गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

आजोबांची खंत

 आजोबांची खंत 
फिरायला जाताना अचानक पाऊस आला ,
बंद दुकानाचा आडोसा ,शोधावा लागला ,
उभ्या -उभ्या काय करणार ?
लोकांची लगबग बडबड आणि सरींचा नाच न्याहाळला ,
शेजारी आजोबा लोकांचा कट्टा होता जमला ,
राजकारण ,अर्थकारण ,समाजकारण ,आपल्यावेळेस असे नव्हते ,संवाद ऐकला ,
चार बायका जमल्याकी जेवण -खाणं ,साड्या -दागिने ,घर -दार सगळ्याचा होतो काला ,
या बाबतीत बायकांना नावे ठेवण्याचा पुरुष वर्गाने ,जणू चंगच आहे बांधला ,
गम्मत म्हणजे कट्ट्यावर ,आजोबा लोकांचा कोंडमारा ,बांध तोडून बाहेर होता पडला ,
पेन्शन आहे ,फ्लॅट आहे मुले आहेत ,खंत एकच ,जोडीदाराने लवकर संग सोडला ,
तिची किंमत ती गेल्यावर कळली ,वाटू लागलंय जणू आपला उजवा हातच मोडला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा