बुधवार, २७ जुलै, २०१६

रेषा


                       रेषा 
देवाने जन्मापासूनच रेषा दिलेली असते आयुष्याची ,
प्रत्येकाच्या हातातच असते रेषा भूत -भविष्य -वर्तमानाची ,
काही ठळक -पुसट ,काही लांब -तुटक ,आधी परिक्षा मग तयारी माहीत नसलेल्या अभ्यासक्रमाची ,
नागमोडी मार्गाची पूर्वसूचना मिळालीच तर ,थोडे संथ थोडे सावध होऊन बदलावा मार्ग ,पण यात्रा चालूनच असते संपवायची ,
जाणीव असावी मनगटाच्या मर्यादा अन ताकतीची ,नको सवय दैवाला दोष देऊन जवाबदारी झटकायची ,
कष्ट -विवेकबुद्धी -सचोटीने संधीचे करावे सोने ,शर्थ असावी प्रयत्नांची ,
संकटांनाही समजावे संधी ,कला असावी अवगत रेषा काबूत ठेवण्याची ,
परिस्थिती बदलणे शक्य नसेल तर थोडे स्वतः बदलून किल्ली जपावी आनंदाची ,
प्रत्येकाच्या रेषा वेगवेगळ्या ,नको तुलना कुणाशीच कुणाची ,
जगी सर्व सुखी असा कोण आहे ?ओळख असावी या तत्वज्ञानाची ,
स्वतः शी राहून प्रामाणिक ,काहीवेळा ठेवावी लागते झाकली मूठ सव्वा लाखांची ,
मग इतारांपेक्षा आपणच सुखी ,प्रचिती येईल या चिरंतन आनंदाची

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा