शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

गुढीपाडवा

         गुढीपाडवा 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ,आज नव -वर्षाचे झाले आगमन ,
स्वागताला उभी ,थोडी नमलेली  गुढी, पात्र -वस्त्र  ,रंग -सुगंध ,कडू -गोडाचे सुंदर मिश्रण ,
तसेच नानाविध गोष्टींचे मिश्रण असते आपले जीवन ,
आंबा -कडुलिंबाची  हिरवी फुललेली डहाळी सांगे ,सुख म्हणजे समृद्धी अन स्वास्थ्याचे अजोड मिलन ,
शुभ्र गोड गाठी बनती ,साखरेचे कण -कण विरघळून तापवून ,
नात्यातील अखंड गोडवा टिकवण्या साठी ,छोटीशी गाठ घ्यावी लागते खपवून ,
तोरणातील विविध रंग शिकविती ,आयुष्यातील प्रत्येक प्रवेश बहरु द्यावा त्या त्या रंगात रंगून ,
ठिपके जोडून काढलेली रेखीव रांगोळी सांगती  ,समाजाने  प्रगत व्हावे ,एकमेकासी धरुन ,
आपणासी सुख -समृद्धी -स्वास्थ्य -समाधान घेऊन येऊ दे ,नव -वर्षातील प्रतिदिन . 
                                                                आसावरी जोशी
                 २--गुडीपाडवा  
संवत्सराचे स्वागत करूया गुडी उभारून ,
नात्याचे तोरण ठेवू प्रेमाने बांधून ,
गाठीतील गोडवा सदा असावा जिभेवर टिकून ,
आरोग्य जपायला ,कधीतरी कडूलिंबही घ्यायचा असतो गोड मानून ,
नववर्षाच्या शुभेच्छा देऊ ,सर्वांना हात जोडून ,
सर्वांना सुख -समृद्धी -समाधान लाभो हीच प्रार्थना मनापासून . 
                                     आसावरी जोशी . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा