सोमवार, ८ ऑगस्ट, २०१६

मित्र

             मित्र 
मनातले आड -पडदा न ठेवता बोलता येते तो मित्र ,
कधी -कधी न बोलताही कळते ,भेटण्यासाठी लागत नाही आमंत्रणपत्र ,
एकाहाकेत पांचालीला महासंकटातून सोडविणारा सखा ,
कधीकधी मनातील हाक आधीच ऐकूजाते शब्द येण्यापूर्वी मुखा ,
ना रक्ताचे ना मानलेले पण न ठरवता एखाद्याशी जुळून जाते नाते मस्त ,
अश्या अजब रसायनाला म्हणतात ,जिवा भावाचा दोस्त ,
दोस्ती एक दौलत ,जमवणे अवघड ,गमावणे सोपे ,जपावी जिवापाड ठेवून किंमत रास्त ,
यारीचे नाते असते रेशमी तलम आर पार दिसणारे ,
जपून ठेवलेल्या ,पुस्तकातील पिंपळपाना प्रमाणे ,उघडून पहाताच ,जुन्या आठवणी जागवणारे ,
सिक्ससेन्स -टेलीपथी असे काहीतरी असणारे ,दूर राहून सुध्दा जवळ ठेवणारे ,
नुसते नसावे गोड गोड बोलणारे ,वेळ पडल्यास कठोर बनून चुका सुधारायला लावणारे ,
घट्ट बंधनात असून जखडून न ठेवणारे ,पार्थ -सारथ्या सारखे योग्यवेळी योग्य दिशा दाखवणारे ,
आजन्म साथ निभावणारे ,कृष्ण -सुदाम्याच्या पोह्यांची आठवण करुन देणारे ,
एखादे तर धन्य असते आठवण रूपाने पिढ्यानपिढ्या ,जगापुढे आदर्श ठेवणारे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा