शुक्रवार, २९ जुलै, २०१६

सापशिडी -पेरावे तसे उगवते



                            सापशिडी 
साप शिडीचा पट उघडला ,फासातर तुझा तूच खेळ ,
दान पाडणे हातात असून नसते ,तोतर नशिबाचा खेळ ,
पुढे -मागे गोटी सरकवत ,बसवावा लागतो ताळमेळ ,
नियम खेळाचे माहित हवेत संपू शकतो केव्हाही खेळ ,
छोट्या -मोठ्या शिड्या मिळाल्यातर ,आनंदाची रेलचेल ,
सापाने जर गिळले तर ,फुकट जातो किमती वेळ ,
शेवट पर्यंत खेळायचाच असतो ,तिखट-आंबट -खारट -गोड ,मिश्र चवीची ती तर भेळ ,
चढ -उतार -धक्के अन वळणेघेत ,डेस्टिनेशन गाठते ,आपली रेल . 
                       पेरावे तसे उगवते 
कर्मावर -कर्तृत्वावर असावा विश्वास ,नसावा कामात नुसता आभास ,
यशाची आसच माणसाचा करते विकास ,पेरून उगवले नाहीतर माणूस होतो निराश ,
प्रयत्न करत रहावे ,जोपर्यंत आहे श्वास ,कमी प्रयत्नात मिळते यश ,तेंव्हा संचिताचा वाटा असावा खास ,
श्रद्धा -भक्ती -आस्था असावी डोळस ,शुद्धी अन सहवासा साठी असावेत उपवास ,
पार्थाचा मार्गदर्शक झाला सारथी ,आपण त्याच्या तत्वज्ञाना वर चालूया ठेवूनि विश्वास .                              



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा