शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

आयुष्यातील अध्याय

                  आयुष्यातील अध्याय 
आयुष्याच्या ग्रंथातील सरत असतात अध्याय ,चांगले -वाईट ,क्लेशकारक ,तरी अपरिहार्य ,
परिक्षा पास करायची तर ,काही आवडते ,काही नावडते ,असतात विषय अनिवार्य ,
जसे इच्छा नसताना पडतच असतात ,चांगल्या सोबत स्वप्ने ,वाईट घाबरवणारी ,
जाग आल्यावर वाईट ते विसरून जायचे ,कारण वाट पहात असते ,रोज एक पहाट सोनेरी ,
वनवास -वटिकेतील निवास -राजमहाल ते आश्रम प्रवास ,कित्ती त्या अग्निपरिक्षा ,
सुवर्ण असो  वा सीता यांना कधीच वाटली नाही ती शिक्षा !!!!!!
सिद्ध -शुद्ध -आदर्श राहायला ,द्याव्याच लागतात अश्या अनेक परिक्षा ,
अनुभवाने रुंदावत असतात ,आयुष्यातील आयाम आणि कक्षा ,
पहिले पान जन्म ,शेवटचे मृत्यु ,मधली पाने' त्या 'ला माहीत ,प्रत्येकाच्या हाती पुस्तके न्यारी -न्यारी ,
परिस्थितीचा हसत स्वीकार ,सकारात्मकता ,कर्तव्य -निष्ठा ,जीवनाला देत असते उभारी ,
इंट्यूशन ,टेलिपथी ,सिक्सथसेन्स च्या स्वागता साठी ,उघडे असावे लागते ,अंतःकरणाचे  द्वार ,
स्थूल अंतराला नसते महत्व ,अनुभूति साठी जुळावी लागते ,मनाची तार ,
अनुभूति म्हणजे ओमकार नाद ,घंटेची किंकिण ,वाद्यांची मोहक झंकार ,
मनाला समजुत घालण्या साठी ,कर्माचा सिद्धांत पडतो ,खूप उपयोगी ,
भोग चुकलेत का कुणाला ?मर्यादा पुरुषोत्तम राम असो वा कृष्णा सम महायोगी . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा