी अश्या राजस्थान -मध्यप्रदेश च्या सीमारेषेवर असणाऱ्या हिंदी भाषिक जोडगावात गेला . त्यामुळे व्यवहार भाषा कोसा कोसावर बदलणारी हिंदी भाषा ,तर शिक्षणाचे माध्यम प्रमाण हिंदीभाषा होते . गावात दोन -चार घरे मराठी होती ,त्यापैकी कुणी इंदुरी मराठी ,कुणी देशावरील तर कुणी कोकणी मराठी बोलत . आमच्या घरात आजी -आजोबा ,आई -वडील ,आत्या हे सर्व मात्र पुणे मुंबईचे प्रमाण मराठी बोलत . आम्ही पाच भावंडे ,शाळा व इतर कारणाने दहा बारा तास घराबाहेर असल्याने बरेचवेळा घरात ही आपापसात हिंदी बोलायला लागायचो . पण आई -वडील त्या बाबतीत कडक शिस्तीचे होते . घरात सर्वांनी एकमेकांशी मराठीतच बोलायचे अशी सक्तीच होतीम्हणा ना !याचा आम्हाला कधी कधी रागही यायचा . पण आज आम्ही मान्य करतो कि आई वडिलांच्या या आग्रही धोरणाचा पुढील आयुष्यात खूप फायदाच झाला . पुढे मुले मोठी झाल्यावर शेती व्यवसायात रमणार नसून ,नोकरी -व्यवसाय किंवा विवाहोत्तर आयुष्य महाराष्ट्रात घालवणार असल्याचे ,त्यांच्या दूरदृष्टीने हेरले होते . बोलीभाषे व्यतिरिक्त मातृभाषेचे ज्ञान वाढावे म्हणून वडिलांनी पुणे मुंबई निघणारे मराठी वर्तमानपत्र ही लावले होते . पोस्टाने ते दोन तीन दिवस उशीरा येत असे . पण इथे ताज्या बातम्यांपेक्षा दैनिकातील भाषा डोळ्याखालून जाणे त्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते . मराठी—हिंदी लिपी सारखीच असल्याने फावल्या वेळेत थोडे मराठी चाळले जायचे . किंवा मोठी माणसे त्यातील कथा आणि मनोरंजनात्मक सदरे वाचून दाखवत . त्यामुळे आम्ही भावंडे कोणत्याही क्लास किंवा परिक्षे शिवाय ,आज ओघवती मराठी बोलू ,वाचू ,लिहू शकतो महाराष्ट्रा पासून दूर राहून सुद्धा ,मराठी साहित्य ,सिनेमा ,नाटक ,लेखक ,कवि यांची निदान तोंडओळख तरी झाली . त्यामुळे पुण्यात बी . एड . करताना ,मराठी माध्यम असून चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले . 
सांगायचा मुद्दा असा की जेंव्हा मातृभाषा आणि शिक्षणाची माध्यम भाषा किंवा व्यवहार भाषा वेगळी असते तेंव्हा पालकांनी तसेच कुटुंबातील मोठ्यांनी ,थोडे सक्तीने, थोडे गोडीगुलाबीने आणि थोडे वातावरण निर्मितीने मुलांना मातृभाषेची गोडी लावायला       
हवी .

   भारतात हल्ली बहुतेकांना तीन -चार भाषा अवगत असतात . मातृभाषा ,राज्यभाषा (१-२),राष्ट्रभाषा आणि अंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी . इंग्लिश आल्याशिवाय बाल्याची प्रगती होणार नाही अशी ठाम समजुत असल्याने किंवा मातृभाषेच्या चांगल्या शाळा उपलब्ध नसल्याने ,इंग्रजी माध्यम शाळेत घालण्याचे प्रमाण हल्ली खूपच वाढले आहे . दुसऱ्या बाजुला पुरेशी विध्यार्थी संख्या नसल्याने मातृभाषेतील काही शाळा बंद कराव्या लागल्या असे समजते . 
    बहुभाषिक असणे चांगलेच ,त्यातील एक मातृभाषा असावी . किमान एका भाषेवर प्रभुत्व असावे ,बाकी भाषा किमान लिहिता -वाचता—बोलता आल्या तरी चालते . मनातील भावनांचे ,विचारांचे आदान -प्रदान महत्वाचे. समोरच्याच्या भाषेत आपण संवाद साधला तर आत्मीयता वाढीस लागण्यास मदतच होते . 
    पहिली वीस -बावीस वर्षे सोडली तर ,पुढील चाळीस -पंचेचाळीस वर्षे पुण्यातच गेली . त्यामुळे तीनही मुलांना आवर्जून मराठी शाळेतच घातले . कारण मराठी मातृ-राज्य—व्यवहार भाषा होती आणि त्या वेळेस चांगल्या मराठी शाळाही उपलब्ध होत्या . पुढे मुले हिंदी ,इंग्रजी ,संस्कृत ही शिकली . मराठी माध्यमामुळे मुलांना इंजिनियरिंग च्या शिक्षणात किंवा अमेरिकेतील उच्चशिक्षण ,नोकरी ,व्यवसायात कोणतीही अडचण अली नाही . 
   आता नातवंडांच्या वेळेस त्यांना मराठी शाळेतच घालावे असा अट्टहास करणे योग्य नव्हे . स्थळ -काळ—वेळ -परिस्थिती प्रमाणे प्रत्येक प्रश्नांची उकल वेगवेगळ्या प्रकारे करावी लागते . दूरसंचार व वाहतुकीच्या साधनांमध्ये क्रांतिकारक बदला सारख्या कारणांमुळे जगातील अंतरे कमी झाली आहेत . एका राज्यातून दुसऱ्या राज्यातच काय पण एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतरित होणेही सोपे झाले आहे ,त्यामुळे आंतराष्ट्रीय प्रमाण भाषेला खूप महत्व आले आहे . घरात आई -बाबा दोघांची मातृभाषा वेगवेगळी असली तर बरेच वेळा घरात इंग्लिश बोलले जाते ,तर काही वेळा फॅशन म्हणून इंग्लिश बोलले जाते . आई -बाबा दोघे नोकरी करणारे असल्याने काही मुले घरापेक्षा जास्तवेळ शाळा—पाळणाघर येथे असतात ,मग मुले जी भाषा ऐकतात तीच बोलणार नां !एक गमतीशीर किस्सा सांगावासा वाटतो -एका नोकरी करणाऱ्या मराठी कुटुंबात मुलीला सांभाळायला एक पंजाबी आया होती ,तर ती मुलगी आयांच्या सहवासामुळे आधी पंजाबी ,शाळेत जाऊ लागल्यावर इंग्रजी आणि काही वर्षानंतर थोडे मराठी बोलायला शिकली . मुलीच्या दृष्टीने विचारांची देवाण -घेवाण महत्वाची आणि नैसर्गिक ही होती .
 एकदा शिकलेली भाषा माणूस कधी पूर्ण विसरत नाही असे म्हणतात . तरी बोली भाषेत सरावाला खूप महत्व आहे . लहानपणी मी हिंदी भाषिक राज्यात राहायल्याने आधी हिंदीत विचार करून मग मराठी बोलले जायचे ,आता चार -पाच दशके महाराष्ट्रात ,तेही पुण्यनगरीत राहिल्याने ,हिंदी लिटरेचर मध्ये एम . ए . असूनही थोडे आठवून आठवून हिंदी बोलले जाते . 
   आपली संस्कृती जाणून घ्यायला मातृभाषेची खूप मदत होते . घरातील लोकांशी सुसंवाद साधणे सोपे जाते ,सुसंवादाने अनेक छोटे -मोठे प्रश्न सुटतात . त्याचा मानसिक आरोग्य चांगले ठेवायला उपयोग होतो . एखाद्या भाषे बद्दल प्रेम अवश्य असावे पण अहं किंवा न्यूनगंड नसावा . त्याचप्रमाणे इतरांच्या भाषेला कमी न लेखता तिचा आदर करणे ही आपले कर्तव्य आहे . आदर्श पिढी घडवायची असेल तर मोठ्यांनी आदर्श वर्तन करणे अपरिहार्य आहे . 
  परदेशात राहणाऱ्या माझ्या मुलांची मुले म्हणजे माझी नातवंडे मातृभाषा मराठीत संवाद साधु लागली की माझे ऊर अभिमानाने-आनंदाने भरुन येते . हे मी प्रामाणिक पणे मान्य करून ,एक पाल्य -पालक आणि आजी म्हणून आलेले अनुभव सर्व वाचकांना समर्पित करते . 
                                     आसावरी जोशी

माय मराठी राज्यभाषा दिन

 माय मराठी राज्यभाषा दिन 


उत्तमच असते माय -राज्य -राष्ट्रभाषे सोबत ,अंतराष्ट्रीय भाषेचे असणे ज्ञान ,
सशक्त संयुक्त कुटुंबात जरी एकच असतो प्रमुख ,पण इतरांनाही द्यायचा असतो योग्यतो मान -सन्मान ,
कुसुमाग्रजांना मानाचा मुजरा देऊन ,वाढली मराठीची आन -बान -शान ,
उदरात कानी पडलेल्या मायभाषेला ,सहाजिकच असते वरचे स्थान ,
भाग्यवान आपण महाराष्ट्रवासी , येथे मराठीला लाभला मातृ भाषा अन राज्य भाषा असा दुहेरी मुकुटाचा मान ,
भाषा मनीचे पोहोचविते कानी ,दोन बाजूंना जोडणारी एक लवचिक कमान ,
भाषा आपुली शास्त्रीय ,सुसंस्कृत ,समृद्ध ,पदरी आपुल्या थोर साहित्यिक -कवि -संतांचे दान ,
भाषेवरुन नको भांडण -तंटा ,ती तर एक साधन ,मोजते मनीचे उधाण ,
अभिजात ,पुरोगामी म्हणून पेलू शकते ,कालमानाने ,काही कोसाने आलेल्या योग्यत्या बदलांचे आव्हान ,
तिच्या चिर आयुष्य -आरोग्या साठी करूया ,परमेश्वराचे निःशब्द ध्यान .
       आसावरी जोशी

कोलंबस मराठी शाळेचा रौप्य मोहोत्सव

 कोलंबस मराठी शाळेचा रौप्य मोहोत्सव 

शिक्षण -नोकरी निमित्त जावे लागते साता समुद्रा पार ,
पण जात नाही मातृभूमि अन मातृभाषेचा विचार ,
पुढील पिढीचा परदेशात जात असतो बालपणी पासूनचा खूप मोठा काळ ,
पण मातृ भाषा त्यांचीही जोडून ठेवते मातृभूमीशी अन संस्कृतीशी नाळ ,
चांगलेच असते बहुभाषांचे ज्ञान ,
पण मातृभाषेला असावा सर्वोच्च मान ,
साहित्य -कला ,सणवार ,आचार -विचार प्रत्येक संस्कृतीचे महत्वाचे अंग ,
प्रत्येक संस्काराला हवाच मातृभाषेचा संग ,
अमेरिकेच्या मुक्कामात मी कोलम्बस मराठी शाळेचे जवळून पाहिले आहे उत्तम काम ,
प्रगतीच्या अफाट वारूला शाळा घालत असते सुसंस्कारांची लगाम ,
कार्यकारिणी सदस्य ,आजी माजी शिक्षक आणि विध्यार्थानांचे अभिनंदन आणि सलाम ,
रौप्यमहोत्सवा निमित्त कोलंबस मराठी शाळेला खूप खूप शुभेच्छा ,
शाळेच्या वटवृक्षाचा विस्तार वाढो अन अनेकांना संस्कारित ज्ञानाच्या 
प्राणवायु  अन शीतल छायेचा लाभ लाभो हीच ईश्वर चरणी इच्छा .
आसावरी जोशी -शुभम मुक्ताची आज्जी 

शुक्रवार, १५ मे, २०२६

Radio Sadrikaran

 रेडिओ ९०.४ सादरीकरण

मी योगासन प्राणायाम बरेच वर्ष करत होते त्या बरोबर  पार्किन्सन उपयुक्त व्यायाम प्रकार यू ट्यूब वर बघून करायला सुरुवात केली .उलटे चालणे , हाताचा  आधार न घेता खुर्ची वरून उठ बस करणे ,आवाजाचा पोत चांगला राहावा  आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरावी या साठी स्तोत्रे  मोठ्या  आवाजात म्हणणे उलटे अंक मोजणे ,रोज हाताने थोडे तरी लेखन  करणे  चालू ठेवले .स्वयं पाकात म्हणाल तर पोळी भाजी ऐवजी भाज्या घालून थालीपीठ व्हेज पुलाव  असे प्रकार  वरचे वर व्हायला लागले .बाई किंवा डबा हा पर्याय  शेवटाला .शिवण सफाईदार आले नाही तरी चालू ठेवले आहे .व्यस्त असल्यावर ट्रेमर्स चे प्रमाण थोडे कमी असते असे  अनुभवास आले .आठवड्यात  दोन दिवस मुलाकडे  जाते तेव्हा नातवा बरोबर भेंड्या  पत्ते खेळणं ,त्याला त्याला हिंदी,मराठी संस्कृत स्तोत्रे  शिकवणे चालू,भटकायला नेणे असा टाईम पास चालू  असतो .

क्षमा ताई चे पार्किन्सन वर बोलू काही  पुस्तक वाचण्यात आले त्यात पीडी सपोर्ट ग्रुप ची माहिती कळली त्यांच्या कडून मृदुला ताई आणि शोभना ताई चा नंबर  मिळाला त्यांना संपर्क साधला आणि दोनच दिवसात मी  या  ग्रुप शी जोडले गेले .
     सपोर्ट ग्रुप शी जोडली गेल्या मुळे मला एक प्रेमळ आणि अनेक पातळ्या वर आधार देणारे एक मोठे कुटुंबच  मिळाले .मनात  सकारात्मक ऊर्जेचा झरा  वाहू लागला .म्हणतात  ना “मन चंगा तो  कठो ती  मैं गंगा “
    मी  मंडळावर केलेली  एक छोटीशी कविता म्हणू  शकतें का
म्हणतात  ना उजव्या हाताने केलेले कार्य कळू नये डाव्या हाताला ,
ना अर्थाजन ना प्रसिद्धीची हाव ,खरे समाज कार्य म्हणतात याला ,
शुभार्थी -शुभंकर साठी किती तरी सभा संमेलने अन धावा धाव ,
तरी वागण्यात असतो सदा विनम्र भाव ,
येथे मिळते तज्ञा  कडून पीडी विषयीचे शास्त्रीय आणि अनुभवलेले ज्ञान ,
धोक्यांपासून सावध होता येते ,आणि आजाराच्या स्वीकृतीचे लौकर येते भान ,
शुभार्थीना  मासिक सभेतून गवसे आनंदी सकारात्मक ऊर्जा आणि संस्थे च्या मार्गदर्शनाचा वाटे मोठाआधार ,
त्या साठी संस्था आणि सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार .
          आसावरी जोशी

May flower

मे फ्लॉवर ,फायर बॉल नाव सार्थक करते ,
रंग ,आकार ,मंद -मंद सुगंध मोहिनी घालते ,
टिकाऊपणा अन नेमाने येणे जाणे असते ,
मध रसाळ गोळा करण्यासी मधुमक्षिका घोंघावते ,
वर्षातून एकदाची फुलुनी ,जन्म सार्थकी लावणे म्हणजे काय ते शिकवते ,
निसर्गाच्या किमये पुढे कर जोडुनी मी नतमस्तक होते .
आसावरी जोशी .



शनिवार, २१ मार्च, २०२६

पार्किन्सन सपोर्ट ग्रुप सदस्यांचे कार्य

म्हणतात  ना उजव्या हाताने केलेले कार्य कळू नये डाव्या हाताला ,

ना अर्थाजन ना प्रसिद्धीची हाव ,खरे समाज कार्य म्हणतात याला ,

शुभार्थी -शुभंकर साठी किती तरी सभा संमेलने अन धावा धाव ,

तरी वागण्यात असतो सदा विनम्र भाव ,

येथे मिळते पीडी विषयीचे शास्त्रीय आणि अनुभवलेले ज्ञान ,

धोक्यांपासून सावध होता येते ,आणि आजाराच्या स्वीकृतीचे लौकर येते भान ,

शुभार्थीना  मासिक सभेतून गवसे आनंदी सकारात्मक ऊर्जा आणि संस्थे च्या मार्गदर्शनाचा वाटे मोठाआधार ,

त्या साठी संस्था आणि सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार .


आसावरी जोशी 

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०२५

शुभेच्छा पत्र -शामा च्या सत्तराव्या वाढदिवसा निमित्त

शुभेच्छा पत्र -शामा च्या सत्तराव्या वाढदिवसा निमित्त 
अडथळ्याची शर्यत खेळत पार केलीस दशके सात ,
नोकरी ,संसार ,पुढच्या मागच्या पिढी ची जवाबदारी ,पुन्हा सात च्या आत घरात ,
बुद्धी सोबत तुझ्या नियोजनपूर्ण कष्टाला द्यावीच लागेल दाद ,
ईश कृपेने मुले निघाली संस्कारी -गुणी ,सून -जावई नातवंडं करिती प्रेमाची बरसात ,
स्वतः सोबत इतरांनाही दिलासा कायम मदतीचा हात ,
ईश्वर चरणी एकच प्रार्थना लाभो तुजसी आयु -आरोग्य-सुख-समाधान सदैव जीवनात . 
  आसावरी जोशी 

बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५

नीता ढवळे एकसष्ठी शुभेच्छा

 


                नीता ढवळे एकसष्ठी शुभेच्छा 
कट्ट्या वरील भेटीं मुळे आपली मैत्री झाली छान ,
समाजकारण ,राजकारण ,रेसिपिज ,घरगुती औषधे यांची होत असते देवाण घेवाण ,
निखळ मैत्री ,आड येत नाही वय ,रुसवे फुगवे ,हेवेदावे ,मान अपमान ,
कारण प्रत्येकाच्या पदरी देव देतोच ना काही गुणांचे दान ,
नीता आमची उत्साही ,सुगरण ,उकडीचे मोदक ,मूंग हलव्याचे किती करू गुणगान ,
नीता -विनय एक नाण्याच्या दोन बाजू जणू देवा नेच दिलेले वरदान ,
मुलगी -जावई-नातू कर्तृत्ववान स्वाभिमानाने उभयतांची उंचावली आहे मान ,
वाढदिवासा निमित्त खूप खूप शुभेच्छा ,केलीस पूर्ण सहा दशकीं वारी ,
लाभो  तुजसी आयु आरोग्य ,सुख समाधान ,हीच प्रार्थना व्याडेश्वरा  अन देवी दुर्गेश्वरी . 

        आसावरी जोशी 

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

त्रिस्थली

 त्रिस्थळी यात्रा  ७-११-२४ तें १५-११-२४भाग्यश्री  ट्रॅव्हल +पंचकन्या 

मैत्रिणीं मुळे त्रिस्थळी यात्रेचा योग आला जुळून ,
प्रयागराज ,अयोध्या ,नंदीग्राम ,सारनाथ ,काशी ,गया ,बौध्दगया ,चित्रकूट  ,गुप्तगोदावरी ,आदि तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले जवळून ,
प्रयागराजला गंगा -यमुना- गुप्त सरस्वती च्या संगमावर गेलो बोटीतून,
संगम असुनही गौरवर्णी गंगा ,सावळी यमुना ,गुप्त सरस्वती आपले अस्तित्व आहेत टिकवून ,
यमुना शांत तर गंगा थोडी चंचल असल्याने संगमाचे स्थान थोडेफार बदललेले येते दिसून ,
प्रयागराज /अलाहाबाद नेहरुंचे -इंदिराचे जन्मस्थान आनंदभवन ,चंद्रशेखर आझाद पार्क ,विद्यापीठ ,कोर्ट आदि परिसर पहिला फिरून ,
चित्रकूट ला गुहेतील गुप्त गोदावरी ,स्फटिक शिळा राम -भरत भेटीचा प्रसंग आठवून डोळे आले भरून ,
अयोध्ये जवळील नंदी ग्राम हून भरताने चौदा वर्षे अयोध्येचा कारभार शत्रुघ्नाच्या मदतीने सांभाळला दुरून ,
तेथे भरत मंदिर  ,भरतमारुती भेट ,कल्की मंदिर इत्यादी बघून विविध नात्यातील प्रेम आले उलगडून ,
२२-१ - २४ला राम लल्ला आला  मोहक बालरुपात अयोध्येला जन्मस्थानी ,कलियुगातील वनवास संपवून ,
अयोध्याधाम ,अयोध्या ,वाल्मिकी विमानतळ , लतामंगेशकर चौक ,शरयू घाट ,देवादिकांच्या सुंदर मुर्त्या ,हनुमान गढी ,कनक भवन एकूणच शहर नमो-योगी  -सहकारी आणि भक्तांच्या मुळे गेले एकदम उजळून ,
ज्योतिर्लिंग -सप्तपुरी-आणि त्रिस्थळी पैकी एक काशी विश्वेश्वराचे लिंग दोनच मिनिटात डोळ्यात घेतले साठवून ,
कालभैरव ,अन्नपूर्णा मातेची घेऊन दर्शन गंगा नदीतून थोडे जल तीर्थरूप आणले भरून ,
काशी /वाराणसी ला ८४घाटांच्या मध्ये रात्री गंगा आरतीच्या सोहळ्याने डोळे गेले दिपून ,
पितृ गयेला गयासुराला पाताळात पाठवणाऱ्या विष्णुपदाचे दर्शन आणि स्पर्शाचा योग आला जुळून ,
बौद्धगयेला सिद्धार्थ चा झाला गौतम बुद्ध ज्या पिंपळ वृक्षा खाली बसून ,
तो बौधी वृक्ष आणि सोनेरी धीर -गंभीर मूर्ती असलेले बुद्ध मंदिर पाहीले निरखून ,
अयोध्येहून येताना सरनाथाचे झाले दर्शन ,जेथेप्रथम पाच शिष्याना बुद्धाने बौद्ध धर्माची शिकवण सांगितली समजावून ,
अश्या प्रकारे ईश कृपेने सुखरूप घरी परतलो त्रिस्थळी यात्रेचे समापन करून . 
                   आसावरी जोशी.

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४

Tristhali yatra

 त्रिस्थळी यात्रा  ७-११-२४ तें १५-११-२४भाग्यश्री  ट्रॅव्हल +पंचकन्या 

मैत्रिणीं मुळे त्रिस्थळी यात्रेचा योग आला जुळून ,

प्रयागराज ,अयोध्या ,नंदीग्राम ,सारनाथ ,काशी ,गया ,बौध्दगया ,चित्रकूट  ,गुप्तगोदावरी ,आदि तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले जवळून ,

प्रयागराजला गंगा -यमुना- गुप्त सरस्वती च्या संगमावर गेलो बोटीतून,

संगम असुनही गौरवर्णी गंगा ,सावळी यमुना ,गुप्त सरस्वती आपले अस्तित्व आहेत टिकवून ,

यमुना शांत तर गंगा थोडी चंचल असल्याने संगमाचे स्थान थोडेफार बदललेले येते दिसून ,

प्रयागराज /अलाहाबाद नेहरुंचे -इंदिराचे जन्मस्थान आनंदभवन ,चंद्रशेखर आझाद पार्क ,विद्यापीठ ,कोर्ट आदि परिसर पहिला फिरून ,

चित्रकूट ला गुहेतील गुप्त गोदावरी ,स्फटिक शिळा राम -भरत भेटीचा प्रसंग आठवून डोळे आले भरून ,

अयोध्ये जवळील नंदी ग्राम हून भरताने चौदा वर्षे अयोध्येचा कारभार शत्रुघ्नाच्या मदतीने सांभाळला दुरून ,

तेथे भरत मंदिर  ,भरतमारुती भेट ,कल्की मंदिर इत्यादी बघून विविध नात्यातील प्रेम आले उलगडून ,

२२-१ - २४ला राम लल्ला आला  मोहक बालरुपात अयोध्येला जन्मस्थानी ,कलियुगातील वनवास संपवून ,

अयोध्याधाम ,अयोध्या ,वाल्मिकी विमानतळ , लतामंगेशकर चौक ,शरयू घाट ,देवादिकांच्या सुंदर मुर्त्या ,हनुमान गढी ,कनक भवन एकूणच शहर नमो-योगी  -सहकारी आणि भक्तांच्या मुळे गेले एकदम उजळून ,

ज्योतिर्लिंग -सप्तपुरी-आणि त्रिस्थळी पैकी एक काशी विश्वेश्वराचे लिंग दोनच मिनिटात डोळ्यात घेतले साठवून ,

कालभैरव ,अन्नपूर्णा मातेची घेऊन दर्शन गंगा नदीतून थोडे जल तीर्थरूप आणले भरून ,

काशी /वाराणसी ला ८४घाटांच्या मध्ये रात्री गंगा आरतीच्या सोहळ्याने डोळे गेले दिपून ,

पितृ गयेला गयासुराला पाताळात पाठवणाऱ्या विष्णुपदाचे दर्शन आणि स्पर्शाचा योग आला जुळून ,

बौद्धगयेला सिद्धार्थ चा झाला गौतम बुद्ध ज्या पिंपळ वृक्षा खाली बसून ,

तो बौधी वृक्ष आणि सोनेरी धीर -गंभीर मूर्ती असलेले बुद्ध मंदिर पाहीले निरखून ,

अयोध्येहून येताना सरनाथाचे झाले दर्शन ,जेथेप्रथम पाच शिष्याना बुद्धाने बौद्ध धर्माची शिकवण सांगितली समजावून ,

अश्या प्रकारे ईश कृपेने सुखरूप घरी परतलो त्रिस्थळी यात्रेचे समापन करून . 

                    आसावरी जोशी. 

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

Chhunda

              कैरी  चा छुन्दा 

     साहित्य -   राजापुरी कैरी सारख्या रेषा नसलेल्या बेताच्या आंबट कैरीचा साल काढून केलेला जाङसर कीस दोन वाट्या ,दोन वाट्या साखर ,दोन टी स्पून लालरंगाचे  तिखट ,एक टी स्पून मीठ ,दोन टी स्पून जिरे +दोन इंच दालचिनी +सात -आठ लवंगा ,या तिन्हींची किंचित गरम करून केलेली जाडसर पूड करावी . 
 कृती -कैरीचा कीस ,साखर ,मीठ एकत्र करून दोन तास झाकून ठेवावे म्हणजे साखर विरघळते .हे मिश्रण एका काचेच्या पसरट बोल मध्ये घालून दोन मिनिटे मायक्रोवेव्ह करावे ,हलवून पुन्हा दोन मिनिटे ठेवावे असे मिश्रणातील पाक आटून एक तारी होई पर्यंत पाच  सहा वेळा करावे .थोडे  सरसरीत असताना बाहेर  काढावे . गार झाल्यावर मिश्रण अजून घट्ट होते .कोमट असताना तिखट ,
आणि जिरे लवंग दालचिनीची ची केलेली पूड घालून हलवावे . छुन्दा तयार !! 
काही लोक स्टील च्या परातीत मिश्रण घालून वर पातळ फडके बांधून सन ड्राय करतात ,तर काही लोक गॅस च्या मंद आचेवर एक तारी पाक होई पर्यंत शिजवतात . 
टीप -घावन ,पराठे थालीपीठ ,सँडविच या बरोबर  आंबट गोड तिखट चवीचा  छुन्दा छान लागतो . 
            आसावरी जोशी 


गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

क्षण कसोटीचे -श्रद्धा होतीच ती अजून दृढ झाली .

 क्षण कसोटीचे -श्रद्धा होतीच ती अजून दृढ झाली . 


   काही कारणाने एक जुनी आठवण ताजी झाली . साधारण  पंधरा वर्षा पूर्वीचा प्रसंग आहे ,मी आमच्या शेजारच्या देवगांवकर कुटुंबियांसोबत गुजरात -सौराष्ट्र च्या ट्रिपला गेले होते . आम्ही आठ लोक होतो . अहमदाबाद ,डाकोर ,द्वारका ,सोमनाथ ,राजकोट ,पोरबंदर ,जूनागढ गिरनार अश्या बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो . गिरनारला "श्री गुरुदत्त शिखर "चढायचे असेल तर दहा हजार पायऱ्या चढाव्या लागतात . गुरुदेवदत्त आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान असल्याने एक दिवस आम्ही गिरनार दर्शना साठी राखून ठेवला होता  कारण तेंव्हा रोपरेल ची  सोय  नव्हती आता  निम्या पर्यंत  रोप रेल  ची  सोय  झाली आहे . रात्री हॉटेल मध्ये मुक्काम करून सकाळी लवकर गिरनार वर जायचे ठरले . काही लोक डोलीने गेले ,एकांनी हॉटेलवर थांबणे पसंत केले . आम्ही तीन लोकांनी पायऱ्या चढून जायचे ठरवले . काहीना काही कारणाने आम्हाला चढणे सुरु करायला थोडा उशीरच झाला . सकाळी दहा च्या आसपास आम्ही चढायला सुरुवात केली . चालणाऱ्यांची आणि डोली वाल्यांची बऱ्यापैकी वर्दळ होती . शिखरावर जाताना वाटेत अनेक देवळांचे दर्शन घेत गेलो . उदा . जैन मंदिर ,अंबामाता ,मच्छिन्द्रनाथ ,गोरखनाथ इत्यादी . सर्वोच्च शिखरावर "श्री गुरु दत्तात्रेयांचे "जागृत देवस्थान आहे . शिखरावर दत्ताचा पादुका आणि मूर्तीची मनोभावे पूजा केली शांतपणे दर्शन घेतले . दहा हजार पायऱ्या चढून गेल्याचा थकवा जणु पळून गेला . जागृत देवस्थान म्हणजे काय याचा खरा अर्थ कळला . परतीचा प्रवास सुरु करणार तर समजले कि थोडेसे उतरून पुन्हा थोडे चढले की तेथे अखंड धुनी आणि प्रसादाचे जेवण मिळते . धुनीचे दर्शन आणि प्रसादा शिवाय परतणे मनाला पटले नाही . आम्ही तेथेही गेलो . मन तृप्त झाले . आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली

उतरणाऱ्या लोकांची वर्दळ हळू हळू कमी व्हायला लागली होती . डोलीवाले सरावा मुळे भराभर उतरत होते . आम्हीपण उतरताना जलद गतीने उतरत होतो . पण पाय थकले होते आणि उतारावर तोल सांभाळणे अवघड जात होते . अश्या वेळेस काठीचा चांगला उपयोग झाला . तरी जाताना लागला त्यापेक्षा निम्म्या वेळेत नऊ हजाराच्या वर पायऱ्या उतरून आलो होतो . दिवस लहान असल्याने लवकर अंधार झाला . पायऱ्या दिसेनाश्या झाल्या . आजूबाजूच्या झाडातून सरसर आवाज ऐकू येऊ लागले . पायऱ्यांचे दगड गुळगुळीत झालेले ,पायताणे पण झिजलेली ,दोन-तीन वेळा पडता पडता राहिलो . आमची गती खूपच मंदावली होती . आम्ही ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ वयोगटातील होतो . मनात एक अनामिक भिती होती . आमच्या तिघांशिवाय आता कोणीच यात्रेकरू दिसत नव्हते . प्रवासाच्या तयारीत घेतलेली बॅटरी हॉटेल वर राहिली होती ,मोबाईल मधील टॉर्च वापरायचे डोक्यातच आले  नाही .  सहकाऱ्यांना फोन करावा तर फोनला रेंज मिळत नव्हती . तेवढ्यात महाविद्यालयीन मुला -मुलींचा एक ग्रुप आम्हाला वर चढताना दिसला . काय करावे कळेना ,या मुलांकडे मदत मागावी का ?ते मदत करतील का ?अश्या अनेक शंका मनात आल्या ,पण दुसरा    काहीच पर्याय नसल्याने त्यांना भैया म्हणून हाकमारले आणि आमची अडचण त्यांना सांगितली . ते म्हणाले आम्ही खाली हॉटेलमध्ये  उतरलोय ,जेवायला थोडा वेळ होता म्हणून विचार केला थोडे  फिरून यावे कारण सकाळी पुढच्या प्रवासाला निघणार आहोत . आम्ही त्यांना विनंती केली कि पायथ्या पर्यंत उतरायला आमच्या सोबत येता का ?ती मुले क्षणाचाही वेळ न लावता लगेच तयार झाली . जणू त्या साठीच ते सगळे तिकडे आले होते . एकेकाने आमच्या पैकी प्रत्येकाचा हात धरला बाकीच्यांनी सेलफोन ची बॅटरी सुरु केली आणि म्हणाले ,आम्ही तुम्हाला तुमच्या हॉटेल पर्यंत सोडल्या शिवाय जाणार नाही . बोलता बोलता पायथा केव्हा आला ते कळलेच नाही . आमचा ग्रुप आमची वाट पहात पायथ्याशी थांबला होता . 
       गिरनार च्या शिखरावर पाषाणात दत्ताचे दर्शन झाले आणि पायथ्याशी आल्यावर त्या तरुण मुला -मुलींच्या रूपानेच जणू देव भेटल्याची प्रचिती आली .
                                                     आसावरी जोशी 
                                                       मो. ९६८९३९०८०२

                वयाचे  टप्पे 

बालपण देगा देवा ,ठेवा जपून आनंदाचा ”ठेवा ”
सोळावे वरीस  ,गद्धे पंचविशी  चे अडथळे पार करीत ,सोनेरी स्वनांचा तारुण्याचा काळ सर्वाना वाटे हवा हवा ,
पुढे जोडीदाराच्या मदतीने संसाराचा गाडा ओढण्याची असते मोठी जवाबदारी ,
मुलांचे शिक्षण -आरोग्य -लग्न-स्वावलंबन यात आव्हाने येतात कितीतरी ,
सोबत आई -वडील परिजनांची काळजी ,अन नाती जपण्याची कसरत ,जणू चालणे तारेवरी ,
बांधावा लागतो लवचिक पूल ,पुढच्या -मागच्या पिढीची सांधायला दरी ,
हेसगळे करताना उभयतांच्या उतरणीच्या नियोजनाची ही घ्यायची असते खबरदारी . 
साठी -सत्तरीच्या मधे सुरु होते आयुष्याची उतरणी ,
तुलनेने थकते शरीर ,साठी बुद्धि नाठी सारख्या चिकटतात म्हणी ,
हा काळ होतो सुसह्य ,जर जपले असेल तन -मन-धनाचे आरोग्य तरुणपणी ,
म्हातारपण -बालपणात साम्य असते ,ही भावना सकारात्मकता दर्शविणारी ,
बालके बोट धरून चालणारी ,एकच प्रश्न अनेक वेळा विचारणारी ,
उतरणीतही तेच असते ,फरक एवढाच एक कृती आनंद देणारी तर दुसरी वैताग देणारी ,
म्हातारपण -बालपण जणू चंद्राची कोर ,कृष्ण -शुक्ल दोन्ही पक्षात दिसणारी ,
एक कोर वाढत वाढत पूर्ण चंद्राच्या रूपाने शीतल प्रकाश देणारी ,
तर दुसऱ्या पक्षातील कमी कमी होत ,कोर रूपाने अंधारात विलीन होणारी ,
पण अमावस्येच्या अस्तित्वा मुळेच पौर्णिमा येते लखलखणारी ,प्रकाशाच्या वाटा दाखवणारी ,
देवा जेष्ठांच्या अनुभवाची शिदोरी ठरू दे समाज -संस्कृतीला  पोषक अन समृद्ध करणारी .
          आसावरी जोशी 
     मो. ९६८९३९०८०२






बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

प्रकाश बापट पंचाहत्तरी -अमृत महोत्सव समारंभ

प्रकाश बापट पंचाहत्तरी -अमृत महोत्सव समारंभ 
उगविला सोनियाचा दिन ,आपणास पंचाहत्तरी निमित्त खूप खूप शुभेच्छा श्री चरणी जोडोनिया कर 
मनाली -सचिन ,अनन्या -आलोक ,अनिशा -अर्चित यांनी प्रेमाने वाढदिवसा निमित्त रचला बेत सुंदर ,
आप्त -मित्र-कट्टा जन अमृताचा शिम्पडिती सडा शातायुषी प्रवासाच्या वाटेवर ,
सामान्य माणसाचा आपल्या हातून थोडे घडावे परमार्थ यावर ही असतो भर ,
ग्राहक पंचायती  सारख्या समाज कार्यात आपला खारीचा वाटा दिसून येतो एक नंबर ,
अंबे जोगाई -दुर्गा व्याडेश्वर कृपेने आपणांसी लाभो भरपूर आरोग्य आनंद सुख समाधान आयुष्यभर . 
          आसावरी जोशी

गुरुवार, २५ जानेवारी, २०२४

राम लला को अर्पित एक माला

 



धन्य धन्य भारत देश ,धर्म और यहाँ की अर्वाचीन संस्कृति जो कईयोको करती आकर्षित ,
पाषाण को देव बनाने की कला और प्राण प्रतिष्ठा की साधना समस्त विश्व को  कर गई अचंभित ,
शब्दों की माला राम लला के चरणों में सश्रद्ध करती हूँ अर्पित ,
भावनाओ के धागे में बड़े छोटे ,रंग बिरंगी और सुगन्धित कई फूल किये हैं गुम्फित ,
श्री राम जय राम जय जय राम ,श्री राम जय राम जय जय राम ,
तन में मन में जन जन में बसा बस एकही नाम ,
रामही अगन ,रामही पवन ,रामही गगन ,
रामही अवनि ,रामही पानी ,
ब्रम्हान्ड हो या पिंड हर कण कण में तूही तू ,
चारों पुरुषार्थो में ,वर्णाश्रम वेदोंमें तूही तू ,
केवट हो या शबरी ,अहिल्या हो या सोने की नगरी ,
जटायु हो या भालू ,वानर हो या गिलहरी ,
चराचर का तू ही तू पालनहारी तारनहारी ,
भक्ती हो या शक्ती प्रेम प्रतिक्षा और तपस्या में मुक्ती की तृप्ती ,
श्रद्धा ,विश्वास निष्काम कर्म ,सदा अनुकरणीय तुम्हरी नीति ,
वाल्मिकी हो या तुलसी सकल रचनाकार राम चरित पर कोटि कोटि बलिहारी ,
न भूतो न भविष्यति ऐसा राम लला की प्राण प्रतिष्ठा ऊत्सव देख धन्य भई दुनिया सारी ,
नयनों और भावनाओं ने किया लल्ला पर जलाभिषेक ,सकल सनातन भयो एक पुजारी ,
जनसागर के स्वागत की माँ शरयू ने की अभूतपूर्व तैयारी ,
शतशः नमन भारत माता ,ॐ नमो नमो ,मोक्ष दायिनी अयोध्या नगरी ,
राम से राष्ट्र और देवसे देश तक करने चेतना विस्तार वचन बद्ध कारसेवक ,राजा और सहकारी ,
अब प्रजा को कर्तव्य पूर्ति हेतू कसनी होगी कमर ,स्वाभिमान रक्षण हेतू  सब उपरवाले के आभारी ,
भारत माँ के चरणोंकी सेवा हेतू सदा तैयार रहे असंख्य भारतवासी बनकर  महाबली ,पवन सुत रामदूत ,गदाधारी ,
अयोध्या का अर्थ जहाँ हो ना युद्ध ,प्रश्न सुलझे सुसंवाद से ,किन्तु दण्डित तो होगाही अत्याचारी ,
फिजूल की माँगो  के लिए नाहो दंगा फसाद ,मोर्चे ,मारपीट,कृत्य कोई विनाशकारी ,
मार्ग क्रमण हो व्यक्ती से समष्टी की ओर ,कर्म वही जो देश के सर्वांगिण विकस में हितकारी ,
वसुधैव कुटुम्बकम ”की भावना का जतन -वर्धन करनेहेतु मानवको  दो सदबुद्धि दशरथ नंदन -अवधबिहारी ,
जय श्रीराम ,कौशल्या नंदन ,मर्यादापुरुषोत्तम -सीताराम-कोदंड धारी  I 
         आसावरी जोशी 

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

Vijay Anjali shubhecha patr


विजय -अंज 
विजय  सष्ठब्दी पूर्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा आमच्या परिवारा कडून ,
ईश कृपेने लाभो तुजसि चिरायु -आरोग्य-सुख-समाधान भरभरून ,
क्षण आनंदाचा असो वा अडचणींचा तेथे असतोस तू हजर आवर्जून ,
पडेल ती जवाबदारी समर्थ पणे पेलतोस पडद्या मागे उभा राहून ,
आई -बाबांचा वारसा पुढे नेत आहेस सर्वांशी स्नेह संबंध जोडून ,
सहचारिणी ची साथ लाभली ‘अंजली ‘ भरून ,
उभयतांच्या आनंदाला द्विगुणित करोत भार्गवी पिनाक मिळून ,
अमृता ची गोडी सहस्त्र चंद्रा ची शीतलता अनुभवत चाल तू शतकी पंथा वरुन . 
       आसावरी  जोशी  आणि परीवार 

अतुल -सुवर्णा——शुभेच्छा पत्र

 अतुल -सुवर्णा——शुभेच्छा पत्र 

स्नेह बंधाचे रूपांतर झाले नाते संबंधात ,विश्वास दृढ झाला काही म्हणीवर ,
लग्नगाठी स्वर्गातच बांधल्या जातात ,फलश्रुति असते स्वयंवर ,
प्रत्यक्षाला प्रमाण कशाला !जोड्या जुळल्या खाडिलकर -घाणेकर अन खाडिलकर - मे णोलीकर ,
अतुल -सुवर्णा जोडी जणू लक्ष्मी-नारायण च निवास करिती भुईवर ,
रोहन -कुणाल जणू सूर्य चंद्र तव उभयतांच्या नभांगणावर ,
ऋचा ,प्रणिता सुविद्य सुसंस्कृत सुना ,स्वागत करिती परिजनांचे जोडोनिया दोन्ही कर ,
लग्न गाठ अन वर्ष गाठ योग आला मणी -कांचन  ,सकलां  च्या तोंडात पडो तूप साखर ,
हेमंत प्रतिभा चा  वारसा  पुढे नेलातच ,घातली त्यात सवाईने भर ,
अतुल आप्त -मित्र-परिवारासाठी तू आधारवड अन गाईड -फ्रेंड-फिलॉसॉफर ,
सहा दशका प्रमाणे अमृत -सहस्त्र चंद्र दर्शन अन सुवर्ण झळाळीची वर्षे लाभो शंभर ,
लाभो तुजसी चिरायुष्य -आरोग्य-सुख समाधान हीच सदिच्छा अन प्रार्थना ठेऊनी माथा श्री चरणावर . 
     आसावरी  जोशी  आणि परिवार 

मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०२३

माझे आजोळ १९-११-२०२३

 


  माझे आजोळ  १९-११-२०२३
नाना -माई ना स्मरून प्रार्थना करते ,कृपा असूद्या आजोळावर देवी दुर्गे आणि व्याडेश्वर ,
पंच तारका -तीन सुपुत्रांनी धन्य जाहले कुटुंब  चिं . पु . देवधर ,
जामात -सुना,नातवंडे -पतवंडे ,वटवृक्षाच्या पारंब्या रुजल्या दूर दूर अन खोलवर ,
समाधानी सुंदर आजोळ चे घर हसू असूदे सदा त्याच्या चेहऱ्यावर ,
आत -बाहेर माणसांची वर्दळ ,भर असतो सदा सुसंवादावर ,
प्रवेश करिता स्वागत करिती दारे ,जणू जोडलेले दोन कर ,
उभे असावे सदा न डगमगणाऱ्या पायावर ,
भुई भासती मातेची मांडी ,छप्पर जणू आजीचा मऊ ऊबदार पदर ,
भिंती ,खिडक्या ,आणि झरोखे नाकी डोळी सुंदर ,
रंग -रंगोटी ,फर्निचर जणू साज चढविला जातीच्या सुंदरीवर ,
द्रौपदीची थाळी आणि अन्नपूर्णेच्या पळीने सजले इथले स्वयमपाकघर ,
येथे आला गेला ,पै पाहुणा ,मनाच्या मोठेपणात वसतो , हिशोब नसे चौरस फुटावर ,
स्वयं पाकघर ,देवघर ,माजघर ,तळघर ,अंगण ,ओसरी ,काही खोल्या माडीवर ,
पूर्वीचे झोपाळा ,कोनाडा ,खुंटी ,सोवळे ,ओवळे मोरी न्याहारी ,बंब ,शेणी ,तिन्ही सांजचे म्हणणे ,कित्येक शब्द हल्ली येतच नाहीत कानावर ,
चुलत ,मावस ,आत्ते ,मामे अशी भावंडे सुट्टीत जमत डझनावर ,
संदीप -स्वराली ,सुनिता -सुषमा आणि समस्त परिवाराने जपला विश्वनाथ -वसुधाचा वारसा अतिशय सुंदर ,
वसुधा मामी आणि संदीप तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ,सदा सुख समृद्धी आणि आयुष्य लाभो आरोग्य पर ,
मान करावा कुणीही असे नाती जपणारे आहे अजोळीचे घर ,
ही वास्तू कर्तव्य पूर्तीत आनंदी असते ,झाली वर्षे सव्वाशे च्या वर ,
जन्म स्थानी चार पिढयांना एकत्र आणले त्या साठी देवधर कुटुंबाचे आभार ,असेच योग येत राहो वरचे वर . 
Asawari joshi

रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

मैत्र

फुलांसाठी रंग सुगंधाची उधळण करते धात्री,
रांगोळीतील ठिपके आणि  गाजाऱ्यातील धागाआपले अस्तित्व संपवातात,म्हणून 
मोहक सौंदर्य साठवता येते नेत्री,
दोष झाकून गुणांना उजळणारी असते खरी मैत्री .🤝🙏🤝🙏🌹 मैत्र दिनाच्या खूप शुभेच्छा 
                                              आसावरी जोशी

सोमवार, १७ जुलै, २०२३

चि . राजीव यांस -शुभेच्छा पत्र


चि . राजीव यांस -शुभेच्छा  पत्र 
राजीव तव जन्माने धन्य जाहले मात -पिता अन कुटुंब भिमन वार 
साठाव्या वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद आम्हा कडून भेट वस्तू म्हणून स्वीकार ,
अमृत -सहस्रचंद्र दर्शन-शतका सारखे शुभदिन येत राहो तव जीवनी वारंवार ,
आदर्श पुत्र -पती-पिता -मित्र तू सर्वच नात्यांना दिलासा सुंदर आकार अन आधार ,
अर्धांगिनी लाभली “दीपा ”सम शिवातील शक्ती चा साक्षात्कार ,
गीतिका -कृत्तिका च्या रूपाने निराकाराचे रूप जाहले साकार ,
शीघ्र लाभू दे सदगुणी जावई ,फुलुदे उभयतांचा संसार ,
एका हाकेला कुणास ही मदतीला धावून जाण्याचे तुम्हा वरी सुसंस्कार ,
अजातशत्रू तू ,जपत आलास रक्ताचा अन जोडलेला परिवार ,
लाभो तुजसी आयु -आरोग्य-सुख-समृद्धी-समाधान ,हीच प्रार्थना करुनि परमेश्वर चरणी शतशः नमस्कार . 
          आसावरी जोशी आणि परिवार