शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

शब्दांची जादू +शब्दांची मजेदार व्युत्पत्ती

शब्दांची जादू

          शब्दांची जादू 
काही शब्द उलट -सुलट लिहिले वाचले तर कधी पोषक होतात तर कधी घातक ,
फक्त -वजा चिन्हाचाच केला विचार तर सगळेच भासे नकारात्मक ,
उभा -आडवा केला विचार तर +अधिक पदरी पडे सकारात्मक ,
वन -वास सर्वांनाच वाटे अप्रिय ,
नव -नव्याची आस जिवासी वाटे प्रिय ,
मन काबूत नसेल तर सैरा वैरा पळे ,
नम -वता आले तर योगेश्वर कळे ,
कुकर्मांची परिणिती असणारच नरक ,
सत्कर्म कर न -कर न सतत बिंबवून आचरणात पडतो चांगला  फरक ,
अंतिम सत्य असे मरा ,असुदे योनी कोटी चौऱ्यांऐंशी ,
त्यातील राम ,कळला ज्याला ,त्याचाच होई वाल्मिकी ऋषी ,
प्रवाहा बरोबर वाहत जाते ती धारा ,
विरुद्ध वाहून उगमा कडे जाते ती कृष्ण बावरी राधा -मीरा .
           शब्दांची मजेदार व्युत्पत्ती 
मिठाची ( सॉल्ट )गरज भागवण्या साठी केलेले अर्थार्जन म्हणजे salary ,
सूर्या सारखी गोल गरम जीवदान देणारी अन भूक भागविणारी भास्करी ,
चांदवी म्हणजे शेवटी केलेली मुलांना आवडणारी छोटीशी भाकरी ,
प्रातः समयी झोपून रहावे अशी वाटणारी झोप गोड साखरी ,
सुलभते साठी झाले अपभ्रंश अन बदल ,पण समृद्धच  झाली , भाव जपूनि अंतरी ,
स्थल -काल -परिस्थितीनुरूप बदल स्वीकारण्याची लवचिकता शिकविते भाषासुंदरी .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा