मंगळवार, १२ जानेवारी, २०१६

।।दगडाची कहाणी ।।

        

   


             ।।दगडाची कहाणी ।।
दगडा पेक्षा वीट मऊ ,दगड डोके ,पाषाण हृदय काय काय तो शब्दांचा मारा ,
याच पाषाणाच्या हृदयातून फुटतो ,पाण्याचा शीतल झरा ,
माती म्हणजे काय?तप -नी -तप झिजून दगडाचा होणारा चुरा ,
माती -पाणी -पाषाणा पासूनच उभे राहते ,देऊळ -गढ -निवारा ,
माणूस राहतो शांत सुरक्षित ,असो शत्रू किंवा उन्ह -पाऊस -वारा ,
छिन्नीचे घाव सोसूनच देवपण येते ,आधी असतो दगडाचा एक चिरा ,
पाषाणाच्या मूर्तीला नसे भेद -भाव ,राजा -रंक -काळा -गोरा ,
खाणीत सापडणाऱ्या सोन्याने कळस शोभतो सोनेरी चमचमणारा ,
काळ्या दगडाच्या पोटातच सापडतो ,मुकुटात लखलखणारा हिरा ,
दगड असोनि भक्तिचा भुकेला ,जेऊ घालती शिंपी -माळी -कुंभार -राधा आणि मीरा . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा