शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

।।नाती-गोती ।।




भयंकर परिस्थितीत बळ देतात ,बाबांचे चार शब्द ,
घाबरू नकोस कायम मी आहे तुझ्या पाठीशी ,
दुखः वेदना सहन करायची शक्ती मिळते ,
कारण माहित असते ,आई जागत बसली असणार उशाशी ,
एक मायेचा तर दुसरा भक्कम आधाराचा हात सहप्रवासात ,
सहज दोन हात करू शकतात कोणत्याही वादळाशी ,
तुझे माझे पटेना अन तुझ्या वाचून करमेना असले तरी ,
भावंडे हवीतच मनातले ओळखायला ,वाटून खायला ,खेळायला एकमेकांशी ,
सुख वाटले तर वाढते ,दुःख वाटलेतर विरते ,
रक्ताची अन नात्याची चार माणसे हवीतच गाठीशी ,
एका हाकेला मध्यरात्री धावून येणारा शेजारी अन मित्र ,
त्याची तुलना तर फक्त देवदूताशी ,
कायम जपावा धागा ,जोडणारा मनाला मनाशी ,
माणसाची मैत्री जमते अमूल्य अश्या आयुष्याशी .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा