शनिवार, ९ जानेवारी, २०१६

।।पंचतत्व =पाचबोटे ।।


                           ।।पाचबोटे =पंचतत्व ।।
पाच बोटे म्हणजे पंचतत्वांचे प्रतीक ,मान मिळाला किती मोठा ,
अग्नि -वायु -आकाश -भू -जल ,यांचा अंगठा -तर्जनी -मध्यमा -अनामिका-कनिष्ठात एकवटला साठा ,
कशाला काट्या चमच्याचा आटापिटा ,अंगठा -तर्जनीचा देवाने दिला चिमटा ,
मध्यमाने मस्त लोणच्याचा खार चाटा ,पापड -पापडी -सांडगीचा तोडावा तुकडा छोटा ,
मस्त मऊ भात खाताना ,चिमुकल्या अनामिका -कनिष्ठाचा मोठा वाटा ,
जाणिजे यज्ञ कर्मात अहुतिचा अमर्याद साठा ,
स्वच्छतेच्या खुळचट कल्पना ,करतात आपलाच तोटा ,
बोटे चाटून ,भुरकून खाल्यानेच ,साफ राहतो कोठा ,
रगडा -मिसळ ,नूडल -पास्ता खाण्यासाठी क्षम्य असावा ,चमचा -सुरी -काटा ,
पंचतत्व पोहोचवतात षटरसांची ,खरी चव आपल्या ओठा ,
'पिंडी ते ब्रम्हांडी ',ब्रम्हांडी ते पिंडी ',जाणावा मंत्र मोठा. 









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा