शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

अयोध्येतील श्री राम मंदिर भूमिपूजन हस्ते -पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी—बुधवार दिनांक पाच ऑगस्ट २०२०

                   अयोध्येतील श्री राम मंदिर भूमिपूजन 
                 हस्ते -पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी—बुधवार दिनांक पाच ऑगस्ट २०२०
अयोध्या नगरीत अभिजीत मुहुर्ती ,श्री राम मंदिराचे ,होते का ते केवळ भूमि पूजन !!
ते तर आपुल्या धर्म -पुराण—इतिहास -कला—साहित्य -संस्कृती अन वचन—पूर्तीचे जतन ,
आदर्श ठरले संत -महंत विभिन्न प्रतिनिधी अन राष्ट्र प्रमुखांचे सेवाभावी वर्तन ,
लघु असो वा महत्तम ,अफाट काटेकोर होते ,या सोहळ्याचे पूर्व -पश्चात नियोजन ,
रामनामाच्या सागरी ,भक्ती -सरितेचे झाले दीर्घ विरहा नंतर मिलन ,
बत्तीस वर्षांची होती तपस्या ,पंचतत्वांच्या साक्षीने नव-शिळांचे झाले पूजन—अर्चन ,
खूप काही शिकवुनि गेले ,राष्ट्रप्रमुखांनी केलेले साष्टांगसह वंदन ,
“जय सियाराम “च्या घोषाने अधोरेखित झाली ,स्त्री शक्तीची आन -बान -शान ,
समयोचित संदर्भ देऊन ,आबाल -वृद्ध—वैद्यांचा वृद्धिंगत केला मान ,
आत्मनिर्भरते सोबत देऊ केले ,भारतीय असल्याचे अमूल्य आत्मभान ,
सर्वोत्तम मानवी मूल्यांचे -गुणांचे स्वरुप म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम ,
त्याग -तपस्या-प्रेम -करुणा-कर्तव्य-बलिदान -न्याय आदिंची मूर्ति म्हणजे राम ,
कौसल्येचा पोटी ,दशरथ ओटी ,शरयूकाठी ,अवधवासीयांच्या ओठी “लल्ला राम ”एकच नाम ,
विराम म्हणजे थांबणे ,गती -प्रगती हवी तर आयुष्यात हवाच कालातीत-देशातील -दिशादर्शक राम ,
नरेंद्राने रोवले रोप ,का !पारिजातकाचेच ,पवित्र मंदिर परिसरी ,
आणले होते या स्वर्ग फुलासी श्री कृष्णानें ,स्वर्गतुनी भूवरी ,
धर्म -पुराण-आयुर्वेद -साहित्यात असे मान ,सकल देवी -देवतांसी प्रिय ,शोभे त्यांच्या शिरी ,
रंग -सुगंध-नाद नाजुक -मखमली स्पर्श ,सोबतीला औषधी गुण नानापरी ,
तन-मन-धन अर्पित करणाऱ्या सुबुद्धांची ,वाढत राहो वंश वेल ,द्या वरदान ब्रम्हा -विष्णु-कैलाशपती ,
कार्य सिद्धीस जावो हीच प्रार्थना ,प्रथम पूजनिय गौरी नंदन गणपती ,
रक्षण करण्यासी समर्थ आहे ,चिरन्जीवी -रामदास-हनुमान-अंजनी पवन सुत-राया मारुती . 
                                        आसावरी जोशी . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा