शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

आषाढी चित्रगीत

     
      

       आषाढी चित्रगीत 
माउली माउली संतांची सावली ,दारी तुळस लावली ,गळ्यात माळ घातली ,
रुपेरी रथ ,सोनेरी पालखी ,त्यात रायाचे आसन ,संगे चाले वारकरी डोक्यावरी वृन्दावन ,
टाळ -मृदूंगा संगे विठूचे भजन ,मुक्कामी करती पादुकांचे पूजन ,
येई वासुदेव टोपी मोर पंखांची घालून ,फेर फुगडी रिंगण विसरुनि देहभान ,
भक्तीची सरिता ,भेटे सागरी उन्मन ,भेटे सागरी उन्मन .
लीन झाले लाखोलॊक नामाच्या गजरात ,राव -रंक ,लहान -थोर ,नसे जातपात ,
तहान भूक विसरुनि चालती उन्हा पावसात ,शंका दाटे मनात ,जाता येईल का गाभाऱ्यात !
विठू भक्तीचा भुकेला कसा राहिल फक्त देवळात ,
उभा कळसावरी ही दिसतो ,ठेऊन कटी वरी हात ,
झाले जीवन सफल जाऊनि पंढरीत ,जाऊनि पंढरीत . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा