शुक्रवार, २९ जुलै, २०१६

सकारात्मकता एक रामबाण उपाय



    
     
    

सकारात्मकता एक रामबाण उपाय 
नुसती चिंता चिता समान ,संकट समयी सकारात्मकता एक रामबाण ऊपाय ,
एकाकीपणात एकांताचे सुख अनुभवावे ,संकटालाही संधी समजावे ,
दुःखा मुळे असते सुखाचे अस्तित्व ,अंधारामुळेच समजते प्रकाशाचे तत्व ,
सकारात्मकता करते परिसाचे काम ,मग लोखंडालाही लाभे खणखणीत दाम ,
अर्थ --प्राण्यात प्राणी मनुष्य प्राणी ,चांगल्या -वाईटातला फरक जाणी ,
घर बनते प्रेमाच्या माणसांनी ,नाही नुसत्या दगड मातीच्या भिंतींनी ,
दिवस बनतो प्रकाशाने ,नाही नुसती रात्र संपल्याने ,
जीवन बनते कर्तृत्वाने ,नाही नुसत्या शरीराच्या जन्माने ,
मरण खुलते जळून उरलेल्या चांगल्या आठवणींच्या भस्माने . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा