शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

महापुरुषांच्या अर्धांगिनी

          महापुरुषांच्या अर्धांगिनी 
भोवल्या वरून जाणाऱ्यांमुळे ,जगतासी दासबोधाचे समर्थ ज्ञान घडे ,
कन्यारत्न कोंदणाविना ,पडले अचानक उघडे ,
पाचा पतींची पत्नी ,अंग झाकाया वस्त्रासाठी रडे ,
अग्निदिव्य ,वनवास सोसुनी सीता सुत आश्रमात वाढे ,
पत्नी -पुत्र -वैभव सोडूनि ,सोडविले सर्वांच्या दुःखाचे कोडे ,
दूध अन अश्रुंचा ओलावा जपत ,माँ यशोधरेने भोगले राजवैभव कोरडे ,
लक्ष्मणाला आदर्श भावाचा मान मिळाला ,सर्वस्व अर्पूनि रामापुढे ,
दिसले का कुणा ,उदास उपेक्षित उर्मिलेचे ,काळजातील ओरखडे ?
अहिल्या ,तारा मंदोदरी ,कस्तुरबा कित्ती कित्ती नावे येती पुढे ,
'साकेत -यशोधरा 'रचुनि कविश्रेष्ठांनी यांचे ऋण फेडिले अल्पसे थोडे ,
जगताच्या कल्याणासाठी आनंदाने तिने सोसले केवढे ....... 
'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा