बुधवार, २७ जुलै, २०१६

. वाचणे -वाचणे



.                              वाचणे -वाचणे 
विविध भाषा शिकता येतात अन ,पुस्तके वाचता येतात ,
अक्षर ,शब्द ,वाक्य व्याकरण आणि बरेच काही भाषा शास्त्राचे टप्पे असतात ,
कधी शब्दशः अर्थ तर कधी मतितार्थ दडलेले असतात ,अभ्यासाने ते उमगतात ,
थोड्या फार फरकाने शब्दांची सगळे सारखीच उकल करतात ,
'वाचेल तो वाचेल 'खरच आहे ,पुस्तके जीवनभर साथ निभावतात ,
      म्हणे पुस्तकांप्रमाणे चेहरे पण वाचता येतात ,वाचायचे असतात ,
पण त्याचे निश्चित असे काही शास्त्र नसते ,थोडे सहवासाने ,थोडे अनुभवाने जमू शकते ,
कधी -कधी मनातले चेहऱ्यावर उघड -उघड दिसते ,
एकाच्या मनातले दुसऱ्याच्या कानात बिनतारी पोहोचते ,
कधी 'मुंह में राम बगल में छुरी 'सारखे असते ,
जसे दिसते तसे प्रत्येक वेळी नसते ,म्हणून तर जग फसते ,
मुखवटा ओळखणे अन त्यामागचे वाचणे तसे अवघडच असते ,
कळे -कळे पर्यंत नाट्य संपलेले असते ,
मात्र आपण खुली 'किताब असणे सर्वस्वी आपल्याच हातात असते ,
कधीतरी लेकी बोले सुने लगे ,तर कधी शालजोडीतूनही मारावे लागते ,
आजार होऊ नये अगर चिघळू नये म्हणून काळजी ही घ्यावीच लागते ,
गोड -गुळगुळीत वेष्टनात कडू औषध लपवावे लागते ,
फक्त निरोगी -सशक्त राहण्यासाठी ,जोडलेले टिकवण्या साठी ,थोडेफार कोटिंग माफ असते ,
नाहीतर बोलावे तैसेचि चालावे हेच सर्व नात्यांसाठी पोषक असते ,उत्तम असते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा