गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

ब्रह्मांड

                     ब्रह्मांड 
ब्रह्मांडी ते पिंडी ,पिंडी ते ब्रह्मांडी ,
धूलीकण -ओलावा -प्रकाश वायु संगे आकाशी अवतरले इंद्रधनुष्य ,
भूमातेच्या कुशीतून रंगछटांचा आनंद घेई ,पंचतत्वांचा कुंभ मनुष्य ,
निसर्गाच्या कुंचल्यातून चितारलेल्या रंगानांही लाभला मातीचा सुगंध ,
अगन -गगन -पवन -जीवन -धरण सर्वांचे मिश्रण म्हणजे निखळ आनंद ,निखळ आनंद . 

प्रश्न

                         प्रश्न 
सर्वांना दूरदेशी पाठवताना मन का जड होत नाही ?
त्यांच्याच सुखात आपले सुख ,म्हणून सोडायचे काही ,
पिल्लांचे पंख बळकट व्हावे म्हणून आधी झटायचे ,
उंच भरारी मारायला लागली की आपणच का पंख छाटायचे ?

प्रार्थना

                      प्रार्थना 
भूतकाळ उगाळायचा असेलच छंद ,
तर त्याचा असावा ,चंदनासम शीतल सुगंध ,
आला दिवस आनंदात जावो ही प्रार्थना असावी ,
भविष्याचे नियोजन असावे पण चिंता नसावी .

गणित एक अवघड विषय

                    गणित एक अवघड विषय 
घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच व्हावे 
उजव्या हाताने देताना ,डाव्याला माहित नसावे ,
दोन्ही हाताने घेताना व्याजाचे गणित पक्के असावे ,
दातृत्वाच्या कडीने वाढत -वाढत साखळी व्हावे ,
समाजात देणारे जास्त ,घेणारे नाममात्र उरावे .

इच्छा

                          इच्छा
आपलीच भाकरी भाजणे हातर स्वार्थ ,
कुटुंबाच्या भाकरी भाजण्याला आहे अर्थ ,
लष्कराच्या ..... भाजणे म्हणजे परमार्थ ,
इच्छा मागणे एकच -सार्थ जीवन न जावो व्यर्थ .

घडलं -बिघडलं

                      घडलं -बिघडलं 
आयुष्यात घडायचे ते घडतच असते ,
चांगले घडले म्हणून उतू नये ,
वाईट घडले म्हणून खचू नये ,
आपण चांगल्या साठी निमित्त झालोतर 'लकी '
मात्र कुणाच्या वाईटाला कारण होऊ नये नक्की ,

चाहुल

                  चाहुल 
दुधापेक्षा साय गोड असते ,
मुद्दलीला व्याजाची जोड हवीहवीशी असते ,
मुलांपेक्षा नातवंडांची ओढ असते ,
आई च्या भूमिकेत कडक -शिस्तप्रिय असते ,
आज्जी झाली की कधीतरी चुकीचीही कड घेत असते ,
कळते पण वळत नाही  कारण ती भूमिका जगत असते ,
दुधापेक्षा साय पचायला जरा जडच असते .