सोमवार, ४ जानेवारी, २०१६

Homemakers tips



    १-तळणीचे प्रमाण बघूनच कढईत तेल घालावे . शेवटी थोडे तेल उरतेच ,त्यात  फोडणीचे साहित्य घालून gas बंद करावा . गार झाल्यावर फोडणी एखाद्या भांड्यात काढून ठेवावी . भरीत ,कोशिंबीर ,शिजवलेल्या  भाज्याना वरून घालायला  ही फोडणी वापरता येते . 
२-बरेच वेळा साबूदाण्याची खिचडी कधी कडक तर कधी मऊ गच्च तर कधी खाली लागते . अश्या वेळेस साबुदाणा थोडे पाणी ठेवून रात्रभर भिजत ठेवावा . सकाळी त्यात आवडी प्रमाणे मीठ ,साखर,दाण्याचे कूट,मिरचीचा ठेचा घालावा . जिऱ्याची फोडणी करून त्यात बटाटे परतावे आणि ही फोडणी साबुदाण्यात ओतून चांगले मिसळावे . लागेल तसे मिश्रण काचेच्या पसरट भांड्यात घालून साबुदाणा पारदर्शक होई पर्यंत मायक्रोवेव मध्ये ठेवावे . मधून -मधून मिश्रण हलवावे . खिचडी मऊ -मोकळी चांगली होते .
३-झटपट हळीवाचे लाडू करायचे असल्यास दुप्पट पाणी घालून ,हळीव १०मि . भिजत ठेवावे . त्यात योग्य प्रमाणात खोवलेला नारळ ,गूळ जायफळ -वेलची पूड घालून सारण एकसारखे करावे . गूळ वितळून सारण घट्ट होई पर्यंत मायक्रोवेव मध्ये ठेवावे . बाहेर काढून थोडे साजुक तूप घालावे . सारण गार झाल्यावर लाडू वळावेत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा