सोमवार, ४ जानेवारी, २०१६

Homemakers tips



    १-शिळाभात ,भाजी ,उसळ ,वरण खायचा कंटाळा आल्यास ,त्यात भाजणी किंवा दोन-तीन प्रकारची पिठे घालून कांदा घालून थालिपिठे करावीत . तसेच लोण्याखालच्या बेरीमध्ये थालीपिठाचे पीठ भिजवल्यास थालीपीठ खुसखुशीत होते . 
२-तांदुळाच्या रव्याची खांडवी करतो ,त्याप्रमाणे वरईची खांडवी पण करता येते . उपासाला चालते आणि पटकन होते . 
३-देवासमोर किंवा पंगती समोर रांगोळीची कचकच नको असल्यास ताज्या फुलापानांची किंवा मणी -मोती -कुंदन यांची तयार रांगोळी वापरू शकतो . 
४-दारासमोर टिकाऊ रांगोळी हवी असल्यास तांदूळ भिजवून त्याची पेस्ट करून वापरता येते ,लाल रंगासाठी गेरु पाण्यात भिजवून वापरावा . जास्त टिकाऊ रांगोळी oil पेंट ने काढता येते . 
५-घरातील चांदीची भांडी काळी पडूनयेत त्यासाठी भांडी पुठ्याच्या डब्यात ठेऊ नये . प्लास्टिक पिशवीत बांधून मग कापडात गुंडाळावी .
६-काळी पडलेली चांदीची भांडी टूथ पेस्ट /पांढऱ्या टूथ पावडर ने घासावीत . 
७-काळी पडलेली चांदीची भांडी लक्ख करण्या साठी एका मोठ्या पातेल्याला अलुम्युनियम foil लावून त्यात पाणी भरावे आणि पाणी उकळत ठेवावे ,पाणी उकळू लागल्यावर त्यात भांडी टाकावीत आणि १/२चमचे खायचा सोडा टाकावा . भांडी स्वच्छ झाल्यावर चिमट्याने एक एक वस्तू बाहेर काढून कापडावर वाळत ठेवावी . 
८-सोन्याचे दागिने रिठ्याने /लिक्विड सोपने टूथ ब्रश ने घासून स्वच्छ करावेत . 



    १-अष्टांग सुपारी -जेवणा नंतर मुखशुद्धी म्हणून अबाल -वृध्द सर्वांना चालणारी ही सुपारी पाचक -पौष्टिक आणि स्वादिष्ट ही आहे . ओवा,शोपा,वावडिंग,जवस,बडीशोप,ज्येष्टीमध,बदाम,किसलेले सुके खोबरे सर्व समप्रमाणात ,स्वादा पुरते लवंग ,वेलची ,सुंठ ,काळेमीठ ,साखर . सर्व पदार्थ गरम करून पूड करून काचेच्या बाटलीत भरून ठेवावी . 
२-तोंडल्याच्या काचऱ्या करताना खमंग परतण्या साठी बऱ्यापैकी तेल घालावे लागते ,पण भाजी झाल्यावर तेल शोषले जात नाही आणि डब्याला भाजी देताना त्यातून तेल बाहेर येऊ शकते . त्यासाठी भाजी होत आल्यावर उकडलेला बटाटा कुस्करून /१-२चमचे तांदूळ पिठी /बेसन घालून भाजी परतावी . भाजी जास्तीचे तेल शोषून घेते . 
३-कैरी प्रमाणे आंबट सफरचंद ,अर्धवट पिकलेले टोमेटो यांचा मेथंबा पण चांगला होतो . आंबटपणा कमी वाटल्यास गारझाल्यावर थोडे लिंबू पिळावे . 
४-गोड खूप आवडत असल्यास मुलांना अंजीर जरदाळू खजूर मनुका असा सुकामेवा खायला द्यावा . सीडलेस खाजुरात अकरोड बदाम पावडर करून त्यात थोडे तूप घालून स्टफ करावे . खाण्यास पौष्टिक आणि डब्यात द्यायला पण सुटसुटीत आहे . 
५-कारल्याचे काप करून मीठ लावून थोडे पिळावेत . नंतर कुरकुरीत होई पर्यंत मायक्रोवेव मध्ये ठेवावेत ,मधून -मधून हलवावेत . रोज जेवणा बरोबर ४-६काप खाल्यास कडूरस आहारात मिळतो . 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा