शनिवार, २ जुलै, २०१६

Bramhakamal



                  ब्रम्हकमळ 
परसबागेतील कळी ते निर्माल्य असा ब्रह्मकमळाचा जीवनक्रम बघितला अन खालील ओळी सुचल्या 
बिजातून ,कंदातून ,काडीतून ,तर काही रोपे अंकुरतात पानाच्या पोटी ,
अचूक अचंभित करणारी ,ब्रह्मदेवाची सृष्टी 
नैसर्गिक पावसाने चिंबून नखशिखान्त ,फुलती डुलती पानफुटी ,
काळोखात काही घटिकांचे घेऊन आयुष्य ,शुभ्र सुरभित ब्रम्हकमळ उमलती ,
किती पेक्षा कसे जगावे ?याचा सुंदर पाठ शिकविती ,
अचल असुनही गुणांमुळे ,चालुन येती लोकच ,फुलोऱ्याच्या अवती -भवती ,
जागृत राहुन तव फुलण्याची वाट पहाती ,मन नयन नासिका ते तोषविती ,
उत्पत्ती -स्थिती -लय या जीवनक्रमाचेच जणू दर्शन घडती ,
ब्रम्हा -विष्णु -शिवांश घेउनी जणु प्रकटले त्रिमूर्ती ,
देव म्हणा वा शक्ति ,श्रद्धा -भक्ती वा चमत्कार ,पंगू भासे मानव मती ,
मतीवरी करुनि मात ,मनापासूनि नमन करोति -नमन करोति 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा