गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

गणित एक अवघड विषय

                    गणित एक अवघड विषय 
घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच व्हावे 
उजव्या हाताने देताना ,डाव्याला माहित नसावे ,
दोन्ही हाताने घेताना व्याजाचे गणित पक्के असावे ,
दातृत्वाच्या कडीने वाढत -वाढत साखळी व्हावे ,
समाजात देणारे जास्त ,घेणारे नाममात्र उरावे .

इच्छा

                          इच्छा
आपलीच भाकरी भाजणे हातर स्वार्थ ,
कुटुंबाच्या भाकरी भाजण्याला आहे अर्थ ,
लष्कराच्या ..... भाजणे म्हणजे परमार्थ ,
इच्छा मागणे एकच -सार्थ जीवन न जावो व्यर्थ .

घडलं -बिघडलं

                      घडलं -बिघडलं 
आयुष्यात घडायचे ते घडतच असते ,
चांगले घडले म्हणून उतू नये ,
वाईट घडले म्हणून खचू नये ,
आपण चांगल्या साठी निमित्त झालोतर 'लकी '
मात्र कुणाच्या वाईटाला कारण होऊ नये नक्की ,

चाहुल

                  चाहुल 
दुधापेक्षा साय गोड असते ,
मुद्दलीला व्याजाची जोड हवीहवीशी असते ,
मुलांपेक्षा नातवंडांची ओढ असते ,
आई च्या भूमिकेत कडक -शिस्तप्रिय असते ,
आज्जी झाली की कधीतरी चुकीचीही कड घेत असते ,
कळते पण वळत नाही  कारण ती भूमिका जगत असते ,
दुधापेक्षा साय पचायला जरा जडच असते . 

माणुसकी

             माणुसकी 
दुसऱ्याच्या दुःखात होणे दुःखी ,
सुखात होणे सुखी ,
हीचतर खरी माणुसकी ,
सोपी आहे डेफिनेशन ,
किती अवघड ऍप्लिकेशन ,
बरेच असतात आपल्या दुःखात सुखावणारे ,
आणि दुसऱ्याचा सुखात हळहळणारे ,
तिसरा प्रकार "घातकरी "
'मुंह में राम बगल में छुरी '

भवसागर

                   भवसागर 
कुणाला आवडेल का दुःखाला मिठी मारणे !
भावतेच ना आरपार पोहत जाणे ,
गोते खाण्यापेक्षा बरे एखाद्या आधाराने थांबणे ,
डुबताना काडीचाही आधार भक्कम वृक्षासम वाटणे !
संधी मिळताच अनिवार्य पुन्हा हात -पाय मारणे ,
भाग्यात लागते आधार अन संधी लाभणे ,
पुढे आपल्याच हातात असते संधीचे सोने करणे ,
शेवटी आनंद टिकवायचा असेल तर उत्तम  असते प्राप्त परिस्तिथी स्वीकारणे ,
यालाच म्हणतात भवसागर तरून जाणे  ...... .... .... 
पुढची अवघड पाहिरी म्हणजे जिवा -शिवा ची गळाभेट होणे . 

सूर्य

               सूर्य 
छोटू -छोटू सूर्याने लावला गॉगल बघ ,दाटुन आले काळे ढग ,
मित्राच्या कपाळावर घामाच्या धारा ,वाहू लागला वादळ वारा ,
रवीने घेतला हातात ब्रश ,नभी चितारला इंद्रधनुष ,
भानुने बदलली अलगद कूस ,पडायला लागला उघडा पाऊस ,
खग बसला ढगा मागे जाऊन ,पाऊस आला धरणीवर धावून ,
भास्कर बुआंनी चढविला सोनेरी वर्ख ,तुम्हीतर राव ग्रह -ताऱ्यांचे अर्क ,
सोन्याच्या गोळ्याला नावे अनेक ,हिरण्यगर्भ -मरीच -आदित्य -सवित्र आणि पूषण ,
सकल सृष्टीचे सौंदर्य वाढविणारे तुम्हीचतर सुवर्ण आभूषण . 
सूर्याला वंदन करावे सदा ,म्हणजे लाभेल आरोग्य -संपदा